Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीड केकेज तालुक्यात चचेरे चाचा ने पानी में गुंगी की दवा देकर दुष्कर्म किया

MMMahendrakumar Mudholkar
Mar 24, 2026 07:06:37
Beed, Maharashtra
ANC- बीडच्या केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलिस ठाणे हद्दीतील एका गावातील 19 वर्षीय तरुणीवर पाच महिन्यांपूर्वी तीच्या 50 वर्षीय चुलत चुलत्याने पाण्यात गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. यानंतर तरुणीचा पंधरा ते वीस दिवसातच विवाह झाला. तीन दिवसांपूर्वी ती गावाकडे आली होती यानंतर तिने कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पिडीतेच्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध घेतला जात आहे तर अधिकचा तपास देखील सुरू करण्यात आला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Mar 24, 2026 08:10:21
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेच्या निवडणुकांत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सहा जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर सत्ता स्थापनेच्या वेळी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून सहाही नगरसेवकांचा एक गट तयार करण्यात आला होता. मात्र नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासात्मक कामांना गती देण्यासाठी सहापैकी चार नगरसेवकांनी उबाठा गटाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही दिवसांपूर्वी प्रवेश केला. या घडामोडीमुळे अकोला शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता सहा पैकी चार नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेत शिंदे गटाशी जवळीक वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर या चारही नगरसेवकांनी आज सहाही नगरसेवकांची एकत्रित बैठक बोलावली होती. या बैठकीत जुन्या गटनेत्याला पायउतार करून नवीन गटनेता निवडण्याची प्रक्रिया करण्यात आली. आजच्या बैठकीत नगरसेवक विजय इंगळे आणि अशोक खुमकर हे अनुपस्थित होते. दुसरीकडे उबाठा गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जात असून गटनेते विजय इंगळे यांनी अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रात नगरसेविका सुरेखा काळे, मनोज पाटील, सोनाली सरोदे आणि सागर भारुका यांनी मूळ राजकीय पक्षातून इतर राजकीय पक्षात बेकायदेशीर विलीनीकरण केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आज सहापैकी चार नगरसेवक उपस्थित असल्याने एकमताने सागर भारुका यांची नव्या गटनेत्यापदी निवड करण्यात आली आहे. आता बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि उबाठा गटाकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
912
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 24, 2026 08:09:54
838
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 24, 2026 08:09:41
853
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 24, 2026 07:46:43
1026
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 24, 2026 07:34:28
992
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 24, 2026 07:30:19
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडीच्या बिरोबा यात्रेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि धनगर समाजाचे आराध्य दैवत म्हणून बिरोबा देवस्थानची ओळख आहे. आरेवाडी बनाच्या परिसरात यात्रेनिमित्ताने यात्रा कमिटी व प्रशासनाकडून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे. बिरोबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात यात्रेच्या पहिल्या दिवशी धार्मिक विधीचा कार्यक्रम पार पडला, पुढील पाच दिवस,या ठिकाणी यात्रा पार पडणार असून यात्री निमित्ताने सुमारे दोन हजारांवर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागली आहेत.
1080
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 24, 2026 07:21:38
1054
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 24, 2026 07:07:06
Shirdi, Maharashtra:भोंदूबाबा अशोक खरातवर कारवाई केल्यानंतर अनेक काळे कारनामे बाहेर आलेत.. एकीकडे नाशिक मध्ये ऑफिस थाटून काळे उद्योग करणारा अशोक खरात प्रसिद्ध झोतात आला तो ईशानेश्वर मंदिरामुळे.. सिन्नर तालुक्यातील मिरगाव जवळील हे ईशान्येश्वर मंदिर.. साधारण 2008 मध्ये या मंदिराचे काम सुरू झालं आणि 16 ऑगस्ट 2010 मध्ये या मंदिराचे काम पूर्ण झालं... याच दरम्यान 2009 मध्ये शिवनिका ट्रस्ट स्थापन करून अशोक खरातने मंदिराचा कारभार पाहण्यास सुरुवात केली.. 2010 पासून प्रसिद्ध होतात आलेल्या या मंदिरात गेल्या सोळा वर्षात दररोज गर्दी व्हायची.. राजकीय नेते असो अधिकारी असो की उच्चपदस्थ श्रीमंत वर्ग... हा सगळा भक्तगण असलेल्या या मंदिर मात्र आता गेल्या चार दिवसांपासून ओस पडलय.... मंदिर आणि मंदिर परिसरात कोणताही फक्त येत नाही. इथे आहे फक्त स्मशान शांतता आणि पक्षांचा किलबिलाट..या मंदिराजवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
989
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 24, 2026 06:19:36
1056
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 24, 2026 06:16:48
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपারা West मध्ये कुत्ते के काटने से रेबीज झालेल्या 9 वर्षीया मुलीचा मृत्यू झाला आहे. कशिश सहानी असे या मुलीचे नाव आहे. पाच महिन्यापूर्वी तिला कुत्रा चावला होता परंतु तिने घाबरून इंजेक्शन झाला नकार दिला होता. कशीश सहानी (9) ही मुलगी नालासोपारा पश्चिमेच्या श्री प्रस्थ येथील सुबोध सागर इमारतीत आपल्या आई वडिल आणि आजोबा सोबत राहत होती. ती मदर मेरी शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकत होती. पाच महिन्यांपूर्वी कशिश ही आपल्या आजोबा बरोबर घराजवळ फिरायला गेली होती. एका कुत्र्याला बिस्कीट देत असताना तिला कुत्रा चावला होता.. आजोबा तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. मात्र इंजेक्शनच्या भीतीने ती जोरात रडू लागल्याने तिला इंजेक्शन न देता घरी आणले. याशिवाय दुसऱ्या दिवशी ती जखम ही सुकून गेल्याने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र चार दिवसांपूर्वीच तिची प्रकृती अचानक बिघडली. तिचे डोळे ही लाल झाले होते. घरच्यांनी कशीश ला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
1056
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 24, 2026 06:05:42
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर जिल्ह्याचा पारशिवनी तालुक्यातील टेकाडी शिवारात आग लागल्याने शंभर एकर गव्हाचे पीक जळाले - काही क्षणांत उभा हंगामातील गव्हाचा पिकाची राख रांगोळी, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट - वाऱ्याच्या वेगामुळे आगीने रौद्र रूप धारण केले, शेतातून शेतात झपाट्याने पसरली आग - अनेक शेतकऱ्यांचे एकरच्या एकर गव्हाचे पीक भस्मसात, आग विझवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ - कन्हान-पिपरी, कामठी, कांद्री, महादुला येथून अग्निशमन दलाच्या चार गाड्यांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात मात्र पिकाची राख रांगोळी.. - डोळ्यांसमोर पीक जळाले शेतकऱ्यांची हळहळ, नुकसानग्रस्तांना तातडीने मदतीची मागणी.
1055
comment0
Report
Advertisement
Back to top