Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीड में युद्ध के असर से ड्रिप सिंचाई पाइप उद्योग ठप, कच्चे तेल महँगा

MMMahendrakumar Mudholkar
Mar 12, 2026 04:35:03
Beed, Maharashtra
बीडमें ठिबक सिंचनचे पाईप बनवणाऱ्या कंपनीचे उत्पादन मागील पाच दिवसापासून बंद पडले आहे.. ठिबक सिंचनचे पाईप बनवण्यासाठी जो कच्चामाल लागायचा तो क्रूड ऑइलच्या रिफायनरी मधून मिळतो... परंतु आता रिफायनरी मध्येच क्रूड ऑइल येत नसल्याने तेथील उत्पादन बंद आहे. आणि त्याचा परिणाम या उद्योगावर देखील झाला आहे. यापूर्वी कधीही न उद्भवलेली ही परिस्थिती असून कच्चामाल जवळपास दुप्पट किमतीत खरेदी करण्याची वेळ उद्योजकांवर आलीय.. परंतु त्यानंतर ठिबक सिंचनचे पाईप देखील महागणार असल्याने ते शेतकऱ्यांना परवडणारे नसेल अशा स्थितीत आता युद्ध थांबल्यासच हे उत्पादन पूर्व पदावरील येईल अशी आशा उद्योजकांमध्ये आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Mar 12, 2026 05:46:32
Bhandara, Maharashtra:शाळेत दोन दिवस पुरेल इतकाच गॅस सिलेंडर साठा.... प्रशासनाने उपाययोजना करावी शाळा प्रशासनाची मागणी.... ईरान,अमेरिक, इजराइल युद्ध सुरू आहे. याचा परिणाम आता भारतात देखील जाणवू लागला आहे. भंडारा जिल्ह्यातील डिफेन्स अकॅडमी शाळेत राज्याच्या कानाकोपऱ्यातील मुले, मुली, शिक्षण घेण्यासाठी येत असतात. याच ठिकाणी कॅन्टीन देखील आहे. शाळेत 1200 विद्यार्थी असून त्यांच्यासाठी जेवण तयार करण्यात येते. पण आता दोन दिवस पुरेल एवढाच गॅस सिलेंडर साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाने गॅस सिलेंडर दिले नाही तर चुलीवर जेवण तयार करण्याची वेळ येणार आहे. आता प्रशासनाने काही तरी उपाययोजना करून सिलेंडर पुरवठा करावा अशी मागणी शाळा प्रशासनाने केली आहे...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 12, 2026 05:45:13
0
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 12, 2026 05:34:07
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 12, 2026 05:33:32
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.. नीट परीक्षेत अपयशानंतर विद्यार्थिनीची आत्महत्या... घटनास्थळी सुसाईड नोट सापडल्याची माहीती.... लातूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे। नीट परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। अयोध्या चंद्रकांत देवकते असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे...ही घटना लातूर शहरातील रेणुका नगर परिसरात घडली आहे। अयोध्या ही परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील सादगीरवाडी येथील रहिवासी आहे। ती लातूर मध्ये शिक्षणासाठी आली होती। काही काळापासून ती नीट परीक्षेची तयारी करत होती। मात्र परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने ती मानसिक तणावात होती अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे। दरम्यान एका भाड्याच्या खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे...
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 12, 2026 05:30:13
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 12, 2026 05:16:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:वृद्ध आई-वडिलांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला गेला. सांगलीच्या भाळवणी येथे वृद्ध आई-वडिलांचा वाढदिवस अगदी थाटामाटात साजरा करण्यात आला आहे. हलगीच्या निनादात घोड्यावरून गावात मिरवणूक काढत वाढदिवसाचा केक कापण्यात आला. एका शेतकरी मुलांनी अनोख्या पध्दतीने आई- वडिलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं, खानापूर तालुक्यातील भाळवणी गावातील शेतकरी मुलांना आपल्या आई-वडिलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या आयुष्याच्या सरत्या शेवटी वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. राजाराम पांडुरंग धनवडे,95 व शांताबाई धनवडे,87 वर्ष यांना चक्क घोड्यावर बसून हलगीच्या तालात मंडपापर्यंत आणून वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्ताने आजी आजोबांना शुभेच्छा देण्यासाठी अख्या गावाने हजेरी लावली होती. वृद्ध आई- वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्यासारख्या अनेक घटना समोर येत असताना, भाळवणीतील संभाजी धनवडे व कुटुंबांनी आई-वडिलांचा साजरा केलेल्या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 12, 2026 04:47:36
Washim, Maharashtra:वाशिमच्या मालेगाव शहरात १० मार्चच्या रात्री एका मंदिरात आणि हॉटेलमध्ये चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.मंगेश बदर आणि दौलत गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते मालेगाव परिसरातील रहिवासी आहेत.पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.या चोरट्यांनी मालनेश्वर हॉटेलमधून चांदीची दोन नाणी,रोख रक्कम तसेच संग्रही ठेवलेल्या जुन्या चलनी नोटा चोरल्या होत्या.तसेच संत गुणवंत बाबा मंदिरातील दानपेटी आणि त्यातील नगदी रक्कमही त्यांनी चोरल्याचे समोर आले आहे.या दोन्ही आरोपींनी परिसरातील इतर ठिकाणीही चोरी केल्याचा पोलिसांना संशय असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 12, 2026 04:16:51
0
comment0
Report
Advertisement
Back to top