Back
अकोला हत्या मामले में दस आरोपीयों को जन्मठेप: सात साल बाद फैसला
JJJAYESH JAGAD
Jan 21, 2026 08:18:58
Akola, Maharashtra
Anchor : अकोला शहरातील धर्मदाय आयुक्त कार्यालयात 2019 साली गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या बहुचर्चित हत्याकांडाचा निकाल तब्बल सात वर्षांनंतर लागला असून, अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणातील दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 15 जणांवर विरुद्ध आरोप पत्र दाखल केला होता.या हत्याकांडात माजी पोलीस उपनिरीक्षकाचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले होते.आरोपींनी किसनराव हुंडीवाले यांच्या डोक्यावर सिलेंडरने वार करून त्यांची हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. या प्रकरणात एकूण 22 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या.सध्या दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत असून उर्वरित आठ आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली काही महिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सबळ पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे ठोस पुरावे सादर झाल्याने न्यायालयाने दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.एकाच प्रकरणात दहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची अकोला जिल्ह्यातील सुमारे 45 वर्षांनंतर 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे – विक्रम श्रीराम गावंडे, श्रीराम गावंडे, धीरज गावंडे, रणजीत गावंडे, दिनेश राजपूत, विशाल तायडे, प्रतीक तोंडे, सतीश तायडे, मयूर अहिर आणि सूरज गावंडे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 21, 2026 09:55:590
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 21, 2026 09:33:040
Report
PNPratap Naik1
FollowJan 21, 2026 09:32:520
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 21, 2026 09:10:370
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 21, 2026 08:45:520
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 21, 2026 08:34:580
Report
AKAMAR KANE
FollowJan 21, 2026 08:33:160
Report
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 10, 2026 10:35:560
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJan 09, 2026 17:17:360
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 16:00:320
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 14:17:250
Report
SNSWATI NAIK
FollowJan 09, 2026 11:08:250
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 10:59:080
Report