Back
गडचिरोली के तुमरकोठी में 24 घंटे में नया पुलिस स्टेशन, सुरक्षा की नई उम्मीद
AAASHISH AMBADE
Dec 19, 2025 13:31:00
Chandrapur, Maharashtra
1000 सी–60 कमांडो, 21 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने गडचिरोली पोलिसांनी तुमरकोठी गावात 24 तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन, मार्च 2026 पर्यंत गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा निर्धार है. अँकर: 2023 पासूनची महत्वाची सुरक्षा पो>की कमी करण्यासाठीच्या साखळीमधील 9 व्या नवीन पोलीस स्टेशनची स्थापना गडचिरोली पोलिसांनी तुमरकोठी गावात 24 तासात केली. भामरागड तालुक्यातील पोस्टे कोठी पासून 07 किमी व छत्तीसगड सिमेपासुन फक्त 02 किमी अंतरावर असलेल्या अति-दुर्गम भागातील नागरिकांची सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून ते विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस स्टेशन तुमरकोठी मैलाचा दगड ठरणार आहे. सन 2024 वर्षाअखेर दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्र, दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन, दिनांक 09 मार्च 2025 रोजी याच भागात कवंडे येथे नवीन पोलीस स्टेशन दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी फुलनार कॅम्प गुंडूरवाही येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. यामुळे अति-दुर्गम भागातील नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यात आली आहे. तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांद्वारे या भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. 1050 मनुष्यबळ, 04 जेसीबी, 07 ट्रेलर, 02 पोकलेन, 25 ट्रक इत्यादींच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली. या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 12 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, 08 सँड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात आली असून यासोबतच पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 02 अधिकारी व 52 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 12, हिंगोली ई कंपनीचे 02 प्लाटुन तसेच सिआरपीएफ 191 बटा. एफ कंपणीचे 01 असिस्टंट कमांडन्ट व 79 अधिकारी/अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 08 पथक (200 कमांडोज) तैनात करण्यात आले आहे. पोलीस स्टेशनच्या उभारणी कार्यक्रमादरम्यान जनजागरण मेळावा आयोजित करुन पोलीस स्टेशन, तुमरकोठी हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना साड्या, चप्पल, पुरुषांना घमेले, ब्लॅकेट, स्वयंपाक भांड्यांचा संच, मच्छरदानी, युवकांना कपडे, टि-शर्ट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, कंपास, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, क्रिकेट स्टंप संच, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच वाढलेल्या सुरक्षेमूळे भविष्य काळात या अतिदुर्गम भागात नवीन रस्ते बांधकाम तसेच एस. टी. बस सेवा सुरु करणे शक्य होणार असून अतिदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowDec 19, 2025 15:20:030
Report
SNSWATI NAIK
FollowDec 19, 2025 15:19:310
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 19, 2025 14:18:040
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 19, 2025 13:36:190
Report
ABATISH BHOIR
FollowDec 19, 2025 13:18:030
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 19, 2025 13:04:190
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 19, 2025 11:36:430
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 19, 2025 11:36:160
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 19, 2025 11:30:450
Report
KJKunal Jamdade
FollowDec 19, 2025 11:17:380
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 19, 2025 10:48:590
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 19, 2025 10:39:190
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 19, 2025 10:36:310
Report
PNPratap Naik1
FollowDec 19, 2025 09:48:060
Report