Back
लातूर सहित राज्य के सोयाबीन दामों में बड़ी गिरावट, कीमतें गिरकर 4900-5200 के दायरे में
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 16, 2026 09:15:55
Latur, Maharashtra
लातूरसह राज्यात सोयाबीन दरात मोठी घसरण…सहा हजारांवरून दर पाच हजारांच्या खाली. लातूरसह राज्यातील बाजारपेठेत सोयाबीनचे दर सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र मागील चार दिवसांपासून दरात सातत्याने घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अतिरिक्त पुरवठा, ब्राझीलमधील विक्रमी उत्पादन आणि भारतात आयात होणाऱ्या स्वस्त सोयातेलाचा परिणाम म्हणून ही घसरण होत असल्याचे सांगितले जात आहे. ब्राझील आणि अर्जेंटिनाकडून मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत असल्याने जागतिक बाजारपेठेत मागणी कमी झाली आहे. अमेरिकेच्या नवीन व्यापार धोरणांचाही परिणाम दरावर दिसून येत असून, सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याची स्थिती आहे. खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळेल या अपेचेनेमागील अनेक वर्षांपासून शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. लातूर जिल्हा सोयाबीनचा ‘ग्रीन बेल्ट’ म्हणून ओळखला जातो. मात्र कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभावाचीही खात्री उरलेली नाही. पारंपरिक पीक पद्धती शेतकऱ्यांसाठी कशी अडचणीची ठरत आहे, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सोयाबीन. ना उत्पादनाची हमी, ना दराची हमी — अशीच परिस्थिती वर्षभर बाजारात पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्हासह जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. भारत-Amerिका करार होण्यापूर्वी प्रतिक्विंटल 5700 ते 5800 रुपये दर मिळत होता. मात्र सध्या तो दर घसरून 4900 ते 5200 रुपयांपर्यंत खाली आला आहे. या करारामुळेच दर घसरल्याची चर्चा शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये रंगली आहे. करारापूर्वी बाजार समितीत दररोज सुमारे 40 हजार कट्ट्यांची आवक होत होती. मात्र सध्या ती केवळ 5 हजार कट्ट्यांवर आली आहे. कमी दर परवडत नसल्याने शेतकरी माल बाजारात आणण्यास टाळाटाळ करत आहेत. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून आधीप्रमाणे दर मिळवून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अंबादास बनकर, शेतकरी (पांढरा शर्ट); रामेश्वर बोडखे, शेतकरी (भगवा शर्ट); नितीतन तोष्णीवाल, व्यापारी (ग्रे शर्ट). सोयाबीनचे दर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असуваат. ब्राझील आणि अमेरिकेत विक्रमी उत्पादन झाल्यामुळे जागतिक स्तरावर उपलब्धता वाढली आहे. त्यातच भारत सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे परदेशातून स्वस्त सोयातेल मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे. त्यामुळे देशांतर्गत तेल गिरण्यांची मागणी घटली आहे. जगातील सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या चीनची मागणीही कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे. बाजारात आवक नगण्य असतानाही दरातील घसरण थांबत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याची ओरड सुरू झाली आहे. लातूर हुन वैभव बालकुंदे रिपोर्टर; जालना हुन नितिश महाजन रिपोर्टर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 10:40:310
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 16, 2026 10:31:400
Report
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 10:21:010
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 16, 2026 10:20:400
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 16, 2026 09:52:480
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 16, 2026 09:52:290
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 16, 2026 09:49:480
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 16, 2026 09:33:590
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 16, 2026 09:32:370
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 16, 2026 09:31:530
Report
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 09:05:520
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 16, 2026 09:03:280
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 16, 2026 08:48:360
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 16, 2026 08:47:490
Report