Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
DhuleDhule

कांग्रेस में घराणेशाही पर मंत्री कोकाटे का ताजा हमला; चुनावी रणनीति स्पष्ट

PPPRASHANT PARDESHI
Oct 26, 2025 12:49:15
Dhule, Maharashtra
काँग्रेसच्या घराणेशाहीवर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोचरी टीका केली आहे. याला धर याला पाड... याला धर जिंकून आण. याच वृत्तीमुळे काँग्रेसची आज महाराष्ट्रामध्ये दुरावस्था झाली असल्याची टीका राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते व धुळे जिल्ह्याचे संपर्क मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. मी काँग्रेस पक्षातून आलो आहे. त्यामुळे मला माहिती आहे. काँग्रेस पक्षात याच गोष्टी करत होत्या याचा ऐकून घे त्याचा ऐकून घे. प्रामाणिक कार्यकर्त्याला सोडून घराणेशाही चालू दे. याच कारणामुळे मी काँग्रेस सोडून काँग्रेस मधून बाहेर पडलो. काँग्रेसच्या नेत्यांनी काय केलं त्यांनी हेच उद्योग केले म्हणून पक्षावर हे दिवस आले. असं म्हणत मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये युतीतील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असा स्पष्ट केला आहे.
11
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Oct 29, 2025 13:34:05
Akola, Maharashtra:दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. अकोला शहरातील उमरी भागात चोरट्यांनी एका सैनिकाच्या घराला लक्ष्य करत सुमारे साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला आहे.मिळालीलेल्या माहितीनुसार, घरातील कुटुंबीय हे लग्नप्रसंगासाठी बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी संधी साधत दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून अंदाजे 30 ग्राम सोन्याचे दागिने, 50 हजार रुपयांची रोकड आणि इतर किमती वस्तू असा एकूण साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला.घटनेची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू आहे. दिवाळीच्या काळात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
4
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 29, 2025 13:09:59
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- अत्यंत दुरावस्थेत असलेल्या रस्त्यावर सुमारे चार कोटीच्या रस्ता दुभाजकाचे काम, चंद्रपुरात जनविकास सेनेच्या माध्यमातून महाकाली मंदीर मार्गावर करण्यात आले आंदोलन, आंदोलक कार्यकर्त्यांनी दुभाजक तोडले अँकर:-- अत्यंत दुरावस्थेत असलेल्या रस्त्यावर सुमारे चार कोटीच्या रस्ता दुभाजकाचे काम करून चंद्रपूर मनपाने नवा विक्रम केलाय. याविरोधात चंद्रपत Genविकास सेनेच्या माध्यमातून महाकाली मंदीर मार्गावर जोरदार आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर मनपाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणाऱ्या कंत्राटदाराचा निषेध केला गेला. संतप्त आंदोलक कार्यकर्त्यांनी दुभाजक देखील तोडले. याचदरम्यान निकृष्ट दर्जाच्या सळाखीचा वापरही पुढे आला. सौंदर्यीकरणाचा भाग असलेले दुभाजक उभारण्यापेक्षा आधी रस्ता दुरुस्त करण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
4
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 29, 2025 13:08:21
Nashik, Maharashtra:राज्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय शेतकरी आणि कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील समन्वय वाढावा आणि कुठल्य क्षणी कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी राज्य सरकारकडून कायम स्वरुपी मोबाईल नंबर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय एक नोव्हेंबर पासून ही योजना कार्यान्वित होणार असून संबंधित कृषी अधिकारी बदलेले गेले तरी मोबाईल नंबर तोच राहणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे महत्वाचे म्हणजे हा मोबाईल नंबर फक्त शासकीय कामकाजासाठीच वापरता येणार आहे वैयक्तिक कामासाठी अधिकाऱ्यांना हा मोबाईल वापरता येणार नसल्याने शेतकऱ्यांसाठी हे अधिक उपयुक्त ठरणार आहे अधिकारी आणि कर्मचारी यांची बदली झाली तरी मोबाईल नंबर बदलणार नसल्याने शेतकऱ्यांना आवश्यक ती माहिती आणि मार्गदर्शन कृषी अधिकारी कर्मचारी यांच्याकडून मिळणार आहे
4
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 29, 2025 13:08:01
Nashik, Maharashtra:Anchor राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाल्याचा दावा राज्य शासन करत असले तरी फार्मर आयडी नसणे ही यातील सर्वात मोठी अडचण ठरत आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ५ हजार ६०८ शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आहेत. विशेष म्हणजे यात राज्यातील तिन्ही मंत्र्यांच्या तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.या अतिवृष्टीत जिल्ह्यातील ४ लाख १८ हजार ९०२ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र त्यापैकी १ लाख १३ हजार शेतकऱ्यांना ३१७कोटी रुपये वितरित झाले आहे. मंत्रिमंडळाने अतिरिक्त मदत जाहीर केली असली तरी ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी फार्मर आयडी हा अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक अडथळा ठरत आहे. विशेष म्हणजे मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये शिक्षणमंत्री दादा भुसेंच्या मालेगाव तालुक्यातील ६० हजार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांच्या येवला तालुक्यातील ५४ हजार शेतकरी वंचित आहेत.
3
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 29, 2025 12:31:10
Nashik, Maharashtra:महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात पहिल्यांदाच एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ऐतिहासिक चांदोरी गावात राबवण्यात आला. गावाचा वाढदिवस म्हणजेच ‘व्हिलेज डे’ या नावाने हा अभिनव उपक्रम चांदोरीतील तरुणांच्या पुढाकाराने आणि ज्येष्ठांच्या सहकार्याने दिनांक २५ ऑक्टोबर रोजी अतिशय उत्साहात साजरा झाला. या उपक्रमामागे असलेली संकल्पना होती — “आपल्या गावाशी पुन्हा नाळ जुळवण्याची आणि गावासाठी काहीतरी परत देण्याची.” अनेक चांदोरीकर शिक्षण, व्यवसाय वा नोकरीसाठी गाव सोडून देशभरातील विविध ठिकाणी स्थायिक झाले आहेत. त्यांना पुन्हा गावाशी जोडण्यासाठी, गावाला भेट देण्यासाठी, आणि आपल्या यशातून गावातील युवकांना संधी देण्यासाठी प्रेरित करणे, हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येत ‘व्हिलेज डे’चे नियोजन केले. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देशभर विखुरलेल्या चांदोरीकरांना निमंत्रण देण्यात आले. या आवाहनाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि देशभरातून चांदोरीकर गावात मोठ्या संख्येने दाखल झाले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता न्यू इंग्लिश स्कूल, चांदोरीच्या प्रांगणात आयोजित क्रिकेट सामन्यांनी झाली. जुन्या क्रिकेटप्रेमी खेळाडूंनी पुन्हा एकदा मैदानावर उतरून जुने दिवस जागवले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत, त्यांची मनोगते, तसेच हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला. या वॉकमध्ये गावातील पौराणिक स्थळे, जुनी मंदिरे आणि सांस्कृतिक वारसा यांची माहिती स्थानिक तरुणांनी उपस्थितांना दिली. चांदोरी हे पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले प्राचीन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव असल्याने यावेळी गोदावरी आरतीचा देखील भव्य सोहळा पार पडला. दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात चांदोरीकरांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या शेवटी गावाची परंपरा दर्शवणारा प्रसिद्ध ‘बोहाडा’ (आखाडा) सादर करण्यात आला, ज्याने वातावरण उत्साहवर्धक बनवले. या उपक्रमात सहभागी झालेल्या गावातील माजी विद्यार्थी, अधिकारी, तसेच उद्योगपतींनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आम्ही चांदोरीतून शिकून आज विविध क्षेत्रांत यश मिळवले. आता आपल्या गावातील युवकांना आमच्या कंपन्यांमध्ये रोजगार व प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊ. गावाचा विकास आणि येथील तरुणांची प्रगती हीच खरी आपली जबाबदारी आहे.” प्रतिक्रिया उद्योजक बबन टर्ले या घोषणेमुळे उपस्थित तरुणांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. चांदोरीच्या इतिहासात पहिल्यांदाच गावातील उद्योजकांनी एकत्र येऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावण्याचे आश्वासन दिले. संध्याकाळी कार्यक्रमाची सांगता झाली तेव्हा अनेकांना गाव सोडताना मनोमन हुरहूर वाटत होती. सर्वांनी एकमुखाने सांगितले — “हा उपक्रम दरवर्षी अधिक भव्य स्वरूपात आयोजित करू, आणि गावासाठी जे काही सहकार्य लागेल ते देऊ!” ‘व्हिलेज डे’ — गावाशी पुन्हा जुळणारी नाळ, एकात्मतेचा उत्सव, आणि चांदोरीच्या नव्या प्रगतीची सुरुवात!
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 29, 2025 12:30:35
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील आमने-सामने! धाराशिव शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती टेंडर वरून राजकीय संघर्ष भेटला. भाजपा आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या 117 कोटींच्या रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेशाला नगरविकास विभागाची स्थगिती. नगरविकास विभागाने धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठवलं स्थगितीचं पत्र — तक्रारीचा सविस्तर चौकशी अहवाल मागवला, रस्त्याच्या टेंडर वरून राजकीय संघर्ष पेटला. भाजप आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या टेंडरला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीनंतरच स्थगिती. फक्त दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी घेतलं होतं श्रेय — मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनाची केली होती घोषणा. आता त्याच 117 कोटींच्या कामाला आलंय ब्रेक! याआधीही जिल्हा नियोजन निधीवरून झालं होतं असंच स्थगितीचं नाट्य. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत नवा संघर्ष उफाळला!
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 29, 2025 12:20:41
Jalna, Maharashtra:जालना : हर्षवर्धन सपकाळ बाईट महाराष्ट्रात काँग्रेसच भाजप सोबत संघर्ष करू शकतो वडेट्टीवार यांना पाठवलेली नोटीस म्हणजे लोकशाहीचा गळा घोटाण्याचा प्रयत्न आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जिल्हा ,तालुका कार्यकारिणीला अधिकार ऑन प्रकाश सोळंके : पैसा फेक तमाशा देख असा कार्यक्रम भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी राज्यात चालवला आहे. ऑन बच्चू कडू: शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत बच्चू कडूंयांना आमचा पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला अराजकतेच्या खाईत लोटू नये फडणवीस यांनी तात्काळ कर्जमाफीची घोषणा करावी डॉ.संपदा मुंडे यांच्यावर फलटणच्या आकाचा दबाव होता, बिडच्या आकापेक्षाही मोठा आका फलटणमध्ये लपलेला आहे.या आकाचा मोठा आका महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस चोरी करून मुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीस चोमु मुख्यमंत्री आहेत. 1 तारखेला मतचोरीच्या अनुषंगाने निघणारा मोर्चा हा सर्वपक्षीय मोर्चा आहे,ही मतचोरी राहुल गांधींनी उघड केली. मनसेकडून महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही
1
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 29, 2025 12:17:00
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी खासदार नारायण राणे भाषण pointers deवरुखमध्ये पार पडला खासदार नारायण राणे यांचा जनता दरबार जनता दरबारानंतर नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या निवडणुका येतील जातील काम करतील त्यालाच पदं मिळतील कामाला लागा, मी अडचणी सोडवण्यासाठी आहे भारतीय जनता पक्ष आणि आपले मित्र पक्ष यांच्यात काही वैर नाही युतीबाबत वरिष्ठ नेते यावर निर्णय घेतील, याबाबत चर्चा नको, वाद नको आपापसात राजकारण दिसलं तर त्या लोकांना मी निवडणुकीतून बाद करीन जनता दरबारानंतर भाषणातून नारायण राणे यांचा कार्यकर्त्यांना इशारा आपल्या कार्यकर्त्यांबरोबर स्नेह जोडा, कार्यकर्त्यांना राणेंचा सल्ला
4
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 29, 2025 12:16:22
Nanded, Maharashtra:वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज नांदेडमध्ये झालेल्या एल्गार मोर्चाकडे ओबीसी नी पाठ फिरवली. मोर्चाला अल्प प्रतिसाद मिळाला. नवीन मोंढा येथून दुपारी मोर्चा निघाला. काही वेळाने मोर्चात प्रकाश आंबेडकर, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे सामील झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी मोर्चाला हाके आणि आंबेडकर यांनी संबोधित केले. 2 सप्टेंबर चा जी आर रद्द करावा, 58 लाख कुणबी नोंदी रद्द करण्यात याव्यात यासाह इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान येनाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसीलाच मतदान करा असे आवाहन यावेळी प्रकाश आबेडकर यांनी केले.
7
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 29, 2025 11:53:08
Virar, Maharashtra:Slug विरार मध्ये स्विमिंग पूल मध्ये बुडून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू विरार पश्चिम यशवंत नगर येथील अमेय क्लब मधील घटना चार वर्षीय चिमुकल्याचा अमेय क्लबच्या स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू ध्रुव सिंग बिष्ट असे मयत चिमुकल्याचे नाव स्विमिंग पुलमधील जिवरक्षक आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामूळे चिमुकल्याचा जीव गेल्याचा कुटुंबीयांचा आरोप बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश कावळे यांची माहिती विरार च्या ट्री हाऊस शाळेत ज्युनिअर केजी मध्ये शिकत होता मुलगा क्लब प्रशासनाच्या निष्काळजी पनामुळे मृत्यू झाल्याचा आरोप बाईट- चंदन सिंग बिष्ट, मयत मुलाचे वडील. बाईट- मयत मुलाची आई.
1
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 29, 2025 11:48:21
Dhule, Maharashtra:धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवकाळी पावसामुळे चिखलाचा साम्राज्य निर्माण झाल आहे. त्यात बाजार समितीतील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये अवकाळी पावसान पाणी साचून अधिकच चिखल निर्माण झाला असून, या रस्त्यांमधून वाट काढत असताना जीवघेण्य कसरत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर अन वाहन चालकांवर आली आहे. या पाणी साचलेल्या खड्ड्यामुळे रस्त्यातून वाट काढताना शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मोठी कसरत होत आहे. अनेक छोटे अपघात या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने या रस्त्यांची दुरुस्ती करावी, खड्डे मुक्त बाजार समिती निर्माण करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेले आहे. शेतकऱ्यांना सर्वाधिक गैरसोईचा सामना या खड्डेमुळे रस्त्यांमुळे करावा लागत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे रात्री पहाटे शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीत घेऊन येतात त्यावेळेस अधिकच कसरत करण्याची वेळ शेतकरी त्रस्त झाले आहेत. बाजार समिती शेतकऱ्यांच्या या त्रासाची दखल केव्हा घेते? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
4
comment0
Report
Advertisement
Back to top