Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

शादी के दिन मतदान: अंकुश ठक ने लोकतंत्र के लिए मिसाल कायम की

JJJAYESH JAGAD
Dec 02, 2025 05:16:09
Akola, Maharashtra
लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी आज संपूर्ण राज्यात मतदानाचा माहोल पाहायला मिळत आहे. राज्यघटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचे महत्व जाणून मतदार उत्साहात मतदान केंद्रांकडे धावत आहेत. अशाच कर्तव्यनिष्ठ भूमिकेचे उत्तम उदाहरण बार्शीटाकळी येथे पाहायला मिळाले. येथे अंकुश ठक यांनी आपल्या आयुष्यातील अत्यंत खास दिवशी ,लग्नाच्या दिवशी पहिली पायरी मतदान केंद्राकडे टाकली. बाहुल्यावर चढण्यापूर्वीच त्याने मतदान करून लोकशाहीप्रती आपली निष्ठा दाखवली.मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्कच नाही तर कर्तव्यही आहे, हे अधोरेखित करत अंकुश यांनी सर्व मतदारांना, व्यस्त दिनक्रमात कितीही कामे असली तरी मतदानाला प्राधान्य द्या आणि आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा असे आवाहन केले आहे.अंकुश ठक यांच्या हा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 14, 2026 03:49:12
81
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 14, 2026 03:48:20
Malegaon, Maharashtra:आखाती देशांच्या युद्धामुळे घरगुती सिलेंडरचा तुटवडा, व्यावसायिक सिलेंडर बंद यामुळे अनेक व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर असल्याने त्याला पर्याय म्हणून नागरिक कोळश्याकडे वळालेले आहेत. पर्यायाने कोळशाच्या मागणीत आता वाढ झाली आहे. इराण अमेरिका इस्राईल युद्धाचा परिणाम आता संपूर्ण जगावर दिसून आला आहे. काही ठिकाणी घरगुती गॅस, CNG आदींचा तुटवडा जाणवू लागला. आता पोट भरण्यासाठी व्यावसायिक सिलेंडरच्या ऐवजी चूल पेटवण्यासाठी, कपडे इस्त्री करण्यासाठी आदींसाठी आता कोळशाची वापर सुरू झाला असून त्याची मागणी वाढल्याने कोळशाचा दरात देखील 5 ते 10 रुपयांनी वाढ होऊन ग्राहकांना याचा फटका बसू लागला आहे. नेहमीपेक्षा आता नवीन ग्राहक कोळसा खरेदी करण्यासाठी येत आहेत तर काही नागरिकांना कोळसा कुठे मिळतो देखील माहीत नसल्याने ते त्याचा शोध घेत आहेत. भविष्यात कोळशाचा देखील तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून आता मात्र कोळसा वापरण्यास नागरिकांचा कल वाढला असून त्याची मागणी वाढली आहे. एकंदरीत बघितले तर युद्धाची झळ मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचू लागल्याने मोठे आर्थिक संकट देखील उभा राहून जीवनमान खालावण्याची चित्रे दिसू लागली आहेत. लवकरच यावर तोडगा काढावा अशी अनेकांनी आशा व्यक्त केली आहे.
91
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 14, 2026 03:48:00
Ahilyanagar, Maharashtra:अमेरिका- इस्राईल और इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्यावसायिक ‘एलपीजी सिलिंडर’ पुरवठ्यावर निर्बंध आणले आहेत... अहिल्यानगर शहरातील हॉटेल व्यवसायिकांची व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने चांगलीच तारांबळ उडत आहे. शहरातील अनेक हॉटेल व्यावसायिक हतबल झाले असून आता हॉटेलमध्ये विटांची चूल तयार त्यावर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.. ग्राहक आणि व्यवसाय टिकवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांची धडपड सुरू असल्याचे पहायला मिळत आहे... नगर शहरातील सावेडी परिसरात असलेल्या जय आनंद या खानावळ चालकाने व्यवसाय टिकवण्यासाठी चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे... सामान्य कष्टकऱ्यांचं हॉटेल अशी ओळख असलेल्या जय हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक आणि शहरातून जाणारे प्रवासी जेवण करतात
86
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 14, 2026 03:31:40
Shirur, Maharashtra:पुण्याच्या शिरूर तालुक्यात हजारो शेतकऱ्यांचा फार्मर आयडीच निघत नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावा लागत आहे, शासनाने बहाल केलेल्या नवीन शर्तीच्या जमिनी या जिरायत म्हणून शेतकऱ्यांना बहाल केल्या मात्र कालांतराने या जमिनी शेतकऱ्यांनी बागायत केल्या पण सातबारा वरती त्या जिरायत म्हणून तशाच राहिल्या त्याचा सातबारा वरती बदल न झाल्याने शेतकऱ्यांना जिरायत पोटखराबा असलेल्या जमिनींचें फार्मर आयडीच निघत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा महत्वाचा प्रश्न शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी अधिवेशनात मांडला त्यामुळे शासनाने तातडीने या मध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आमदार कटके यांनी अधिवेशनात केलीय.
107
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 14, 2026 02:32:41
Akola, Maharashtra:आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा फटका अनेक उद्योगांना बसत आहे. अकोला शहरात सुमारे ४०० हॉटेल व्यवसायिक आहेत. मात्र सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली आहे. तरीही ग्राहकांची सेवा थांबू नये या उद्देशाने काही व्यवसायिकांनी पर्याय म्हणून चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. चुलीवर स्वयंपाक करणे कष्टदायक आणि वेळखाऊ असले तरीही अनेक वर्षांपासून या भोजनालयांवर अवलंबून असलेल्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून हॉटेल मालकांनी हा मार्ग स्वीकारला आहे. काही हॉटेल्समध्ये चूल पेटवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने काही व्यवसायिकांना हॉटेलच्या बाहेरच चूल मांडून स्वयंपाक करावा लागत आहे. धुरामध्ये आणि वाढलेल्या कष्टांमध्येही हे कुटुंब ग्राहकांना जेवण मिळावं म्हणून दिवस-रात्री मेहनत करत आहे. अकोला शहरात उपचारासाठी येणारे रुग्ण, व्यापारी तसेच पर्यटक यांना दशकांपासून येथील भोजनालयांनी सेवा दिली आहे. आज गॅसच्या तुटवड्याच्या संकटातही ही सेवा खंडित होऊ नये म्हणून अनेक हॉटेल व्यवसायिकांनी चुलीवरच जेवण बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या भोजनालयांमध्ये शेकडो कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे चुलीवर स्वयंपाक सुरू ठेवत त्यांनी कर्मचाऱ्यांचा रोजगारही टिकवून ठेवला आहे. ग्राहकांनाही या परिस्थितीची जाणीव असल्याने तेही या व्यवसायिकांच्या प्रयत्नांचे कौतुक करत आहेत. गॅसचा तुटवडा, वाढलेली मेहनत आणि अनेक अडचणी, तरीही ग्राहकांची सेवा थांबू नये आणि आपल्या कामगारांच्या घरातील चुल पेटती राहावी, या भावनेेतून अकोल्यातील हॉटेल व्यवसायिकांनी चुलीचा आधार घेतला आहे. संकटाच्या या काळातही सेवा, जिद्द आणि माणुसकी जपणाऱ्या या हॉटेल व्यवसायिकांची ही लढाई खरोखरच प्रेरणादायी ठरत आहे.
111
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 14, 2026 02:31:02
176
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 14, 2026 02:17:55
181
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 14, 2026 02:17:25
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्हा परिषदेने 2026-27 वर्षासाठी 59 कोटी 55 लाख रुपयांचा वार्षिक अंदाजपत्रक जाहीर केलं आहे. मागील चार वर्षापासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज आहे त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी और लेखाधिकारी यांनी विशेष सभा घेऊन अंदाजपत्रक सादर केला आहे. जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्न आणि प्रत्येक विभागाचा खर्चाचा मेळ घालणार हे अंदाजपत्रक असून प्रत्येक विभागाला पुरेल असा निधी देण्याचा प्रयत्न या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. या वर्षाखेर पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याचा अंदाज आहे त्यामुळे या अंदाजपत्रकात काही बदलही होऊ शकतात.
240
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 14, 2026 02:01:29
Varasoli, Maharashtra:माणगाव, इंदापूर बायपास 1 जूनपर्यंत सुरू होणार. कोकण रेलवेचा अडथळा लवकरच दूर होणार. कोरेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा. अडथळा ठरणारे विद्युत पोल हटवणार. अँकर – कोकणात जाणारे प्रवासी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची लवकरच सुटका होणार आहे. या दोन्ही ठिकाणच्‍या बायपासचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्‍यासाठी युदधपातळीवर प्रयत्‍न सुरू आहेत. या कामात येणारा कोकण रेल्‍वेचा अडथळा लवकरच दूर हाईल आणि 1 जून पर्यंत दोन्‍ही बायपास सुरू होतील अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. तटकरे यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून कोकण रेल्‍वेच्‍या वरीष्‍ठ अधिकारयांशी चर्चा केली. कोकण रेल्‍वेच्‍या विद्युत पोलमुळे बायपासच्‍या कामांमध्‍ये अडथळे येत आहेत. हे अडथळे लवकरच दूर केले जातील असे कोकण रेल्‍वेच्‍या अधिकारयांनी सांगितले. बाईट – सुनील तटकरे, खासदार
203
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 14, 2026 02:00:54
Bhandara, Maharashtra:Anchor: भंडारा जिले के लाखनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या वलामाझरी सहवनक्षेत्रात खाजगी जागेत दोन रान गवे मृत आढळून आले होते. त्यानंतर वन विभागाकडून पंचनामा करत मृत होण्याचे कारण शोधण्यात आले असता घटनास्थळाच्या जवळच कुमार आनंदराव बन्सोड याने शेतात पिक संरक्षणासाठी लावलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने झाल्याचे दिसून आले. आरोपीच्या शेतातून विद्युत तार लावण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून आरोपी शेतकऱ्यावर वन्यजीव संरक्षण अधिनयमा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून वन्य प्राणी पिकाची नुकसान करत असल्यास विद्युत तार न लावता नुकसानीचा अर्ज करावा असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
173
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 14, 2026 01:45:19
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | गॅसची साठेबाजी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा,विभागीय आयुक्तांचे आदेश गॅस साठेबाजी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा,विभागीय आयुक्तांचे आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी  आढावा बैठक घेतली. या वेळी उद्योजक संघटना, पुरवठा विभाग, तिन्ही गॅस वितरक कंपन्या, शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग उपस्थित होते. या वेळी विभागीय आयुक्त पापळकर यांनी स्वयंपाकाचा गॅस अविरत उपलब्ध ठेवावा, ठेवावा, वितरण सुरळीत राहावे यावर पुरवठा विभागाने देखरेख ठेवावी. कुठेही गॅसची साठेबाजी, जादा दराने विक्री, काळाबाजार होत असल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.
205
comment0
Report
Advertisement
Back to top