410210
तुर्भे में कचरे से बिजली बनाने की योजना को मंजूरी मिली
Navi Mumbai, Maharashtra:बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने नवी मुंबईतील तुर्भे येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या मागणीला शासन मान्यता मिळालेय. नवी मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारा घरगुती व औद्योगिक कचऱ्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर तुर्भे येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सार्वजनिक-खाजगी-लोकसहभागातून सुरु केला जाणार आहे. सदर प्रकल्प उभारण्याकरिता साधारण 1800 ते 2000 कोटी रुपये खर्च येणार असून नवी मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि स्मार्ट सिटीच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलेय.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
परतवाड़ा केस: आरोपी अयान ने सड़क पर केक काटा, पुलिस ने शुभकामनाएं दी
Amravati, Maharashtra:परतवाडा प्रकरणात नवीन ट्विस्ट; मुख्य आरोपी अयानला पोलिसांनी दिल्या होत्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अयान अहमदने बॉस नावाचा उल्लेख असलेल्या टी शर्ट घालून पोलिसांच्या उपस्थितीत भर रस्त्यात फटाके फोडून वाढदिवसाचा केक कापल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्य आरोपी अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी थेट आरोपी अयान याच्या तोंडात केक भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे परतवाडा प्रकरणांमध्ये सुरुवातीला पोलिसांनी हयगय केल्याचा आरोप झाला असतानाच दुसरीकडे चक्क पोलिसांनी मुख्य आरोपीला केक भरवल्याचा व्हिडिओच आता समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ज्या दिवशी आरोपी अयानने भर रस्त्यात केक कापला त्या दिवशी पोलिसांनी त्याला का थांबवलं नाही उलट पोलिसांनीच का त्याला शुभेच्छा दिल्या असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला जातो. वाढदिवसाच्या दिवशी आरोपी अयानच्या अंगात असलेल्या टी-शर्टवर बॉस असा उल्लेख असून भर रस्त्यात अयानला केक भरवणाऱ्या आणि वाढदिवसात सहभागी होणाऱ्या पोलिसांवर काही कारवाई होणार का याकडे लक्ष सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
लाखनी नगर पंचायत के सफाई कर्मचारियों ने वेतन रोक के विरोध में प्रदर्शन
Bhandara, Maharashtra:स्वच्छता कामगार कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे वेतन थकीत... कामगारांचा कंत्राटदारावर आक्रोश. भंडारा जिल्ह्यातील लाखनी नगरपंचायत स्वच्छता कामगार कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने कामगारामध्ये कंत्राटदाराविरुद्ध नाराजी निर्माण झाले होतें. तसेच ह्या कामगारांचे सुरक्षा संदर्भात कुठलाही विमा पॉलिसी नाही हा कामगावर अन्याय होत असून शासनाने 1 एप्रिल पासून कामगारांना 600 रुपये वाढीव मजुरी मंजूर केली आहे. त्या नियमानुसार वेतन देण्यात यावे अशी मागणी करत स्वछता कामगार कर्मचारी लाखनी नगर पंचायत मधील कंत्राटदारावर आक्रोश व्यक्त करीत आंदोलन केला आहे.0
0
Report
अकोला पुलिस ने ऑपरेशन प्रहार में MD ड्रग्स और भारी संपत्ति कब्जे में लिया
Akola, Maharashtra:अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केले आहेत. सिव्हिल लाईन हद्दीत संशयित व्यक्तीकडऊन सुमारे १३.६३ ग्रॅम एमडी ड्रग्ज तसेच मोबाइल असा एकूण सुमारे १३.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.0
0
Report
Advertisement
हिंगोली में शिवसेना का महावितरण कार्यालय के सामने अन्नत्याग आंदोलन; AB केबल जांच मांग
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिले में शिवसेना के पक्ष से महावितरण कार्यालय के सामने अन्नत्याग आंदोलन शुरू किया गया है; आरडीएसएस योजना के अंतर्गत AB केबल के काम में अनियमितता के कारण गावठाण फिटर के काम की जांच की मांग की जा रही है; जब तक जाँच नहीं होती, आंदोलन स्थगित नहीं किया जाएगा—यह आंदोलनकारियों का निर्णय है।0
0
Report
यवतमाळ जलसंकट के लिये मंत्री समीक्षा: टैंकर पानी और विहिर अधिग्रहण पर मुआवरा तय
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारनार्थ उपाययोजनांबाबत पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकासमंत्री अशोक ऊईके यांनी आढावा घेतला. ग्रामीण व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजना तसेच नळपाणी पुरवठा योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. सद्यस्थितीत चार गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच आवश्यक तेथे खाजगी विहिरी अधिग्रहित करुन नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. त्यानुसार ज्या दिवशी ग्रामसभेत विहिर अधिग्रहणाचा ठराव होईल, त्या दिवसापासून विहिर अधिग्रहण मोबदला दिला जाईल, असा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला.0
0
Report
भीषण गर्मी के बीच राजापुर गाँव में टैंकर से पानी सप्लाई शुरू
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे अशा परिस्थितीत तालुक्यातील राजापूर गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या या राजापूर गावातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी टँकरच्या 4 फेऱ्याद्वारे गाव भागात पाण्याच्या टाकीत पाणी टाकून नळावाटे वितरण केले जात आहे तर वाड्या-वस्त्यांवर थेट टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे0
0
Report
Advertisement
ग्राम रोजगार सेवकों ने मानधन बढ़ाने की मांग पर आंदोलन जारी
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी मानधनाच्या मुद्द्यावरून कामबंद आंदोलन सुरू केले असून गेल्या पंधरा दिवसांपासून हे आंदोलन तीव्र होत चालले आहे. शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8 हजार रुपये मानधन आणि 2 हजार रुपये प्रवासी भत्ता देण्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात गेल्या 18 महिन्यांपासून कोणतेही मानधन मिळाले नसल्याने या ग्राम रोजगार सेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत, अशी नाराजी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
युवा नेता समीर समदडिया के नेतृत्व में 30 लाख रुपये के विकास कार्यों का उद्घाटन
Yeola, Maharashtra:येवला शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील ताज पार्क परिसरामध्ये युवा नेते समीर समदडिया यांच्या प्रयत्नाने तीस लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमार्फत कामे मंजूर करण्यात आली होती. या विकास कामांचा शुभारंभ नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.0
0
Report
एसटी बस की धड़के से बाइक सवार युवक की मौत, CCTV में कैद भयावह हादसा
Sangli, Maharashtra:स्लग - एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार,अपघाताची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद.. सांगलीच्या जत तालुक्यातल्या डफळापूर येथे एसटी बसच्या धडके दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. डफळापूर येथील पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून रस्ता पार करत असताना, भरधाव एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक बसली,यामध्ये सुमारे पंधरा ते वीस फूट लांब पर्यंत दुचाकी फरफटत गेली, यामध्ये शिरीष जाधव जागीच ठार झाला. पेट्रोल पंपावरून रस्ता ओलांडताना बस दुचाकीच्या या भीषण अपघाताची घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.0
0
Report
Advertisement
जालना में प्रेम के जाल में फँसाकर छात्रा से बलात्कार; गिरफ्तार आरोपी को न्यायिक हिरासत
Jalna, Maharashtra:जालना |प्रेमाच्या जाळ्यात अडकवून महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार जालना कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाशिकनंतर जालन्यातही धक्कादायक प्रकार उघड अँकर- नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकरणानुसार राज्यभरात संतापाची लाट असताना, आता जालना शहरातही तशाच पद्धतीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रेमाच्या नावाखाली तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय आणि तिला बुरखा घालण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पीडित तरुणीशी आरोपी साहिल जावेद अन्सारी याने ओळख वाढवली. सुरुवातीपासूनच त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने आत्महत्येची धमकी देत मानसिक दबाव निर्माण केला. या दबावाला बळी पडत तरुणीने त्याच्याशी मैत्री ठेवली. यानंतर आरोपीने तिच्यावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. शहरातील विविध ठिकाणी फिरताना त्याने तिला बुरखा घालण्यास भाग पाडले. पुढे, “घरी कोणी नाही” असे सांगत आरोपीने तिला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकारानंतर मानसिक धक्क्यात असलेल्या पीडितेने अखेर धाडस दाखवत ही बाब आपल्या आईला सांगितली. त्यानंतर आईसह पीडितेने कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या घटनेमागे आणखी काही धागेदोरे आहेत का याचाही तपास केला जात आहे.0
0
Report
नाशिक: मल्टिनॅशनल कंपनी के धर्मांतरण-यौन शोषण केस में 2 संदिग्ध अदालत में पेश
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग मल्टिनॅशनल कंपनी में धर्मांतरण और महिला लैंगिक शोषण प्रकरण... आज न्यायालय में 7 में से 2 संदिग्धों को हाजिर किया जाएगा... शफी शेख और राज मेनन के नाम ऐसे संदिग्धों में बताए गए... महिला लैंगिक शोषण और धर्मांतरण प्रकरण में 9 में से एक अपराध में उन्हें हाजिर किया जाएगा... पुलिस हिरासत मांगे जाने की संभावना...0
0
Report
नाशिक: सकल हिंदू समाज की बाइक रैली, कॉर्पोरेट जिहाद के विरोध में
Nashik, Maharashtra:Nashik breaking - नाशिक मध्ये आज सकल हिंदू समाजाची बाईक रॅली मल्टिनॅशनल कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत निघणार रॅली - मल्टिनॅशनल कंपनीत घडलेल्या कॉर्पोरेट जिहाद घटनेचा निषेधार्थ रॅलीचे आयोजन - वेगवेगळे हिंदू संघटना रॅलीत होणार सहभागी - धर्मांतर आणि महिलांवर झालेले अत्याचार विरोधात सकल हिंदू सकल समाज आक्रमक - बाईक रॅलीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात - थोड्याच वेळात बाईक रॅलीला सुरुवात होणार0
0
Report
Advertisement
पांझण नदी के बिजली पंप चालू करने गए दो किसान मृत
Malegaon, Maharashtra:नांदगाव (नाशिक): विजेचा शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू... साकोरा येथील दुर्दैवी घटना.. पांझण नदीवरील वीजपंप दुरुस्ती करतेवेळी घडली घटना... शिरीष भगवान पठाडे (वय ४२) व जगदिश तुकाराम खैरनार अशी मयत शेतकऱ्यांची नावे.. पांझण नदीपात्रातील विजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या दोघा शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे घडली.. पांझण नदीपात्रात गेल्या काही वर्षांपासून पन्नास ते साठ शेटकर्यांचे विजपंप कार्यरत आहेत. आज साकोरा येथील शिरीष भगवान पठाडे(४२) व जगदिश तुकाराम खैरनार (३६) हे दोघे तरूण शेतकरी पांझण नदिवर विज पंप सुरू करण्यासाठी गेले. मात्र विजपंप पाण्याहार असल्याने तो पाण्यात खेचण्याच्या प्रयत्नात पाण्यात अचानक विजपुरवठा सुरू झाल्याने दोघा शेतकऱ्यांना विजेचा तीव्र झटका बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.0
0
Report
शिरूर थाने के बाहर दो गुटों का हिंसक टकराव, पुलिस ने लाठीचार्ज किया
Shirur, Maharashtra:ब्रेकिंग न्यूज़ शिरूर पुणे... शिरूरला पोलिस ठाण्यात धुमश्चक्री दोन गट एकमेकांना भिडले; अखेर पोलيسांच्या लाठीमारानंतर जमाव पांगला. पुणे जिल्ह्याच्या शिरूर पोलिस स्टेशनच्या आवारात मध्यरात्री दोन गटात धूम चक्री दगडफेक शिवीगाळ, धमक्यांसह तुफान राडा झालाय, जमाव काबूत येत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवीले. या राड्यात दोन जखमी झाले असून, याप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी बेकायदा जमाव जमवून सामाजिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही गटांतील 35 ते 40 जणांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून यात सराईत गुन्हेगारांसह प्रतिष्ठीत मंडळींचाही समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात राडा होऊन ही पोलिसांनी अद्याप एका ही आरोपीला अटक केली नसून या राड्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.0
0
Report
नवी मुंबई के झोपड़पट्टों में क्लस्टर योजना पर भाजपा-शिंदे गट کی نئی जंग
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील झोपडपट्टी धारकांना क्लस्टरच्या माध्यमातून अधिकृत मोठी घरे देण्याची मागणी शिवसेना शिंदे गटातर्फे करण्यात आलेय. एमआयडीसी मधील झोपडपट्टी धारकांना 300 चौरस फुटाची घरे देण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते ही सकारात्मक बाब असली तरी ठाण्याच्या धरतीवर नवी मुंबईत देखिल क्लस्टर योजना रबविण्याची मागणी करण्यात आलेय. गणेश नाईकांनी एमआयडीसीच्या टेंडर प्रक्रियेला विरोध केला असून माजी आमदार संदीप नाईकांनी थेट मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. यावरून नाईकांच्या मनात असतं तर आतापर्यंत झोपडपट्टी धारकांना घरे मिळाली असती आणि संदीप नाईक मोर्चा काढणार असतील तर आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढू असा थेट इशारा शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय.0
0
Report
Advertisement
