icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
413501
DPdnyaneshwar patange16 Feb 2026, 09:03 am

धाराशिव में सत्ता परिवर्तन की गतिविधियाँ तेज, भाजपा उम्मीदवारों की टीम आगे बढ़ी

Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग परंडासह उमरगा येथील दोन अपक्ष जिल्हा परिषद सदस्य भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या गोटात सहलीवर गेलेला भाजप उमेदवारांचा कोकणातील मुक्काम कर्नाटकात हलवला सहलीवर गेलेल्या भाजप उमेदवारासोबत तीनही अपक्ष उमेदवार परंडा तालुक्यातील लोणी गटातून निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार राणी रेवणाथ ढोरे उमरगा तालुक्यातील तुरोरी गटाच्या अर्चना युवराज जाधव आणि आलूर गटाचे आप्पासाहेब मल्लिनाथ पाटील भाजपा आमदारांना जगजितसिंह पाटील यांच्या गोठात दाखल झाल्याची माहिती
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

छत्रपती संभाजीनगर महापालिका में भूत-प्रेत का दावा, मंत्री शिरसाठ के बयान से तकरार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिका में भूतांचा वावर असल्याचा दावा पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केला आहे या ठिकाणी आधी कब्रस्तान होतं त्यामुळे इथे गाडलेले आत्मा इथल्या अधिकारी पदाधिकाऱ्यांना बेचैन करतात आणि त्यातून सगळेच बेचैन होतात असा दावा त्यांनी केला आणि पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर मध्ये चर्चांना उधाण आलय... महापालिका परिसरात आत्म्यांचा वावर. महापालिका इमारत पूर्वी कब्रस्तान ची जागा. पालकमंत्री शिरसाठ यांचा दावा, चर्चांना उधाण. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला ग्रहण लागले आहे आणि ते लागण्याचे कारण म्हणजे जिथं इमारत आहे इथं सगळे मुरदे गाडले जायचे ही कब्रस्तान ची जागा आहे असं वक्तવ્ય पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केला, त्यामुळं इथले सगळे आत्मे तुम्हाला डीवचतात आणि म्हणून सगळे बेचैन होतात असेही शिरसाठ म्हणाले, यातुन मुक्ती पाहिजे असेल तर ही इमारत चांगल्या ठिकाणी करा असा सल्लाही पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी महापौर आणि आयुक्तांना दिला, यामुळं आत्म्यांना ही सुटका मिळेल आणि तुम्हालाही सुटका मिळेल असे शिरसाठ म्हणाले, आणि या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजी नगर मध्ये अक्षरशः चर्चांना उधाण आलेलं आहे. इम्तियाज जलील यांनी शिरसाठ याना डिवचले आहे, ३०-३५ वर्ष झाले तेव्हा कब्रस्थान दिसलं नाही का असा सवाल त्यांनी केलाय, आणि नवी इमारत हवीच असेल तर एन 12 भागातील कचरा डेपो हटवा आणि तिथे महानगर पालिका इमारत बांधा अशी आमची केली. अंधश्रद्धा निर्मূলन समितीने महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. आयुक्तांनी खुलासा करावा आणि जादूटोणा कायदा अंतर्गत हे विधान तपासून गुन्हाही दाखल करावा अशी मागणी अनिस ने केली आहे. कुठल्या न कोणत्या कारणामुळे शिरसाट सतत वादात असतात त्यात महापालिकेत उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी केलेले हे विधान आणि त्यानंतर सुरू असलेली टोलेबाजी सगळेच चमत्कारिक आहे त्यात पालकमंत्री असलेल्या शिरसाठ यांना असली विधान करणे शोभत नाही हे तितकच सत्य आहे आणि हसत खेळत जर विधान केलं असेल तर याबद्दल खुलासा करण्याची ही तितकीच गरज आहे
0
0
Report
Advertisement

मालाड में भोंदूबाबा के प्रताप पर स्थानीयों ने प्रदर्शन किया: गिरफ्तारी की मांग

Mumbai, Maharashtra:एकीकडे नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असताना दुसरीकडे मुंबईतील मालाडमध्ये भोंदूबाबाच्या प्रतापांमुळे स्थानिक हैराण झाले आहेत. मालाडमध्ये राहणारा हा भोंदू बाबा "आपल्या अंगात रविवार आणि गुरुवार या आठवड्यातल्या दोन दिवशी देवी येते आणि मी अनेकांच्या शरीरातील भूत उतरवतो" असं म्हणत जादूटोणा करत असल्याचं दुसऱ्या स्थानिकांनी केला आहे. या सगळ्याचे पुरावे स्थानिकांनी दिंडोशी पोलिसांना दिले असून हे सगळे प्रकार त्यांनी तात्काळ थांबावेत यासाठी पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी केली आहे. यासाठी 65 ते 70 स्थानिकांनी आपल्या सहीचं पत्र पोलिसांना दिला आहे. भोंदूबाबाचे प्रताप, जादूटोणा, भूत उतरवणे ही सगळी प्रकरण फक्त खेडेगावात-ग्रामीण भागात नाही तर मुंबईतल्या शहरी भागात सुद्धा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण अंधश्रद्धेला खतपाणी देणाऱ्यांची संख्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढत चाललेली पाहायला मिळत आहे. मालाड पूर्वेला राहणारा रिदम पांचाळ हा व्यक्ती रविवार आणि गुरुवार लोकांची सेवा करतो असं म्हणत जादूटोणा करत असल्याचा आरोप त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिकांनी केला आहे. मागील दोन वर्षांपासून दर आठवड्याच्या रविवारी आणि गुरुवारी अघोरी पूजा करतो आणि त्याला अंगात देवी आल्याचे म्हणत इतरांच्या अंगातील भूत उतरवतो असं सांगतो. आतापर्यंत त्याच्या घरी, घराच्या समोर अशा प्रकारच्या पूजा किंवा अशा प्रकारचे प्रताप तो करत होता. मात्र 4 एप्रिलला त्याने महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांना बोलून आपली पूजा करत उघडपणे भूत उतरण्याच्या नावाखाली जादूटोण्याचा प्रकार केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचे काही फोटोज व्हिडिओसुद्धा आता समाज माध्यमांमध्ये आले आहेत.
0
0
Report

अकोला में शिंदे शिवसेना और भाजपा के बीच तनाव जारी; बैनर फाड़ने पर आरोप

Akola, Maharashtra:अकोला शहरात महापालिकेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. काल शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक सागर भारूका यांच्या समर्थकांनी भाजपविरोधी बॅनरबाजी केली होती. या बॅनर हटवण्यावरूनही दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. दरम्यान, काल मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर लावण्यात आलेला सागर भारूका यांचा बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बॅनरवर महापुरुषांचे तसेच देवतांचे फोटो लावण्यात आले होते. त्यामुळे भावना दुखावल्याचा आरोप करत, हा प्रकार भाजप कार्यकर्त्यांनी केला असावा असा अप्रत्यक्ष आरोप शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

सोलापुर जिला परिषद समितियों में शिंदे समूह दबाव नाकाम, सिद्धाराम म्हेत्रे को स्थान नहीं मिला

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडीत शिंदे गटाचे दबावतंत्र अपयशी ठरले - सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडीत शिंदे गटाचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंचे दबावतंत्र अपयशी ठरले - शिवसेना शिंदे गटातील सदस्यांमुळेच अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे एकाकी पडले - शिवसेना शिंदे गटातील सदस्यांनीच पाठिंबा न दिल्याने सिद्धाराम म्हेत्रेंच्या मुलाला अपेक्षित विशेष समितीमध्ये स्थान मिळाले नाही - शिवसेनेच्या सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्थायी, बांधकाम आणि समाजकल्याण समितीत स्थान मिळावे यासाठी निवडणूक लावण्याची घोषणा केली - मात्र झेडपीच्या 68 पैकी 60 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने शिवसेनेतील म्हेत्रे गटाचा प्रभाव राहिला नाही - याशिवाय स्वपक्षातील 8 पैकी 6 सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने सिद्धाराम म्हेत्रे यांना माघार घ्यावी लागली. - निवडणूक झाली असती तर भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले असते आणि शिवसेना शिंदे गटाची मोठी नामुष्की झाली असती.
0
0
Report
Advertisement

नितीन राऊत का आरोप: दलित नेताओं के नाम पर वोटिंग, नागपुर कांग्रेस पर सवाल

Nagpur, Maharashtra:नागपूर महापालिका स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत नाराज आहेत. राऊत यांच्या प्रतिनिधींना डावलण्यात आलं तसेच षडयंत्र रचल्या गेल्याचा आरोप करत त्यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि महापालिका विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर यांची कारवाईची मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. केवळ मतांसाठी दलित नेत्यांचा वापर करण्यात येतो आणि काही द्यायचं असेल तर डावलण्यात येत असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना स्थानिक काँग्रेस नेत्यांवर केला. माझ्या समर्थकांपैकी कोणालातरी प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे होतं. मी गेल्या सहा निवडणुका पक्षासाठी लढलो मात्र अजून पर्यंत एकही सदस्य माझ्याकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी गेलेला नाही. काल माझ्याविरुद्ध प्री प्लान षडयंत्र रचण्यात आलं, माझा अपमान करण्यात आला. केवळ मतांसाठी दलित नेत्यांना वापरायचं, जेव्हा काही द्यायचं असेल तेव्हा डावलण्यात येत हे यावर तक्रार केली आहे. प्रदेश काँग्रेसनेच एक नाव मला द्यायला सांगितलं होतं, मात्र त्यानंतरही डावलण्यात आलं, हा प्रदेश काँग्रेसचा अपमान आहे, त्यामुळे याबाबत कारवाई झाली पाहिजे. माझ्याकडूनही काँग्रेस पक्षात चांगल्या संख्येने नगरसेवक आहेत, अशा वेळेला हे गुप्त ठेवून सगळं करण्यात येत असेल तर ते षडयंत्रच आहे. माझ्या प्रतिनिधीला अर्ज दाखल करण्यापूर्वी नुसत फिरवण्यात आलं. मी निवडून आलेला आमदार आहे, पक्षाचा राजीनामा देण्याचा विषयच नाही. प्रांताध्यक्षांच्या सुचनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही, झिडकारण्यात आल्या, तो त्यांचा अपमान आहे. नियमानुसार ही कारवाई झाली पाहिजे. प्रांताध्यक्षांशी बोलणे झाले आहे, त्यांनी कारवाई केली पाहिजे. माझा इशारा नक्की आहे; कृपा करून आम्हाला डावलू नका. केंद्रीय पर्यवेक्षकांशी बोलल्यानंतर पुढील भूमिका सांगेल.
0
0
Report

सोलापुर के निजी अस्पताल में 8 घंटे बाद महिला की मौत; परिवार डॉक्टरों पर आरोप

Solapur, Maharashtra:सोलापुरात खाजगी हॉस्पिटलमध्ये सिझर झाल्यानंतर 8 तासातच महिलेचा मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप - सोलापूरातील कृष्णामाई नर्सिंग होममध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या 25 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू - अनुजा बावळे यांच्या प्रसूती दरम्यान सिझरची प्रक्रिया करण्यात आली मात्र त्यानंतर आठच तासांमध्ये महिलेचा मृत्यू - सिझर नंतर त्रास होत असल्याची वारंवार तक्रार करून देखील डॉक्टर आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी बेदखल केल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप - अनुजा बावळे यांच्या पोटी जन्माला आलेला छोटा चिमुकला मात्र आईपासून राहिला वंचित - घटनेला दहा-बारा दिवस होऊन देखील कोणताच गुन्हा दाखल नसल्याने नातेवाईक हतबल - खाजगी हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सर्वत्र व्यक्त करण्यात येतोय संताप - लवकरात लवकर डॉ. माधुरी दबडे यांच्यावर कारवाई करून हॉस्पिटल सील करण्याची नातेवाईकांची मागणी
0
0
Report
Advertisement

सोलापूर में विवाहित महिला पर पेट्रोल डालकर आग लगाने वाला पति गिरफ्तार, हालत गंभीर

Solapur, Maharashtra:सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरातील घटना, घटनेत महिला गंभीर जखमी. फैजान जावेद शेख असं या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे तर नर्गिस फैजान शेख असे विवाहित महिलेचे नाव आहे. 2024 साली नर्गिस आणि फैजान या दोघांचा निकाह झाला होता. मात्र लग्नाच्या अवघ्या 2-3 महिन्यातच दोघांमध्ये वाद होऊ लागल्याने दोघेही विभक्त राहत होते. तलाक देण्याच्या कारणावरून मागील काही दिवसापासून दोघांमध्ये सतत्याने वाद होत होते. काल रात्री 10 च्या दरम्यान आरोपी फैजान हा नर्गिसच्या घरात आला आणि सासूला विश्वासात घेत मला नर्गिस सोबत बोलायचे असल्याने सांगून तिला एका खोलीत नेले. त्यानंतर सोबत आणेलेले पेट्रोल तिच्या अंगावर टाकून लाईटरने पेटवून तो फरार झाला. घरात आग लागल्याचे पाहून शेजारी आणि कुटुंबियांनी नर्गिसचा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तिला गंभीर अवस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. घटनेनंतर सोलापूर पोलिसांनी पाहणी केली असून प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केलीय.
0
0
Report

amravti ke peratvada maamle me naya khulasa: flat par yuviyaon ke saath laingik atyachaar

Amravati, Maharashtra:अमरावतीच्या परतवाडा प्रकरणात मोठी अपडेट समोर; लैंगिक कृत्य करत असलेला फ्लॅट आला समोर अँकर :-अमरावतीच्या परतवाडा मध्ये तरुणीचे लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचे प्रकरण एक मोठी अपडेट समोर आली असून आरोपी अहमद अयान हा पीडित तरुणींना अमरावतीच्या कठोरा नाका भागातील एका रेसिडेन्सी मधील फ्लॅटमध्ये तिसऱ्या माळावर आणून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. या फ्लॅट वर मुलींना आणून मित्राला पाचशे रुपये देऊन याच फ्लॅट वर मुलीवर अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या फ्लॅट वरून पोलिसांनी आता एका आरोपीला अटक केली असून या फ्लॅटमध्ये अनेक मुली येत असल्याचा इमारतीतील नागरिकांनी आरोप केला आहे. फ्लॅट मालकाला वारंवार माहिती देऊनही फ्लॅट मालकाने कुठलीही कारवाई केली नसल्याचेही इमारतीतील नागरिकांनी सांगितले आहे. दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात सहा आरोपींना अटक असून पुढील तपास सुरू आहे या इमारतीतून त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में 2026 हीट एक्शन प्लान लागू, गर्मी से निपटने के उपाय तेज

Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1604ZT_CHP_ANTI_HEAT_PLAN_1_2 ( 2 file sent on 2C) टायटल:-- मनपा चंद्रपूर हद्दीत उष्माघात कृती आराखडा २०२६ ची अंमलबजावणी सुरू, कोल्ड वॉर्ड सह प्रशासन सज्ज अँकर:---चंद्रपूर शहर हॉट सिटी म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते. उन्हाळ्याचा काळ सुरु झाला आहे. दरवर्षी इथला पारा उच्चांक गाठतो. हवामान खात्याने सध्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे या उन्हाळ्यात नागरिकांना उष्माघात होण्यास नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका उष्माघात कृती आराखडा २०२६ राबवित आहे. यावर्षी अधिक कडक उन्हाळा राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घर थंड ठेवण्यासाठी घराच्या छतावर उष्णतारोधक पेंट लावण्याचा उपाय सुचविण्यात आला आहे. शहरात स्वयंसेवी संस्था आणि चिल्ड वॉटर असोसिएशनतर्फे त्याहून मागील वर्षीच्या 21 संख्येहून अधिक पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. बेघर आणि भिका-याना बेघर निवासात दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मानसिक रुग्णांसाठीही विशेष कृती आराखडा तयार केला आहे. दुपारच्या वेळेस ट्राफिक सिग्नल बंद ठेवले जात आहेत. सार्वजनिक बागांच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. १०८ रुग्णवाहिकांचा सहभाग वाढवला असून, बांधकाम कंत्राटदारांना मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बाईट १) डॉ. नयना उत्तरवार, वैद्यकीय अधिकारी, मनपा, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

आमदार खोत की कविता ने रोहित पवार के प्रचार पर मचा बवाल

Sangli, Maharashtra:स्लग - बारामती पोटनिवडणुकीतील प्रचारावरून आमदार सदाभाऊ खोत यांची रोहित पवारांवर टीका अँकर - आमदार सदाभाऊ खोत यांनी आमदार रोहित पवारांच्या बारामती पोट निवडणुकीच्या प्रचारावरून टीका केली आहे. मुख्यमंत्री सुमित्रा पवार यांचे प्रचारासाठी रोहित पवार मैदानात उतरले आहेत,रोहित पवारांचे प्रचारावरून आमदर सदाभाऊ खोत यांनी सोशल मीडिया अकाउंटवरुन विडंबनात्मक कवितेतुन टीका केली आहे. खेळ मांडला खेळ मांडला..! पुरोगामीपणाचा खेळ मांडला..!! सत्तेच्या सारीपाटावर स्वयंघोषित पुरोगामी धृतराष्ट्र बनला..! पुरोगाम्योनो,आम्ही पुरोगामीपणाचा खेळ मांडीला...!! सत्तेच्या जोरावरती,कधी भावनेच्या लाटेवरती कधी जातीवादाच्या नावावरती पुरोगामीपणाचा खेळ मांडला...! अश्या शब्दातून आमदार रोहित पवारांच्या वर निशाणा साधला आहे
0
0
Report

वाशिम में जलसंकट गहराया: प्रशासन ने 3 करोड़ 76 लाख रुपये के 317 उपाय प्रस्तावित

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत्या असलेल्या तापमानाचा परिणाम लघू व मध्यम प्रकल्पांतील जलसाठ्यावर दिसून येत आहे. जिल्ह्यातील एकूण 160 प्रकल्पांपैकी जवळपास निम्म्या लघू प्रकल्पांची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने कृती आराखडा तयार केला आहे.सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील सुमारे 224 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने 3 कोटी 76 लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे.या आराखड्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा,विहिरींचे अधिग्रहण,विहिरींचे खोलीकरण,नळयोजनांची दुरुस्ती तसेच भविष्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये यासाठी जलपुनर्भरणाच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. एकूण 317 उपाययोजना राबविण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top