Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याण गांधारी परिसर में गाड़ी में सांप घुसा; सर्प मित्रों ने सुरक्षित निकाला

ABATISH BHOIR
Nov 26, 2025 05:21:45
Kalyan, Maharashtra
कल्याण गांधारी परिसरात गाडीत शिरलेल्या हरंटोळ सापाची सर्प मित्रांनी केली सुटका कल्याणच्या गांधारी येथील गोल्डन ओक हॉटेलजवळ उभी असलेल्या एका गाडीत अचानक साप शिरल्याची घटना समोर आली. नागरिकांनी तत्काळ सर्पमित्र संदीप पंडित यांच्याशी संपर्क साधला. संदीप पंडित घटनास्थळी दाखल होत सापाची गाडीतून सुखरूप सुटका केली. संदीप पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव करण्यात आलेला सर्प हरंटोळ प्रजातीचा असून तो निमविषारी आहे. या सापापासून मानवाला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. _sम्बन्धित सर्पाची त्वरित निसर्गात मुक्तता करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली._
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Nov 26, 2025 05:37:36
Nagpur, Maharashtra:नागपूर * *गांजा तस्करीत सहा जणांना अटक, तर फरार असलेल्या दोघांचा शोध सुरू..* अटकेतील एक आरोपी भाजप युवा मोर्चाच्या काटोल ग्रामीणच्या अध्यक्ष असल्याची माहिती * अटकेतील आरोपीकडून 6 लाख 72 हजार रुपयांच्या 33.600 किलो गांजासह एकूण 17 लाख लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त.. * काटोल पोलिस आणि एनडीपीएस सेल यांच्या संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली.. * *अटकेतील आरोपी वैभव काळे हा डोरली(भांडवलकर) येथील सरपंच आणि भाजपा युवा मोर्चा काटोलचा ग्रामीण अध्यक्ष आहे...* * तर या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर राऊत हा एका या सामाजिक संघटनेचा पदाधिकारी आहे.. - हा गांजा ओडीसामधून नागपूरमध्ये काटोल जिल्ह्यात आला होता,
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 26, 2025 05:37:22
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 26, 2025 05:35:04
Nagpur, Maharashtra:नागपुर - नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या - गणेशपेठ परिसरात गाडीखाना चौकात तरुणाची हत्या - मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास मृतक अमन मेश्राम याला आरोपीने भेटीसाठी बोलवले असता दोघात वाद होऊन आरोपीने साथीदारच्या मदतीने धारदार shस्त्राने केले वार... - जखमीला पोलिसांनी तरुणाला मेयो हॉस्पिटल मध्ये नेले असता डॉक्टरांनी मूर्त घोषित केले - अमन मेश्राम असे मृतकाचे नाव तर अमित शिवलकर असे आरोपीचे नाव आहे..ही हत्या प्रेम प्रकरणातून घडल्याची माहिती समोर आली आहे.. - आरोपीने स्वतःची दुचाकी सोडून पळ काढला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे...
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Nov 26, 2025 05:32:36
Buldhana, Maharashtra:स्थानिक नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनी बुलढाणा जिल्ह्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. आज, २६ नोव्हेंबर रोजी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री - अजित पवार आणि एकनाथ शिंदे - हे एकाच दिवशी बुलढणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे चिखली आणि खामगाव येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेत. तर, शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा शहरात शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. या दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 26, 2025 04:30:32
103
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 26, 2025 04:30:18
Shirdi, Maharashtra:काॅग्रेस अहिल्यानगर जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण... जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण आणी मारहाण... माॅर्निग वाॅकला गेलेल्या जिल्हाध्यक्षाला गाडीत घातले... अज्ञातांकडून जिल्हाध्यक्षला अपहरण केल्याचा CCTV फुटेज समोर.. हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप... आज सकाळी सात वाजण्याच्या sुमारास घडली घटना... सचिन गुजर यांचे अपहरण करत केली जबर मारहाण... श्रीरामपूरचे आमदार हेमंत उगले , काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाने , सचिन गुजर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात ठाण मांडून... गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू... नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आरोप प्रत्यारोप.. त्यातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहीती... थेट काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण केल्याने एकच खळबळ...
207
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 26, 2025 04:20:46
170
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 26, 2025 04:20:32
Ratnagiri, Maharashtra:खेडमध्ये उबाठाला मोठा धक्का, उबाठाच्या प्रभाग क्रमांक पाच ब च्या उमेदवार सुनीता खालकर यांचा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा खेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना मोठी घडामोडी मात्र पहावयास मिळत आहे शहरातील प्रभाग क्रमांक पाच ब च्या उमेदवार सुनिता सागर खालकर या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विकास कामांना प्रभावित होऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेत शिवसेना पक्षाला स्वइच्छेने जाहीर पाठिंबा दर्शवला असून त्यांनी तसे प्रतिज्ञा पत्र देखील सादर केले आहे. मंगळवारी सायंकाळी मोठी राजकीय उलथापालथ पहावयास मिळाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळाराम बाळू खेडेकर यांच्या होम ग्राउंड वरील आणि त्यांच्या प्रभागातील उमेदवार सुनिता खालकर यांनी शिवसेना पक्षाचे उमेदवाराला अधिकृत पाठिंबा देत आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे.. खेड शहरात होणारी विकास कामे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कामावर प्रभावित होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे..
119
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 26, 2025 04:20:23
Nanded, Maharashtra:शंकरराव चव्हाण म्हणायचे नांदेडला लंडन बनवणार, मी दोन तीन वेळा नांदेडला आलो पण मला काही बदल दिसला नाही अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी काँग्रेसचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यावर टीका केली. भोकर नगर परिषदेच्या निवडणुकी निमित्त आयोजित जाहीर सभेत शिरसाठ यांनी ही टीका केली. आज तर मी त्यांच्या मतदार संघातील गावात आलो, मला वाटले हे गाव तरी चांगले असेल परंतु काही नाही. ज्या लोकांनी एव्हढं मोठं राजकारण केलं, काम केलं ज्यांच्या आदर्शवर आम्ही राजकारण करतो ते गाव तर सर्वात सुंदर असेल असे वाटले होते अशी खोचाक टिकाही शिरसाठ यांनी केली. भाकरी खाता की पैसे एव्हढ्या सगळ्या एजंसी घेऊन करता, एव्हढा पैसा कश्याला पाहिजे, भाकरी खाता की नोटा अश्या शब्दात सामाजिक न्यायामंत्री संजय शिरसाठ यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. अशोक चव्हाण यांचा मतदार संघ असलेल्या भोकर नगर परिषद निवडणुकीच्या निमित्त आयोजित जाहीर सभेत शिरसाठ यांनी हे वक्तव्य केले. घरात पंधरा माणसे असली असती तर वाटण्या झाल्या असत्या आणि आपल्या वाट्याला काही येणार नाही असे असले तर समजू शकलो असतो असे म्हणत शिरसाठ यांनी अशोक चव्हाण यांच्यावर व्ययक्तिक टिकाही केली. संजय शिरसाठ टाईट राहतो सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. माझा फ्लॅट आहे काय आहे ते दाखवतो आपण कुणाला घाबरत नाही, आपण प्रामाणिक पणे करतो कुणाचे हरामाचे पैसे खात नाही अशी बोचारी टिकाही शिरसाठ यांनी केली. आमची ऑटो युनियन सगळे मंत्री झाले फक्त एकनाथ शिंदे रिक्षा चालवत नव्हते मीही रिक्षा चालवत होतो, भाजपचे बावनकुळे, प्रताप सरनाईक हेही रिक्षा चालवत होते. आमची रिक्षा चालवणाऱ्यांची एक मोठी युनियन आहे आम्ही सगळे मंत्री झालो, सर्वसामान्य मोठे झाले पाहिजे असे वक्तव्य मंत्री संजय शिरसाठ यांनी भोकर मध्ये आयोजित जाहीर सभेत केले.
165
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 26, 2025 04:18:47
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक आणि पाटील गटाचं एखाद्या विषयावर एकमत झालंय असं खूप कमी वेळेला पाहायला मिळतं. पण कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादी घोळाबाबत महाडिक आणि पाटील यांनी एकमत नोंदविले आहे. एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात मोठ्या प्रमाणात नावे गेले असतील तर ती तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे असं निवेदन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले. प्रत्येक प्रभागात अशा प्रकारचा घोळ झाल्याने त दुरुस्त झाल्याशिवाय प्रारूप मतदार यादी अंतिम करू नये अशी मागणी देखील ऋतुराज पाटील यांनी केली आहे. याच विषयावर बोलत असताना भाजपा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी प्रभाग रचनेमुळे मतदार यादीमध्ये गडबड झाली आहे, त्यामुळे उमेदवाराला फटका बसू शकतो, त्यामुळे हे दुरुस्त झाले पाहिजे अशी आमचीही मागणी आहे अस म्हटलय.
128
comment0
Report
Advertisement
Back to top