Back
काशीद समुद्रकिनारे शिक्षा यात्रा में छात्र-शिक्षक डूबे, एक की मौत
JJJAYESH JAGAD
Nov 09, 2025 07:18:13
Akola, Maharashtra
रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रकिनारी अकोल्यातील कोचिंग क्लासच्या सहलीदरम्यान घडलेली एक हृदयद्रावक दुर्घटना समोर आली आहे. सहलीच्या आनंदात न्हाऊन निघालेल्या विद्यार्थ्याचा आणि शिक्षकांचा व्हिडिओ हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा क्षण ठरला. शनिवारी सायंकाळी समुद्रात पोहत असताना एका विद्यार्थ्याचा आणि एका शिक्षकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
अकोल्यातील शुअरवीन क्लासेसमधील १२ विद्यार्थी आणि ३ शिक्षक शैक्षणिक सहलीसाठी रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रकिनारी गेले होते. समुद्राच्या लाटांशी खेळत, एकत्र सेल्फी घेत, मोबाईलवर आठवणी कैद करत सर्व जण आनंद लुटत होते. मात्र काही क्षणातच हा आनंद दु:खात परिवर्तित झाला. अचानक आलेल्या प्रचंड लाटेमुळे दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक पाण्याच्या खोल गर्भात ओढले गेले. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले, मात्र शिक्षक राम कुटे (वय ६०) आणि विद्यार्थी आयुष रामटेके (वय १९) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.मृतदेह बोर्ली आणि मुरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले. या घटनेत आयुष बोबडे (वय १७) हा विद्यार्थी सुखरूप बचावला असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे. शिक्षकाने येथील सुंदर दृश्य मोबाईल मध्ये कायदे करून आपल्या स्टेटस वर शेवटचे ठेवले होते.अकोल्यात या घटनेने शोककळा पसरली असून, विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. शिक्षणासाठी निघालेली ही सहल अखेर जीवघेणी ठरली,आणि अकोल्यातील शिक्षक-विद्यार्थ्याच्या आयुष्याचा शेवटचा अध्याय समुद्राच्या लाटांमध्ये विरला..
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MKManoj Kulkarni
FollowNov 09, 2025 08:51:200
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 09, 2025 08:51:100
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 09, 2025 08:49:144
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 09, 2025 08:31:214
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 09, 2025 08:15:382
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 08:08:083
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 09, 2025 08:06:558
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 09, 2025 07:49:204
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 07:48:394
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 09, 2025 07:48:196
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 09, 2025 07:30:583
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 07:21:262
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 09, 2025 07:21:055
Report
KJKunal Jamdade
FollowNov 09, 2025 07:09:428
Report