Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

DGCA के प्रारम्भिक अहवाल पर सवाल, अमोल मिटकरी ने VSR कंपनी कार्रवाई की मांग

JJJAYESH JAGAD
Mar 02, 2026 11:31:00
Akola, Maharashtra
VSR कंपनी प्रकरणी वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. सोशल मीडियावर जय पवार यांनी पोस्ट केलेल्या कथित व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांनी DGCA च्या प्राथमिक अहवालावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. मिटकरी यांनी म्हटले की, DGCA चा २२ पानी प्राथमिक अहवाल अत्यंत त्रुटीपूर्ण असून त्यामध्ये नमूद केलेल्या ठिकाणांबाबत स्पष्ट विसंगती आढळून येते. एवढ्या गंभीर प्रकरणात असा निष्काळजीपणा कसा झाला? असा प्रश्न उपस्थित करत हा अहवाल दारू किंवा गांजा पिऊन तयार केल्यासारखा वाटतो, अशी तीव्र टीका त्यांनी केली. तसेच उड्डाणादरम्यान रोहित सिंह झोप घेत असल्याचा आरोप अत्यंत गंभीर असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे मिटकरी म्हणाले. संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, तसेच VSR कंपनीवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली. जय पवार यांनी या प्रकरणात घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचे सांगत, सत्य समोर येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. DGCA ने तातडीने कठोर कारवाई न केल्यास संबंधित कंपनीला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही आमदार मिटकरी यांनी दिला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Mar 02, 2026 12:48:16
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर फाटा रोडवर बिबट्याने केली गायीच्या बछड्याची शिकार, वन पथकाने माहिती मिळताच नागरिकांना केले सतर्क अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर फाटा रोडवरील वननर्सरीच्या समोर बॉटनिकल गार्डन आवार भिंतीजवळ बिबट्याने भर रस्त्यावर गायीच्या बछड्याची शिकार केली. गस्तीवर असलेल्या वनरक्षक वर्षा पिंपरे व त्यांच्या टीमने घटनेची माहिती मिळताच तत्काळ दाखल होऊन प्रवाशांना सावध केले. हा परिसर गेल्या काही वर्षापासून बिबट्याच्या सतत वावराने दहशतीखाली आहे. बॉटनिकल गार्डन भिंत, राख डेपो आणि विटा भट्टी परिसरात बिबट भटकत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे स्थानिकांत भीतीचे वातावरण आहे. गावातील मांस-मटण दुकानातील जैविक कचरा इथं टाकला जातो, यामुळे कुत्रे आणि वन्यजीव शिकारीच्या शोधात इथे येतात. संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन कचरा व्यवस्थापनासह उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 02, 2026 12:21:02
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररंगांमध्ये होळीचा मोठा उत्साह बघायला मिळत आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके ही होळीसाठी नंदुरबार जिल्ह्या दौऱ्यावर आले आहेत. उईके हे सातपुड्यातील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरा करणार आहेत. होळी सणा निमित्ताने धडगाव शहरातून निघणाऱ्या भोंगऱ्या बाजारातील शाही मिरवणुकी त्यांनी अन्य लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांसह सहभाग नोंदवला. सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील आदिवासी बांधव होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. होळी सणानिमित्त सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या धडगाव शहरात भोंगऱ्या बाजाराची मोठी धूम पाहायला मिळाली. या निमित्ताने आदिवासी बांधवांनी आपली ऐतिहासिक आणि पारंपरिक शाही मिरवणूक अत्यंत उत्साहात काढली. या मिरवणुकीत गावाचे पाटील भीमसिंग पराडके आणि आमदार आमश्या पाडवी यांच्यासह परिसरातील आदिवासी सरदारांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला. हातातील काठ्या आणि कमरेला बांधलेले घुंगरू यांच्या आवाजासह, भले मोठे ढोल आणि वाद्यांच्या तालावर आदिवासी बांधव धुंद होऊन नाचले. आधुनिक काळातही आपली मूळ संस्कृती आणि डोंगराच्या बाजाराची परंपरा आजही धडगावमध्ये कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या शाही मिरवणुकीने संपूर्ण शहरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले असून, हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीने हा मिरवणूक पार पडला. Prashant Paredashi, Nathurbar.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 02, 2026 12:05:44
Vasai-Virar, Maharashtra:पालघर जिल्ह्यात भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संप आज तीव्र झाल्याचे चित्र आहे. वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज होळीच्या दिवशी कामकाज बंद ठेवत संप पाळला. कर्मचाऱ्यांनी एकत्र येत पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांची भेट घेतली आणि विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजात वाढत चाललेले खाजगीकरण, समान काम समान वेतन आणि कामाचा वाढता ताण या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. या संपामुळे नागरिकांच्या भूमीविषयक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शासनाने मागण्या पूर्ण न केल्यास हा संप पुढे कायम ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 02, 2026 11:36:08
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. इस्लाम पार्टीचे अध्यक्ष आसिफ शेख पत्रकार परीषद पॉइंटर ऑन खेमनेय मृत्यू. अमेरिका आणि इस्रायल यांनी जो हल्ला केला आहे, त्यात खेमनेय यांचा मृत्यू झाला. त्याचा मी निषेध करीत आहेत. रमजान महिन्यात असे नको व्हायला पाहूजे होते. हा माणुसकीचा वध आहे अमेरिका आणि इस्रायल कायर आहे. मी आदरणीय पंतप्रधान यांना विनंती करतो की त्यांनी पुढाकार घेऊन जागतिक शांतीसाठी प्रयत्न करावे. रमजान महिना सुरू आहे. नमाजाची वेळ झाली होती. औरंगजेबाच्या कबरीवर जाणे काहीही वाईट नाही. तेथे जाऊन दुवा मागितली. मालेगावात आमचा आमदार झाला, राज्यभरात विस्तारासाठी पक्षाची वल्लभ बैठक सुरू आहे. आम्ही राज्यभरात संपर्क सुरू आहे. रमजान नंतर राज्यभरात विस्तार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आज माझ्या सोबत बसलेले सर्व दिसत आहेत. त्यावसारवार्ांची आम्ही कोअर कमिटी ठरवत आहोत. रफत यार खान, सय्यद आरिफ हुसेनी, कलीम कुरेशी, जफर बिल्डर, अबू लाला. ही समिती युथ समिती, महिला विंग तयार करणार.. ही समिती जो पर्यंत मराठवाड्यातील बांधणी पूर्ण करणार नाही तो पर्यंत ही समिती राहणार. आमचा पक्ष सेक्युलर आहे. जातीयवादी पक्ष नाही. 3 हिंदू आमच्या पक्षातून निवडून आले आहेत. दोन मराठा आणि एक हिंदू निवडून आलेलं आहे. आमची विचारधारा सेक्युलर आहे. आम्ही व्हिजन घेऊन चालणारे आहे. आमचा व्हिजन काय राहणार याची घोषणा मुंबई मधील राज्यस्तरीय बैठकीत करणार आहे. sir साठी आमची कमिटी औरंगाबाद (संभाजीनगरचा उल्लेख) मध्ये जनतेला मदत करेल. Mim चे खासदार आमदारा झाले, विविध पक्षांनी या शहरात राजपाट केला, हा ऐतिहासिक शहर आहे. मात्र या शहराची सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याचं प्रश्न जसेच्या तसे आहे. अजूनही पाणी अनेक दिवस आड येत आहे. हा प्रश्न कायम आहे. याचा अर्थ म्हणजे आतापर्यंतचे सर्व सत्ताधारी याचे जबाबदार आहेत. म्हणजे सब एक हमाम मे नंगे है.. यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या संदर्भात मोठे आंदोलन कराव लागलं तर मोठे आंदोलन या शहर वासियासाठी करणार आहे. या शहरात विविध पक्ष असताना इस्लाम पक्ष का आवश्यक आहे असा प्रश्न पडला असेल मात्र mim कडून तरुणाचा वापर केला गेला.. भाजप हिंदूंचा उपयोग करतो आणि mim मुस्लिमांच... हिंदूंना पर्याय मिळत नाही. हळूहळू या देशातून राज्यातून सेक्युलर पक्ष संपत चालला आहे. आपला देश हा हिंदू मुस्लिम एकतेचा देश आहे.. म्हणून एक विकल्प म्हणून आम्ही पुढे आलो आहोत, आम्ही राज्यात सर्वांना सोबत घेऊन शिक्षण, बेरोजगारी, महिला सर्वांना समोर ठेवून विकास करू. ट्रिपल तलाक, काळा कायदा... कायदेशीर लढाई, रस्त्यावरील लढाई, लोकशाही मार्गाने लढाई असे व्हिजन घेऊन आम्ही जनतेसमोर येणार आहोत. माझा 40 वर्षाचा राजकीय प्रवास आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 02, 2026 11:20:17
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- दुबईत अडकलेल्या चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारला केली मदतीची मागणी, युद्धजन्य भागातून मायदेशी परतण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याची विनवणी, दुबईच्या जबेल पोर्ट भागात अडकले आहेत विद्यार्थी अँकर:--दुबईत अडकलेल्या चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. युद्धजन्य भागातून मायदेशी परतण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याची विनवणी त्यांनी केली आहे. दुबईच्या जबेल पोर्ट भागात हे विद्यार्थी अडकले आहेत. युद्ध किती दिवस चालेल हे सांगता येत नाही आणि मिसाईल व स्फोटाच्या आवाजांनी सर्वच दहशतीत आहे असेही त्यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 02, 2026 10:02:13
Malegaon, Maharashtra:ईरान के वरिष्ठ नेता खोमेनी की मौत के बाद विश्व में प्रतिक्रियाएं तेज हो गईं। नाशिक के मालेगाव में हुसेनी मज्जिद पर खोमेनी के बैनर लगाए गए और मज्जिद पर काले झंडे फहराए गए। रात्री नमाज़ के बाद कैंडल मार्च निकाला गया। मौलाना सैयद हैदर अब्बास ने कहा कि खोमेनी धार्मिक और सामाजिक नेता थे, उनकी मौत से हमे गहरा दुख है; आज रात मज्जिद में कुरआन पढ़कर मज्जिद से शिया कब्रस्तान तक कैंडल मार्च निकाला जाएगा। भारत सरकार से कहा गया कि नागरिकों और विदेश में रहने वाले भारतियों की सुरक्षा सुनिश्चित करे। मौलाना ने कहा कि प्रधानमंत्री मोदी इस समय इस्राइल में गए थे; लोग देखेंगे कि यात्रा के प्रभाव क्या होंगे। आज मालेगाव में इसके असर के चलते विरोध प्रदर्शन और कैंडल मार्च आयोजित किए जा रहे हैं।
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Mar 02, 2026 10:01:29
Mumbai, Maharashtra:भांडुपमध्ये आठवीत शिकणाऱ्या मुलांनी आपल्याच मित्राचा काटा काढत, त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नक्की काय झाली हि घटना पाहूया. भांडुपच्या शिवनेरी कंपाऊंड मध्ये राहणारा चौदा वर्षाचा सिद्धार्थ लोंढे घराबाहेर खेळण्यासाठी गेला परंतु, संध्याकाळ उलटून गेले तरी सिद्धार्थ घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी भांडुप पोलिस ठाण्यास सिद्धार्थ हरवला असल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी सिद्धार्थ च्या मित्रांकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याच्या मित्रांनी सांगण्यास टाळटाळ केली परंतु, पोलिसांच्या उलट तपासणीत सिद्धार्थ हा विहार तलावात पोहताना बुडाला असल्याचं त्यांनी सांगितले. त्यानंतर विहार तलावातून अग्निशमन दल आणि NDRF पथकाने सिद्धार्थचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आणि त्याचा मृतदेह शवविछेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात सिद्धार्थचा मृत्यू हा पाण्यात बुडून नाही तर, डोक्याला मार लागून झाल्या असल्याचं समोर आले. यानंतर पोलिसांनी त्याच्या मित्रांची सखोल चौकशी केली असता त्यांनीच सिद्धार्थच्या डोक्यावर वार करून त्याला विहार तलावात फेकल्याचं कबूल केलं. बाईट्स - बाळासाहेब पवार (व. पो. नि. भांडुप) Vo.2 सिद्धार्थ आणि त्याचे तीन मित्र हे आठवीत शिकणारे असून त्यातील एक मित्र ह्या सिद्धार्थच्या घरासेजारीच राहणारा होता. सिद्धार्थ हा या मित्रांवर दादागिरी करत असल्यामुळे त्याचा खून केला असल्याचं पोलिसांकडून जरी सांगण्यात आलं असलं तरी, सायकल चालविण्यावरुन या चौघांमध्ये वाद निर्माण झाले आणि कट रचून या तिघांनी सिद्धार्थला जीवे मारल्याचं सिद्धार्थचे पालक सांगत आहेत. बाईट्स- अजय लोंढे (पालक) Vo.3 एका किरकोळ वादातून मैत्रीचे रूपांतर वैरात झाले… आणि त्यातून एका निरागस जीवाचा अंत झाला. प्रश्न आता इतकाच — अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली हिंसक प्रवृत्ती थांबवण्यासाठी पालक, शाळा आणि समाज किती सजग आहेत? याच आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 02, 2026 09:36:24
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये धक्कादायक घटना, 13 महिन्यांच्या चिमुकलीचे चुलत्याकडून कोयत्याने तुकडे; धाराशिवच्या गवळेवाडी येथील धक्कादायक घटना मुलीला अद्याताने पळवून नेल्याची वडिलांनी दिली होती तक्रार, पोलीस तपासात चुलत्यानेच पळवून नेल्याचे समोर चुलता शंकरेश्वर माने याने कोयत्याने चिमुकलीचे तुकडे करत पोत्यात भरून जमिनीत पुरले आरोपीकडून कबुली जबाब, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तामलवाडी पोलिसांनी 24 तासात संशयित आरोपीला ताब्यात घेत, मृतदेहाचा शोध घेतला भावाची पत्नी पर पुरुषासोबत पळून गेली, मुलगी भावाची नसल्याच्या संशयावरून रागाच्या भरात चुलत्याने मुलीचा खून केल्याची प्राथमिक माहिती
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 02, 2026 09:32:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:विरोधी पक्ष नेता विरोध करतानाचे शॉट्स आणि महापालिका अधिकारी बाईट्स 2 सी ला जोडले आहेत तर , जनरल shots, विरोधी पक्ष नेता byte mim अतिक्रमण नावाने tvu वरून आले आहेत...संजय शिरसाठ byte त्यांच्या पीसी मधून घ्यावा... Anchor : छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेवरून रणकंदन माजलं असून, महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांसह एमआयएमच्या १४ नगरसेवक आणि त्यांच्या पतींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका महापालिकेच्या तक्रारी वरून पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. ( शहागंज भागातील गोंधळ, जेसीबी समोर उभे असलेले नगरसेवक, पोलिसांशी सुरू असलेली हुज्जत आणि शॉट्स वापरा ) छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज भागात महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना प्रचंड राडा झाला। विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर आणि त्यांच्या समर्थकांनी पालिकेच्या पथकाला अक्षरशः पिटाळून लावलं. हातगाडी चालकांनी एक दाम्पत्याला मारहाण केलेली त्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला होता , महापालिकेने कडक कारवाई सुरू केलीय मात्र एमआयएम चा याला विरोध सुरुय, त्यातून अनेक ठिकाणी महापालिकेचया पथकाला एमआयएम नगरसेवकांनी हाकलून लावले त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार महापालिकेने केलीय... काय आहेत आरोप ? * पालिकेच्या महिला उप-आयुक्त सविता सोनवणे यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. * "महानगरपालिका तुमच्या बापाची जहागीर नाही" अशा शब्दांत पथकाला दमदाटी केली. * जेसीबी आणि ट्रकला बळजबरीने रोखून धरलं. * हातगाडी चालकांना पुन्हा अतिक्रमण करण्यासाठी भडकवलं.या प्रकरणी पालिकेच्या तक्रारीवरून आता ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे विरोध सुरू होण्याआधीच महापालिकेने या नगरसेवकांना इशारा दिला होता मात्र नगरसेवकांनी पालिकेच्या इशारा कडे दुर्लक्ष केले...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 02, 2026 08:32:38
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत पादचारी तरूणीची चेन लांबविणारे दोघे अटकेत रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे गुन्ह्याची पोलखोल डोंबिवलीतील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मच्छी मार्केटकडून स्कायव्हॉकवर एक तरूणी जिना चढत होती. तिच्या गळ्यात सोन्याची चेन होती. तेथे दबा धरून बसलेल्या दोघापैकी एकाने या तरूणीच्या पाठीमागे जाऊन तिच्या गळ्यातील चेन हिसकावून पळ काढला. एका रिक्षावाल्याच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने चोरट्याचा थरारक पाठलाग केला. मात्र त्या चोरट्याने लांबविलेली चेन हातोहात त्याच्या साथीदाराच्या ताब्यात दिली. अखेर विष्णूनगर पोलिसांनी दोन्ही अटकेचा ताब्यात घेतलं . आकाश बांगर, आणि प्रविण सुरेश पाटील अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे असून हे दोघेही शहापूर तालुक्यातील नाडगावचे रहिवासी आहेत. कल्याणच्या सत्र न्यायालयामध्ये हजर झाले असता आरोपीना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top