Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

गैस संकट से वाशीम में घर-उद्योग के लिए लकड़ी की मांग तेज

GMGANESH MOHALE
Mar 18, 2026 03:01:07
Washim, Maharashtra
वाशीम: अचर: आखाती देशांतील युद्धाचा परिणाम देशासह वाशिम जिल्ह्यातही जाणवू लागला आहे. घरगुती व व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण होत असल्याने गॅस टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पर्यायी इंधन म्हणून जळाऊ लाकडाची मागणी वाढली आहे. गरीबांसह मध्यमवर्गीय नागरिक स्वयंपाकासाठी चूल व भट्टीत लाकडाचा वापर करू लागले आहेत. तसेच लघुउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि लग्नसराईतही लाकडाचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. या बाबत سॉमिल व टिंबर व्यापाऱ्यांशी बातचीत केली आमचे वाशिमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 18, 2026 04:05:45
Washim, Maharashtra:अकंर:राज्यातील हवामानात सध्या मोठे चढउतार पाहायला मिळत असून,हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी अवकाळी इशारा दिला आहे.एकीकडे तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असताना, हवामान विभागाकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.वाशिम जिल्ह्यासह परिसरात 20 मार्चदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यां मध्ये चिंतेचे वातावरण आहे.रब्बी हंगामातील हरभरा,गहू पालन पिके काढणीच्या टप्प्यात असून,तर हळद काढणीला सुरुवात झाली आहे.अवकाळी पावसामुळे मोठ्या नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे शेतकरी सध्या पिकांची कापणी व काढणी करण्याची धावपळ सुरु आहे.या बदलत्या वातावरणा मुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 18, 2026 04:04:50
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. ANC- राज्यात दोन दिवस वादळी वा-यासह पावसाचे असणार आहेत... कोकण, मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात 20 मार्चपर्यंत वादळी वा-यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे... तर मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये तुरळकठिकाणी हलक्या सरीचंचा अंदाज वर्तवण्यात आलाय... पावसाळी वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे... त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळालाय.. मात्र दुसरीकडे पावसाच्या शक्यतेने बळीराजाची चिंता मात्र वाढलीये... वादळी पावसाच्या शक्यतेने काढणीला आलेलं पीक अडचणीत सापडलंय...
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 18, 2026 03:51:09
Yavatmal, Maharashtra:पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने माकडावर मारलेला डार्ट निशाणा चुकल्याने ग्रामस्थाला लागला. त्यामुळे माकडा ऐवजी ग्रामस्थ बेशुद्ध पडले. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील भवानी या गावात ही घटना घडली. गावात एक माकड काही दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे, ग्रामस्थांवर हल्ले करीत आहे त्यामुळे या पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाचे पथक गावात पोहोचले. त्यांनी माकडाला बेशुद्ध करण्यासाठी ट्रॅन्क्विलायझर गन मधून डार्ट सोडला, मात्र निशाणा चुकल्याने तो डार्ट थेट गर्दीत उभे असलेल्या सदानंद खराटे यांना लागला. माकडा ऐवजी ग्रामस्थच बेशुद्ध झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जखमी सदानंद खराटे यांना तातडीने कोरटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्या प्रकृती स्थिर आहे. पिसाळलेल्या माकडाला जेरबंद करण्यासाठी आता वन विभागाने पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत.
509
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 18, 2026 03:47:12
Nagpur, Maharashtra:नागपुर - नागपुरात दुर्दैवी घटना, सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शारदा नगर परिसरातील दुर्दैवी घटना. मृत बालकाचे नाव दानिश अयाज अन्सारी अस सहा वर्षीय चिमुकल्याच नाव. घराजवळील मोकळ्या मैदानात खेळताना तोल जाऊन खड्ड्यात पडल्याच बोललं जातं आहे. घाणेरडे पाणी नाक-तोंडात गेल्याने गुदमरून जागीच मृत्यू. बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांकडून शोध सुरू, सुमारे दोन तासांनी खड्ड्यातून मृतदेह आढळला. घटनेमुळे परिसरात हळहळ, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर. पोलिसांकडून पंचनामा, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शहरात उघडे खड्डे आणि सांडपाणी व्यवस्थेचा अभाव गंभीर समस्या. यापूर्वीही उघड्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू झाल्याची घटना झाल्या आहेय.. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी केली जात आहे...
588
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 18, 2026 03:20:51
Washim, Maharashtra:वाशिम: अकोला-नांदेड महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान वाशीम शहरातील हिंगोली नाका परिसरात अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे अवशेष आढळल्याने खळबळ उडाली आहे. रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू असताना रात्री साडेदहा वाजता जेसीबी चालकाला मुरूमाच्या ढिगाऱ्याखाली हे अवशेष दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीसच्या 112 आपत्कालीन क्रमांकावरून कळविण्यात आले आणि वाशिम शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. हे प्रकरण अपघात आहे की घातपात,याबत अद्याप स्पष्टता नाही. मृतदेहाचे अवशेष मुरूमासोबत आले की कोणीतरी खून करून ते लपवले, याचा तपास वाशिम शहर पोलीस, ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
1003
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 18, 2026 03:17:50
Satara, Maharashtra:साताऱ्यातील खासदार उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये एका आगळ्यावेगळ्या पाहुण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खाकी वर्दी अंगात दरारा आणि हातात पुष्पगुच्छ घेऊन आलेल्या एका पोलीस इन्स्पेक्टर ने थेट खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. मात्र हा कोणी खरा पोलीस अधिकारी नसून आपल्या कलेच्या जोपासनेसाठी आलेला एक बहुरूपी कलाकार होता. त्याच्या या संवादशैलीमुळे जलमंदिरचा परिसर हास्याने फुलून गेला. त्याने महाराजांसमोर उभे राहून जेव्हा आपल्या खास शैलीत विनोद सादरीकरण सुरू केले. तेव्हा उदयनराजेंनाही आपले हसू आवरता आले नाही... ग्रामीण भागात गावोगावी फिरून लोकांचे मनोरंजन करणारी बहुरूपी ही कला आता काळाच्या ओघात दुर्मिळ होत चालली आहे. हीच कला जिवंत ठेवण्यासाठी एका युवकाने पोलीस इन्स्पेक्टरचा वेश परिधान केला होता. या युवकाने सादर केलेल्या कलेचे उदयनराजेंनी कौतुक केले
952
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 18, 2026 03:16:35
903
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 18, 2026 03:16:21
Bhandara, Maharashtra:पिरॅमिड गॅस एजन्सीच्या अनधिकृत गॅस गोदामावर पुरवठा विभागाचा छापा... मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा जप्त.... 57 सिलेंडर केले जप्त... भंडारा जिल्हा पुरवठा अधिकारी यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार त्यांच्या पथकाने भंडारा येथील एम.आय.डी.सी. (MIDC) परिसरात असलेल्या एका अनधिकृत गॅस सिलेंडर गोदामावर धाड टाकली. या कारवाईत घरगुती आणि व्यावसायिक वापराचे मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून, संबंधित गोदामाला सील लावण्यात आले आहे. जिल्ला पुरवठा अधिकारी आणि त्यांच्या पथकाने एम.आय.डी.सी भंडारा परिसरातील एका संशयास्पद गोदामाची तपासणी केली. यावेळी गोदामाच्या बाहेर गॅस एजन्सीचा नावाचा फलक नव्हता, तसेच गॅस सिलेंडर साठवणुकीसाठी विस्फोटक विभागाचा अधिकृत परवाना नसल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. घरगुती वापराचे 40 रिकामे गॅस सिलेंडर , व्यावसायिक वापराचे 8 रिकामे गॅस सिलिंडर तर लहान 5 रिकामे गॅस सिलेंडर. अश्या प्रकारे एकुण 57 गॅस सिलेंडर आढळुन आले. तपासणी दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असणारी आग प्रतिबंधक यंत्रे किंवा गॅस सिलेंडर मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाटा यांसारखी कोणतीही साधने तिथे उपलब्ध नसल्याचे दिसून आले, जे नियमांचे गंभीर उल्लंघन आहे. गोदामावर उपस्थित असलेले मनीष भूपेंद्र खारा (वय ५२, रा. भंडारा) यांना कागदपत्रांची मागणी केली असता, त्यांनी कोणतेही अधिकृत परवाने सादर केले नाही. तसेच, गोदामातील साठ्याबाबत त्यांनी प्रशासनाला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्या वाहनचालकाने त्यांच्या वाहनाची बॅटरी डाऊन झाल्याने रिकामे सिलेंडर तिथे ठेवल्याचे सांगितले. तरी मोठ्या प्रमाणातील साठा पाहता या गोदामातुन अनाधिकृतरित्या गॅस सिलेंडरची विक्री करत असल्याचे स्पष्ट आढळून आल्याने यावर कारवाई करण्यात आली....
1077
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 18, 2026 03:16:00
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ अटकेत बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ याला नाशिक क्राइम ब्रANCH युनिट 1 ने अटक केली आहे. संबंधित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे... तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ५८ व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे...पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू असून, त्यामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नाशिक क्राइम ब्रANCH युनिट 1 करीत आहे.
993
comment0
Report
Advertisement
Back to top