Back
अकोला के संतोषी माता चौक पर स्कार्पियो ने मचाया तहलका; 7-8 नागरिक घायल
JJJAYESH JAGAD
Feb 16, 2026 08:48:36
Akola, Maharashtra
अकोला शहरातील वर्दळीच्या संतोषी माता चौक परिसरात भरधाव स्कार्पिओने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून ७ ते ८ नागरिक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संतोषी माता चौकातून भरधाव वेगाने जाणारी स्कार्पिओ कार अचानक अनियंत्रित झाली. चालकाचा ताबा सुटल्याने या वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकी, दोन चारचाकी आणि एका ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या अपघातात रस्त्यावरून पायी चालणारे ७ ते ८ नागरिक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत अपघातग्रस्त स्कार्पिओ वाहन आणि चालकाला ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी पुढील तपास रामदास पेठ पोलीस करत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 10:40:310
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 16, 2026 10:31:400
Report
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 10:21:010
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 16, 2026 10:20:400
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 16, 2026 09:52:480
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 16, 2026 09:52:290
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 16, 2026 09:49:480
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 16, 2026 09:33:590
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 16, 2026 09:32:370
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 16, 2026 09:31:530
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 16, 2026 09:15:550
Report
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 09:05:520
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 16, 2026 09:03:280
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 16, 2026 08:47:490
Report