Back
भातकुली में चिकन विवाद से 12 वर्षीय जितेराजा की हत्या, आरोपी गिरफ्तार
ADANIRUDHA DAWALE
Feb 28, 2026 06:18:05
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_CHIKEN_PKG सहा फाईल आहे
रिपोर्टर :- अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
चिकनच्या तुकड्यावरून 12 वर्षीय मुलाचा रक्तरंजित शेवट; मुलाच्या मावस भावाने खून केल्याने परिसरात खळबळ, आरोपी अटक
अँकर :- अमरावतीच्या भातकुली येथून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक अशी घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात चिकन खाण्याच्या किरकोळ वादातून मावस भावानेच १२ वर्षीय मुलाची लोखंडी वस्तूने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला अपघाताचा बनाव मध्ये आम्ही तपासले नाही कारण पोलिसांच्या तपासात खुनाचा थरारक प्रकार समोर आला. पाहूया झी 24 तासचा हा खास रिपोर्ट…
Vo१ : भातकुली तालुक्यात चिकन खाण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन मावस भावांमध्ये वाद झाला आणि या वादाने घेतला एका निरागस जीवाचा बळी घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे मृत मुलाचे नाव जितेराजा गौड असून त्याचे वय अवघे १२ वर्षे आहे. दरम्यान आरोपी त्याचाच मावस भाऊ बब्बू गौड असून त्याच वय २१ वर्षे आहे दोघेही मूळचे मध्यप्रदेशातील रहिवासी असून कामानिमित्त भातकुलीत राहत होते दोघेही चिकन खाण्यासाठी बसले असता चिकनच्या तुकड्यावरून मोठा वाद झाला आणि वाद इतका टोकाला गेला की संतापाच्या भरात आरोपीने लोखंडी वस्तूने जितेराजावर वार केला त्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा घरातच मृत्यू झाला
Vo२: घटनेनंतर हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्यात आले मृतकाच्या वडिलांनी पोलिसांत अपघाताची तक्रार दाखल केली मात्र पोलिसांना संशय आल्याने सखोल तपास सुरू करण्यात आला वैद्यकीय अहवाल आणि घटनास्थळावरील पुराव्यांवरून हा अपघात नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले यानंतर पोलिसांनी आरोपी बब्बू गौड याला अटक केली तसेच खोटी तक्रार दिल्याप्रकरणी मृतकाच्या वडिलांनाही आरोपी करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
बाईट :- रवींद्र राजुलवालकर, पोलीस निरीक्षक भातकुली
Vo३: चिकनसारख्या क्षुल्लक कारणावरून एका निरागस बालकाचा जीव जाणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे… क्षणिक राग आणि आवेग किती भयंकर ठरू शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे भातकुलीतील या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
किरकोळ कारणावरून घडलेली ही घटना समाजासाठी गंभीर इशाला देणारी ठरते आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 28, 2026 07:20:190
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 28, 2026 07:18:550
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 28, 2026 07:18:300
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 28, 2026 07:18:180
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 28, 2026 07:18:060
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 28, 2026 07:17:010
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 28, 2026 07:16:300
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 28, 2026 07:01:040
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 28, 2026 07:00:540
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 28, 2026 06:46:320
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 28, 2026 06:46:150
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 28, 2026 06:18:280
Report
PNPratap Naik1
FollowFeb 28, 2026 06:03:520
Report
APAMOL PEDNEKAR
FollowFeb 28, 2026 05:46:320
Report
