Back
सांगली महापालिका में भाजपा बनाम महाविकास आघाडी: सत्ता का कौल किसके पक्ष में?
SMSarfaraj Musa
Dec 19, 2025 11:36:43
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - हिसकावलेली सत्ता भाजप मिळवणार ? की महाविकास आघाडी बाजी मारणार,सांगलीकर कोणाला देणार कौल..
अँकर - कधीकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा सांगली महापालिका आता भाजपाचं गड बनला आहे.राज्यातल्या बदललेल्या राजकीय समिकरणानंतर सांगली महापालिकेत भाजप आता पावरफुल पक्ष बनलाय,त्यामुळे महाविकास आघाडीसमोर भाजपाचे मोठं आव्हान असणार आहे.मात्र या निवडणुकीमध्ये सांगलीकर जनता सत्तेच्या समीकरणाला की शहराच्या विकासाला कौल देणार,हे निकाल नंतर स्पष्ट होणार आहे.
व्ही वो - सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाने वेगळी भूमिका घेण्याची तयारी सुरू केली आहे.भाजपात झालेली भाऊ गर्दी,राष्ट्रवादी अजित पवार गटाची वेगळी भूमिका आणि महाविकास आघाडीकडे उमेदवारांचा वाणवा यावेळेस सांगली महापालिकेची निवडणूक रंगतदार होणार आहे.
बाईट - शिवाजी मोहिते - जेष्ठ पत्रकार -सांगली.
व्ही वो - सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची स्थापना होऊन 26 वर्ष उलटलेत,या दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सर्वपक्षीय महाविकास आघाडी,भाजपा अशा महाविकास आघाडी अशी सर्वच पक्षांच्या अलटून-पालटून सत्ता राहिले आहे.
एक नजर टाकूया पक्षीय बलाबलवर...
*एकूण नगरसेवक 78*
( 20 प्रभाग )
काँग्रेस - 20
राष्ट्रवादी (शप गट) - 15
भाजपा - 41
अपक्ष - 2
व्ही वो - गत निवडणुकीमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं,मात्र अडीच वर्षाच्या कालावधीनंतर महापौर निवडणुकीत राज्यातल्या सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीने सांगली महापालिकेत परिवर्तन केले.त्यानंतर गेल्या काही वर्षात राज्यातल्या पक्षांतर समीकरणामुळे महापालिकेचीही समीकरण बदलली आहेत.
बाईट - हणमंत मोहिते - जेष्ठ पत्रकार- सांगली.
एक नजर टाकूया सध्याचे बलाबलवर.
ग्राफिक in
भाजपा - 51
काँग्रेस - 11
राष्ट्रवादी - ( SP ) 08
राष्ट्रवादी अजित पवार - 07
शिवसेना - 00
ग्राफिक out
व्ही वो - सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपा एक नंबरला असणारा पक्ष आहे, यामध्ये भर म्हणून महापालिका क्षेत्रात दबदबा असणारया मदन पाटील गटाच्या नेत्या जयश्रीताई पाटील आणि
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहिलेले पृथ्वीराज पाटील आपल्या समर्थकांसह भाजपात दाखल झालेत.त्यामुळे महापालिका क्षेत्रात आता भाजपा पावरफुल पक्ष बनला आहे,यातुनचं भाजपात आता इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे.
बाईट - शेखर इनामदार - संघटक ,भाजपा- सांगली.
व्ही वो - राज्यातील सत्तांतर स्थानिक पक्षांतर यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची परिस्थिती तशी खिळखिळी बनली आहे.त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रित येत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.आमदार जयंत पाटील आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील या तिघांनी एकत्रित येत महापालिका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा जाहीर केलंय.मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसला तगडे उमेदवारी मिळवताना दमछाक होणार आहे.
बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी शरद पवार पक्ष
व्ही वो - महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने आता स्वबळाचा नारा दिला आहे. 30 जागांची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादीने आता ऐन निवडणुकीत पक्षात माजी महापौरांसह 16 आजी-माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाने आता आणखी जागांची मागणी करत स्वबळावर लढण्याचा इशारा दिलाय.
बाईट - पद्माकर जगदाळे - शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट - सांगली.
व्ही वो - महायुतीतल्या शिवसेना शिंदे गटाने देखील स्वबळाची भाषा करत,योग्य वाटा आणि सन्मान द्या,अन्यथा स्वबळावर लढू,असा इशारा शिवसेना शिंदे गटाने देखील दिला आहे.
बाईट - शंभूराज देसाई - पर्यटन मंत्री - शिवसेना शिंदे गट.
व्ही वो - आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील आता या महापालिका निवडणुकीत सत्ता आणण्यासाठी एकत्र आलेत.तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा,निवडणूक लढवत आहे.
व्ही वो - सांगली,मिरज आणि कुपवाड अशा तीन शहरांची मिळून हे महापालिका आहे. सांगली आणि मिरज कुपवाड या तिन्ही शहरांमध्ये उपनगरांचा विस्तार,हा गेल्या काही वर्षात झपाट्याने झाला आहे.मात्र अद्याप ही पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत.शहरातल्या विकासाचा तर प्रश्न अद्यापही गंभीर आहे,ड्रेनेज व्यवस्था गटार व्यवस्था रस्ते अशा गोष्टींचा अभाव दिसून येतो..
*कोणते मुद्दे महत्वाचे असू शकतात*
ज्यामध्ये सांगली शहराच्या विकासाबरोबर, उपनगरातील नागरी सुविधा,शेरीनाल्याचे सांडपाणी शुद्धकरणं,कृष्णा नदी प्रदूषण, स्वच्छ आणि 24 तास पाणी, शहरातील खड्ड्यांचे रस्ते,घराणेशाही आणि पक्षांतर हे मुद्दे असू शकतात.
PTC
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowDec 19, 2025 11:36:160
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 19, 2025 11:30:450
Report
KJKunal Jamdade
FollowDec 19, 2025 11:17:380
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 19, 2025 10:48:590
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 19, 2025 10:39:190
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 19, 2025 10:36:310
Report
PNPratap Naik1
FollowDec 19, 2025 09:48:060
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 19, 2025 09:47:150
Report
AKAMAR KANE
FollowDec 19, 2025 09:46:490
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 19, 2025 09:46:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 19, 2025 09:21:540
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 19, 2025 09:19:350
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 19, 2025 09:05:390
Report
PNPratap Naik1
FollowDec 19, 2025 09:00:480
Report