Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

शिर्डी साईं संस्थान की आय 850 करोड़, 31.62 करोड़ वृद्धि के साथ

KJKunal Jamdade
Dec 12, 2025 07:34:03
Shirdi, Maharashtra
साईनगरीत गर्दी घटली , उत्पन्न मात्र वाढले.. शिर्डी साई संस्थानचे उत्पन्न ८५० कोटींवर... मागील वर्षीच्या तुलनेत ३१.६२ कोटींची वाढ... साई संस्थानच्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जवळपास ३२०० शे कोटींच्या ठेवी... शिर्डीचं साई संस्थानचे देवस्थान पुन्हा श्रीमंत देवस्थानांच्या यादीत... शिर्डात साई दरबारी भाविकांचा ओघ तुलनेने कमी मात्र दानात लक्षणीय वाढ... उत्पन्नाचे प्रमुख स्रोत खालीलप्रमाणे - गुंतवणुकीवरील व्याज - २४२.८८ कोटी, दक्षिणापेटी - १५३.८२ कोटी, सर्वसाधारण देणगी - १११.४२ कोटी, रुग्णालये - ६८.४१ कोटी, अन्नदान निधी - ६७.८८ कोटी, प्रसादालय - ५५.२६ कोटी, वैद्यकीय निधी - ५२.७४ कोटी, वस्तुरूप देणगी - २०.९८ कोटी, दागिने व रत्ने - १४.७९ कोटी. या पद्धतीने घटली १० रुपयांच्या लाडू पाकिटची मागणी. १० रुपये किंमतीचे हे लाडू पाकीट सन २०२२ - २३ मध्ये उपलब्ध नव्हते मात्र २०२३ - २४ मध्ये भाविकांसाठी १० रुपयांत सुरू झाल्यावर याची विक्री प्रचंड वाढली आणि १ कोटी ४५ लाख ६० हजार ५३६ रुपयांमध्ये विकली गेली.परंतु २०२४ - २५ मध्ये १० रुपयांत मिळणाऱ्या लाडू पाकिटची विक्री घटून ३९ लाख ६८ हजार ३४९ रुपये इतकी झालिये
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Mar 03, 2026 13:01:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:ग्रहण काळामध्ये गर्भवतींना पाळायला लावणाऱ्या अनिष्ट रुढींना छेद देण्यासाठी सांगलीमध्ये अंनिसने "सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण" हा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत एका महिलेने ग्रहण काळामध्ये भाजी चिरली, त्यानंतर फळे खाऊन, जेवणही केले. ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलेने भाजी चिरली तर बाळाचे ओठ फाटतात. या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भ्रामक कल्पनेला सांगलीच्या चांदणी प्रफुल थोरात या गर्भवती महिलेने आज छेद दिला. ग्रहणाचे वेध सुरू झाल्यानंतर चांदणी थोरात या गरोदर महिलेने भाजी चिरली, कात्रीने कागद कापले तसेच फळे कापून ती खाल्ली ही, सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण"या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 03, 2026 12:51:30
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या मारेगाव तालुक्यातील बोरी येथील संत गदाजी महारांच्या यात्रेत गोटमार होळी रंगली. फाल्गुन पौर्णिमेपासून या यात्रेला प्रारंभ होतो. येथील गोटमार होळी विदर्भात प्रसिद्ध आहे. धुलिवंदनाच्या दिवशी सकाळी सर्व जण मंदिरासमोरील मैदानात जमा होतात. या ठिकाणी गावकरी दोन चमू तयार करून हुतुतू खेळतात. या खेळात शेवटी आऊट होणाऱ्या खेळाडूंची प्रेतयात्रा काढण्यात येते. ही यात्रा संपूर्ण गावातून वाजतगाजत फिरल्यावर पुन्हा मंदिराच्या परिसरात येते. नंतर गोटमारला सुरुवात होते. गावातीलच एक व्यक्ती मंदिरासमोर असलेल्या उंच जागेवर बसून गावकऱ्यांवर दगड मारत असतो, तर गावकरी त्याच्यावर दगड मारत असतात. एखादा गावकरी दगड लागून मूर्च्छित पडला की ही गोटमार थांबते. या संपूर्ण खेळात गावकरी गदाजी महाराजांचा जयजयकार करीत असतात. नंतर मूर्च्छित झालेल्या गावकऱ्याला मंदिरात नेण्यात येते. त्या ठिकाणी मंदिराचा पुजारी त्याला अंगारा लावतो. काही वेळाने हा व्यक्ती बरा होतो. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आजही सुरू आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 03, 2026 12:01:35
Nashik, Maharashtra:नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी तब्बल पाचशे इच्छुकांनी दावेदारी केली असून पक्ष कार्यालयातील रजिस्टर नावांनी भरल्याची माहिती समोर आली आहे. संघटनेतील पदाधिकारी, पराभूत उमेदवार आणि सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे कार्यकर्ते देखील या स्पर्धेत उतरले आहेत. नाशिक महापालालिकेत एकूण दहा स्वीकृत सदस्यांची निवड होणार असून त्यात भाजपच्या वाट्याला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. या पदासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकार व्यक्तींना संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी प्रत्यक्षात राजकीय कार्यकर्त्यांनाच संधी मिळते. स्वीकृत नगरसेवकपदासाठी सामाजिक संस्थांमधील कामाचा अनुभव हा महत्त्वाचा निकष मानला जाते. त्यामुळे अनेक इच्छुकांनी गणेश मंडळे किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनुभव दाखवत कागदपत्रे सादर केली आहेत. तीन वर्षांचे ऑडिट आणि इतर कागदपत्रे पूर्ण करून इच्छुकांनी दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सुनील केदार भाजप शहराध्यक्ष महापालिका निवडणुकीवेळी भाजपकडे सुमारे एक हजार अर्ज आले होते. त्यापैकी ११८ जणांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचा काहींचा दावा आहे. त्यामुळे आता इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र त्याची पात्रता म्हणजे तो चांगला असावा अशी कोपरखळी त्यांनी मारलीय गिरीश महाजन नेते भाजपकडून याच महिन्यात स्वीकृत नगरसेवकांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी इच्छुकांची मोठी संख्या लक्षात घेता संघर्ष टाळण्यासाठी निवड प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 03, 2026 11:48:26
Dhule, Maharashtra:पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईचा येते नागरिकांसोबत रंगापंचमी साजरी केली. यावेळी त्यांनी अहिराणी पारंपरिक गीत आणि होळीच्या गीतांवर ठेका धरला. यावेळी त्यांच्या कुटुंबीय देखील सहभागी झाले होते. दोंडाईचा नगरपरिषदेच्या वतीने आयोजित धुलीवंदन उत्सवात पालकमंत्री रावल यांनी सहभागी होत, होळी आणि रनागपंचमीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दोंडाईच्या शहराच्या नगराध्यक्षा सौ नयनकुंवरताई रावल तसेच रावल यांच्या पत्नी सभागृह नेत्या सुभद्रादेवी रावल यांच्यासोबत होळीच्या रंगांचा आनंद घेताना दिसून आले.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 03, 2026 11:20:44
Nashik, Maharashtra:नाशिक गिरीश महाजन बाईट पॉईंट feed by live u 51 -> अनेक जण आहेत पत्रक म्हणून गेले आहेत। विमान सेवा बंद झाली म्हणून ते अडकले आहेत, ते सुरक्षित आहेत, सर्व व्यवस्था आपण करून देऊ। ambesy सोबत केंद्र सरकार संपर्कात आहे, आपण देखील त्या लोकांच्या संपर्कात आहात। आज उद्या विमान सेवा सुरळीत होईल तेव्हा सर्व व्यवस्थित होईल। संजय राऊत साठी: संजय राऊत तिकडे जाऊन लढू देखील शकता। जग तिसऱ्या महा युद्धाकडे चालले आहे, बालिश पण का करतात, लोक आपली कीव करतात। प्रकाश आंबेडकर साठी: भयंकर आहे, वाट कसली बघत आहे, अनेक नेते आहेत अशी वल्गना करता। बोलणे टाळले पाहिजे। उत्तर महाराष्ट्र कांदा, द्राक्ष, केळी आदि एक्सपोर्ट साठी: परिस्थिती गंभीर आहे, दुबई वरती देखील अटॅक होत आहे। आख्यायी देशात देखील आपला माल जातो। परिस्थितीच अशी आहे की, काही करू शकत नाही। कांदा अनुदान: कॅबिनेट मध्ये त्या संदर्भात निर्णय घेतील, शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे। उन्मेष पाटील: आम्ही त्यांना हाकलले आहे, कुठे जाऊद्या, ते बरेच पक्ष फिरतील। पक्ष सोडल्यावर काय होईल हे अनेकांना माहिती आहे; त्यांनी कुठे जाऊद्या परिस्थिती समजेल त्यांना। त्र्यंबकेश्वर भाविक मारहाण: अतिशय गंभीर विषय, चार पाच जणांनी कपडे फाडले; अशा पद्धतीने मारावे मला देखील पटलेले नाही। हे योग्य नाही, म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे। चौकशीचा भाग आहे, भाविक हा पर राज्यातलं होता तो निघून गेला आहे। तुम्ही कसे ठरवणार की तो ड्रग्स पिलेला होता; जग भारतातून लोक येतात वारंवार असे प्रकार होणे चुकीचे। ज्यांनी हा प्रकार केला त्यांनी चांगल्या पद्धतीने शिकवणे लागेल; पोलिसांना सांगावे लागेल त्याला व्यवस्थित समजवा। बैठकीत काय काय सुधारणा केली पाहिजे. अजित पवार accident: मी काही टेक्निकल माणूस नाही; चौकशी सुरू आहे, अहवाल आल्यावर समजेल; त्यावर बोलणे योग्य नाही। स्वीकृत नगरसेवक निवड: एक दोन दिवसात नाव जाहीर होईल; आठवडाभरात आम्ही नाव सांगू। कुंभ: खूप चांगल्या सेवा द्यायच्या आहे, सुंदर नियोजन कराचे आहे; आम्ही आधीच सांगितले होते, थोडा त्रास सहन करावा लागेल; त्यानंतर 35-40 वर्ष खड्डे पडणार नाही असे आम्ही रस्ते करत आहोत। साधू महंत कुंभ काम आरोप: कुठलेही तडजोड नाही; आपली जी मुदत आहे त्याच्या आत आपण ही काम करणार आहोत.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 03, 2026 11:18:51
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 03, 2026 10:33:07
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहरात पोलिसांनी एका ट्रक चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पंढरपूर शहरातील सांगोला कडे जाणाऱ्या चौकात अवजड वाहतूक करणाऱ्या एक ट्रक चालकाला पोलिस बेदम असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. सदर ट्रक चालकाने नो एन्ट्री मध्ये वाहन आणल्याने पोलिसांनी दोन हजार रुपये घेतले तसेच घेतलेल्या रकमेची पावती दिली नाही. असे आरोप ट्रक चालकाने केला आहे. तसेच काही अंतर गेल्यावर चालकाच्या मोबाईल वर एक हजार रुपये दंड आल्याचा मेसेज आला. यानंतर चालकाने दंड कसला याबाबत पोलिसांना विचारणा करण्यासाठी परत आला असता पोलिसांनी वाहन चालकाला बेदम मारहाण केल्याचे त्याचे म्हणणे आहे. हे व्हिडिओ आज समाज माध्यमांवर व्हायरल झाले. हा प्रकार घडत असताना मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे त्या ठिकाणाहून जात असताना त्यांच्या कडे स्थानिक नागरिकांनी घटना सांगितली असता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून असा प्रकार बाबत नाराजी व्यक्त केली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 03, 2026 10:16:55
Solapur, Maharashtra:SOLAPUR BREAKING - मोबाईल पाहण्यास न दिल्याने तेरा वर्षीय चिमुकल्याची गळफास घेऊन आत्महत्या ( PKG ) - SOLAPUR जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला - मोबाईल पाहण्यास न दिल्याने तेरा वर्षीय चिमुकल्याची गळफास घेत आत्महत्या - मोबाईल घेतला चिमुकल्याचा जीव? घटनेला जबाबदार कोण ? - पालकहो सावधान मोबाईलच्या हट्टापायी आपली चिमुकली संपवतायत जीवन - मोहोळ जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मन सुन्न करणारी घटना घडली आहे. मोबाईल वापरण्यास न दिल्याच्या कारणावरून एका तेरा वर्षीय चिमुकल्याने अक्षरशः गळफास घेत स्वतःला संपवले आहे. यशराज धर्मराज डोके राहणार - पेनुर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कोणाचाही विश्वास बसणार नाही अशा पद्धतीची ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात काल घडलीय. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात प्रत्येक जण बदलणं हे गरजेचे आहे मात्र याचाच अतिवापरामुळे लहान मुलांचा जीव जाण्याची वेळ आली आहे. यशराज धर्मराज डोके याचे आई-वडील शेती करून आपली उपजीविका भागवतात. एक मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास यशराज डोके याने मोबाईल वापरण्यास का दिला नाही? याचा राग मनात धरत राहत्या घरातील पत्राच्या लोखंडी अँगल ला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन स्वतःला संपविले आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तात्काळ मोहोळ येथील शासकीय रुग्णालयासाठी उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच होता असल्याचे घोषित केले. सदर घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी अधिकची माहिती दिलीय. - बाईट - बाजीराव पोवार ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मोहोळ पोलीस ठाणे ) सदरच्या घटना या केव्हाच अचानकपणे घडत नाहीत. पालकांनी आपल्या पाल्यास योग्य संस्कार केले आणि मर्यादित गोष्टी ठेवल्या की असे प्रसंग टाळता येतात. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून प्रत्येक गोष्ट आपल्या पाल्याला दिलीच पाहिजे असे नाही. मुलांमध्ये धीर धरण्याची वृत्ती कमी होत चालली आहे त्याच्यामध्ये नक्कीच पालकांचा देखील दोष असल्यास मत मानसोपचार तज्ञ डॉ. नितीन भोगे यांनी म्हटलं आहे. - डॉ. नितीन भोगे ( मानसोपचार तज्ञ ) END P2C मोहोळ मध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र खळबळ माजलीय. आज डोके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय मात्र ही वेळ आपल्या कुटुंबावर येऊ नये यासाठी पालकांनी देखील वेळीच जाग होणार गरजेच आहे. अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 03, 2026 09:46:23
Jalna, Maharashtra:जालना : माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी कार्यकर्त्यांसोबत केली रंगपंचमी साजरी.. भोकरदन येथे निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या अंगावर रंग उधळत रंगपंचमी.. उध्दव, राज ठाकरेंसह संजय राऊत आणि अब्दुल सत्तारांवर केली टिका आज संपूर्ण देशभरात रंगपंचमी मोठ्या उत्सवात साजरी होत आहे, त्याच पार्श्वभूमीवर जालनाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी जालन्यातील भोकरदन येथे त्यांच्या निवासस्थानी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे, यावेळी दानवेंनी कार्यकर्त्यांच्या अंगावर रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी केली आहे. तसेच सर्व देशवासीयांना रंगपंचमीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्यात. यावेळी दानवेंनी संजय राऊत यांच्यासह उध्दव ठाकरे,राज ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांच्यावर टिका केलीय.उद्धव ठाकरे हे हिरव्या रंगात जाऊन बसले असून त्यांना आता हिरवा रंगच शोभून दिसतो असं म्हणत संजय राऊत सकाळी कोंबड्यासारखे ओरडतात अशी टिका दानवेंनी केली.अब्दुल सत्तरांनी सिल्लोडमध्ये दंगल घडवून आणली असूनते हिरव्या रंगात जन्मले अशी टिका दानवेंनी केली
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 03, 2026 09:30:14
Kolhapur, Maharashtra:सगळीकडे होळीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. रंग, जल्लोष आणि पारंपरिक होळी दहन ही या सणाची ओळख आहे. मात्र होळी पेटवताना मोठ्या प्रमाणात शेणी आणि लाकडांचा वापर केला जातो. पर्यावरणाचा विचार करता हा मुद्दा गंभीर ठरतो. यालाच सकारात्मक पर्याय देत पुरोगामी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक स्तुत्य उपक्रम राबवला जाण्यात आला. शहरातील विविध तालीम संस्था आणि तरुण मंडळांकडून ‘शेणीदान’ हा उपक्रम सातत्याने राबवला जातो. या उपक्रमांतर्गत अनेक मंडळे होळी दहनासाठी प्रतीकात्मक स्वरूपात केवळ पाच शेणींचा वापर करतात आणि उर्वरित शेणी दान स्वरूपात देतात. या शेणी थेट पंचगंगा स्मशानभूमी येथे पाठवण्यात येतात. अंत्यसंस्कारासाठी पंचगंगा स्मशानभूमीला दरवर्षी सरासरी सुमारे 35 लाख शेणींची आवश्यकता असते. ही गरज लक्षात घेऊन होळीच्या निमित्ताने समाजोपयोगी काम करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जातो. यंदा होळी निमित्ताने तब्बल 6 लाख शेणी जमा झाल्या असून, हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरकच नाही तर सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श ठरत आहे. सण साजरा करतानाच समाजकार्याची जोड देताना हा कोल्हापूरचा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरत आहे
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top