Back
अकोला नगरपालिका चुनाव: भाजपा में बगावत, 250+ कार्यकर्ता उभाठ में शामिल
JJJAYESH JAGAD
Dec 22, 2025 05:35:35
Akola, Maharashtra
राज्यातील महापालिकांमध्ये भाजपने विजयाचा झेंडा फडकावला असला, तरी अकोल्यात या विजयाच्या गजरातच नाराजीचा आवाज तीव्र होताना दिसतोय. सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरलेला भाजप, पक्षातील असंतोष रोखण्यात मात्र सपशेल अपयशी ठरत असल्याचं चित्र अकोल्यात उघडपणे समोर आलं आहे. अकोल्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही आजी-माजी नगरसेवकांकडून ‘तिसरी आघाडी’ उभारण्याच्या हलचाली सुरू असल्याने आधीच पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली असताना, आता थेट पक्षाच्या तळागाळात मोठी भगदाडं पडत असल्याचं स्पष्ट झालं आहे. अकोला शहरातील खडकी भागातून भाजपला मोठा धक्का बसला असून, तब्बल राजेश घोगरे या माजी भाजप पदाधिकारी यांच्यासह २५० हून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भाजपला रामराम ठोकत उबाठा गटात प्रवेश केला आहे. यामध्ये भाजप महिला आघाडीच्या माजी ग्रामीण उपाध्यक्ष, विविध पदाधिकारी आणि शेकडो निष्ठावंत कार्यकर्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या प्रवेश सोहळ्यामुळे काँग्रेसलाही फटका बसला असून, काँग्रेसचे काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पक्ष सोडून उबाठामध्ये प्रवेश केला आहे. उबाठाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला असून, प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी भाजप नेतृत्वावर थेट आणि जळजळीत आरोप केले आहेत. अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आयात केलेल्या लोकांना तिकीट दिलं जातंय, पक्ष वाढीसाठी घाम गाळणाऱ्यांना बाजूला सारून, सत्तेच्या गणितात बसणाऱ्यांना पुढे केलं जात आहे असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करून त्यांना सोबत घेणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र दोन दिवसच उलटून पक्षाला गळती लागली आहे. एकीकडे ‘पक्ष संघटनेचा कणा मजबूत’ असल्याचा दावा करणारा भाजप, दुसरीकडे मात्र त्याच संघटनेतील कार्यकर्त्यांची नाराजी ऐकून घेण्यात अपयशी ठरत असल्याचं अकोल्यातील हे चित्र सांगत आहे. नगरपालिकेतील यशाचा जल्लोष सुरू असतानाच, पक्षातून बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्यांची रांग भाजपसाठी येत्या निवडणुकीत किती महागात पडते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowDec 22, 2025 06:50:360
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 06:31:300
Report
AKAMAR KANE
FollowDec 22, 2025 06:02:200
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 22, 2025 05:50:050
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 22, 2025 05:48:510
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 22, 2025 05:39:010
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 22, 2025 05:38:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 05:20:450
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 22, 2025 05:04:060
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 22, 2025 04:48:160
Report
PNPratap Naik1
FollowDec 22, 2025 04:47:490
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 22, 2025 04:15:390
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 22, 2025 04:02:190
Report
ABATISH BHOIR
FollowDec 22, 2025 04:02:020
Report