Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

समुद्री युद्ध के बीच हार्मोस्ट्रेट के कप्तान शकील सय्यद समेत क्रू अभी फंसे

LBLAILESH BARGAJE
Mar 25, 2026 05:15:41
Ahilyanagar, Maharashtra
अमेरिका, इजरायल और इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या समुद्रामध्ये अनेक जहाजे अडकून पडले आहेत. समुद्रातून पुढे जाण्यास योग्य संदेश येत नाही तोपर्यंत ही जहाजे एकाच ठिकाणी अनेक दिवसांपासून पुढील संदेश येण्याची वाट पाहत उभे आहेत. अहिल्यानगर येथील नेव्ही कार्गो जहाजा वरील कॅप्टन सय्यद शकील कादर गेल्या वीस दिवसांपासून एकाच ठिकाणी समुद्रात जहाजावर आपल्या भारतीय साथीदारांसह अडकून पडले आहेत. शकील सय्यद यांचे जहाज हार्मोस्ट्रेट जवळ अडकून पडले असून त्यांच्या जहाजाच्या आजूबाजूला आहे अनेक जहाजें याच युद्धाच्या परिस्थितीमुळे उभी असून जहाजावरील प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन सध्या वावरत असून कारण युद्धजन्य परिस्थितीमुळे दररोज क्षेपणास्त्रे ड्रोन त्यांना जहाजाच्या वरून जाताना पाहायला मिळत आहे रोजच काही ना काही आवाज त्यांच्या आजूबाजूला येत असून मोठ्या प्रमाणात धूर दिसत आहे. हे जहाज स्पेन येथून दुबई कडे जाण्यास निघाले असल्याची माहिती कॅप्टन शकील सय्यद यांनी दिली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Mar 25, 2026 06:22:33
Gadchiroli, Maharashtra:टायटल:-- छत्तीसगड राज्यातील शेवटचा नक्षल कमांडर पापाराव आज करणार आत्मसमर्पण, राज्याचे गृहमंत्री विजय शर्मा उपस्थित राहण्याची शक्यता, छत्तीसगड मधील 25 लाख रकमेसह संपूर्ण देशात दोन कोटी एवढे आहे त्याच्यावर बक्षीस, पापाराव यांच्या आत्मसमर्पणानंतर छत्तीसगडमधील नक्सल चळवळ संपुष्टात येण्याचा गृहमंत्री विजय शर्मा यांचा दावा अँकर:--छत्तीसगड राज्यातील शेवटचा नक्षल कमांडर पापाराव आज त्याच्या 20 सहका-यांसह आत्मसमर्पण करणार आहे. छत्तीसगड राज्याचे गृहमंत्री विजय शर्मा यांची यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. छत्तीसगड मधील 25 लाख रकमेसह संपूर्ण देशात त्याच्यावर दोन कोटी एवढे बक्षीस आहे. पापाराव यांच्या आत्मसमर्पणानंतर छत्तीसगडमधील नक्सल चळवळ संपुष्टात येण्याचा दावा गृहमंत्री विजय शर्मा यांनी केला आहे. नक्सल चळवळ संपुष्टात येण्याची गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेली 31 मार्च 2026 ही डेडलाईन आता अगदी निकट आली आहे. त्यामुळे पाच दशकांपासून देशातील अनेक भागांमध्ये व विशेषतः दंडकारण्य भागामध्ये सुरू असलेल्या नक्सल चळवळीचा खात्मा करण्याचा दावा केंद्र व राज्य सरकारांनी केला आहे. गेले दोन वर्ष यासंदर्भात मोठे एन्काऊंटंटर्स व आत्मसमर्पण मोहिमा राबवून याकडे वाटचाल सुरू आहे. काही प्रमुख नक्सलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवण्यास होकार दिला असून शिल्लक राहिलेल्या नक्सल चळवळीतील बंदूक विरुद्ध संविधान असा संघर्ष सुरू आहे. काही आत्मसर्पण हे दहशतीने तर काही खुल्या वातावरणातील आयुष्याच्या ओढीने होत आहे. विविध राज्यांची पुनर्वसन धोरणे देखील यासाठी कारणीभूत असून सरकार देखील रक्तपात न होता बंदूक खाली ठेवून हा प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी सकारात्मक पावले उचलत आहे. छत्तीसगड हे नक्षल चळवळीच्या प्रारंभापासून महत्त्वाची भूमिका असलेले राज्य होते. त्यातील सर्वात शेवटचा कमांडर पापाराव जंगलातून बाहेर निघून आता छत्तीसगड राज्याच्या गृहमंत्री व पोलीसदलासमोर आत्मसमर्पण करणार असल्याने संपूर्ण देशातील नक्सल चळवळीला हा मोठा हादरा मानला जात आहे.
475
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 25, 2026 06:00:30
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रातील सावर्ला जंगल परिसरात सरपण वेचणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. सावर्ला तलावाजवळील कक्ष क्रमांक ८९ मध्ये ही घटना उजेडात आली. मृत महिलेचे नाव प्रमिला अरुण वाडगुरे (वय ४६, रा. तळोधी बाळापुर चिटणीसपुरा) असे आहे. प्रमिला वाडगुरे या नेहमीप्रमाणे इतर पाच ते सहा महिलांसोबत जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सर्व महिलांनी काड्या जमा करून परतीची तयारी सुरू केली होती. याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला. हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. तसेच वन विभागाला तात्काळ कळविण्यात आले. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
853
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 25, 2026 05:34:09
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशीम जिल्ह्यात २०२५ मध्ये सरासरी १२३ टक्के पर्जन्यमान होऊनही सध्या शहरे आणि तीस गावांमध्ये जलसंकट निर्माण झाले आहे. भूजल पातळी १.५२ मीटरपेक्षा अधिक खाली गेल्याने पुढील काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. वाशीम जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांसह ७७ जलाशयांमध्ये मार्चच्या तिसऱ्या पंधरवड्यात केवळ ३०टक्के जलसाठा शिल्लक आहे. जल जीवन मिशन अंतर्गत ५७२ योजनांपैकी १८८ पूर्ण झाल्या असून १८० योजना ७५-८०टक्के प्रगतीवर आहेत. महाराष्ट्रीयन जीवन प्राधिकरणाच्या २२ पैकी १८ योजनांतून पाणीपुरवठा सुरू आहे, तर ५० पैकी ४६ गावांना पाणी मिळत आहे; मात्र ४ योजना अपूर्ण आहेत. २०२१-२३ दरम्यान पाझर तलावांचे रूपांतर, ४० हजार शोषखड्डे, अनियंत्रित विहिरी व विंधन विहिरी आणि नियोजनशून्य नळयोजनांमुळे भूजल व्यवस्थेचे संतुलन बिघडल आहे.
1087
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 25, 2026 05:33:34
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात पेट्रोल टंचाईची अफवा आणि पंपांवरील गर्दी सलग चौथ्या दिवशी कायम, शहरातील अनेक पेट्रोल पंप साठा संपल्याने झाले बंद चंद्रपुरात पेट्रोल टंचाईची अफवा आणि पंपांवरील गर्दी सलग चौथ्या दिवशी कायम आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंप साठा संपल्याने बंद झाले आहे. जवळचे सर्व पेट्रोल पंप बंद झाल्याने शहराबाहेरून पेट्रोल भरून आणताना दुचाकीस्वार आणि वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. तास- दोन तास रांगेत उभे राहिल्यावर साठा संपल्याचे सांगितले जात असल्याने वाहनधारकांची मोठी अडचण होत आहे. आता केवळ अत्यावश्यक सेवांसाठी पेट्रोल शिल्लक राहिले आहे. दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र टंचाईची स्थिती नसून नागरिकांनी घाबरून साठा करू नये असे आवाहन केले आहे. प्रत्यक्षात यावर उपाययोजना शून्य आहेत.
996
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 25, 2026 05:30:32
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये प्रत्येक गुरुवारी मांस विक्री राहणार बंद, नगरपरिषदेच्या निर्णयाचे सर्वत्र उस्फुर्त स्वागत - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अक्कलकोट नगरीमध्ये नगरपरिषदेचा महत्त्वपूर्ण निर्णय - प्रत्येक गुरुवारी मांस विक्री बंद ठेवण्याचा नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा महत्त्वपूर्ण निर्णय - स्वामीभक्त आणि अक्कलकोट वासियांकडून नगरपरिषदेच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत - गेल्या अनेक वर्षांपासून स्वामी भक्तांकडून होत असलेली मागणी अखेर पूर्ण - मावाबंदीच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर आता प्रत्येक गुरुवारी मांस विक्री बंदचा नगरपरिषदेचा महत्त्वपूर्ण निर्णय
1024
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 25, 2026 05:03:18
Ambernath, Maharashtra:अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी आणली कुत्रे पकडण्याची जाळी अंबरनाथ मध्ये नगरसेवकाचे उपहासात्मक आंदोलन भटके कुत्र्यांना पकडत नसल्याने नगरसेवक संतप्त अंबरनाथ मध्ये बच्चा कुत्र्यांचा विद्यार्थिनी वर हल्ला विकास सोमेश्वर यांनी चक्क अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी कुत्रे पकडण्याची जाळी नगरपालिकेत आणत उपहासात्मक आंदोलन केलं, तुम्ही कुत्रे पकडत नसाल तर आम्ही तुम्हाला पकडतो असे सांगत सोमेश्वर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली असल्याचे विकास सोमेश्वर यांनी सांगितले, लवकरात लवकर प्रशासनाने उपाययोजना न केल्या असता अधिकाऱ्यांना प्रेमाची भाषा समजत नसल्यास शहरात एकाही अधिकाऱ्यांना फिरू देणार नसल्याचा इशारा नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी दिला आहे,
1058
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 25, 2026 05:02:49
Yavatmal, Maharashtra:पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा पसरल्याने काल रात्रीपासून यवतमाळच्या सर्व पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम होऊन इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा यवतमाळ जिल्ह्यात पसरली. नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथून येणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल डिझेल मिळाले नाही त्यामुळे दुचाकी व चार चाकी वाहने घेऊन नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या. आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेलची मागणी होऊ लागली, वास्तविक पाहता इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पोलिसांनी पेट्रोल पंपावर बंदोबस्त लावून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
987
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 25, 2026 04:49:20
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:मिरजेच्या बेडगमध्ये पार पडली अनोखा त्राटकी सोंग मिरवणूक गावातल्या प्रमुख मार्गांवरून हा त्राटकी सोंग मिरवणूक निघाली, ज्यामध्ये रावणाची बहिण शृर्पणखा व तिचे दैत्यसैन्य, तिच्या जिवंत देखावा सादर करण्यात आला. रामायण कथेतील असणारे दंडकारण्याचे क्षेत्र बेडग गावच्या हद्दी पर्यंत होते, ज्या ठिकाणी रावणाची बहिण शृर्पणखाचे राज्य होते, त्यामुळे मरगाई देवीच्या यात्रेनिमित्ताने हा त्राटकीचा दरबार सांगोच्या माध्यमातून आयोजित करण्याची परंपरा आहे. अनोखा पद्धतीचा त्राटकी सोंग पाहण्यासाठी महाराष्ट्र सह कर्नाटक मधील हजारो भाविकांनी बेडग गावात उपस्थिती लावली होती.
1049
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 25, 2026 04:47:17
1044
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 25, 2026 04:31:37
Varasoli, Maharashtra:सर्वाहाराच्‍या पाठपुराव्‍याने कुटुंबाची भेट ...... तीन वर्षानंतर झाली कुटुंबाची पुनर्भेट ...... अँकर – कर्नाटकातील कोळसा भटटीवर काम करणारया रायगड जिल्‍हयातील दोन आदिवासी मुलींची तीन वर्षानंतर सुटका करण्‍यात आली. सर्वाहारा जन आंदोलनाच्या पाठपुराव्‍यामुळे तब्‍बल तीन वर्षांनी आई वडील आणि मुलींची भेट झाली. रायगडच्‍या रोहा तालुक्‍यातील वरवटणे आदिवासी वाडीवरील संतोष वाघमारे ,त्यांची पत्नी सुनीता आणि दोन मुली अनिता व पूजा असे कुटुंुब दहा वर्षांपूर्वी अहिल्‍यानगर येथील कोळसा भटटी मालक अनिल चव्हाण यांनी कोळसा भट्टी कामासाठी, कर्नाटकातील रायपूर येथे नेले होते, दहा वर्ष सतत या कुटुंबाने, अनिल चव्हाण यांच्याकडे कोळसा पाडण्याचे काम केले, मात्र या कामाचा मोबदला म्हणून अनिल चव्हाण यांनी काहीही न दिल्याने त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून वाघमारे पतीपत्‍नी तीन वर्षांपूर्वी तेथून पळून गेले परंतु दोन मुलीना अनिल चव्हाण यांनी आपल्या ताब्यात घेऊन ठेवल्यामुळे या मुलींना न घेता या दोघांना तिथून निघावे लागले. अनिल चव्हाण यांनी या दोन मुलींना आपल्या ताब्यात ठेवले होते. सर्वहारा जन आंदोलन संस्थेने पाठपुरावा केल्यानंतर वीटभट्टी मालकाने या मुलींना आईवडिलांच्या ताब्यात दिले.
960
comment0
Report
Advertisement
Back to top