Back
VSR विमान दुर्घटना पर अमोल मिटकरी की शंका, CID जांच और विशेष अधिवेशन की मांग
JJJAYESH JAGAD
Feb 07, 2026 15:33:19
Akola, Maharashtra
VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करत असताना अजित पवारांचा झालेला अपघात अजूनही अनेक प्रश्न निर्माण करत आहे. या अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले की, VSR कंपनीने डिसेंबर महिन्यात आपल्या प्रत्येक पायलटचा तब्बल ५० कोटी रुपयांचा विमा उतरवला होता आणि त्यानंतरच जानेवारी महिन्यात ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे हा केवळ अपघात होता की त्यामागे काही वेगळा कट आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पायलटला हिप्नॉटाईज करण्यात आलं होतं का? ज्या पद्धतीने दहशतवादी हल्ल्यांमध्ये मानवी बॉम्ब किंवा अजमल कसाबसारख्या घटनांमध्ये हिप्नॉटिझमचा उल्लेख झाला होता, तसंच काहीसं या प्रकरणात घडलं का, अशी शंका मिटकरी यांनी व्यक्त केली. ५० कोटींच्या विम्याचं आमिष दाखवून पायलटला वापरण्यात आलं का, याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाची CID चौकशी लावल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, मंगळवारी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार असून, त्यावेळी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन पायलट आणि VSR कंपनीची सखोल चौकशी करावी, तसेच या अपघाताच्या संदर्भात दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात यावं, अशी मागणी करण्यात येणार असल्याचंही अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:17:500
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:16:350
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:16:170
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:15:59Oros, Maharashtra:रत्नागिरी आमदार किरण सामंत यांनी सपत्नीक जिल्हा परिषद आदर्श विद्यमंदिर पाली १ या ठिकाणी बजावला मतदानाचा हक्क
0
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:02:440
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:02:190
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:02:090
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 07, 2026 14:45:400
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 07, 2026 14:01:060
Report
PNPratap Naik1
FollowFeb 07, 2026 13:47:460
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 07, 2026 13:30:390
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 07, 2026 13:16:520
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 07, 2026 13:16:060
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 07, 2026 13:06:580
Report