Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला में विमान पायलट प्रशिक्षण केंद्र को मिली मंजूरी, धोतरे के प्रयासों से नया अवसर

JJJAYESH JAGAD
Dec 24, 2025 02:17:15
Akola, Maharashtra
Anchor removed content: अकोल्याच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या विमान पायलट प्रशिक्षण केंद्राला अखेर मंजुरी मिळाली असून, या महत्त्वपूर्ण यशाचे श्रेय खासदार अनुप धोत्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला जाते. अकोला ही आधीच शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखली जाते या प्रशिक्षण केंद्रामुळे अकोल्याची शैक्षणिक ओळख अधिक भक्कम झाली आहे.आता या विमान पायलट प्रशिक्षण केंद्रामुळे अकोल्याच्या नावाला राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळणार असल्याचा विश्वास खासदार धोत्रे यांनी व्यक्त केला आहे. हे पायलट प्रशिक्षण केंद्र येत्या चार महिन्यांत सुरू होणार असून, केंद्र सरकारने संबंधित संस्थेला अधिकृत मंजुरी दिली आहे. यामुळे पश्चिम विदर्भातील युवकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. अकोल्यातील विद्यार्थ्यांना पायलट प्रशिक्षणासाठी मुंबई, चेन्नईसारख्या महानगरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही, आणि स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार आहे.या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमी अधिग्रहणाचे काम सुरू केले असून, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची यासंदर्भात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून देत अकोल्यातील हवाई पट्टी व विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.हे पायलट प्रशिक्षण केंद्र म्हणजे अकोल्याच्या विकासाला नवी दिशा देणारी नववर्षाची मोठी भेट असून, रोजगार, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Dec 24, 2025 03:36:11
kolhapur, Maharashtra:नागपूर भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन 5 जानेवारी रोजी नागपूर दौऱ्यावर... नितीन नवीन रेशीमबाग स्मृतीस्थळ और संघ मुख्यालयाला भेट देणार. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नववर्षातील पहिलाच नागपूर दौरा. नागपूर हे संघ मुख्यालय असल्याने दौऱ्याला राजकीय आणि वैचारिक महत्त्व. रेशीबमाग स्मृतीस्थळ हे संघ परिवाराचे श्रद्धास्थान, परंपरेनुसार अभिवादन करतील... महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कार्यक्रमावर मर्यादा. भाजप कार्यकर्त्यांना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सूचना दिल्याची माहिती... पूर्णवेळ अध्यक्ष होईपर्यंत जेपी नड्डांच्या जबाबदाऱ्या नितीन नवीन सांभाळणार. संघ विचारधारेशी नाळ दृढ करण्यासाठी मार्गदर्शनपर आशीर्वादाचा दौरा. जबाबदारी स्वीकारल्यानंतर संघ मुख्यालय भेट ही भाजपमध्ये परंपरा.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 24, 2025 03:20:45
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा भाजप कडूनही जशास तसा समाचार. तुम्हाच्या मनात काय दडलं आम्हाला माहीत नाही पण तुमची भाषा योग्य नाही - केनेकर. पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा भाजपकडूनही जशास तसा समाचार घेण्यात आला, दबावाला बळी पडणार नाही असं भाजपकडून ठणकावून सांगण्यात आलं... पालकमंत्र्यांच्या बोलण्यामध्ये कुठलीही सत्यता नाही भाजप नेते आणि पदाधिकाऱ्याबद्दल बोलले ते चुकीचं आहे. आपण महायुतीतले नेते आहात कोर कमिटीतले जबाबदार नेते आहात आपले असे बोलणे योग्य नाही. युती संदर्भातल्या आपल्या दोन्ही पक्षांमध्ये आचारसंहिता आहे त्या आपण पाळल्या पाहिजे, खालच्या फळीतले पदाधिकारी आमचं प्राबल्य असलेल्या जागांवर दावा सांगत असेल तर आपल्याला बसून मार्ग काढावा लागेल, तुमच्या मनात काय दडलं आम्हाला माहित नाही पण तुम्ही जी भाषा भाजपा बद्दল बोलतात ती चुकीची आहे, असे आमदार संजय केनेकर म्हणाले
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 24, 2025 03:19:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना-भाजप युतीचा सस्पेन्स वाढला भाजप-शिवसेनेच्या युतीसाठी आजचा दिवस निर्णयाचा संजय शिरसाट आणि अतुल सावे यांची मोठी विधाने छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना आणि भाजप युतीबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स आता टोकाला पोहोचला आहे. बुधवारी म्हणजेच आज या युतीबाबत अंतिम निर्णय होणे अपेक्षित असून राजकीय वर्तुळाचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे. युती होणार की नाही, यावर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते, युतीचा निर्णय आज होणे अत्यंत आवश्यक आहे. जर आज निर्णय झाला नाही, तर वरिष्ठांना वेगळा विचार करावा लागेल असे संकेत त्यांनी दिले आहेत. तर आज युतीबाबत बैठक होईल असे भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय होणार जे पाहणे महत्वाचे असणार आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 24, 2025 03:17:55
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीच्या हालचाली वाढल्या, मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता - सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित निवडणूक लढण्याची दाट शक्यता - महापालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची युती जवळपास पक्की झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती - जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे सुद्धा मंगळवार सकाळपासून मुंबईत असल्याची माहिती - सन्मानपूर्वक जागांचे वाटप करून महापालिका निवडणूक एकत्रित लढण्यासाठी प्रयत्न - आगामी एक - दोन दिवसात भाजपा आणि शिवसेना दोन्ही वरिष्ठ नेत्यांची संयुक्त बैठकीनंतर घोषणा होण्याची शक्यता - मात्र युती झाली तरी सोलापूर महापालिकेसाठी भाजपा हा मोठा भाऊ तर शिवसेना शिंदे गट छोटा भाऊ असणार आहे - त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत आणखी काय -काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 24, 2025 03:01:42
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियदर्शिनी उईके यांनी निवडून येतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेऊन शहरात महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष दामिनी किंवा निर्भया पथक निर्माण करण्या बाबत साकडे घातले आहे. यवतमाळ मध्ये सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, शाळा-महाविद्यालयाचे परिसर, बसस्थानक व इतर गर्दीच्या भागांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र व तत्पर कार्य करणारे महिला पोलीस पथक कार्यरत असणे आवश्यक आहे. अशा पथकामुळे महिलांवरील छेडछाड, गैरवर्तन व अन्य गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल. त्यासाठी संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात जेणेकरून पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचू शकेल व प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावीपणे राबवता येईल. असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नगराध्यक्ष प्रियदर्शिनी उईके यांनी म्हटले आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 24, 2025 02:45:56
Bhandara, Maharashtra:नगर परिषद विजयी मिरवणुकीतील अखेर तीन गुन्ह्यांची नोंद Anchor :- तुमसर नगरपरिषद निवडणुकीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाने तुमसर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांप्रकरणी पोलिस ठाणे तुमसर येथे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. मारहाण, शिवीगाळ, धमकी आणि जखमी होण्याच्या घटनांनी शहरात तणाव निर्माण झाला होता. नेहरू नगर परिसरात एक महिला विजयी मिरवणूक पाहत असताना आरोपी पंकज बालपांडे याने त्यांच्या वहिनीच्या घरात प्रवेश करून बाल्कनीत येत मागून केस ओढून खाली पाडले. डावा हात मुरगळून मानेच्या डाव्या बाजूला मारहाण करत अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. वैद्यकीय तपासणी अहवालाच्या आधारे या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. तर दुसरी घटना सफल उमेश शर्मा यांच्या फिर्यादीवरून मंगेश समरित व सौरभ चरडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतेही कारण नसताना या दोघांनी शिवीगाळ करत विटेच्या तुकड्याने डोक्यावर, कानाजवळ व ओठावर मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे. तिसऱ्या घटनेत, नेहरू नगरमध्ये मिरवणुकी दरम्यान जोत्स्ना बालपांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 23, 2025 17:03:31
Kalyan, Maharashtra:केडीएमसी निवडणुकीत महायु़ती होण्याचे सकәंत? शिवसेना भाजप जागावाटपाबाबत बैठका सुरू.. सकारात्मक बैठका, दोन दिवसात निर्णय होणार. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपा आणि शिंदेमध्ये अनेक दिवसांपासून फोडाफोडीचे राजकारण सुरू होते तर अंबरनाथ, बद्लापूरमध्ये नगरपरिषद निवडणुकीमध्ये सेना भाजपा एक मेकांना विरोधात निवडणुका लढवल्या मात्र कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून यासाठी सलग बैठका सुरू आहेत. महायुतीतील जागावाटपाबाबत सकारात्मक वातावरण असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी दिली. दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाने चर्चा सुरू असून जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय होईल. येत्या दोन दिवसांत याबाबत ठोस निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे, असे आमदार मोरे यांनी सांगितले. केडीएमसी निवडणुकीत महायुती एकत्र लढल्यास विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी आधीच संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली असून प्रभागनिहाय आढावा, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि रणनीती आखण्यावर भर दिला जात आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 23, 2025 14:22:40
Pandharpur, Maharashtra:सोलापूर महापालिकेत जर अजित पवार पक्षाकडून ऑफर आली तर सोलापूर स्थानिक नेत्यांना आणि वरिष्ठाना विश्वासात घेऊन याबाबत निर्णय घेऊ, सोलापूर महापालिका प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भूमिका माढा लोकसभा, त्यातील विधानसभा मतदारसंघ आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपचा वारू रोखण्यात यशस्वी ठरलेले माढयाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता सोलापूर महापालिका निवडणूक प्रभारी जबाबदारी दिलीं आहे. सोलापूर जिल्ह्यासह शहरात मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे बेरजेचे राजकारण करण्यासाठी मोहिते पाटील पॅटर्न सोलापूर महापालिकेत राबवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्लॅन आहे.
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top