Back
युद्ध के कारण गैस सिलेंडर की कमी, लोग अब कोयला इस्तेमाल कर रहे हैं
VNVishal Nagesh More
Mar 14, 2026 03:48:20
Malegaon, Maharashtra
आखाती देशांच्या युद्धामुळे घरगुती सिलेंडरचा तुटवडा, व्यावसायिक सिलेंडर बंद यामुळे अनेक व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर असल्याने त्याला पर्याय म्हणून नागरिक कोळश्याकडे वळालेले आहेत. पर्यायाने कोळशाच्या मागणीत आता वाढ झाली आहे. इराण अमेरिका इस्राईल युद्धाचा परिणाम आता संपूर्ण जगावर दिसून आला आहे. काही ठिकाणी घरगुती गॅस, CNG आदींचा तुटवडा जाणवू लागला. आता पोट भरण्यासाठी व्यावसायिक सिलेंडरच्या ऐवजी चूल पेटवण्यासाठी, कपडे इस्त्री करण्यासाठी आदींसाठी आता कोळशाची वापर सुरू झाला असून त्याची मागणी वाढल्याने कोळशाचा दरात देखील 5 ते 10 रुपयांनी वाढ होऊन ग्राहकांना याचा फटका बसू लागला आहे. नेहमीपेक्षा आता नवीन ग्राहक कोळसा खरेदी करण्यासाठी येत आहेत तर काही नागरिकांना कोळसा कुठे मिळतो देखील माहीत नसल्याने ते त्याचा शोध घेत आहेत. भविष्यात कोळशाचा देखील तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून आता मात्र कोळसा वापरण्यास नागरिकांचा कल वाढला असून त्याची मागणी वाढली आहे. एकंदरीत बघितले तर युद्धाची झळ मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचू लागल्याने मोठे आर्थिक संकट देखील उभा राहून जीवनमान खालावण्याची चित्रे दिसू लागली आहेत. लवकरच यावर तोडगा काढावा अशी अनेकांनी आशा व्यक्त केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 14, 2026 04:17:2231
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 14, 2026 04:15:5478
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 14, 2026 04:04:48152
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 14, 2026 04:02:5499
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 14, 2026 03:49:12119
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 14, 2026 03:48:0098
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 14, 2026 03:46:51240
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 14, 2026 03:33:32182
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 14, 2026 03:31:40144
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 14, 2026 02:32:41111
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 14, 2026 02:31:02176
Report
AKAMAR KANE
FollowMar 14, 2026 02:17:55181
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 14, 2026 02:17:25240
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 14, 2026 02:16:20130
Report