Back
अमरावती में गर्मी से राहत: पारा 42°C से गिरकर 33.6°C पर पहुंचा
ADANIRUDHA DAWALE
Mar 22, 2026 06:02:06
Amravati, Maharashtra
अवकाळी पावसाने अमरावती करांना दिला दिलासा; पारा आठ अंशाने घसरुन ३३.६ अंशावर पोहोचला
मार्च महिन्यातील १२ व ११ तारखेला अमरावतीत पारा ४२.२ अंशापर्यंत गेला होता. हे तापमान देशातील सर्वोच्च असल्याची नोंद झाली होती. मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात उष्णतेच्या या रौद्र रुपाने अमरावतीकर प्रचंड त्रस्त झाले होते. दरम्यान मागील तीन दिवसांपासून जिल्हह्यात ढगाळ वातावरण व शुक्रवारी काही भागात पाऊस झाला होता. त्यामुळे कमाल तापमानात कमालीची घट होवून पारा थेट ११.६ अंशावर आला होता. आठ दिवसापुर्वीच्या तापमानाच्या तुलनेत ८.६ अंशाची घट झाली होती. यामुळे अमरावतीकरांना तात्पुरता का होईना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला आहे. अमरावती यंदा मार्च महिन्यातच उष्णतामानाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरले होते. विदर्भातील अकोला, अमरावती या ठिकाणी तापमान इतर शहराच्या तुलनेत अधिक राहतेच. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे १९ मार्चपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्याच दिवशी सायंकाळी तसेच २० मार्चला पहाटे शहरासह जिल्ह्यातील काही भागात मध्यम व हलक्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाली होती. यामुळे मात्र २० मार्चला दिवसभर तापमान कमी होते. तसेच ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे दिक्साही गारवा जाणवत होता. दरम्यान शनिवारी सकाळपासून वातावरण स्वच्छ व निरभ्र झाले आहेत. ढग कुठेही नाहीत. मात्र १७ मार्चपर्यंत असलेली उन्हाची दाहकता रविवारी जाणवत नव्हती. तुरळक ठिकाणी झालेल्या पावसाचा परिणाम रविवारी कायम राहीला व उन्हाच्या चटक्यांपासून तात्पुरता दिलासा मिळाला होता. दरम्यान २२ मार्चपासून कमाल तापमानात पुन्हा वाढ होणार आहे. कारण वातावरण स्वच्छ झालेले आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस अमरावतीत उन्हाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 08:18:170
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 08:17:440
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 22, 2026 08:16:140
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 22, 2026 08:04:13858
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 22, 2026 07:42:02902
Report
SKShubham Koli
FollowMar 22, 2026 07:40:391009
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 22, 2026 07:01:311080
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 22, 2026 07:00:491076
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 22, 2026 07:00:361077
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 22, 2026 06:38:121008
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 22, 2026 06:36:231039
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 22, 2026 06:36:09978
Report
AKAMAR KANE
FollowMar 22, 2026 06:17:221057
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 22, 2026 06:04:581068
Report