Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

नगर परिषद चुनाव महायुती में भुमरे का तकरार; गठबंधन की तैयारी, पर हवा बदली

VKVISHAL KAROLE
Nov 24, 2025 02:50:46
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
नगर परिषद निवडणुकी वरून आता महायुतीच्या पक्षात जुंपली असल्याचे दिसतेय.. नगरपरिषदेच्या निवडणुकीतील महायुतीवरून माजी मंत्री तथा शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे. आम्ही भाजपसोबत युती करण्यासाठी तयार होतो. शेवटच्या दिवशी आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत प्रयत्न केले. अतुल सावेंना भेटलो, काही करा पण आपली युती करा म्हणून सांगितले. तुम्ही जसे सांगताल तसे करायला तयार असल्याचे देखील सांगितले, पण त्यांच्या डोक्यात हवा गेली होती असा टोला भुमरे यांनी लगावला. पैठण येथील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार बैठकीत ते बोलत होते.
149
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Nov 24, 2025 03:30:42
Satara, Maharashtra:साताऱ्यातील खालची पिलानी या गावात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. या गावातील शेतकरी बळीराम कदम हे शेतात बैल चरायला घेऊन गेल्यावर या बैलावर बिबट्याने प्राणघातक हल्ल्या केला. यामधे बैलाला गंभीर दुखापत झाली असून बिबट्याच्या आणि बैलाच्या झटापटीमध्ये बैलाचे एक शिंग तुटले आहे. बैलाला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्रावा झाला. या घटनेमुळे गावांमध्ये bhiतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करण्यासाठी मजूर येत नाहीत आणि त्यामुळे शेतीची कामे रखडली आहेत या भागात अनेक ठिकाणी बिबट्याने पाळीव कुत्रेवर हल्ला केला आहे.. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. वनविभाग आणि प्रशासनाने यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 24, 2025 03:21:39
Kolhapur, Maharashtra:Kop Road Issue Janhit Yachika कोल्हापूर शहरातील बिकट रस्त्यांच्या विरोधात कोल्हापुरातील सजग नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापुर शहरातील रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले मग रस्ते गेले कुठे ? असा सवाल कोल्हापूरकरांचा आहे. शहरात काही ठिकाणी रस्ते झाले पण तेही रस्ते दर्जाहीन, अधिक उंचीचे, युटिलिटी सिफ्टिंग न करता झाले आहेत, शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे या सर्व मुद्द्यांचा समावेश करून कोल्हापूरातील सजग नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर कशा प्रकारची सुनावणी होते हे पहावं लागेल.
28
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 24, 2025 03:21:20
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील सावरगाव परिसरात अकोला–हैदराबाद महामार्गावर रात्रीच्या दरम्यान जडवाहनाने दोन बिबट्यांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा बिबट्या गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. मृत बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील कारवाईसाठी वनविभागाची टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे. जखमी बिबट्याला उपचारासाठी वनविभागाकडून आवश्यक ती मदत पुरविण्याची प्रक्रिया सुरू असून अपघाताचे कारण, वाहनाची ओळख आणि इतर तपशीलांची चौकशी सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून महामार्गावरील वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
59
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 24, 2025 03:20:54
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पांढरकवडा नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी भाजपाने आतिश बोरेले यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे, महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्र लढत आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी नगराध्यक्ष शंकर बडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान नगरपरिषद मध्ये झालेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे विविध समस्याचा जन्म झाला, असा आरोप भाजपा उमेदवार आतिष बोरेले यांनी केला आहे. बोरेले यांच्यासाठी आमदार राजु तोडसाम व केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बाईट : आतिष बोरेले : भाजपा उमेदवार
87
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 24, 2025 03:20:36
Nashik, Maharashtra:पालिका निवडणुकीचा राज्यातील महायुतीच्या प्रचाराचा नारळ नाशिक जिल्ह्यातून फोडला जाणारे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सभा दुपारी साडेबाराला त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जिल्ह्यातील पहिली सभा नांदगावला होत आहे. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्हीही एकाच दिवशी जिल्ह्यात येत असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभमेळा असल्याने भाजपने इथे नगरपरिषद ताब्यात घेणे प्राधान्यक्रम ठेवला आहे यासाठी कुंभमेळ्या मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष लक्ष येथील कामांवर आणि प्रचार कार्यावर आहे . नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास घुले यांना निवडून आणण्यासाठी आज अकरा वाजता सभा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे प्रथमच त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर येत असल्याने येथील आखाडा प्रमुखांसह साधू-महंतांनाही व्यासपीठावर येण्याचे निमंत्रण आहे.
69
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 24, 2025 03:02:06
Dhule, Maharashtra:नगरपालिकाओं के चुनाव प्रचार के लिए राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उत्तर महाराष्ट्र के दौरे पर हैं। वे उत्तर महाराष्ट्र के विभिन्न स्थानों पर अलग-अलग प्रचार सभाएं करेंगे। इनमें से मुख्य रूप से नंदूरबार जिले के शाहदा नगरपालिका के प्रचार के लिए सभाएं होंगी, वहीं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुळे जिले की पिंपळनेर नगरपालिका के चुनाव के लिए सभाओं को संबोधित करेंगे। इन दोनों सभाओं में वे जनता को क्या संबोधित करते हैं, यह देखने लायक होगा। इन दोनों पार्टियों के राजनैतिक संबंध ढीले-पतले हो चुके हैं, अब चुनाव मैदान में कौन बाजी मारेगा यह देखना अहम है, इसलिए ये दोनों नेता अपनी पार्टी के कार्यकर्ताओं को संबोधित करते समय क्या बोलते हैं, इस पर सबकी नजर है।
55
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 24, 2025 02:48:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या सोयगाव तालुक्यातील घोसला शिवारात शेतात साठवून ठेवलेल्या सुमारे ५० क्विंटल मक्याच्या गंजीला मध्यरात्री अज्ञातांनी आग लावल्याची घटना समोर आली आहे, घटना उघडकीस येताच ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु संपूर्ण मका जळून राख झाला. घोसला शिवारातील गट क्र. १६२ मधील शेतकरी आत्माराम हरी शेळके यांनी मळणीची तयारी केली होती, मजूरही लावले होते. मात्र त्याआधीच त्यांच्या ४ महिन्यांची मेहनत भस्मसात झाली आहे. यात त्यांचे जवळपास लाखोंचे नुकसान झाले असून या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण; आग लावणारे कोण याचा शोध सुरू आहे...
153
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 24, 2025 02:46:37
126
comment0
Report
Advertisement
Back to top