Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812
सिंधुदुर्ग जिले में जिला परिषद व पंचायत समिति चुनाव के लिए मतदान शुरू
UPUmesh Parab
Feb 07, 2026 17:02:09
Oros, Maharashtra
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकिसाठी आज सकाळ पासून मतदान प्रक्रियेला सुरवात झालीय. सकाळच्या sत्रात जिल्ह्यात अगदी शांततेत मतदान सुरवात झालीय.. सिंधुदुर्गात 5 लाख 61 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 50 जागांसाठी 155 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत तर पंचायत समितीच्या 100 जागांसाठी 244 उमेदवार रिंगणात उभे आहेत. 810 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UPUmesh Parab
Feb 07, 2026 17:16:35
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 07, 2026 17:16:17
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे यांनी बजावला मतदानाचा हक्क.. कणकवली तालुक्यातील वरवडे येथील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क. 27 वर्ष नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली असलेली जिल्हा परिषद ह्यावेळी सुद्धा महायुतीच्या माध्यमातून विजय होणार असल्याचा राणेनी विश्वास व्यक्त केला. विरोधक नाउमेद झाल्याने ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नितेश राणे मुंबई महापौर निवडणुकीबद्दल देखील प्रतिक्रिया दिल्या. मुंबईकरांनी आपला महापौर अगोदरच निवडलाय, कोण मुंबईचा विकास करू शकतो हे माहित असल्याने महापालिकेचे निवडीचे मत दिले, जय श्री राम बोलणारा महापौर अपेक्षित होता, असे त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांच्या टीकेबद्दल नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 07, 2026 15:33:19
Akola, Maharashtra:VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करत असताना अजित पवारांचा झालेला अपघात अजूनही अनेक प्रश्न निर्माण करत आहे. या अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले की, VSR कंपनीने डिसेंबर महिन्यात आपल्या प्रत्येक पायलटचा तब्बल ५० कोटी रुपयांचा विमा उतरवला होता आणि त्यानंतरच जानेवारी महिन्यात ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे हा केवळ अपघात होता की त्यामागे काही वेगळा कट आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पायलटला हिप्नॉटाईज करण्यात आलं होतं का? ज्या पद्धतीने दहशतवादी हल्ल्यांमध्ये मानवी बॉम्ब किंवा अजमल कसाबसारख्या घटनांमध्ये हिप्नॉटिझमचा उल्लेख झाला होता, तसंच काहीसं या प्रकरणात घडलं का, अशी शंका मिटकरी यांनी व्यक्त केली. ५० कोटींच्या विम्याचं आमिष दाखवून पायलटला वापरण्यात आलं का, याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाची CID चौकशी लावल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, मंगळवारी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार असून, त्यावेळी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन पायलट आणि VSR कंपनीची सखोल चौकशी करावी, तसेच या अपघाताच्या संदर्भात दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात यावं, अशी मागणी करण्यात येणार असल्याचंही अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 07, 2026 14:45:40
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 07, 2026 14:01:06
Thane, Maharashtra:भिवंडीतील माजी महापौर विलास पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर.. महापौर पदाच्या निवडणुकीत नवा वळण... अँकर.. भिवंडी कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील व त्यांचा मुलगा नगरसेवक मयुरेश पाटील यांना शनिवारी भिवंडी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने आता महापौर पदाच्या निवडणुकीतील चुरस आणखीन वाढली आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीनंतर कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील व भाजप आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांमध्ये निवडणुक निकालानंतर जोरदार हाणामारी झाली होती. या प्रकरणी दोन्ही गटातील सुमारे ५१ जणांवर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील व त्यांचा मुलगा नगरसेवक मयुरेश पाटील यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी माजी महापौर विलास पाटील व त्यांचा मुलगा मयुरेश पाटील यांना अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला असून कोणार्क विकास आघाडीतील एकूण २३ जणांना तर भाजपच्या ३ जणांना अशा एकूण २६ जनांना भिवंडी न्यायालयातून जामीन मंजूर झाले आहे. माजी महापौर विलास पाटील यांना जामीन मंजूर झाल्याने आता महापौर पदाच्या निवडणुकीतील चुरस आणखीन वाढली आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 07, 2026 13:47:46
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील शाहू मिल चौकात भरधाव क्रेटा कारमुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वडील आणि विवाहित मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगात असलेल्या क्रेटा कारने तीन ते चार दुचाकींना जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार तब्बल दहा ते पंधरा फूट दूरफेकले गेले, तर अपघातग्रस्त क्रेटा कार घटनास्थळीच उलटी झाली. राजारामपुरी आठव्या गल्लीत राहणारा 19 वर्षीय मयुरेश पाटील हा क्रेटा कार घेऊन शाहू मिल चौकाच्या दिशेने येत होता. शाहू मिल चौकात आल्यानंतर वाहनावरील त्याचा ताबा सुटला आणि कार थेट विरुद्ध दिशेला गेली. त्यामुळे समोरून तसेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकींना क्रेटा कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे दीपक वावगे (वय 72) आणि त्यांची विवाहित मुलगी भाग्यश्री लक्ष्मण गवळी (वय 30) यांना क्रेटा कारची जोरदार धडक बसली. दोघेही घटनास्थळावरून दहा ते पंधरा फूट दूर फेकले गेले असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की तिन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात आणखी तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमींवर कोल्हापूरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत भाग्यश्री लक्ष्मण गवळी या मूळच्या गगनबावडा तालुक्यातील रहिवासी होत्या. वकिली व्यवसायानिमित्त त्या आपल्या पतीसह कोल्हापुरात वास्तव्यास होत्या. आज काही कामानिमित्त त्या आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. दरम्यान, अपघातापूर्वी चालक मयुरेश पाटील याचा कुटुंबीयांशी वाद झाल्याची माहिती असून त्यानंतर कोणालाही न सांगता तो क्रेटा कार घेऊन घराबाहेर पडल्याचे समोर आले आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 07, 2026 13:30:39
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 07, 2026 13:16:52
Navi Mumbai, Maharashtra:बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने नवी मुंबईतील तुर्भे येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या मागणीला शासन मान्यता मिळालेय. नवी मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारा घरगुती व औद्योगिक कचऱ्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर तुर्भे येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सार्वजनिक-खाजगी-लोकसहभागातून सुरु केला जाणार आहे. सदर प्रकल्प उभारण्याकरिता साधारण 1800 ते 2000 कोटी रुपये खर्च येणार असून नवी मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि स्मार्ट सिटीच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलेय.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 07, 2026 13:16:06
Shirdi, Maharashtra:कोपरगाव बस स्टेशन में आज सायंकाळी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ब्रेक फेल झाल्याने एसटी बसचे अचानक नियंत्रण सुटले. ही बस थेट फलाट क्रमांक पाचवर चढल्याने स्टेशन में एकच खळबळ उडाली. घटनेच्या वेळी बस स्टेशनात प्रवासी और विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. अचानक समोर आलेल्या बसमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या अपघातात एक प्रवासी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बस स्टेशनात मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, एसटी बसच्या देखभालीबाबत आणि दुरावस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेची चौकशी होणार का, असा सवाल आता प्रवाशांमधून विचारला जात आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top