Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

अंजनगांव सुर्जी में मतगणना में घोटाला आरोप, अधिकारी के खिलाफ अदालत जाने का संकेत

ADANIRUDHA DAWALE
Dec 22, 2025 05:38:52
Amravati, Maharashtra
चार फाईल आहे अंजनगाव सुर्जीत मतमोजणी मध्ये घोळ झाल्याचा काँग्रेसचा आरोप; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा यशोमती ठाकूरांचा इशारा अंजनगाव सुर्जी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या मतमोजणी मध्ये घोळ झाल्याचाआरोप काँग्रेस पक्षाचा वतीने करण्यात आला आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आशा बानो रशीद खान यांचा पराभव झाल्याने काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या आहे. अंजनगाव सुर्जी च्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अरेरावी करत घाईगडबडीने निकाल दिला या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटला गेला आम्ही फेर मतमोजणी मागितली होती पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली नाही मतमोजणीची व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली नाही अंजनगाव सुर्जी मध्ये काँग्रेस विजयी झाली आहे पण आमच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने निकाल दिला असे आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Dec 22, 2025 06:50:36
Yeola, Maharashtra:येवलं नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची संपन्न झाली येव्हेल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना यांच्यातच सरळ लढत पाहायला मिळाली होती दरम्यान वार्ड क्रमांक सहा ब मध्ये शिवसेनेकडून उभ्या असलेल्या मीनाक्षी सचिन अलगट यांचे पती सचिन अलगट यांचे प्रचारादरम्यान दुःखद निधन झाल्याने अलगट कुटुंबियांनी प्रचार थांबवायला दुसरीकडे मात्र रणधुमाळी सुरू होती याच वार्डात सोनल नाईकवाडे या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभ्या होत्या राजकीय अनुमान पाहता सोनल नाईकवाडे विजय होतील असा अंदाज बांधला जात होता मात्र मीनाक्षी अलगट यांना मतदारांनी सहानुभूती दाखवत विजयाची माळ गळ्यात घातली पत्रकारांशी बोलताना मीनाक्षी अलगट या भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 22, 2025 06:31:30
Chandrapur, Maharashtra:पक्षाने माझी ताकद कमी केली या सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया, अशा प्रकारचा वक्तव्य करणं म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान असल्याचे ते म्हणाले. अनेक ठिकाणी मंत्रीपद असलेल्या जिल्ह्यात देखील भाजपच्या उमेदवारांचा पराभव झालाय. आमच्याकडे मंत्री पद असताना देखील आम्ही अनेक नगरपरिषदांमध्ये पराभूत झालो, मंत्रीपद असताना दोन वेळा आम्ही लोकसभा देखील पराभूत झालो.  चंद्रपूर जिल्ह्याकडे सलग पाच वर्षे मंत्रीपद असताना देखील पराभूत झालो असेही ते म्हणाले. शोभाताईं फडणवीस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट कौटुंबिक असून त्यांनी पक्षासाठी कष्ट केले आहेत. त्यामुळे पक्षाच्या झालेल्या पराभवामुळे त्यांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे, असेही आ. जोरगेवार म्हणाले.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 22, 2025 06:02:20
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 22, 2025 05:50:05
Washim, Maharashtra:वाशीम वाशिम वाशीम जिल्ह्यातील कारंजा नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय फेरबदल घडवून आणला आहे.या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवार फरीदा बानो मोहम्मद शफी पुंजानी यांनी भाजपच्या उमेदवार निशा गोलेच्छा यांचा 117 मतांनी पराभव केला आहे.या पराभवामुळे कारंजा विधानसभेच्या भाजपच्या आमदार सई डहाके यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.कारंजा नगरपरिषदेत एमआयएमने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. कारंजा नगरपरिषदेतील एकूण 31 नगरसेवकांपैकी 16 नगरसेवक एमआयएमचे निवडून आले असून भाजपला 13 जागांवर समाधान मानावे लागले आहे.राष्ट्रवादी (अप) पक्षाला एक व अपक्षाला एक जागा मिळाली आहे.वाशिम नगरपरिषदेतही एमआयएमचे दोन नगरसेवक विजयी झाले असून, विदर्भातील स्थानिक राजकारणात एमआयएमचे वाढते वजन स्पष्ट झाले आहे. नगरपरिषद निवडणुकीमध्ये एमआयएमच्या मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा सुद्धा झाल्या होत्या. *नगराध्यक्ष : फरीदा बानो मोहम्मद शफी पुंजानी (एमआयएम) **पक्षनिहाय नगराध्यक्ष,नगरसेवक संख्या : * एमआयएम – 16 * भाजपा – 13 * राष्ट्रवादी (अप) – 1 *अपक्ष :1
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 22, 2025 05:48:51
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर सहाय्यक पोलीस अधीक्षकांची वाळू माफियांवर मोठी कारवाई बारा वाहनांसह सहा वाळू माफियांना घेतलं ताब्यात पंढरपूर शहरालगतच्या इसबावि भागातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा आणि त्याची वाहतूक सुरू आहे. याबाबत पोलिसांनी पथक तयार करून वाळू उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन कारवाई केली. या कारवाईमध्ये 12 वाळू वाहतूक करणारी वाहने पोलिसांनी जप्त केलीली आहेत या कारवाईदिकून बारा आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आज पर्यंत पोलिसांना वाहने मिळत होती पण पहिल्यांदाच पोलिसांनी वाळूमाफीयांना ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू केलेलं आहे पंढरपूर तालुक्यातील कौठाळी शिरढोण या परिसरात सुद्धा मोठ्या पद्धतीने वाळू उपसा सुरू आहे त्यावर सुद्धा कारवाई होण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून होते
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 22, 2025 05:39:01
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- चिपळूण नगरपरिषद में शिवसेना के उमेश सकपाळ ने रमेश कदमांचा पराभव कर आश्चर्यजनक विजय हासिल किया। चिपळूण नगर परिषद में शिवसेना-भाजपा युती के उमेश सकपाळ ने माजी आमदार रमेश कदमांचा पराभव किया और जीत हासिल की। रमेश कदम के प्रचार में उद्धव ठाकरे-सेना के आमदार भास्कर जाधव भी मैदान में थे। आपने कबड्डी खेलते समय जैसी चाल चली, वैसी ही परिणाम निकले। हमने किसी का होम-पिच नहीं देखा, जनता ने हमारे काम पर विश्वास दिखाया। एकनाथ शिंदे ने चिपळूण में मेरे प्रचार के लिए सभाएँ कीं और फायदा हुआ। उमेश सकपाळ एकनाथ शिंदे, उदय सामंत के समर्थक रहे हैं। उमेश सकपाळ के लिए उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने चिपळूण में सभा ली। मेरे विजय के लिए उद्योग मंत्री उदय सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजपा नेता प्रशांत यादव ने मेहनत की। मैं सड़क पर का कार्यकर्ता हूँ, इसलिए कोई चुनौती नहीं मानी। पिछले 5 वर्षों में जनता की हर मुश्किल में मैं पहुँचा और आज जनता ने इसे मान्यता दी।
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 22, 2025 05:35:35
Akola, Maharashtra:राज्यातील महापालिकांमध्ये भाजपने विजयाचा झेंडा फडकावला असला, तरी अकोल्यात या विजयाच्या गजरातच नाराजीचा आवाज तीव्र होताना दिसतोय. सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरलेला भाजप, पक्षातील असंतोष रोखण्यात मात्र सपशेल अपयशी ठरत असल्याचं चित्र अकोल्यात उघडपणे समोर आलं आहे. अकोल्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही आजी-माजी नगरसेवकांकडून ‘तिसरी आघाडी’ उभारण्याच्या हलचाली सुरू असल्याने आधीच पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली असताना, आता थेट पक्षाच्या तळागाळात मोठी भगदाडं पडत असल्याचं स्पष्ट झालं आहे. अकोला शहरातील खडकी भागातून भाजपला मोठा धक्का बसला असून, तब्बल राजेश घोगरे या माजी भाजप पदाधिकारी यांच्यासह २५० हून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भाजपला रामराम ठोकत उबाठा गटात प्रवेश केला आहे. यामध्ये भाजप महिला आघाडीच्या माजी ग्रामीण उपाध्यक्ष, विविध पदाधिकारी आणि शेकडो निष्ठावंत कार्यकर्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या प्रवेश सोहळ्यामुळे काँग्रेसलाही फटका बसला असून, काँग्रेसचे काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पक्ष सोडून उबाठामध्ये प्रवेश केला आहे. उबाठाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला असून, प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी भाजप नेतृत्वावर थेट आणि जळजळीत आरोप केले आहेत. अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आयात केलेल्या लोकांना तिकीट दिलं जातंय, पक्ष वाढीसाठी घाम गाळणाऱ्यांना बाजूला सारून, सत्तेच्या गणितात बसणाऱ्यांना पुढे केलं जात आहे असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करून त्यांना सोबत घेणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र दोन दिवसच उलटून पक्षाला गळती लागली आहे. एकीकडे ‘पक्ष संघटनेचा कणा मजबूत’ असल्याचा दावा करणारा भाजप, दुसरीकडे मात्र त्याच संघटनेतील कार्यकर्त्यांची नाराजी ऐकून घेण्यात अपयशी ठरत असल्याचं अकोल्यातील हे चित्र सांगत आहे. नगरपालिकेतील यशाचा जल्लोष सुरू असतानाच, पक्षातून बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्यांची रांग भाजपसाठी येत्या निवडणुकीत किती महागात पडते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 22, 2025 05:20:45
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यात भाजपने यश मिळवले असले तरी छत्रपती संभाजी नगरात भाजपला फक्त 1 नगराध्यक्ष निवडून आणता आला भाजपच्या हा पराभवामागे शिंदेंच्या शिवसेनेचा हात असल्याचा चर्चा आता सुरु झाल्या आहेत आणि त्याच कारण म्हणजे अब्दुल सत्तार यांचे सिल्लोड मध्ये निवडून आल्या नंतरचे विधान भाजप नेते रावसाहेब दानवे याना टार्गेट करत सत्तार यांनी जालन्यातील भोकरदन मध्ये तुमचा सुपडा साफ केला असे विधान केले आहे , सोबतच छत्रपती संभाजी नगरातील फुलंब्री जो रावसाहेबांचा लोकसभा मतदार संघात येतो तिथं आणि कन्नड मध्ये जिथं रावसाहेब दानवे यांची मुलगी आमदार आहे तिथं ही आम्ही पराभव केला असे सत्तार यांचा विधानावरून स्पष्ट होतेय...फलंब्री मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नगर अध्यक्ष निवडून आलाय तर कन्नड मध्ये काँग्रेस चा नगर अध्यक्ष निबडून आलाय, तिथं भाजपच्या पराभवासाठी सत्तार यांनी काम केले का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.. सिल्लोडमध्ये प्रचार करणाऱ्यांचा आम्ही भोकरदनमध्ये सुपडासाफ केल्याचं सत्तार म्हणाले आहे. स्वतःचं गाव वाचवू शकत नाही, ते सिल्लोडमध्ये प्रचार करत होते असा खोचक टोलाही सत्तार यांनी दानवेंना लगावला आहे. तसेच फुलंब्री आणि कन्नडमध्ये देखील आम्ही गणित बिघडवले असा सत्तारांनी टोला लगावला. तर खुलताबाद मध्येही आमची भूमिका होती असे सत्तार म्हणाले निवडून आलेले सगळे माझे मित्र असल्याचं सत्तार म्हणाले.. त्यामुळं सत्तार यांची भाजप विरोधात भूमिका असल्या़ं पुन्हा एकदा दिसून येतंय..
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 22, 2025 04:48:16
Niphad, Maharashtra:रामसर दर्जा प्राप्त असलेले तसेच महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख निर्माण केलेल्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य 25 ते 30 हजार देशी-विदेशी पक्षी दाखल झाल्याने पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे जणू एक प्रकारचा देशी विदेशी पक पक्षांचा मेळावाच भरला आहे चला पाहूया हा स्पेशल रिपोर्ट.... महाराष्ट्रातील एक उत्तम तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिक मध्ये कुंभमेळा भरतो त्याप्रमाणे नांदूर मधमेश्वर हे पक्षीतीर्थ’ असलेल्या या अभयारण्यामध्ये करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षणातून येथे 300 हून अधिक प्रकारचे पक्षी असल्याचे आढळून आले आहे. येथील जलाशयात 24 जातीचे मासे आहेत.परिसरात 400 हून अधिक प्रजातीच्या वनस्पतींची विविधता आहे नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात पक्षी अधिवासाची संपन्नता तसेच दुर्मिळ पक्ष्यांचे अस्तित्त्व लक्षात घेऊन हे क्षेत्र ‘भारतीय पक्षीतीर्थ जाळ्या’त समाविष्ट करण्यात आले आहे फ्लेमिंगो, टिल्स, पोचार्ड, विजन, गडवाल, शॉवलर, पिनटेल, क्रेन, गारगनी, टर्नस्, गज, पेलिकन, गॉडविट, सॅन्ड पायपर, क्रेक, कर्ल्यु, हैरियर, प्रॅटिनकोल, गल इत्यादि स्थलांतरीत पाणपक्षी येथे जास्त प्रमाणात आढळून येतात. पाण कोंबडी, मुक्त बलाक, गायबगळे, मध्य बगळे, खंड्या, आयबीस, स्टॉर्क इत्याही स्थानिक पक्षी येथे सातत्याने दिसून येत असतात. तर पाणकावळे, पाणडुबी, रोहित, चमचा, धनवर, कुट आदी स्थानिक स्थलांतरित पक्षीही येथे आढळून येत असतात.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 22, 2025 04:47:49
Kolhapur, Maharashtra:Kop Mandlik On Mushrif Anc:- राजकीय विद्यापीठ अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मध्ये नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीतसिह घाटगे एकत्र आल्यानंतर राजकीय समीकरणा बदली. पण या बदललेल्या समीकरणानंतर शिंदे गटाचे नेते माजी खासदार संजय मंडलिक गट चांगलाच आक्रमक झाला. मुरगुड नगरपालिकेत शिंदे गटाच्या उमेदवाराने नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यानंतर मंडलिक गटाने जोरदार जल्लोष केला. त्यानंतर प्रतिक्रिया देत असताना संजय मंडलिक यांनी हसन मुश्रीफांवर जोरदार टीका केली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बद्दल मला काहीच बोलायचं नाही.. कारण त्यांच्या विचारावर मी राजकारण करत नाही.. हसन मुश्रीफ हे काय हिटलर लागून गेले नाहीत.. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात मला प्रश्न विचारू नका... मरू दे तिकडे... अशी खरमरीत टीका मंडलिकाने केली. राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्या नेत्यांमध्येच मोठ्या प्रमाणात मतभेद ताणले गेले. अनेक ठिकाणचे मतभेद हवेत विरले देखील. पण कागल मध्ये मात्र वेगळा चित्र दिसतंय. याला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची किनार मानली जात आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 22, 2025 04:02:19
Amravati, Maharashtra:शहरात दहशत माजवणाऱ्या टोळक्याची पोलिसांनी काढली धिंड; दोन दिवसांआधी धुडगुस घालत वाहनांवर दगडफेक करत केली होती तोडफोड. दोन दिवसाआधी अमरावती शहरालगत असलेल्या नांदगाव पेठ परिसरात एक व्यक्तीचा खून झाला होता त्यानंतर काही तरुणांच्या टोळक्याने शहरात धुळघुस करत दगडफेक करत वाहनांची तोडफोड करून शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शहराच्या काही भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर येत पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या व तोडफोड करणाऱ्या आरोपींना अटक केली आणि काल अखेर ज्या परिसरात टोळक्याने तोडफोड करत दहशत माजवली होती तिथूनच हाताला बेळ्या बंधून या टोळक्याची धिंड काढत परिसरातील नागरिकांचे माफी मागायला लावली. त्यामुळे नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर झाले असून या संपूर्ण टोळक्याची चांगलीच नाचक्की पोलिसांनी केली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top