Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला-गोरवा मार्ग पर मालवाहक वाहन में आग, चालक की सतर्कता से बड़ा नुकसान टला

JJJAYESH JAGAD
Mar 22, 2026 08:04:13
Akola, Maharashtra
अकोला जिले में तापमान बढ़ने के साथ आग लगने की घटनाओं में भी वृद्धि देखी जा रही है. अकोला से गोर्वा मार्ग पर एक धक्कादायक दुर्घटना घटित हुई. चालू अवस्था में चल रहा एक मालवाहक वाहन अचानक जल उठा, जिससे क्षेत्र में हड़कंप मच गया. मिली जानकारी के अनुसार यह मालवाहक वाहन अकोला से गोरवा की तरफ जाते समय अचानक धुआं निकलने लगा और कुछ ही क्षणों में वाहन भीषण आग की चपेट में आ गया. चालक ने स्थिति पर नियंत्रण रखते हुए वाहन को सड़क के किनारे रोक दिया और बाहर निकल गया, जिससे बड़ी दुर्घटना टल गई. इस आग में पूरा मालवाहक वाहन खाक हो गया. घटना की जानकारी मिलते ही अकोला अग्निशमन विभाग की दो गाड़ियाँ तुरंत मौके पर पहुँच गईं और कुछ ही समय में आग पर काबू पा लिया गया. सौभाग्य से इस आग में किसी के जीवनहानि की सूचना नहीं है. लेकिन आग कैसे लगी, इसका कारण स्पष्ट नहीं हो पाया है और जांच जारी है.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Mar 22, 2026 10:31:10
Bhandara, Maharashtra:ओबीसींच्या कार्यकर्ता म्हणून मी या मोर्चात सहभागी झालो. ओबीसीवर हे सरकार ओबीसींची फसवणूक करत आहे. आज बेईमान सरकार आपण पाहतोय. बोलतो एक करतोय एक.... जुमले बाज म्हणतो अशी प्रवृत्ती या सरकारची आहे.... ओबीसींची जनगणना करणार म्हणून सांगितलं आणि तिथं ओबीसींचा वेगळा कॉलमच नाही.... हे ओबीसींना न्याय देऊ शकत नाही.... अनेक प्रकारे ओबीसी वर अन्याय होत आहे.... आणि म्हणून सर्व ओबीसी संघटनांनी एकत्रितपणे हा मोर्चा काढलाय... सरकारला या संदर्भात लाज वाटली पाहिजे की ओबीसी रस्त्यावर उतरून स्वतंत्र जनगणनेसाठी मागणी करत आहेत... ओबीसींच्या भरोशावर सत्ता मिळवून ओबीसींना विसरतात जराही लाज या सरकारला नाही हे खेदाने या ठिकाणी सांगतो.... खरात बरोबर आता अनेकांची वरात निघणार आहे... खरात प्रकरणात काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात. विरोधी पक्षांचे कोण कोण गेले त्यांच्या पुरावे मी देऊ शकतो असे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केला आहे... यावर भंडारा येथे विजय वडेट्टीवार यांनी या खरात प्रकरणात जे कोणी नेते असतील त्या सर्वांचे पुरावे दाखवा या भोंदू बाबाला कोण कोण बडी पडलेत सर्वांचे पुरावे द्यावेत. हिम्मत असेल तर पुरावे द्यावेत असे वक्तव्य केले आहे. अशोक खरात प्रकरणांमध्ये तसे तर दोनशे व्हिडिओ आहेत.... 90 व्हिडिओ हे आक्षेपार्ह आहेत या प्रकरणामध्ये अनेक मंत्री आहेत आयएएस अधिकारी आहेत आणि आयपीएस अधिकाऱ्यात मोठमोठे पदावर असलेले अधिकारी आहेत या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या कारवाई झाली पाहिजे कारण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणला जर अंधश्रद्धा पसरवणारे मंत्री असतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 22, 2026 10:23:29
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या पलूस येथील एका नामांकित शिक्षण संस्थेचे संचालकाच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या एका दिवसात गुन्ह्याचा छडा लावत,एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला आहे. किरकोळ वादातून त्याने संजय प्रभाकर परांजपे यांची हत्या केल्याचा आता उघडकीस आले आहे. 18 मार्च रोजी संजय परांजपे यांची पलूस मध्ये धारदार Shस्त्रांनी वार करत हत्या केल्याचा प्रकार घडला होता. परांजपे राहत असलेल्या पार्किंग मध्ये एका अल्पवयीन मुलाशी किरकोळ वाद झाला ज्यातून मुलाने परांजपे यांना ढकलून दिल्यानंतर खाली पडल्याने परांजपेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली,त्यानंतर ही बाब परांजपे सांगतील या भीतीपोटी,मुलाने टोकदार शस्त्रांनी,परांजपे यांच्यावर हल्ला करून खून करत पळ काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
193
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 22, 2026 10:00:59
943
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 22, 2026 09:09:07
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर येथील औद्योगिक वसाहती मध्ये उद्योगांना गॅस टंचाई बाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उद्योजकांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विखे यांनी उद्योगांना प्राधान्य क्रमानुसार गॅसची उपलब्धता होणार असल्याचं म्हटलं आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी पुरवठा अधिकारी औद्योगिक वसाहत क्षेत्र अधिकारी बीपीसीएल चे अधिकारी आणि उद्यöszजकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उद्योजकांनी गॅसमुळे उद्योगावर होत असलेला परिणाम आणि कामगारांच्या स्थलांतरांचे प्रश्न उपस्थित केले यावर लवकरच तोडगा निघणार असल्याचं विखे यांनी सांगितलं आहे. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशात गॅसची अडचण नाही सध्या घरगुती गॅस आणि औद्योगिक क्षेत्रात कॅन्टीन साठी लागणारा गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिला जात आहे. आगामी काळात प्राधान्यक्रमानुसार गॅस उपलब्ध होईल असं म्हटलं आहे.
1025
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 22, 2026 08:16:14
Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या हाय व्होल्टेज ड्रामा नंतर महायुतीतीलच चार मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. एका बाजूला मंत्री शंभूराज देसाई ,मंत्री मकरंद पाटील तर दुसऱ्या बाजूला भाजपचे मंत्री जयकुमार गोरे,मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. नेमकं काय झालं सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी निवडीवरून यावरचा हा रिपोर्ट... व्हिओ 1- सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. महायुतीतील भाजप ने स्वबळावर निवडणूक लढवली तर शिवसेनेने राष्ट्रवादी ला सोबत घेऊन ही निवडणूक लढवली.65 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपला 27 तर राष्ट्रवादीला 20,शिवसेनेला 15 जागांवर विजय मिळाला पण 33 जागांची मॅजिक फिगर कोणालाच गाठता आली नाही.त्या नंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने त्याचे सदस्य फुटू नये यासाठी त्यांना निकालानंतर बाहेर अज्ञात स्थळी पाठवून दिले.таб्बल 45 दिवस हे सदस्य गायब होते.मात्र भाजपने राष्ट्रवादी चे 2 तर शिवसेनेचे 2 सदस्य फोडण्यात यश मिळवले.मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा निवडीच्या दिवशी राष्ट्रवादीचा अजून एक सदस्य फोडत 2 राष्ट्रवादीचा सदस्यांना अपहरणाचा गुन्ह्यात सातारा पोलिसांनी अटक केली त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.या नाट्यमयी घडामोडी नंतर भाजपला 33 मॅजिक फिगर गाठता आली आणि त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदा भाजपने ताब्यात घेतले.यावेळी राष्ट्रवादीचा दोन सदस्यांना पोलिस अटक करतेवेळी झालेल्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाई जखमी झाले.या अटकेवेळी भाजपाने पोलिस बलाचा वापर केल्याचा आणि पोलिस भाजपचा घरगड्यासारखे वागल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी केला आहे . बाईट - मंत्री शंभूराज देसाई व्हिओ 2- दोन मंत्र्यांच्या अंगावर पोलिस येत असतील तर या सारखे महाराष्ट्राचे दुर्दैव नसल्याची टीका मंत्री मकरंद पाटील यांनी केली आहे. बाईट -मंत्री मकरंद पाटील व्हिओ - तर अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील कसे घेऊन येऊ शकतात असा सवाल उपस्थित करत यांनी 45 दिवस त्यांनी त्यांचा सदस्यांना डांबून ठेवल्याचा आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.त्याच बरोबर मंत्री देसाई पोलिसांना वेटीला धरण्याचे काम करतात असा आरोप देखील गोरे यांनी केला आहे. बाईट - मंत्री जयकुमार गोरे व्हिओ 4- पोलीसांच्या कारवाईत मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी आडवे पडणे योग्य नव्हते आम्ही त्यांच्यावर हल्ला आम्ही केलेला नाही बाईट - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व्हिओ 5- एकूणच सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून साताऱ्यातील महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे त्यामुळे भविष्यात हा वाद विकोपाला जाणार की senior_midस्थी नंतर थांबणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
1057
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 22, 2026 07:42:02
Akola, Maharashtra:अकोला में आज सुबह एक अत्यंत दुखद घटना सामने आई। 19 मार्च से लापता हुए 11 वर्षीय बालक सर्वज्ञ निंबाळकर का मृत शरीर आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर के एक नाले में पाया गया। परिवार के अनुसार सर्वज्ञ 19 मार्च को बिना बताये घर से बाहर निकल गया था। तलाश के बाद भी वह नहीं मिला, जिसके बाद एमआयडीसी थाने में गुमशुदगी की शिकायत दर्ज कराई गई। सर्वज्ञ को तैराकी का शौक था, इसलिए बचाव दल ने एक नाले में उसकी खोज की, लेकिन खोज सफल नहीं हुई। आज सुबह कुछ नागरिकों ने मॉर्निंग वॉक के दौरान नाले से दुर्गंध महसूस की और पास जाकर देखा तो एक बच्चे का शव मिला। नागरिकों ने तुरंत पुलिस को सूचना दी। पुलिस ने मौके पर पहुंच कर शव को कब्जे में ले लिया और शव परीक्षण के लिए भेज दिया है। इस प्रकरण में मौत का कारण अभी स्पष्ट नहीं है; आगे पुलिस जांच कर रही है.
1010
comment0
Report
SKShubham Koli
Mar 22, 2026 07:40:39
1009
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 22, 2026 07:01:31
Gadchiroli, Maharashtra:टायटल:-- देशातील नक्सल चळवळीच्या उच्चाटनाची 31 मार्च आहे तारीख, तारीख जवळ येत असताना पोलीस आणि सुरक्षा दले झाली अधिक सतर्क, अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत नक्षल्याना केले शस्त्रे खाली टाकण्याचे आवाहन अँकर:--देशातील नक्सल चळवळीच्या उच्चाटनाची 31 मार्च ही तारीख केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केली आहे. ही तारीख जवळ येत असताना पोलीस आणि सुरक्षा दले अधिक सतर्क झाली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत नक्सल्याना शस्त्रे खाली टाकण्याचे आवाहन केले आहे. एप्रिल 1991 साली आत्राम यांचे नक्सलवाद्यांनी अपहरण केले होते . 15 दिवस चाललेल्या या नाट्याचा वाटाघाटीनंतर अंत होत त्यांची सुटका झाली होती. आत्राम यांनी मात्र आता आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेत मुख्य प्रवाहात सामील होण्याचे भावनिक आवाहन नक्सलवाद्यांना केले आहे.
1084
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 22, 2026 07:00:49
Pandharpur, Maharashtra:पंढरपुरात स्थानिक नागरिकांना दर्शन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि वेळ द्यावी अन्यथा जन आंदोलन करू असा इशारा महर्षी वाल्मीक संघाचे नेते गणेश अंकुशराव यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती प्रशासनाला दिला आहे. एकादशी , विविध सण यावेळी स्थानिक नागरिक आवर्जून सहकुटुंब श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मंदिरात येतात. मात्र त्यांना ताटकळत ठेवून इतराना व्हीआयपीना दर्शन दिल्याचा प्रकार नेहमी घडत असतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अशा दिवशी वेळ ठरवून त्यांना दर्शन व्यवस्था करावी अशी मागणी महर्षी वाल्मीक संघाने केली आहे. प्रशासनाने यावर दखल घेतली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
1076
comment0
Report
Advertisement
Back to top