Back
गुढीपाडुवे पर AI-जनित वीडियो से ऑनलाइन फ्रॉड; भक्तों से 351 रुपये की ठगी
PNPratap Naik1
Mar 18, 2026 02:49:06
Kolhapur, Maharashtra
गुढीपाडव्या दिवशी करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीला साडी अर्पण करणे सौभाग्याचे आणि सुख-समृद्धीचे प्रतीक आहे असा खोटा प्रचार करणारा AI-generated व्हिडिओ यजमान डॉट कॉम माध्यमातून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल करण्यात आला आहे.. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या नावाने ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. केवळ ३५१ रुपयांत महालक्ष्मी साडी सेवा आणि शृंगार सेवा घरबसल्या मिळेल, असा दावा करणारा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे AI द्वारे तयार करण्यात आलेला असून, अशा प्रकारची कोणतीही अधिकृत सेवा मंदिर प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही,या जाहिरातीमध्ये 351 रुपये भरल्यानंतर देवीची साडी घरबसल्या देवीच्या चरणी अर्पण केली जाईल, तसेच सेवेचा व्हिडिओ, ब्लाऊज पीस आणि हळदी-कुंकू घरपोच दिले जाईल, असा खोटा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून याबाबत स्पष्ट करण्यात आले असून, अशा कोणत्याही ऑनलाईन सेवेचा मंदिराशी संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे भक्तांनी अशा बनावट वेबसाईट आणि व्हिडिओंसापासून सावध राहावे, तसेच कोणतीही सेवा घेण्यापूर्वी अधिकृत स्रोतांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 03:51:090
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 03:50:340
Report
KJKunal Jamdade
FollowMar 18, 2026 03:48:520
Report
AKAMAR KANE
FollowMar 18, 2026 03:47:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 18, 2026 03:36:32877
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 03:20:51995
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 18, 2026 03:17:50944
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 18, 2026 03:16:35894
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 18, 2026 03:16:211066
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 18, 2026 03:16:00985
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 03:01:071014
Report
AKAMAR KANE
FollowMar 18, 2026 03:00:131003
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 02:48:251018
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 18, 2026 02:48:121037
Report