Back
अकोला में शिक्षकों के ट्रांसफर घोटाले में 268 पर बोगस प्रमाणपत्र लेने के आरोप
JJJAYESH JAGAD
Mar 25, 2026 01:45:23
Akola, Maharashtra
अकोला जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल 268 शिक्षकांनी बदलीचा लाभ घेण्यासाठी बोगस दिव्यांग (UDID) प्रमाणपत्रे तसेच खोट्या आजारांची कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही गंभीर बाब माहिती अधिकारातून समोर आली असून या प्रकरणात मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता आहे. अकोला जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते गणेश कुरई यांनी केला आहे. कुरई यांनी माहिती अधिकारातून काढलेल्या माहितीनुसार, तब्बल 268 शिक्षकांनी बदलीचा लाभ मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे आणि खोट्या आजारांची कागदपत्रे सादर केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार शिक्षकांसह एका गट शिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मुर्तीजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी याआधीच केली होती. त्यासाठी त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे अनेकदा लेखी तक्रारही दिली होती. दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान गैरप्रकार सिद्ध झाल्यास सुमारे 280 शिक्षक आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जाऊ शकतो. या प्रकरणामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 25, 2026 02:48:42556
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 25, 2026 02:45:50497
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 25, 2026 02:45:31518
Report
AKAMAR KANE
FollowMar 25, 2026 02:45:12509
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 25, 2026 02:34:06885
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 25, 2026 02:33:49938
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 25, 2026 02:33:281048
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 25, 2026 02:33:061029
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 25, 2026 02:17:06955
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 25, 2026 02:16:541000
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 24, 2026 17:16:531080
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 24, 2026 15:49:57993
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 24, 2026 15:32:521083
Report
MAMILIND ANDE
FollowMar 24, 2026 15:17:401083
Report