Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Hingoli431513

हिंगोली में अंतरराज्यीय घरफोड़ गिरोह के आरोपी गिरफ्तार; 2.28 लाख रुपए के गहने जप्त

GMGajanan MAchindar
Mar 25, 2026 02:17:06
Hingoli, Maharashtra
हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागात घरफोडी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत आरोपीकडून पाच तोळे सोन्याचे दागिने 2 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हा आरोपी तेलंगणा, कर्नाटक,मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र अशा विविध राज्यांत घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील असल्याची माहिती समोर आली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 03:30:26
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थांविरोधात टास्क फोर्सने मोठी धडक कारवाई केली आहे. गेल्या चार दिवसांत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल ४ हजार ४०० नशेच्या गोळ्या आणि १३२ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी कुख्यात ड्रग्ज माफिया ‘अंधा फिरोज’चा भाऊ सय्यद अझर आणि त्याचा नातेवाईक तौफिक रशीद अली या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. २३ मार्च रोजी पहिली कारवाई करत ट्रॅव्हल्सने सुरतहून नशेचा माल आणणाऱ्या सय्यद अझरला अटक करण्यात आली. त्याच्याकडून २ हजार गोळ्या आणि ११४ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तर २४ मार्च रोजी घाटी रुग्णालयासमोर दुसरी कारवाई करण्यात आली. यावेळी तौफिक रशीद अली याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ हजार ४०० नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 25, 2026 03:16:06
Solapur, Maharashtra:सोलापूर - प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने सोलापुरात मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न Anchor - removed byline: There is no need to include this in clean_text. प्रभू श्रीराम जन्मोत्सवा निमित्त शहरातील बाळवेस येथील श्रीराम मंदिरामध्ये मोफत नेत्ररोग तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली. गेल्या पंचवीस वर्षांपासून या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत असून शंभर पेक्षा अधिक नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला. समाजातील अत्यंत गोरगरीब नागरिकांना तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आणि चांगले उपचार घेता यावेत या उद्देशाने या शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते.
145
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 03:15:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक वर्षांच्या मागणीनंतर लघु उद्योजकांना अमृत लघु उद्योग योजनेंतर्गत वाळूज आणि चिकलठाणा एमआयडीसीमध्ये गाळे बांधून देण्याचे काम प्रगतिपथावर आहे. हे गाळे वाटप कोणाला आणि कसे करावे, याविषयी एमआयडीसीने अद्याप कोणतेही धोरण निश्चित केले नाही. यामुळे जुन्या अर्जदारांना गाळे द्यायचे अथवा निविदा पद्धतीने गाळे वाटप करावे, याविषयी स्थानिक अधिकारी अनभिज्ञ आहेत. वाळूज एमआयडीसीमध्ये औद्योगिक भूखंड शिल्लक नाही. यामुळे मागणी करुन ही शेकडो लघु उद्योजकांना एमआयडीसी लहान आकाराचे भूखंड देऊ शकलेले नाही. या उद्योगांच्या मागणीनुसार शासनाने सन २०२२ मध्ये लघु उद्योगांसाठी वाळूज येथे ४९ तर चिकलठाणा एमआयडीसीमध्ये २२ गाळे बांधून देण्याचा निर्णय घेतला होता. २ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या भूखंडावर एक हजार चौरस फुटात गाळ्यांचे बांधकाम सध्या सुरू आहे. भूखंडाची किंमत आणि त्यावरील बांधकामाचा खर्च विचारात घेऊन एमआयडीसीने प्रत्येक गाळ्याची किंमत ६५ ते ७० लाख रुपये निश्चित केली आहे...
376
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 25, 2026 03:15:24
270
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 25, 2026 02:48:42
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणार नवीन एमआरआय मशीन. आ. देवेंद्र कोठे यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची मागणी केली. आ. देवेंद्र कोठेच्या मागणी पत्रावर मुख्यमंत्र्यांनी सही करत याबाबतचे आदेश दिले आहेत. सध्या असलेली एमआरआय मशीन ही बारा वर्षे जुनी असून ती कालबाह्य झाली आहे. सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक, मराठवाडा, आणि तेलंगणा अशा अनेक राज्यातून उपचारासाठी रुग्ण सोलापुरात येत असतात. मात्र त्यांना एमआरआय करण्यासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते मात्र आता नवीन एमआरआय मशीनमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
920
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 02:45:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच १ एप्रिल रोजी रेडीरेकनरचे नवीन दर जाहीर होतात. यंदाही या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं छत्रपती संभाजी नगरात  वाढीव मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी नागरिक ३१ मार्चपूर्वीच मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्याला प्राधान्य देत आहेत. नागरिकांची ही वाढती गर्दी लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व नोंदणी कार्यालये शनिवार आणि रविवारसह सर्व शासकीय सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात तीन, बीड बायपास भागात दोन, अशी एकूण पाच नोंदणी कार्यालये आहेत...
912
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 25, 2026 02:45:31
Varasoli, Maharashtra:स्क्लग – रायगड जिल्‍हा परीषद विषय समिती सभापतीपद का चुनाव बिनविरोध पार पड़ा. परंतु खातेवाटप अद्याप जाहीर नहीं हुए हैं, सोशल मिडियावर नवनिर्वाचित सभापतींचे खातेवाटप काही उत्साही कार्यकर्ते वाटून मोकळे झाले आहेत. सभापतींचे खातेवाटप करून त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर सोशल मिडियावर फिरताहेत. या अफवांमुळे नागरीकांमध्‍यये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र याबाबत जिल्‍हा परीषदेत नवनिर्वाचित पदाधिकारयांनी भूमिका स्‍पष्‍ट केली आहे. महिला बालकल्‍याण समिती व समाज कल्‍याण समिती वगळता अद्याप कुठल्‍याही खात्‍यांचे वाटप करण्‍यात आले नाही. वरिष्‍ठ पातळीवर याबाबत निर्णय होवून 7 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत ते जाहिर केले जाईल, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले.
894
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 25, 2026 02:45:12
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरातील प्राचीन श्री पोद्ददारेश्वर राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाची तयारी जोमात सुरू आहे.. विशेष म्हणजे यंदा मंदिरात तब्बल 17हजार नारळाची आकर्षक अशी आरास तयार करण्यात आलीय. मंदिराचे प्रवेशद्वार,सभामंडप या सर्व परिसरात तब्बल 17हजार श्री फळांनी ही आरासने सजावण्यात आलेय. सुमारे महिनाभर ही आरास तयार करण्याकरता अवधी लागला... नारळाची आरास बांधण्यासाठी मौली धाग्याचा वापरण्यात आलाय .. उत्सव झाल्यानंतर हे नारळ प्रसाद रुपात भक्तगणांना परत देण्यात येणार आहे.... दरम्यान प्रभू श्रीरामाच्या मंदिरात करण्यात आलेली आकर्षक अशी श्रीफळांची आरासचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
891
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 02:34:06
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पुन्हा छत्रपती संभाजी नगरात वातावरणात मोठा बदलाव होणार असून बुधवारी और गुरुवारी शहरावर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पावसाचीही शक्यता आहे.. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर तापमानात वाढ होत असली तरी मंगळवारी संध्याकाळी शहराच्या आकाशात ढगांची दाटी झाली होती. आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंगळवारी रात्री उशिरा पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाजही वर्तवल्याचे संदेश पाठवले होते. या वर्षी शहरवासीयांना निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव येत असून ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, त्यानंतर थंडी आणि दुसऱ्याच दिवशी उन्हाचा कडाका असे विचित्र हवामान पाहायला मिळत आहे.
980
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 02:33:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी आणि संशोधकांसाठी प्रशासनाने सोय उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये ये-जा करण्यासाठी आता विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागणार नाही. पीएम उषा प्रकल्पांतर्गत मिळालेल्या निधीतून खरेदी केलेल्या चार नवीन इलेक्ट्रिक गाड्यांचे लोकार्पण मंगळवारी झाले. विद्यापीठाला प्राप्त झालेल्या १०० कोटींच्या निधीतून सुमारे ४० लाख रुपये खर्च करून या गाड्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये १४ आसन क्षमतेच्या २ गाड्या, तर ८ आसन क्षमतेच्या २ गाड्या अशा एकूण ४ गाड्यांचा समावेश आहे. फक्त विद्यापीठाचे आय कार्ड दाखवून या गाड्यांचा उपयोग करता येणार आहे.
1081
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 25, 2026 02:33:06
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या कामरगाव परिसरात अवैधपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पुणे-अहिल्यानगर रोडवरील हॉटेलच्या पार्किंगमध्ये ३ एच.पी. गॅस टँकरमधून व्यावसायिक टाक्यांमध्ये विनापरवाना गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून चार आरोपींना रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी ५७ टन गॅस, ३ मोठे टँकर, १ टेम्पो आणि भारत गॅस कंपनीच्या टाक्या असा एकूण २ कोटी १ लाख ९६२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सचिन बोधले, माणिक गुट्टे, उल्हास कवडे आणि अमृत ठोकळ या चौघांना ताब्यात घेतलं आहे.
1082
comment0
Report
Advertisement
Back to top