400601
शिंदे गट के आदेश पर महापौर-उपमहापौर के नामांकन दाखिल
Thane, Maharashtra:पक्षाच्या आदेशाने शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेकडून महापौर,उपमहापौर पदासाठीचे ३ उमेदवारी अर्ज दाखल.... पक्षाच्या आदेशाने महापौर पदासाठी सुचिता रुपेश म्हात्रे, बाळाराम चौधरी यांच्या नावाचे अर्ज तर उपमहापौर पदासाठी अस्मिता प्रभूदास नाईक यांचे नावाचे नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे. मात्र पक्षाच्या अंतिम निर्णयानंतर २० तारखेला सर्व समीकरणे जुळलेली दिसतील. प्रकाश पाटील,शिवसेने नेते0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नवी मुंबई महानगरपालिका के सामने दिनदहाड़े अज्ञात व्यक्ति की हत्या से शहर में हड़कंप
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालया समोरील दिवसाढवळ्या एका अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडालेय. वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्याया धक्कादायक घटनेमुळे शहरातील सार्वजनिक सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. नवी मुंबई पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मयत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखिल तपासले जात आहेत.0
0
Report
निमोण गांव ने पानी की टंकी पर निर्भरता खत्म कर दुष्काळ को दी मात
Chandvad, Maharashtra:नाशिक जिले के चांदवड तालुक्यातील निमोण गावाने एक आदर्श घालून दिला आहे… दरवर्षी फेब्रुवारीपासून टँकरवर अवलंबून असलेले हे गाव आता दुष्काळमुक्त झाले आहे… आणि हे शक्य झाले आहे सुशिक्षित सरपंच डॉ. स्वाती देवरे यांच्या पुढाकारातून… पाहूया आमचे प्रतिनिधी काय सांगतात… चांदवड तालुक्यातील निमोण… कमी पर्जन्यमानामुळे कायम पाण्याच्या टंचाईचा सामना करणारे गाव… 2025 पूर्वी परिस्थिती इतकी बिकट होती की, फेब्रुवारी महिन्यापासूनच टँकरने पानीपुरवठा करावा लागत होता… मात्र गावाच्या सरपंचपदी असलेल्या सुशिक्षित आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. स्वाती देवरे यांनी या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा निर्धार केला… मुंबईयेथील रहा फाउंडेशनचे गिरीश कुलकर्णी आणि सारिका कुलकर्णी यांच्या सहकार्याने गावातील पडीत जमिनीवर तब्बल एक एकर क्षेत्रावर शेततळे उभारण्यात आले… गेल्या वर्षी झालेल्या पावसाचे पाणी आणि विहिरींच्या माध्यमातून हे शेततळे पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात आले…आणि याच नियोजनाचा परिणाम म्हणजे 2026 मध्ये गावाला टँकरची गरजच भासली नाही… निमोण गावाने योग्य नियोजन, नेतृत्व आणि सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर दुष्काळावर मात केली आहे…आज हे गाव इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे… निमोण गावाचा हा आदर्श नक्कीच इतर दुष्काळग्रस्त गावांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे…0
0
Report
S. CREATORS 2026: सोलर चार्जिंग कार समेत ग्रामीण विद्यार्थियों ने दिखाया तकनीकी भविष्य
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी तंत्रज्ञानाचा महाकुंभ मानल्या जाणाऱ्या 'S. CREATORS 2026' या भव्य प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन.. अँकर सावर्डे येथील तंत्रज्ञानाचा महाकुंभ मानल्या जाणाऱ्या 'S. CREATORS 2026' या भव्य प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि आमदार शेखर निकम यांच्या हस्ते फित कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनवलेली इलेक्ट्रिक स्कुटर,शेतीसाठी उपयुक्त यंत्रे आणि प्रगत सॉफ्टवेअर मॉडेल्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार शेखर निकम यांनी विद्यार्थ्यांच्या या तांत्रिक प्रगतीचे तोंडभरून कौतुक केले आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी आता जागतिक स्पर्धेसाठी सज्ज होत असल्याचे सांगितले.. या प्रदर्शनात लक्षवेधी ठरली ती सोलर वर चार्ज होणारी कार.. पर्यावरण होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी ही कार तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे..0
0
Report
Advertisement
Chipplun bullock cart race thrill captured by drone; millions watched
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणच्या मैदानात गुलालाची उधळण.. कादवड कालभैरव चषकाचा थरार ड्रोनमध्ये कैद!.. अँकर कोकणात सध्या बैलगाडी शर्यतींचा धुराळा पाहायला मिळतोय! चिपळूण तालुक्यातील भराडे येथील 'कादवड कालभैरव चषक' मोठ्या उत्साहात पार पडला.. रडारवरची गती आणि जोडीदाराचा ताळमेळ पाहत असतानाच,या स्पर्धेच्या फायनलमध्ये खऱ्या अर्थाने धूळ उडाली. हजारो शौकिनांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत अटीतटीची लढत पाहायला मिळाली.. जेव्हा मैदानात गाड्या सुटल्या,तेव्हा प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला. विशेष म्हणजे,या स्पर्धाचा चित्तथरारक अनुभव फक्त जमिनीवरूनच नाही,तर ड्रोन कॅमेऱ्यातूनही टिपण्यात आला आहे.. आकाशातून टिपलेला हा थरार आणि वेगाचा खेळ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पाहूया,भराडे येथील या बैलगाडी शर्यतीचा हा खास व्हिडिओ...0
0
Report
मालेगांव बम विस्फोट के पीड़ितों को MLSA से मुआवजा, परिवारों को राहत
Malegaon, Maharashtra:नाशिकच्या मालेगाव बॉंब स्फोटातील ४५ पीडितांना भरपाई - अद्याप काही जखमी पीडितांचा संपर्क नाही, त्यांचा शोध सुरू... मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील पीडितांना मुंबई शहर विधी सेवा प्राधिकरणामार्फत नुकसानभरपाई देण्यास सुरुवात करण्यात आली असून, या माध्यमातून पीडित कुटुंबांना काहीसा दिलासा मिळत आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या सहा जणांपैकी पाच जणांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांची मदत देण्यात आली आहे. जखमी पीडितांपैकी ४५ जणांना प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. ही मदत महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. दरम्यान, एका मृत व्यक्तीच्या वारसांचा तसेच काही जखमी पीडितांचा अद्याप संपर्क न झाल्याने त्यांना नुकसानभरपाई बाकी आहे. संबंधितांचा शोध घेण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले. मदतीमुळे पीडितांना आर्थिक आधार मिळत असला, तरी उर्वरित लाभार्थ्यांपर्यंतही ही मदत लवकर पोहोचावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.0
0
Report
प्राजक्त तनपुरे की नई राजनीतिक भूमिका पर सबकी नजर—20 अप्रैल का चौकस ऐलान
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...काल भाजप नेत्यांनी तनपुरे यांच्याबाबत भाष्य करताना तनपुरे आमच्या सोबत आले तर आम्हाला आनंदच होईल असे म्हटलं होतं याबाबत तनपुरे यांनी 20 एप्रिल रोजी आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे...0
0
Report
Advertisement
शिरूर में 40°C से पार गर्मी: लोग घरों से बाहर निकलने से बच रहे
Shirur, Maharashtra:राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून सूर्य अक्षरशः ओकतोय पुण्याच्या शिरूर परिसरात तापमान 40 च्या पार गेलं असून या रणरणत्या उन्हात नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळत आहेत सध्या या परिसरात गाव खेड्यातील यात्रा जत्रांचा हंगाम सुरू आहे मात्र यात्रा जत्रांकडे ही नागरिकांनी उन्हामुळे पाठ फिरवलीय तर जे काय नागरिक यात्रेत त्या नागरिकांनी सुद्धा शरीराला थंडावा मिळावा यासाठी उसाच्या रसाचा आधार घेतलाय याचाच उसाच्या गुऱ्हाळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
जालना में कपास के दाम 8500-8600 रुपये प्रति क्विंटल, किसान खुश
Jalna, Maharashtra:जालना :कापसाने गाठला 8 हजार 500 रुपयांचा टप्पा,जालन्यातील अनेक शेतकरी नाराज तर अनेकांना साठवून ठेवलेल्या कापसामुळे लॉटरी. अँकर : कापसाला आज ना उद्या चांगला भाव मिळेल या आशेपोटी जालन्यातील शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला मात्र साडेसहा ते 7 हजार रुपये दराने शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली. मात्र शेतकऱ्यांनी कापूस विक्री करताच अमेरीका-ईस्त्राईल,ईराण युद्ध पेटलं .आणि क्रुड ऑईलचा देखील प्रश्न निर्माण झाला.त्यामुळे भारतात कापसाच्या भावात चांगलीच तेजी आली असून कापसाला प्रतिक्विंटलं 8 हजार 500 ते 8 हजार 600 रुपयांचा भाव शेतकṙ्यांच्या हातात पडतोय. त्यामुळे उशिरापर्यंत कापसाची साठवणूक करून भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी चांगलेच सुखावले आहेत.जालन्यातील शेकडो शेतकऱ्यांना भाववाढीचा फायदा झाला असून वाढीव दर पदरात पडल्यानं शेतकरीण आनंद व्यक्त केलाय. तर आधीच कापूस विकलेल्या शेतकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केलीय.0
0
Report
कोल्हापुर दूध संघ के खिलाफ कार्रवाई; सुनवाई शुरू, अधिकारी बदले; किसानो ने किया जोरदार प्रदर्शन
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या 1200 दूध संस्थांची अवसायन कारवाई प्रकरणी सुनावणी सुरू आहे. पण आज कोल्हापूर सहाय्यक निबंधक दुग्ध कार्यालयात सुनावणीसाठी उपस्थित राहिलेल्या दूध संस्था प्रतिनिधींची कोणतीच दखल घेतली नसल्याची तक्रार सुनावणीसाठी उपस्थित राहिलेल्या दूध संस्था प्रतिनिधींनी केली आहे. सुनावणी घेणाऱ्या अधिकाऱ्याची तातडीने बदली करण्यात आली, त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली ते अधिकारी देखील ऑफिसमध्ये नाहीत, त्यामुळे ही सुनावणी घेऊन लेखी म्हणणे कोण सादर करून घेणार असा सवाल दूध संस्था प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. गोकुळ दूध संस्थेचा विस्तार वाढत आहे, वाढत असलेला विस्तार काही लोकांना बघवला जात नाही म्हणूनच दूध उत्पादक संस्थांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे असा आरोप दूध संस्था प्रतिनिधीनी केला आहे. त्याचबरोबर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधक दुग्ध ऑफिसच्या कारभाराविरोधात जोरदार निदर्शन केली.0
0
Report
Advertisement
नांदेड–नाळेश्वर सड़क खराब, हादसों से मौतों का सिलसिला; ग्रामस्थ उपवास शुरू
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड ते नाळेश्वर हा 25 गावांना जोडणारा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आल्याने हा रस्ता दुचाकी वाहन धारकांसाठी मृत्यूचा सापळा बनलाय. दोन वर्षापूर्वी हा सात किलोमीटर लांबीचा रस्ता बनवण्यात आलाय. पण रस्त्याखाली योग्य प्रमाणात भराव टाकण्यात न आल्याने आणि निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरल्याने जागोजागी रस्त्याला तडे गेले आहेत. रस्त्याच्या मधोमध भेगा पडल्या आहेत. या भेगांमध्ये दुचाकीचे टायर फसून अपघात घडताहेत. दोन वर्षात या रस्त्यावर पाच दुचाकीस्वारांचा मृत्यू झालाय. पूर्णा, परभणीला जोडणारा हा रस्ता असल्याने मोठी वर्दळ या रस्त्यावर आहे. पण निकृष्ट दर्जाचा आणि छोटा रस्ता असल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता नव्याने करून देण्याच्या मागणीसाठी एका ग्रामस्थाने आजपासुन आमरण उपोषण सुरु केले आहे.0
0
Report
एक जून से सभी बस स्टेशन शौचालय यात्रियों के लिए मुफ्त, सरनाइक की घोषणा
Kolhapur, Maharashtra:Kop Pratap Sairnaik Visit प्रत्याप सरनाईक ने एक जून से राज्य के सभी बस स्टेशन परिसर के सुलभ शौचालय प्रवासियों के लिए मुफ्त करने की घोषणा की है. कोल्हापुर जिल्हा दौरे पर आए मंत्री सरनाईक ने दौरे के शुरुआती चरण में कोल्हापुर मध्यवर्ती बस स्टेशन परिसर के कैंटीन और शौचालयों की निरीक्षण की. इस मौके पर परिसर की स्वच्छता देखकर उन्होंने हैरानी व्यक्त की और बताया कि स्वच्छता बनाए रखना महत्वपूर्ण है. इसके अलावा, राज्य के कई एसटी कैंटीन में सामान्य यात्रियों के लिए 30 रुपए में चाय-नाश्ते की सुविधा के विज्ञापन के अनुरूप वास्तविकता नहीं दिख रही है, उन्होंने कहा. इसलिए सभी कैंटीनों में ‘30 रुपए में चाय-नाश्ता’ के बोर्ड लगाने के निर्देश उन्होंने अधिकारियों को दिये. इसके अलावा, बस स्टेशन परिसर के शौचालयों में यात्रियों से अधिक पैसे वसूलने की शिकायतें भी सामने आईं हैं, खासकर महिलाओं से भी पैसे लिए जाने की बात सामने आई. इस पृष्ठभूमि में, एक जून से राज्य के एसटी महामंडल की सभी शौचालयें यात्रियों के लिए पूरी तरह मुफ्त उपलब्ध कराने का निर्णय लिया गया है, प्रताप सरनाईक ने इसकी घोषणा की.0
0
Report
देवरी जंगल में बाघ का हमला, चार लोग सुरक्षित बच गए
Bhandara, Maharashtra:देवरीच्या जंगलात थरार! वाघाचा हल्ला... म्हशीचा पंचनामा स्ववीच्छेदन करायला गेलेल्या डॉक्टरानवर वाघाचा हल्ला चार जण थोडक्यात बचावले! भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील अड्याळ येथील जंगल परिसरात सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत पट्टेदार वाघाने चार जणांवर अचानक धाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली. सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे सर्वजण थोडक्यात बचावले. लाखनी तालुक्यातील देवरी परिसरात वाघाने एका म्हशीचा बळी घेतला होता, तर दुसरी म्हैस जखमी झाली होती. याबाबत गणेश मारवाडे देवरी यांनी वन विभागाच्या सूचनेनुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले. त्यानुसार सायंकाळी सुमारे ६.३० वाजता पशुधन विकास अधिकारी, हे स्पॉटवर पोहोचले. शेतशिवारालगत मृत म्हशीचे छायाचित्रण सुरू असतानाच अचानक पट्टेदार वाघ समोर आला आणि चारही जणांवर धावून येण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र उपस्थितांनी मोठ्याने आरडाओरडा करत कुऱ्हाड दाखवत धैर्याने परिस्थितीचा सामना केला. त्यामुळे वाघ काही अंतरावर थांबला आणि सर्वजण तिथून पळून जाऊन जीव वाचवण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम में रक्तदान की जरूरत बढ़ी: लोग स्वेच्छा से रक्तदान करें
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात एकीकडे उन्हाळ्याचे तीव्र चटके वाढत असतानाच रक्तटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रक्तदानाचे प्रमाण घटल्यामुळे शासकीय रक्तपेढीतील सध्या केवळ आठवडाभर पुरेल इतकंच रक्त उपलब्ध आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी ३० ते ३५ रक्तपिशव्यांची गरज भासते. मात्र सध्यााच साठा अवघ्या ८० बॅगपर्यंत घसरल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. विशेष म्हणजे ए, बी, एबी आणि ओ या सर्व रक्तगटांतील निगेट व्हटिव्ह गटांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे.वाशीम जिल्ह्यात बॅलेसेमिया, सिकलसेलसह विविध आजारांनी ग्रस्त सुमारे १७० रुग्णांचे जीवन नियमित रक्तपुरवठ्यावर अवलंबून आहे. मात्र, रक्तदाते कमी होत असल्याने आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन मर्यादित प्रमाणात होत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना पुढे येत स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि युवकांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून या संकटावर मात करण्यासाठी सहकार्य करावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.0
0
Report
डोंबिवली पश्चिम के नवापाडा में गड्ढे में मोटरसाइकिल चालक गिरा; लोगों ने गाड़ी बाहर निकाली
Kalyan, Maharashtra:तोल जाऊन नागरिक खड्ड्यात पडला. सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये आहेत डोंबिवली पश्चिमेत नवापाडा आगरी सभागृह समोरील रोडवर रस्त्याचे काम सुरू असताना दुचाकी तेथून घेऊन जात असताना चालकाचा तोल जाऊन चालक गाडीसह गटारासाठी खोदलेला खड्ड्यात पडल्याने रस्त्यावरील नागरिक आणि समोरील जिमच्या कर्मचाऱ्यांनी खड्ड्यात पडलेल्या गाडीला गाडीला बाहेर काढण्यात मदत केली.0
0
Report
मालेगांव में अंतरराज्यीय चैन स्नैचिंग गिरोह का पर्दाफाश, मुख्य आरोपी बीदर से गिरफ्तार
Malegaon, Maharashtra:आंतरराज्यीय चैन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई कर्नाटकातील बिदरयेथून मुख्य आरोपी अटक मुस्तफा अली इसा अली (वय २०, मूळ भुसावळ) ताब्यात घेतले आहे. मालेगावसह जिल्ह्यातील १० चैन स्नॅचिंग गुन्हे उघड झाले असुन त्यांनी मोटारसायकलवरून महिलांचे सोन्याचे दागिने हिसकावत असल्याची कबुली दिली आहे. टोळीतील सादिक अली, भोला सज्जाद अली, अब्बास अली व अन्य साथीदार फरार असून महाराष्ट्र व मध्यप्रदेशातही गुन्ह्यांची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
