Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

अमरावती महापालिका की विशेष सभा में कचरा मुद्दे पर कांग्रेस से मेयर की भिड़ंत

ADANIRUDHA DAWALE
Feb 28, 2026 07:16:30
Amravati, Maharashtra
अमरावती महापालिकेत विशेष सभेला सुरुवात; शहरातील कचऱ्याच्या मुद्द्यावर काँग्रेस नगरसेवक आक्रमक, नगरसेवकांची महापौरांसोबत खडाजंगी. अँकर :- अमरावती महापालिकेत आज विशेष सभेला सुरुवात झाली असून अमरावती शहरातील कचऱ्याच्या मुद्द्यावर काँग्रेस नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये काँग्रेस आणि महापौरांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली असून काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्वच्छतेच्या मुद्द्यावरून भाजपच्या महापौरांना घेरल्याने सभागृहात मोठी खडाजंगी झाल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसचे नगरसेवक विरोधी पक्षनेते आणि महापौर यांच्यात खडाजंगी सुरू असून काल सत्ताधारी शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविकेच्या पतीने नाल्यात उतरून नालेसफाई केली होती.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Feb 28, 2026 08:32:03
Shirur, Maharashtra:अष्टविनायक महामार्गावरील शिरूर तालुक्यातील मलठण येथील चौकात रस्त्याच्या कामातील अनियमितता व विविध समस्यांवरून स्थानिक ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. मलठण, सोनेसांगवी, कवठे, वाघाळे तसेच परिसरातील गावांतील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. महामार्गाच्या कडेला साइड पट्ट्या नसणे, आवश्यक सूचना फलक (बोर्ड) नसणे, तसेच अपूर्ण कामामुळे वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या समस्यांकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग अवलंबला. आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 28, 2026 08:16:51
Nala Sopara, Maharashtra:नालासोपाऱ्यात आचोळे परिसरातील मेडिकल मध्ये आग अग्निशमन जवानांकडून आगीवर नियंत्रण नालासोपारा पूर्व येथील आचोळे परिसरातील चौधरी मेडिकल स्टोअरमध्ये आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. अवघ्या काही क्षणात दुकानातील साहित्याने पेट घेतला , घटनेची माहिती वसई विरार शहर महानगरपालिकाच्या अग्निशमन दलाला मिळताच जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. लागलेल्या आगीत दुकानासमोर पार्क असलेल्या एका कारचे जळून नुकसान झाले आहे ... आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आगीत औषधांचा मोठा साठा जळून खाक झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 28, 2026 07:20:19
Shirur, Maharashtra:चिमुकल्यांना बाजारी ज्ञानाच्या अर्थकारणाचे धडे पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन शेतीचे व्यावसायीक अर्थकारण चिमुकल्यांना आत्मसाद व्हावं यासाठी Shirur तालुक्यातील Chaandoh येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळकरी मुलांचा विकेंड भाजी विक्री बाजार भरलाय. गावातील नागरिकांनीही चिमुकल्यांकडुन भाजीपाल्याची खरेदी केलीय मात्र मागच्या काही दिवसांपासुन शेतमालाच्या उत्पादन खर्चात होणारी वाढ आणि मिळणारे उत्पन्न यातील तफावत दिसुन येतेय त्यामुळे शेतक-याच्या कष्टाची मातीच होते त्यामुळे शिमुकल्य वयात शाळकरी मुलांना शेतमाल विक्रीचे ज्ञानाचे धडे प्रत्यक्षात बाजार शिक्षक देत आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 28, 2026 07:18:55
Shirdi, Maharashtra:कोपरगाव तालुक्यातील देरडे कोऱ्हाळे येथे बनावट खतांच्या साठ्यावर कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारावर कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुण नियंत्रण निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी पोलिसांच्या मदतीने गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी विविध कंपन्यांच्या नावाने साठवून ठेवलेल्या सुमारे ३०० खतांच्या गोण्या जप्त करण्यात आल्या असून तब्बल ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्यात बनावट खतांचा सुळसुळाट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 28, 2026 07:18:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संजय शिरसाट अजित पवार अपघात एक महिना, आज अहवाल -येणार अजित पवारांच्या मृत्यू अपघात की घातपात, एक महिना गील, अनेकांनी अनेक अंदाज लावले....ब्लॅक बॉक्स जळाला असे सांगितले जात होते, पण तो सुरक्षित आहे, अहवाल आल्यावर सगळं स्पष्ट होईल, dgic च्या अहवाल नंतर अनेक उत्तर मिळतकल, अहवाल येई पर्यत यावर काही बोलणे योग्य नाही, रोहित पवारांना सर्वजण सहकार्य करण्यासाठी तयार आहे. रोहित पवार एकनाथ शिंदे भेट -रोहित पवार आज एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे, त्यांनी जी काही माहिती काढली आहे, त्यावर कुणीतरी बोलवे अशी त्यांची भूमिका असून, योग्य आहे. सर्वकाही समोर आल्या शिवाय राहणार नाही राज ठाकरे ऑन अजित पवार अपघात -सर्वांनी शक्यता वर्तवली आहे. प्रत्येक माणसाला शंका आहे, त्याव्हे उत्तर मिळेल शिखर बँक अजित पवार -शिखर बँकेने सर्वकाही तपासून सांगितले असेल त्यावर बोलणे योग्य नाही ,अहवाल दिला असेल तर मान्य करावे लागेल, सरकार निधी -लाडकी बहीण विधानसभा निवडणुकीत सुरू केली आहे, याचा फटका सर्वाच विभागला बसला आहे. एखादी योजना राबवली असेल आणि चालू राहण्यासाठी आम्ही देखील एक पाऊल मागे घेतले विकास कामांना ब्रेक लागला असला तरीही थोडया दिवसात सर्वकाही सुरळीत होईल शेतकरी kyc नंतरही पैसे नाही -सरकार आर्थिक अडचणीत आहे, मान्य करावे लागेल, शेतकरी भरपाई देणारच आहोत, संभाजीनगर शेतकरी दुपार निधी नोटीस -अधिकारीवर कारवाई झाली पाहिजे, शेतकरी तुमच्याकडे आले होते का? तुम्ही पैसे टाकले ,त्यामुळे अधिकाऱ्यांकडून पैसे वसूल केले पाहिजे पंकजा मुंडे अधिकारी आरोप आणि निलंबन -मंत्री आज आहेत उद्या नसणार असे समजून काही अधिकारी काम करतात, असे अनुभव आहेत, कालची कारवाई आशा अधिकाऱ्यांसाठी महत्वाचे आहे, कालचा निर्णय स्वागत आहे मंत्री अनुपस्थित मराठी भाषा कार्यक्रम -अधिवेशन काळ असेल, काही कारणास्तव गेले नसेल, आमची चूक आहे ,पुढच्या वेळी चूक होणार नाही, नेमाडे साहित्यिक असून, त्यांनी कान टोचले सन्मान आहे त्याचं -उद्धव ठाकरे मुंबई महापौर वक्तव्य उद्धव ठाकरे स्वप्नात आहे, सरकार बदलणार म्हणायचे, आता मुंबई महापौर आपलाच ,म्हणतात, पाच वर्ष निघून जातील, आता तुम्ही कधी मुख्यमंत्री होणार हेही सांगा.... भुमरे चालक नोटीस -अंबादास दानवेच्या आरोपांचा खंडन भुमरे यांनी केला आहे, त्यांचा बदनामी झाल्याने नोटीस दिली आहे, दानवेंना कायदेशीर उत्तर द्यावे लागेल, आरोप करणे सोपं आहे, सिद्ध करणे अवघड आहे... Mim अतिक्रमण कारवाई विरोध -महानगरपालिकेने यापूर्वी कारवाई केली, शहराच्या विकास कामासाठी काही निर्णय घेतले पाहिजे, mim नगरसेवक यांचे सीसीटीव्ही आहे, त्यांचा नगरसेवक पद रद्द करावे... गर्भवती महिलेला मारहाण झाली, या घटनेच्या समर्थन करणाऱ्या नगरसेवक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे... महानगरपालिका लाच अधिकारी आयुक्त सहकार्य -लाचखोर अधिकारी पकडल्यावर चार्जशीट होते ,योग्य पुरावे असल्यास न्यायालयात प्रकरण जाते, पण पुरावे नसल्यास आणि आयुक्त यांच्या सुनावणीमध्ये पुरावे आढळून आले नसल्यास ते निर्णय घेऊ शकतात. पण आयुक्तांनी कसे निर्णय घेतले याबाबत मी स्वतः माहिती घेईल. अकोला महानगरपालिका निर्णय -टिपू सुलतान नाव नसावे अशी आमची भूमिका आहे, महाराष्ट्राची ही सांस्कृती आहे, असे फोटो लागू नयेत अशी आमची भूमिका आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 28, 2026 07:18:06
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 28, 2026 07:00:54
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 28, 2026 06:46:32
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांचा रास्ता रोको , पोलीस बंदोबस्तामध्ये कांदा लिलावाला सुरुवात - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर गडगडले - कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य चौकात शेतकऱ्यांचा रास्ता रोको - कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांचा काही काळ एपीएमसी बाहेर ठिय्या - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोलीस बंदोबस्तात कांद्याच्या लिलावाला सुरुवात - दोन हजार रुपये भाव अपेक्षित असणाऱ्या कांद्याला केवळ सातशे ते आठशे रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी - लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी संतप्त
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Feb 28, 2026 06:46:15
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 28, 2026 06:18:28
Pimpri-Chinchwad, Maharashtra:डबघाईला आलेल्या महापालिकेची तिजोरी भरण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेन अभय योजना सुरू केलीय. नागरिकांनी त्यांचा थकलेला मालमत्ता कर आणि त्या वरील दंड भरता यावा, या हेतून पिंपरी चिंचवड महापालिकेन अभय योजना सुरू केली आहे. कधी काळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिका असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे, त्यामुळं महापालिके समोर विकास कामासाठी निधी उभारण्याच मोठ आव्हान आहे. नागरिकांना जर मालमत्ता करात अभय योजनेच्या माध्यमातून सवलत दिली, तर नागरिक मोठ्या प्रमाणात त्यांनी थकवलेला मालमत्ता कर भरतील, आणि त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत वाढ होईल अशी अपेक्षा महापालिकेला आहे. त्यासाठी महापालिकेने अभय योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत करदात्यांच जवळपास 90% दंड माफ केला जाणार आहे. एक मार्च ते 31 मार्च दरम्यान ही योजना राबवली जाणार आहे. आणि जे करदाते पूर्ण रक्कम एकाच वेळी भरतील त्यांच्यासाठी ही योजना लागू असळे अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top