Back
अकोला नगर निगम में उबाठा बनाम ठाकरे शिवसेना की सियासत में हलचल
JJJAYESH JAGAD
Mar 24, 2026 08:10:21
Akola, Maharashtra
अकोला महापालिकेच्या निवडणुकांत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सहा जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर सत्ता स्थापनेच्या वेळी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून सहाही नगरसेवकांचा एक गट तयार करण्यात आला होता. मात्र नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासात्मक कामांना गती देण्यासाठी सहापैकी चार नगरसेवकांनी उबाठा गटाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही दिवसांपूर्वी प्रवेश केला. या घडामोडीमुळे अकोला शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता सहा पैकी चार नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेत शिंदे गटाशी जवळीक वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर या चारही नगरसेवकांनी आज सहाही नगरसेवकांची एकत्रित बैठक बोलावली होती. या बैठकीत जुन्या गटनेत्याला पायउतार करून नवीन गटनेता निवडण्याची प्रक्रिया करण्यात आली. आजच्या बैठकीत नगरसेवक विजय इंगळे आणि अशोक खुमकर हे अनुपस्थित होते. दुसरीकडे उबाठा गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जात असून गटनेते विजय इंगळे यांनी अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रात नगरसेविका सुरेखा काळे, मनोज पाटील, सोनाली सरोदे आणि सागर भारुका यांनी मूळ राजकीय पक्षातून इतर राजकीय पक्षात बेकायदेशीर विलीनीकरण केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आज सहापैकी चार नगरसेवक उपस्थित असल्याने एकमताने सागर भारुका यांची नव्या गटनेत्यापदी निवड करण्यात आली आहे. आता बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि उबाठा गटाकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 09:48:250
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 24, 2026 09:47:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 24, 2026 09:36:39787
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 24, 2026 09:18:171048
Report
PNPratap Naik1
FollowMar 24, 2026 09:17:34997
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 24, 2026 09:15:53941
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 24, 2026 09:05:27906
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 24, 2026 09:04:07901
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 24, 2026 09:00:551013
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 24, 2026 08:46:301034
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 24, 2026 08:09:541098
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 24, 2026 08:09:411037
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 24, 2026 07:46:431033
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 24, 2026 07:34:281032
Report