Back
चंद्रपुर कैंसर अस्पताल उद्घाटन पर जोरगेवार बनाम मुंगंटीवार में नया संघर्ष; भागवत कार्यक्रम रद्द पर बहस
AAASHISH AMBADE
Dec 22, 2025 14:50:34
Chandrapur, Maharashtra
चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटल लोकार्पणाच्या मुद्यावर आ. जोरगेवार यांनी दिलेल्या पत्रावरून जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार नवा संघर्ष पेटलाय. चंद्रपूर येथे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमाला चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी आक्षेप घेतला होता. रुग्णालयात अत्यावश्यक सोयींची कमतरता लक्षात घेता हे उद्घाटन कितपत संयुक्तिक होईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात जोरगेवार यांनी पाणीपुरवठा, मनुष्यबळ आणि इतर सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या सर्व गोष्टी उपलब्ध झाल्याशिवाय रुग्णालय सुरू करणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळणे होईल असं म्हणत जोरगेवारांनी हे رुग्णालय सुरू करणे योग्य होणार नाही अशी पत्रात मागणी केली होती. जोरगेवार यांच्या या पत्रामागे जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार संघर्ष कारणीभूत असल्याची चर्चा आहे. 9 डिसेंबरला लिहिलेले हे पत्र मीडियाच्या हाती पडल्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांच्या पक्षनिष्ठेवरच प्रश्न उपस्थित करत मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला अशाप्रकारे विरोध करणे योग्य नसल्याचं वक्तव्य केलं. जोरगेवार यानी आपल्या खुलाशात मी देखील स्वयंसेवक असून मुनगंटीवार यांनी राजकीय वैमान्यातून आरोप केल्याचा आरोप केलाय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowDec 22, 2025 16:01:430
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 22, 2025 15:02:470
Report
PNPratap Naik1
FollowDec 22, 2025 14:09:500
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 14:08:290
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 14:04:050
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 13:39:450
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 22, 2025 13:24:310
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 22, 2025 13:24:050
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 22, 2025 13:16:000
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 22, 2025 13:08:280
Report
AKAMAR KANE
FollowDec 22, 2025 12:53:040
Report
ABATISH BHOIR
FollowDec 22, 2025 12:36:170
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 22, 2025 12:15:260
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 22, 2025 12:03:390
Report