Back
युद्ध के साये में मावल इंद्रायणी चावल की निर्यात ठप्प, किसान चिंतित
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 12, 2026 08:50:34
Pune, Maharashtra
मावळच्या इंद्रायणी तांदळाचा सुगंध सात समुद्रापार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दरवळतो. मात्र आखाती देशांतील युद्धाच्या काळ्या ढगांमुळे या सुगंधी तांदळाच्या निर्यातीवर संकट ओढावू लागलं आहे. मावळ तालुक्यात पिकणारा इंद्रायणी तांदूळ आपल्या उत्कृष्ट चव, नैसर्गिक सुगंध आणि पौष्टिक गुणधर्मांमुळे देशासह परदेशातही प्रसिद्ध आहे. विशेषतः युनायटेड किंगडम आणि युनायटेड अरब अमिराती या देशांमध्ये या तांदळाची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. मात्र युद्धामुळे मावळच्या इंद्रायाणी तांदळाच्या निर्यातीवर देखील परिणाम झाल्याचे चित्र आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदळाच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे ७७ टक्के तांदूळ युनायटेड किंगडमला तर जवळपास २३ टक्के तांदूळ युनायटेड अरब अमिरातीमध्ये निर्यात केला जातो. यामुळे मावळातील राईस मिल मधील काम देखील ठप्प पडल्याचे चित्र आहे. या राईस मिल चालकांशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी. मात्र सध्या आखाती भागातील युद्ध परिस्थितीचा फटका भात उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. निर्यात केलेला इंद्रायणी तांदूळ जेएनपीटी बंदरावर अडकून पडल्याने भात गिरण्या, व्यापारी आणि शेतकरी सगळेच चिंतेत आहेत. परिणामी पुणे मार्केट यार्ड आणि नवी मुंबईतील एफएमसी मार्केट यार्डमध्येही व्यवहार मंदावले असून बाजारपेठेत एक प्रकारची शांतता पाहायला मिळत आहे. स्थानिक बाजारात या तांदळाची किंमत साधारण ५० ते ६० रुपये प्रति किलो असून, गुणवत्ता आणि पॉलिशिंगनुसार निर्यात बाजारात ती तब्बल १२५ रुपयांपर्यंत पोहोचते. मात्र सध्या निर्यात बंद असल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. End Vo: मावळ भागातील हवामान आणि जमीन इंद्रायणी तांदळाच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल मानली जाते. त्यामुळे येथील शेतकरी सुमारे साडे बारा हजार हेक्टर क्षेत्रात हा सुगंधी, मध्यम आकाराचा आणि चिकट पोत असलेला तांदूळ पिकवतात. नैसर्गिक सुगंध, पौष्टिकता आणि फायबरयुक्त गुणधर्मांमुळे या तांदळाची मागणी देशासह परदेशात सातत्याने वाढत आहे. मात्र मावळच्या सुगंधी इंद्रायणी तांदळावर आता आंतरराष्ट्रीय घडामोडींची सावली पडल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 12, 2026 10:22:410
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 10:19:420
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 12, 2026 10:19:260
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 10:18:42Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली मिरज में घरेलू गैस सिलिंडर मिलने के लिए ग्राहकों की भीड़ उड़ी है. पहले 15 दिन में मिलने वाला गैस सिलिंडर अब 25 दिनों बाद मिल रहा है. आखाती देश के युद्ध के आगे कितने दिन चलेंगे, इसकी पुष्टि नहीं. इसलिए गैस सिलेंडर लेने के लिए जगह-जगह गैस एजेंसी के बाहर नागरिकों की रांगे लगी हैं.
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 12, 2026 09:56:160
Report
ABATISH BHOIR
FollowMar 12, 2026 09:47:260
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 12, 2026 09:33:580
Report
AKAMAR KANE
FollowMar 12, 2026 09:23:490
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 12, 2026 09:19:070
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 09:18:560
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 12, 2026 09:18:410
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 12, 2026 08:50:530
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 12, 2026 08:47:470
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 08:47:080
Report