Back
कोल्हापुर शाहू मिल चौक हादसा: पिता और बेटी की मौत, तीन घायल
PNPratap Naik1
Feb 07, 2026 13:47:46
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर शहरातील शाहू मिल चौकात भरधाव क्रेटा कारमुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वडील आणि विवाहित मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगात असलेल्या क्रेटा कारने तीन ते चार दुचाकींना जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार तब्बल दहा ते पंधरा फूट दूरफेकले गेले, तर अपघातग्रस्त क्रेटा कार घटनास्थळीच उलटी झाली. राजारामपुरी आठव्या गल्लीत राहणारा 19 वर्षीय मयुरेश पाटील हा क्रेटा कार घेऊन शाहू मिल चौकाच्या दिशेने येत होता. शाहू मिल चौकात आल्यानंतर वाहनावरील त्याचा ताबा सुटला आणि कार थेट विरुद्ध दिशेला गेली. त्यामुळे समोरून तसेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकींना क्रेटा कारने जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे दीपक वावगे (वय 72) आणि त्यांची विवाहित मुलगी भाग्यश्री लक्ष्मण गवळी (वय 30) यांना क्रेटा कारची जोरदार धडक बसली. दोघेही घटनास्थळावरून दहा ते पंधरा फूट दूर फेकले गेले असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की तिन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात आणखी तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमींवर कोल्हापूरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत भाग्यश्री लक्ष्मण गवळी या मूळच्या गगनबावडा तालुक्यातील रहिवासी होत्या. वकिली व्यवसायानिमित्त त्या आपल्या पतीसह कोल्हापुरात वास्तव्यास होत्या. आज काही कामानिमित्त त्या आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. दरम्यान, अपघातापूर्वी चालक मयुरेश पाटील याचा कुटुंबीयांशी वाद झाल्याची माहिती असून त्यानंतर कोणालाही न सांगता तो क्रेटा कार घेऊन घराबाहेर पडल्याचे समोर आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:17:500
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:16:350
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:16:170
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:15:59Oros, Maharashtra:रत्नागिरी आमदार किरण सामंत यांनी सपत्नीक जिल्हा परिषद आदर्श विद्यमंदिर पाली १ या ठिकाणी बजावला मतदानाचा हक्क
0
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:02:440
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:02:190
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:02:090
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 07, 2026 15:33:190
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 07, 2026 14:45:400
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 07, 2026 14:01:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 07, 2026 13:30:390
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 07, 2026 13:16:520
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 07, 2026 13:16:060
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 07, 2026 13:06:580
Report