Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

चंद्रपुर नगर पालिका में भाजपा सत्ता, स्थायी समिति चुनाव टला; विरोधी कहते भाजपा डरी

AAASHISH AMBADE
Feb 16, 2026 11:38:33
Chandrapur, Maharashtra
चंद्रपुरात मनपा मध्ये भाजपची सत्ता झाली स्थापन ,मात्र स्थायी समिती सदस्यांची निवड आणि अध्यक्षपदाची निवडणूक रखडल्याने मनपा वर्तुळात सस्पेन्स, विरोधकांनी केला भाजप घाबरल्याचा आरोप तर भाजप मात्र मौन 66 सदस्यांच्या चंद्रपूर महापालिकेत भाजपच्या संगीता खांडेकर यांचा अवघ्या एका मताने महापौरपदी विजय झाला तर समसमान मते पडल्याने उबाठा शिवसेनेचे प्रशांत दानव ईश्वरचिठ्ठीने उपमहापौरपदी निवडून आले. महापौरपदाच्या निवडणुकीत एम आय एम चा एक नगरसेवक तटस्थ राहिला. तर संपूर्ण निवडणुकीत वंचित चे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. भाजपच्या 10 फेब्रुवारी च्या विजयानंतर आता स्थायी समिती अध्यक्ष निवडण्याची प्रतीक्षा आहे. भाजपने राजकीय करार करत ही जागा उबाठा शिवसेनेला देण्याचे मान्य केले आहे. मात्र स्थायी समितीत प्रत्येक चार नगरसेवकांच्या मागे एक सदस्य निवडून द्यावयाचे समीकरण आहे. अशा स्थितीत 16 सदस्यांच्या स्थायी समितीत सत्ता विरोधक आणि समर्थक 8-8 समसमान मते पडणार आहेत. त्यामुळेच स्थायी समिती सदस्यांसाठी नाव देताना व प्रत्यक्ष अध्यक्ष निवडीसाठी भाजप पराजय बघता घाबरली आहे असा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला आहे.यावर भाजपतर्फे प्रतिक्रिया देण्यासाठी मात्र कुणीही तयार नाही. बाईट १) पप्पू देशमुख, विरोधी नगरसेवक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Feb 16, 2026 13:19:29
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या कोंढाळा गावात सिमेंट प्रकल्प काम प्रारंभ झाल्याने ग्रामस्थ संतापले. अनेकदा पाठपुरावा करूनही कंपनीने कुठलीही दखल घेतली नाही परिणामी महिला व ग्रामस्थांनी आंदोलन करत कंपनीचे काम बंद पाडले. संपूर्ण जमीन घ्या, गावाचे पुनर्वसन करा, स्थानिक बेरोजगारांना काम द्या या मागण्यांची पूर्तता करण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनादरम्यान काही काळ ग्रामस्थ आणि पोलिसात जोरदार धुमश्चक्री झाली. कंपनी प्रशासनाने दडपशाही केल्यास यापुढच्या काळात प्रशासन आणि कंपनी विरोधात जोरदार संघर्ष करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 16, 2026 13:05:52
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात कोकणतील हापूस आंबा येण्यास सुरुवात झालेय. आज हापूस आंब्याच्या 100 पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. लांबलेला पाउस आणि वाढलेल्या थंडीचा परिणाम हापूस आंब्याच्या उत्पादनावर झाला असून हापूस आंब्याचा हंगाम यंदा खूप उशिराने सुरु होणार असल्याचे समोर येतंय. लहान हापूस आंब्याला दीड हजार प्रति डझन तर मोठ्या हापूस आंब्याला अडीच हजार प्रति डझन हा दर भेटत आहे. यंदा अमेरिकेने हापूस आंब्याला शून्य टक्के टारीफ लावल्याने अमेरिकेत मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची एक्स्पोर्ट होणार असली तरी यंदाचा हंगाम कोकणातील आंबा शेतकऱ्यांसाठी थोडा कठीण जाणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेय.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 16, 2026 13:04:41
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील नंदगुर गावात महाशिवरात्रचा सण आदिवासी समाजाच्या वतीने मोठ्या पारंपरिक उत्साहात करण्यात आला साजरा अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील नंदगुर येथे महाशिवरात्र सण आज आदिवासी समाजाच्या वतीने मोठ्या पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजात महादेवाला संभू सेक असं म्हणतात आणि मूल तालुक्यामध्ये नंदगुर येथे संभू सेक यांचं अतिशय जुनं पेनठाणा म्हणजे धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्र निमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी रविवार आणि सोमवार असा दोन दिवसीय महाशिवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आला होता. आज सकाळी विविध प्रकारचे आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले, सोबतच या ठिकाणी नवीन मूर्तीची देखील स्थापना करण्यात आली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 16, 2026 12:37:19
Akola, Maharashtra:विमान अपघात प्रकरणातील ब्लॅक बॉक्स जळाल्यामुळे डेटा रिकव्हर करण्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी तातडीने पारदर्शक माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. मिटकरी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ब्लॅक बॉक्स परदेशात रिकव्हर होणार असून अपघाताची माहिती “लवकरच” मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र तोपर्यंत विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज, पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे घरून किती वाजता व कोणत्या गाडीतून निघाले, ते कुठल्या रोडवर ट्रॅफिकमध्ये अडकले होते का, तसेच संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ,या सर्व बाबी २८ जानेवारी २०२६ रोजीच्या दिनांक व वेळेसह महाराष्ट्राला कळवाव्यात, अशी त्यांनी विनंती केली आहे.अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी उपलब्ध सर्व पुरावे आणि तांत्रिक माहिती सार्वजनिक करावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, या मागणीमुळे संबंधित यंत्रणांवर पारदर्शकतेचा दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 16, 2026 12:36:22
Thane, Maharashtra:भिवंडी पालिका महापौर पदाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. کوणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. त्यामुळे भिवंडी पालिका मुख्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप निर्माण झाले होते. महापालिकेच्या प्रवेशद्वारापासून तळमजल्यावर तसेच नगरसचिवांच्या कार्यालयात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कारण विलास पाटील यांना फसवणुकी प्रकरणे ठाणे गुन्हे शाखेने अटक करत १४ फेब्रुवारी रोजी भिवंडी न्यालयात हजर केले होते. न्यालयाने पाटील यांना पाच दिवसांची १८ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज १६ रोजी महापौर उपमहापौर पदाचे अर्ज दाखल करण्यासाठी विलास पाटील यांनी न्यालायाकडे विनंती केली असता न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत महापालिकेत अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 16, 2026 12:01:38
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 16, 2026 11:52:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANCHOR : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीनगरचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगर येथे भाजपचा महापौर झाल्या पासून मराठी-हिंदी लोकांवर असा जुलूम सुरू झालाय, या गरिबांचा आक्रोश पहा असा उल्लेख करण्यात आला आहे. सोबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यात हातगाडी लावणाऱ्या महिलेवर अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करत असल्याचे दिसत आहे. संजय राऊत यांनी केलेल्या याच आरोपाला आता संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत दिवाळखोरीत निघालेले माणूस असून, घरी बसल्यावर त्यांना काही सुचत नाही असे संभाजीनगरचे महापौर समीर राजूकर म्हणाले आहे。
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 16, 2026 11:38:03
Kalyan, Maharashtra:1.28 कोटींची थकबाकी, टीटवाळ्यातील जी आर पाटील. शाळेचे कार्यालय महापालिकेकडून सील. मालमत्ता कराची थकबाकी भरा और कारवाई टाळा केडीएमसी चे आवाहन. मागील सात वर्षांपासून तब्बल 1 कोटी 28 लाख 38305 रुपयांचा मालमत्ता कर थकविल्यामुळे टीटवाळ्यातील जी.आर. पाटील शाळेच्या कार्यालयावर महापालिकेच्या कर विभागाने सील ठोकण्याची कारवाई केली. मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी केडीएमसीने आत्तापर्यंत 300 मालमत्ता सील केल्या असून शेकडो नोटीसा पाठवल्या आहेत. त्यामुळे मालमत्ता कराच्या थकीत रकमेचा भरणा करा और कारवाई टाळा असे आवाहन केडीएमसी कडून करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे मालमत्ता कराची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी जंग जंग पछाडले आहे. मार्च अखेरपर्यंत कर वसुलीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कर्मचारी अधिकाऱ्यांची फौज तयार केली आहे. वारंवार नोटिसा देऊन देखील थकीत रकमेचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांवर केडीएमसीने आता कठोर कारवाई सुरू केली असून आत्तापर्यंत सुमारे 300 मालमत्ता सील केल्या आहेत तर शेकडो नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत,
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 16, 2026 11:37:25
Akola, Maharashtra:गोंधळ आणि राडा ही अकोला महापालिकेची ओळख आजच्या महापालिकेच्या दुसऱ्या सभेत ही कायम राहिली.अकोला महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आज पहिली सभा आयोजित करण्यात आली होती.पहिल्याच सभेत गोंधळ झाल्यानंतर दुपारी दुसरी सभा आयोजित करण्यात आली होती.शहरातील साफ सफाईच्या मुद्यावर ही सभा आयोजित करण्यात आली होती,यावेळी भाजपचे नगरसेवक विजय अग्रवाल विकासाचा मुद्दा मांडत असतानाच उबाठाचे नगरसेवक सागर भारुका यांनी गोंधळ घालत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला,यावेळी सभागृहात चांगलाच गोधळ पाहायला मिळाला, विजय अग्रवाल आणि सागर भारुका हे आमने-सामने आल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही पाहायला मिळाले, तर दुसरीकडे काँग्रेस नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरसेवकांमध्ये ही चांगलाच शाब्दिक युद्ध पाहायला मिळाला.मात्र या गोंधळात जनतेची गैरसोय होऊ नये या करिता आपल्या साध्या भाषेत मत मांडतांना काँग्रेसचे नगरसेवक मोहम्मद फजलू यांनी सभेत एकच हसू पिकविला.एकंदरीत अकोला महापालिकेच्या सभेत अकोला शहराचा विकास होने अपेक्षित असताना प्रत्येक सभेचे अश्या प्रकारे गोंधळ उडाल्याने, शहराचा विकास होणार तरी कसा असा सवाल उपस्थित होत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 16, 2026 10:40:31
Nagpur, Maharashtra:नागपूर -- भाजपा नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ल्याची घटना काल घडलीय - भाजप नगरसेविका मानसी सिमले यांच्या पती निखिल श्याम सिमले यांच्या वर हल्ला - आरोपी ठाकरे, सिमले जुने मित्र असून पूर्वी एका हत्याकांडात आरोपी होते; त्यातून निर्दोष सुटका झाली होती - घटना तलाव परिसरात घडली; दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला, वादाच रूपांतर हाणामारी त झाले. - कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील घटना. आरोपी महेश ऊर्फ सोनू गणेश ठाकरे याने चाकूने सिमलेच्या छाती व पोटावर वार केले. - गंभीर जखमी सिमले यांना खासगी रुग्णालयात दाखल. - पोलिसांकडून पुढील तपास सुरू. हल्ला केल्यानंतर आरोपी सोनू ठाकरे पळून जातानाचा CCTV मध्ये चित्रीत झाला आहे
0
comment0
Report
Advertisement
Back to top