Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001
संभाजीनगर में शिवसेना-भाजपा की बैठक, उम्मीदवारों की जगहों पर चर्चा
VKVISHAL KAROLE
Dec 19, 2025 13:36:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
ANC: संभाजीनगरमध्ये आज जागा वाटपासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी बैठक झाली. या बैठकीत कोण कोणत्या प्रभात प्रभागांमध्ये कोण लढू शकतं याची प्राथमिक चर्चा झाली. यापूर्वी २०१५ मध्ये ज्या प्रभागात दोन्ही पक्षाचे नगरसेवक निवडून आले होते, त्यातील आत्ताची स्थिती काय आहे, यावरून एकमेकांच्या जागा एक्स्च Exchange करता येतील का यावरही चर्चा झाली. प्रत्येक प्रभाग निहाय आढावा घेण्यात आला. उद्या दुपारपर्यंत दोन्ही पक्षाचे नेते आपापल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सोबत चर्चा करून उद्या बैठकीला येतील. त्यावर चर्चा होईल. आता उद्या पुन्हा एक वाजता दोघांची बैठक होणार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Dec 19, 2025 14:18:04
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग ऐन महापालिका निवडणुकीत सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का..दोन माजी महापौरांसह 16 आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश.. अँकर सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इनकमिंग झाले आहे. सांगली महापालिकेच्या दोन माजी महापौरांसह 16 आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मिरजेत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या पक्ष प्रवेशांमध्ये काँग्रेसचे माजी महापौर किशोर जामदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचा देखील प्रवेश झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, भाजपा आणि जनसुराज्य शक्ती पक्षातल्या अर्जूनाजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाची ताकद वाढली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. तर पक्षप्रवेशा मध्ये मिरज दंगलीचे मुख्य सूत्रधार म्हणून ज्यांच्याकडे बोट झाले होता, त्यांनी देखील अजित पवार गटात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 19, 2025 13:31:00
Chandrapur, Maharashtra:1000 सी–60 कमांडो, 21 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने गडचिरोली पोलिसांनी तुमरकोठी गावात 24 तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन, मार्च 2026 पर्यंत गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा निर्धार है. अँकर: 2023 पासूनची महत्वाची सुरक्षा पो>की कमी करण्यासाठीच्या साखळीमधील 9 व्या नवीन पोलीस स्टेशनची स्थापना गडचिरोली पोलिसांनी तुमरकोठी गावात 24 तासात केली. भामरागड तालुक्यातील पोस्टे कोठी पासून 07 किमी व छत्तीसगड सिमेपासुन फक्त 02 किमी अंतरावर असलेल्या अति-दुर्गम भागातील नागरिकांची सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून ते विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस स्टेशन तुमरकोठी मैलाचा दगड ठरणार आहे. सन 2024 वर्षाअखेर दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्र, दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन, दिनांक 09 मार्च 2025 रोजी याच भागात कवंडे येथे नवीन पोलीस स्टेशन दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी फुलनार कॅम्प गुंडूरवाही येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. यामुळे अति-दुर्गम भागातील नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यात आली आहे. तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांद्वारे या भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. 1050 मनुष्यबळ, 04 जेसीबी, 07 ट्रेलर, 02 पोकलेन, 25 ट्रक इत्यादींच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली. या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 12 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, 08 सँड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात आली असून यासोबतच पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 02 अधिकारी व 52 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 12, हिंगोली ई कंपनीचे 02 प्लाटुन तसेच सिआरपीएफ 191 बटा. एफ कंपणीचे 01 असिस्टंट कमांडन्ट व 79 अधिकारी/अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 08 पथक (200 कमांडोज) तैनात करण्यात आले आहे. पोलीस स्टेशनच्या उभारणी कार्यक्रमादरम्यान जनजागरण मेळावा आयोजित करुन पोलीस स्टेशन, तुमरकोठी हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना साड्या, चप्पल, पुरुषांना घमेले, ब्लॅकेट, स्वयंपाक भांड्यांचा संच, मच्छरदानी, युवकांना कपडे, टि-शर्ट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, कंपास, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, क्रिकेट स्टंप संच, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच वाढलेल्या सुरक्षेमूळे भविष्य काळात या अतिदुर्गम भागात नवीन रस्ते बांधकाम तसेच एस. टी. बस सेवा सुरु करणे शक्य होणार असून अतिदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 19, 2025 13:18:03
Kalyan, Maharashtra:शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर काँग्रेसचा डॅमेज कंट्रोल आप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, मात्र मान-सन्मानावरून बैठकीत पुन्हा गोंधळ मामा पगारे नाराज; नेत्यांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि ब्लॉक अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने बैठका घेत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला. मात्र या कार्यक्रमात जुन्या कार्यकर्त्यांच्या मान-सन्मानावरून वाद उफळून आला. कल्याणमधील जिल्हाध्यक्ष कार्यालयात काँग्रेस प्रभारी राजन भोसले आणि जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पाटकर यांच्या उपस्थितीत बैठक व पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडत असताना डोंबिवली निवडणूक समन्वयक मामा पगारे यांनी योग्य मान-सन्मान न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला. मात्र या वेळी माध्यमाला पाहताच नेत्यांनी त्याची समजूत काढल्यानंतर हा वाद निवळला. दरम्यान, आगामी पालिका निवडणुकीत काँग्रेस ‘किंगमेकर’ची भूमिका बजावणार असल्याचा दावा जिल्हाध्यक्षांनी केला आहे मात्र काँग्रेसकडून पक्ष प्रवेश करत डायमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी जुन्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान मिळत नाही यामुळे अंतर्गत नाराजगी काँग्रेसच्या प्रत्येक बैठकीमध्ये दिसून येत आहे. बाईट.. मामा पगारे कॉग्रेस पदाधिकारी
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 19, 2025 11:36:43
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - हिसकावलेली सत्ता भाजप मिळवणार ? की महाविकास आघाडी बाजी मारणार,सांगलीकर कोणाला देणार कौल.. अँकर - कधीकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा सांगली महापालिका आता भाजपाचं गड बनला आहे.राज्यातल्या बदललेल्या राजकीय समिकरणानंतर सांगली महापालिकेत भाजप आता पावरफुल पक्ष बनलाय,त्यामुळे महाविकास आघाडीसमोर भाजपाचे मोठं आव्हान असणार आहे.मात्र या निवडणुकीमध्ये सांगलीकर जनता सत्तेच्या समीकरणाला की शहराच्या विकासाला कौल देणार,हे निकाल नंतर स्पष्ट होणार आहे. व्ही वो - सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाने वेगळी भूमिका घेण्याची तयारी सुरू केली आहे.भाजपात झालेली भाऊ गर्दी,राष्ट्रवादी अजित पवार गटाची वेगळी भूमिका आणि महाविकास आघाडीकडे उमेदवारांचा वाणवा यावेळेस सांगली महापालिकेची निवडणूक रंगतदार होणार आहे. बाईट - शिवाजी मोहिते - जेष्ठ पत्रकार -सांगली. व्ही वो - सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची स्थापना होऊन 26 वर्ष उलटलेत,या दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सर्वपक्षीय महाविकास आघाडी,भाजपा अशा महाविकास आघाडी अशी सर्वच पक्षांच्या अलटून-पालटून सत्ता राहिले आहे. एक नजर टाकूया पक्षीय बलाबलवर... *एकूण नगरसेवक 78* ( 20 प्रभाग ) काँग्रेस - 20 राष्ट्रवादी (शप गट) - 15 भाजपा - 41 अपक्ष - 2 व्ही वो - गत निवडणुकीमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं,मात्र अडीच वर्षाच्या कालावधीनंतर महापौर निवडणुकीत राज्यातल्या सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीने सांगली महापालिकेत परिवर्तन केले.त्यानंतर गेल्या काही वर्षात राज्यातल्या पक्षांतर समीकरणामुळे महापालिकेचीही समीकरण बदलली आहेत. बाईट - हणमंत मोहिते - जेष्ठ पत्रकार- सांगली. एक नजर टाकूया सध्याचे बलाबलवर. ग्राफिक in भाजपा - 51 काँग्रेस - 11 राष्ट्रवादी - ( SP ) 08 राष्ट्रवादी अजित पवार - 07 शिवसेना - 00 ग्राफिक out व्ही वो - सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपा एक नंबरला असणारा पक्ष आहे, यामध्ये भर म्हणून महापालिका क्षेत्रात दबदबा असणारया मदन पाटील गटाच्या नेत्या जयश्रीताई पाटील आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहिलेले पृथ्वीराज पाटील आपल्या समर्थकांसह भाजपात दाखल झालेत.त्यामुळे महापालिका क्षेत्रात आता भाजपा पावरफुल पक्ष बनला आहे,यातुनचं भाजपात आता इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे. बाईट - शेखर इनामदार - संघटक ,भाजपा- सांगली. व्ही वो - राज्यातील सत्तांतर स्थानिक पक्षांतर यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची परिस्थिती तशी खिळखिळी बनली आहे.त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रित येत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.आमदार जयंत पाटील आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील या तिघांनी एकत्रित येत महापालिका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा जाहीर केलंय.मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसला तगडे उमेदवारी मिळवताना दमछाक होणार आहे. बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व्ही वो - महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने आता स्वबळाचा नारा दिला आहे. 30 जागांची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादीने आता ऐन निवडणुकीत पक्षात माजी महापौरांसह 16 आजी-माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाने आता आणखी जागांची मागणी करत स्वबळावर लढण्याचा इशारा दिलाय. बाईट - पद्माकर जगदाळे - शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट - सांगली. व्ही वो - महायुतीतल्या शिवसेना शिंदे गटाने देखील स्वबळाची भाषा करत,योग्य वाटा आणि सन्मान द्या,अन्यथा स्वबळावर लढू,असा इशारा शिवसेना शिंदे गटाने देखील दिला आहे. बाईट - शंभूराज देसाई - पर्यटन मंत्री - शिवसेना शिंदे गट. व्ही वो - आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील आता या महापालिका निवडणुकीत सत्ता आणण्यासाठी एकत्र आलेत.तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा,निवडणूक लढवत आहे. व्ही वो - सांगली,मिरज आणि कुपवाड अशा तीन शहरांची मिळून हे महापालिका आहे. सांगली आणि मिरज कुपवाड या तिन्ही शहरांमध्ये उपनगरांचा विस्तार,हा गेल्या काही वर्षात झपाट्याने झाला आहे.मात्र अद्याप ही पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत.शहरातल्या विकासाचा तर प्रश्न अद्यापही गंभीर आहे,ड्रेनेज व्यवस्था गटार व्यवस्था रस्ते अशा गोष्टींचा अभाव दिसून येतो.. *कोणते मुद्दे महत्वाचे असू शकतात* ज्यामध्ये सांगली शहराच्या विकासाबरोबर, उपनगरातील नागरी सुविधा,शेरीनाल्याचे सांडपाणी शुद्धकरणं,कृष्णा नदी प्रदूषण, स्वच्छ आणि 24 तास पाणी, शहरातील खड्ड्यांचे रस्ते,घराणेशाही आणि पक्षांतर हे मुद्दे असू शकतात. PTC
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 19, 2025 11:36:16
Akola, Maharashtra:अकोला जिले के बालापुर शहर में नगरपालिका चुनाव रणधर्माैली तेज हो गया है। यहाँ के राजनीतिक इतिहास में स्वातंत्र्यपूर्व काल से कांग्रेस परिवारों का एकछत्र नियंत्रण रहा है। कुछ समय पहले सत्ता संघर्ष के बावजूद खतीब خاندان सत्ता में रहा, अब सभी दल स्वबळावर मैदान में उतरे हैं। नगरपालिका में तीन पूर्व विधायक सत्ता के मोर्चे पर हैं। बालापुर नगरपरिषदे की स्थापना 1938 में हुई, पर दशकों से खातेब परिवार का सत्ताकाल रहा है। कांग्रेस के साथ एकनिष्ठ खातेब ने विधानसभा में पद का त्याग कर वंचित बहुजन आघाड़ी में प्रवेश किया। इस बार नगराध्यक्ष पद के लिये उनकी पत्नी मैदान में हैं। वक़्त के साथ विकास के दावों के बीच स्थानीय स्तर पर सतत दबाव बना हुआ है।
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 19, 2025 11:17:38
Shirdi, Maharashtra:देवळाली प्रवरा / अहिल्यानगर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन... शिंदे देवळाली प्रवरा येथील सभास्थळी दाखল... शिवसेनेचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे यांच्यासाठी प्रचार सभेचे आयोजन... देवळाली प्रवरा नगरपालिकेत शिवसेना विरुद्ध भाजप अशी प्रमुख लढत... देवळाली प्रवरा नंतर एकनाथ शिंदे यांच्या नेवासा आणि कोपरगाव येथे सभा... यासह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन... देवळाली प्रवरा / अहिल्यानगर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण मुद्दे.. बिगुल वाजलं आहे..उदा मतदान आणि परवा गुलाल उधळायचा आहे.. लाडक्या बहीण आणि भावांना भेटायला आलोय.. विरोधकांची किती आली वादळे तरी विरोधकांना पुरून उरणारी.. ही निवडणूक तिरंगी चौरंगी नाही तर भगव्या रंगाची ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पाहिला महिलांसाठी अनेक योजना मी सुरू केल्या.. शेतकऱ्यांना देखील मोठी मदत आपण दिलीय.. या सर्वात आवडती योजना माझी लाडकी बहीण योजना.. कुणाचा मायकालाल आला तरी ही योजना बंद पाडू शकत नाही.. लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सर्व पदापेक्षा माझ्यासाठी मोठी.. या गावात अनेक समस्या.. सगळ्या समस्या सोडविण्यासाठी तुम्ही साथ द्या.. बिबट्यांचा शिरकाव इकडे असेल तर त्याचा देखील बंदोबस्त केला पाहिजे.. माणसाच आयुष्य महत्त्वच.. बिबट मुक्त देवळाली करणार मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहाय्यात निधीतून साडे चारशे कोटी रुपये आरोग्यासाठी दिले आणि अनेकांचे प्राण वाचवले आपला खुर्चीचा नव्हे तर विकासाचा अजेंडा.. मी मुख्यमंत्री झालो होतो मात्र अजून अनेकांची पोटदुखी गेली नाही.. मला अनेकजण म्हणता तुम्ही झोपता कधी.. आम्ही झोपा काढणारे नाही विरोधकांच्या झोपा उडवणारे.. भाषण संपले...
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 19, 2025 10:48:59
Satara, Maharashtra:सातारा : फलटण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर आणि सर्व नगरसेवकांच्या प्रचारासाठी आज अभिनेता गोविंदा यांची रॅली फलटण शहरात काढण्यात आली. या रॅलीला फलटणकरांनी मोठा प्रतिसाद दिल्याच पाहायला मिळालं. यावेळी माध्यमांशी बोलताना गोविंदा यांनी मराठीतून संवाद साधत सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या तसंच मी या दिलेल्या शुभेच्छांना कोणताही दोष लागू नये असं सुद्धा गोविंदा म्हणाले. अनिकेत राजे यांच्या कामातून लोकांचे विचार पूर्णपणे बदलून जातील असं काम त्यांनी कराव अस सुद्धा ते म्हणाले... वाईट बोलणारी लोक नेहमीच दिसत असतात त्यामुळे मी विरोधकांनी केलेल्या टिकेकडे पाहत नाही. चित्रपट स्थापना, रुद्र स्थापना याला महाराष्ट्राची भूमी पुढे आणते. या महाराष्ट्राच्या भूमीला मी सतत नमन करत असतो. बाळासाहेबांच्या कृपेने आम्ही पुढे आलेलो आहोत आमच्यावर त्यांची ही कृपा सदैव राहील असे मत सुद्धा अभिनेता गोविंदा यांनी व्यक्त केलं.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 19, 2025 10:39:19
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 19, 2025 09:48:06
Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अनेक जागांवर एकमत न झाल्याने काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इचलकरंजीत युती असूनही निवडणुकीत दोस्तीत कुस्ती पाहायला मिळणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्यातील वस्त्रोद्योगाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजीत प्रथमच महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर मात्र जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, भाजप आमदार राहुल आवाडे और माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यात झालेल्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. मात्र कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा द्यायच्या, यावर एकमत झालेलं नाही, परिणामी जिथे शक्य आहे तिथेच महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इचलकरंजीत आधीच आठ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामुळे भाजपमध्ये काहीसा नाराजीचा सुर आहे. स्थानिक नेतेही स्वतंत्र रणनीती आखताना दिसत आहेत. इचलकरंजीत पारंपरिक राजकीय वर्चस्व, स्थानिक नेत्यांची ताकद, सहकार व वस्त्रोद्योगाशी संबंधित मतदारांचा प्रभाव, तसेच नव्या महानगरपालिकेमुळे मिळणारे आर्थिक अधिकार — हे सर्व मुद्दे या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे स्थानिक समीकरणांना अधिक महत्त्व दिले जात आहे. इचलकरंजी शहरात सध्याचे राजकीय गणिते बदलली असले तरी याच इचलकरंजी मध्ये एकेकाळी राष्ट्रवादीचे 29 जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष इचलकरंजी मध्ये टोकाचे तडजोड करेल अस सद्यातरी दिसत नाही.
0
comment0
Report
Advertisement
Back to top