Back
सातपुड्या की होली पर आदिवासी शाही शोभायात्रा धड़गाव में, मंत्री उईके भी शामिल
PPPRASHANT PARDESHI
Mar 02, 2026 12:21:02
Dhule, Maharashtra
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररंगांमध्ये होळीचा मोठा उत्साह बघायला मिळत आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके ही होळीसाठी नंदुरबार जिल्ह्या दौऱ्यावर आले आहेत. उईके हे सातपुड्यातील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरा करणार आहेत. होळी सणा निमित्ताने धडगाव शहरातून निघणाऱ्या भोंगऱ्या बाजारातील शाही मिरवणुकी त्यांनी अन्य लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांसह सहभाग नोंदवला. सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील आदिवासी बांधव होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. होळी सणानिमित्त सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या धडगाव शहरात भोंगऱ्या बाजाराची मोठी धूम पाहायला मिळाली. या निमित्ताने आदिवासी बांधवांनी आपली ऐतिहासिक आणि पारंपरिक शाही मिरवणूक अत्यंत उत्साहात काढली. या मिरवणुकीत गावाचे पाटील भीमसिंग पराडके आणि आमदार आमश्या पाडवी यांच्यासह परिसरातील आदिवासी सरदारांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला. हातातील काठ्या आणि कमरेला बांधलेले घुंगरू यांच्या आवाजासह, भले मोठे ढोल आणि वाद्यांच्या तालावर आदिवासी बांधव धुंद होऊन नाचले. आधुनिक काळातही आपली मूळ संस्कृती आणि डोंगराच्या बाजाराची परंपरा आजही धडगावमध्ये कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या शाही मिरवणुकीने संपूर्ण शहरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले असून, हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीने हा मिरवणूक पार पडला. Prashant Paredashi, Nathurbar.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowMar 02, 2026 14:33:360
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 02, 2026 14:32:010
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 02, 2026 14:17:340
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 14:15:060
Report
PNPratap Naik1
FollowMar 02, 2026 14:01:100
Report
PNPratap Naik1
FollowMar 02, 2026 13:51:100
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 13:49:440
Report
ABATISH BHOIR
FollowMar 02, 2026 13:46:370
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 02, 2026 12:48:160
Report
SNSWATI NAIK
FollowMar 02, 2026 12:45:130
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 02, 2026 12:20:410
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 02, 2026 12:05:440
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 02, 2026 11:46:420
Report
SNSWATI NAIK
FollowMar 02, 2026 11:46:040
Report
