Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

77वें गणतंत्र दिवस पर अहिल्यानगर में ध्वजारोहण

LBLAILESH BARGAJE
Jan 26, 2026 05:49:14
Pune, Maharashtra
देशभरात आज 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अहिल्यानगर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलिस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सैन्य दलाच्या विशेष बैंडसह पोलिस प्रशासनातील वेगवेगळ्या पोलिस पथकांनी आणि विद्यार्थ्यांनी संचालन केल. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी आणि नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पालकमंत्री विखे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Jan 26, 2026 08:22:51
Satara, Maharashtra:सातारा:पालकमंत्री शंभूराज देसाई पत्रकार परिषद पॉइंटर सातारा: गणेश नाईक यांनी केलेल्या टीकेवर राजकारणात कोणीच कोणाला कमी नसते. एखाद्याला संपवायची भाषा केली तर बाकीचे हाताची घडी घालून बसत नाहीत. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा आमची भूमिका घेणार. आमचा पक्ष सुद्धा तोडीस तोड उत्तर देणार.. पद्म पुरस्कार व महाराष्ट्राचा सन्मान केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या “महाराष्ट्राचा सन्मान” मोहिमेअंतर्गत पद्म पुरस्कार माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात.पद्म पुरस्कार हे कोणत्याही राजकीय शिफारशीवर नव्हे, तर संबंधित व्यक्तींच्या आयुष्यभराच्या कार्याचा, सामाजिक योगदानाचा आणि राष्ट्रासाठी केलेल्या सेवेचा सखोल अभ्यास करून दिले जातात.अशा पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या ज्येष्ठ मान्यवरांवर राजकीय टीका करणे हे महाराष्ट्राच्या सन्मानालाच धक्का देणारे आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यांवर टीका संजय राऊत हे नेहमीच टीका करण्याच्या भूमिकेत असतात. राज्याच्या किंवा देशाच्या हितासाठी सकारात्मक, विकासाभिमुख भूमिका त्यांनी कधीही मांडलेली दिसत नाही.माध्यमांसमोर येताना केवळ विरोधकांवर टीका करणे हाच त्यांचा अजेंडा असतो.त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना सामान्य जनता गांभीर्याने घेत नाही. ‘पैशाचा पाऊस’ आरोप पूर्णपणे फेटाळले नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमध्ये पैशांचा वापर झाल्याचा आरोप हा निराधार आहे.एकही ठोस केस, तक्रार, एफआयआर किंवा पुरावा दाखवावा.निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यावर पांघरूण घालण्यासाठी असे आरोप केले जात आहेत.लोकशाहीत आरोप नव्हे, तर पुरावे महत्त्वाचे असतात. निवडणूक निकाल हे जनतेचे उत्तर महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.हे जनतेच्या मतदानातून सिद्ध झालेले वास्तव आहे.“पैशाचा पाऊस” पडला असता, तर जनतेने मतदानातून नाकारले नसते. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांवर स्पष्ट भूमिका काही नेत्यांकडून जात, धर्म आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये केली जात आहेत.जबाबदार पदावर असलेल्या माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्री यांनी तरी संविधानाची आठवण ठेवून बोलावे. अशा वक्तव्यांुळे समाजात अशांतता, द्वेष आणि हिंसा पसरू शकते. खरी शिवसेना कोणाची –न्यायव्यवस्थेने सिद्ध केले न्यायालयाने, विधानसभेने, लोकसभेने आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे कीएकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरी शिवसेना आहे.जनतेने मतदानातूनही यावर शिक्कामोर्तब केले आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांवर लोकांनी शिक्कामोर्तब केला आहे. ड्रग्स / रॅकेट प्रकरणी सखोल तपास सातारा जिल्हा पोलीस अत्यंत बारकाईने आणि गतीने तपास करत आहेत.या रॅकेटच्या मुळाशी कोण आहे, कोण चालवत आहे, याचा शोध सुरू आहे.दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. राजकीय संबंधांचे आरोप – पुरावे द्या कुठल्या आरोपीचा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध असल्याचे पुरावे असतील, तर ते पोलीस प्रशासनाकडे सादर करावेत. उगाच राजकीय पक्षांना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुरावे मिळाल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर लक्ष सध्या शिवसेनेचा संपूर्ण फोकस जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर आहे.जास्तीत जास्त शिवसेनेचे सदस्य निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.जिल्हा परिषद सत्तेत शिवसेनेचा सहभाग हा प्रमुख उद्देश आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या टिकेवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिल आहे. मंत्री गोरे हे मोठे नेते आहेत. मंत्र्यांविषयी आम्ही लहान कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ ज्ञानाच्या जोरावर अनुभवावर विधान केलं असावं. आम्ही आमच्या पक्षांना जी शिस्त लावून दिली आहे. त्या चौकटीमध्ये राहून पक्ष वाढवण्याचे काम करत आहोत. पाटण विधानसभा मतदारसंघातील तयारी प्रचाराचा शुभारंभ पवित्र तीर्थक्षेत्रात श्रीफळ वाढवून करण्यात आला. विकासकामे आणि लोकांच्या सुख-दुःखातील सहभाग हे प्रमुख मुद्दे आहेत. आमच्यासमोर पॅकेजचे मोठे आव्हान आहे या मोठे पॅकेजच्या भूलथापांना पाटणची जनता बळी पडणार नाही... यावेळी प्रचंड संख्येने शिवसेनेचे उमेदवार पाटण विधानसभा मतदारसंघात निवडून येणार. महायुती समन्वय समितीचा निर्णय वैयक्तिक टीका टाळणे, मैत्रीपूर्ण लढत, खालच्या पातळीवर न जाणे असा स्पष्ट निर्णय होता.शिवसेनेने 100% पालन केले.ज्यांनी पालन केले नाही, त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारावेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 26, 2026 08:00:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर şehirात амली पदार्थांची तस्करी करणाऱ्या लातूरच्या टोळीला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री महामार्गावर मृत्यूचा थरार अनुभवला. केंब्रिज चौक ते गणेश कॉलनी या १० किलोमीटरच्या अंतरात तस्करांनी पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी दोन वेळा गाडी अंगावर घालत ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हे शाखेचे अंमलदार दादासाहेब झारगड यांनी धावत्या कारच्या बोनेटवर उडी मारून काच फोडली. त्यामुळे कारच्या चालकाला पुढे दिसण्यास अडचण झाली. त्यामुळे गाडीचा वेग मंदावला. आणि पोलिसांच्या गाड्यांना आरोपींच्या गाडीला घेराव घालत १८.७८ लाखांच्या मुद्देमालासह तिघांना बेड्या ठोकल्या. यात 3 आरोपींना अटक केली.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Jan 26, 2026 07:48:15
Kalyan, Maharashtra:कर्ता-याच्या तणावातून थोडी उसंत… कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये क्रिकेटचा आनंद Anc..नेहमी तक्रारी, चौकशी आणि कायदा-सुव्यवस्था सांभाळताना पोलिसांचा दिवस खूप धावपळीचा असतो. मात्र प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या धावपळीतून थोडी विश्रांती घेत कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला आहे. Vio:- कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस स्टेशन परिसरामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. या खेळात कल्याणच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणी जी. घेटे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कर्तव्यातून काही वेळ बाजूला काढत पोलिसांनी खेळाचा आनंद घेत उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 26, 2026 07:32:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच पहाटेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. छावणी परिसरातील सुभाषपेठ येथील एका घराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आगीच्या विळख्यात सापडल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, छावणीतील गल्ली नंबर 2 मध्ये सुभाषपेठ गणेश मंदिर परिसरातील राजेश दुबे यांच्या घराला पहाटे ३ वाजेच्या सुमारास आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, काही वेळातच ज्वाळांनी संपूर्ण घराला वेढले. सुदैवाने, महावितरणचे कर्मचारी सर्जेराव यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन केंद्राचे जवान अग्निशमन बंबासह तातडीने घटनास्थळी रवाना झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 26, 2026 07:31:01
Kolhapur, Maharashtra:26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरात विंटेज ओनर्स क्लबने विंटेज बाईक अँड कार शो भरवला आहे. कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लबला यंदा 10 वर्ष पूर्ण झाली असून यंदा कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौक मैदानात कोल्हापूरकरांसाठी हे मोफत प्रदर्शन भरवण्यात आले. दरवर्षी या क्लबकडून 26 जानेवारीनिमित्त कोल्हापूर शहरातील अनेक भागातून विंटेज रॅली काढण्यात येते. मात्र यंदा फक्त भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये अनेक जुन्या चार चाकी आणि दोन चाकी गाड्यांचा समावेश होता. प्रदर्शनातील या विंटेज गाड्या पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jan 26, 2026 07:30:52
Ambernath, Maharashtra:झी 24 तासचा दणका, बदलापूर जवळच्या अवैध उत्खननावर कारवाई महसूल विभागाने पोकलेन मशीन केली सील बदलापूर जवळच्या बेंडशेळ भागात अवैधरित्या सुरू होतं डोंगर खोदण्याचं काम Anchor - बातमी आहे झी 24 तासच्या दणक्याची... बदलापूर जवळच्या बेडशीळ भागात चाफ्याची वाडीलगत सुरू असलेलं अवैध उत्खनन महसूल विभागाने थांबवलय. इतकच नाही तर पोकलेन मशीन देखील सील केलीय. याठिकाणी अवैधरीत्या डोंगर खोदण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे इर्शाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती होती. झी 24 तासने याबाबतची बातमी प्रसारित करताच महसूल विभागाने संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारलाय. बदलापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर बेंडशीळ हे आदिवासी लोकवस्ती असलेलं गाव आहे. या गावालगत दहा ते पंधरा आदिवासी वाड्या आहेत. इथल्याच चाफ्याची वाडी या पाड्यालगत असलेला डोंगर कोणतीही परवानगी न घेता खोदण्यात येत होता. काही भूमाफीयांनी पोकलेन आणि जेसीबीच्या साह्याने हा डोंगर भुईसपाट केला. तसंच शेकडो झाडांची कत्तलही केली. याबाबत इथल्या ग्रामपंचायतीचे सदस्य सुकऱ्या हंबिर आणि वनशक्ती सामाजिक संस्थेचे नंदकुमार पवार यांनी आवाज उठवला होता. झी 24 तासने ही बातमी दिल्यानंतर अंबरनाथच्या तहसीलदारांनी कडक पावलं उचलत तत्काळ हे काम बंद केलय. तसंच जेसीबी आणि पोकलेन मशीन सील करून संबंधितांवर कारवाई सुरू केलीय. या कारवाई बद्दल स्थानिक गावकऱ्यांनी झी 24 तासचे आभार मानले आहेत. Byte - सुकऱ्या हंबीर, ग्रामपंचायत सदस्य, चामटोली चंद्रशेखर भुयार , बदलापुर
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 26, 2026 07:30:36
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री On सत्यनारायण नुवाल पद्मश्री - आज आपल्या करता आनंदाचा दिवस है, केंद्र सरकारने सत्यनारायण नुवाल यांना पद्मश्री जाहीर केलेला आहे, सन्मान केलाय, सत्यनारायण नुवाल यांनी संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हावा याकरिता जे अत्यंत महत्त्वाचे आधुनिक उपकरणात देण्याचा प्रयत्न केला भारत मातेला सुरक्षित करण्याकरता अतिशय महत्त्वाचा योगदान नुवाल यांनी केला आहे संपूर्ण जगात नागपूरच, विदर्भाचं नाव संपूर्ण देशात एक्सपोर्ट करून आणि विदेशात अनेक देशात एक्स्पोर्ट करून आत्मनिर्भर करण्याचं काम केलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येऊन गेले, त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान बघितलं, ऑपरेशन सिंदूरमध्ये जे ड्रोन्स होते, ड्रोन हल्ले परतून लावले ते सोलार इंडस्ट्रीमध्ये तयार झाले होते नागपुरात सोलार उद्योग आहे,नसत्यनारायण नुवाल यांनी शून्यातून साम्राज्य उभा केला On बोथे गुरुजी पद्मश्री - मी बोथे गुरुजी यांच्याकडे जाणार आहे, त्यांनाही शुभेच्छा देणार आणि त्यांचे जे कार्य आहे ते अतुल्य आहे, या महाराष्ट्राला आणि विदर्भाला तुकडोजी महाराजांचा ग्रामगीता जनता जनादनांपर्यंत पोहोचून तुकडोजी महाराजांनी केला आणि बोथे गुरुजींनी हे काम केलं On संजय राऊत कोशारी - किमान असा पुरस्कार दिल्यानंतर, इतकी मोठी यंत्रणा यामध्ये असते, जन्मापासून तर संपूर्ण कार्य बघितल्याशिवाय एवढा मोठा पुरस्कार मिळत नाही, एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यावर अशा पद्धतीचे आरोप करणे हे बुद्धी भ्रष्ट झालेल्या लोकांचं काम आहे On सूर्य ऊर्जा - मी आभार मानतो, मुख्यमंत्र्यांकडे स्वतः ऊर्जा विभाग आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचा हा विक्रम झालाय, एकूण देशात जेवढे सोलर आहेत त्याच्यातले 60% हे महाराष्ट्रात लागले आहे, आणि त्याला पुरस्कार मिळाला, शेतकऱ्यांना दिवसा वीज जाईल विधानसभा निवडणुकीत आम्ही शेतकऱ्यांना ते कमिटमेंट केलं होतं ते पूर्ण करत आहोत एकाही शेतकऱ्यांकडून पम्पाचा बिल घेणार नाही,विजेचा बिल घेणार नाही On वीज प्रकल्प राख - कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपूर वीज प्रकल्पातून जी राख निघते ते दगड खाणीत भऱली जाईल,वडधामना, बुटीबोरी आणि पाचगावाकडे आहेत ते भरले तर राखेमुळे होणारे प्रदूषण कमी होईल
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Jan 26, 2026 07:11:22
Wardha, Maharashtra: Hinganghat थाने के परिसर में जप्त सुगंधित तंबाकू को जलाने के कारण स्कूल के विद्यार्थियों के स्वास्थ्य पर खतरा पैदा होने का आरोप लगाया गया है. यह घटना जिले की उच्च प्राथमिक शाला के पास हुई, जहाँ स्कूल खुली रहते और विद्यार्थियों की उपस्थिति के समय जप्त तंबाकू का बड़ा हिस्सा परिसर में जलाया गया. इससे धुएँ और राख स्कूल के परिसर में फैलने की आशंका है, जिससे बच्चों के फेफड़ों के नाजुक स्वास्थ्य पर असर पड़ सकता है. इस मामले में शिकायतकर्ता ने गृह राज्यमंत्री और वर्धा के पालकमंत्री पंकज भोयर से कठोर कार्रवाई की मांग की है और एक स्वतंत्र/प्रशासकीय चौकशी समिति गठित करने की मांग की है. पुलिस निरीक्षक अनिल राऊत और संबंधित कर्मियों पर विभागीय कार्रवाई की भी मांग की गई है. गृह राज्यमंत्री पंकज भोयर ने चौकशी समिति की नियुक्ति की पुष्टि की है.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Jan 26, 2026 07:01:36
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या डव्हा यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.आठ दिवस चालणारी ही यात्रा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि कृषीदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते.वाशीम जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील विविध ग्रामीण भागातील हजारो शेतकरी दरवर्षी या यात्रेला उपस्थित राहतात आणि नाथ नंगे महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतात.या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.या प्रदर्शनीत विविध आधुनिक कृषी तंत्रज्ञान,नवीन पिके, सुधारित बियाणे, आधुनिक सिंचन पद्धती,कृषी अवजारे यांची माहिती देण्यात येत आहे.यासह महिला बचत गटांनी आपली विविध उत्पादने कृषी प्रदर्शनीत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनसह नागरिक मोठ्या संख्येने या प्रदर्शनीला भेट देत असून नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन आपल्या शेतीत उपयोग करून उत्पन्न वाढीसाठी मदत होणार असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं。
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Jan 26, 2026 06:32:40
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मालेगाव - मालेगाव कॉलेज स्टॉपवर झाला स्फोट... - फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा झाला अचानक स्फोट.. - चार जण गंभीर जखमी, तर जखमीत 15 वर्षाच्या मुलाचाही समावेश... - मालेगाव कॉलेज स्टॉपवर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रंगिबेरंगी फुग्यांमध्ये गॅस भरून वर आकाशात उडविण्यासाठी तरुण, महिला, लहान बालकांनी एकच गर्दी केली होती. त्याच क्षणी अचानक त्या सिलेंडर चा स्फोट झाल्याने दोन महिला, दोन पुरुष हे गंभीर जखमी झाले असून आता त्यांना उपरचार्थ नाशिक येथे हलविण्यात येत असून एक 15 वर्षाच्या मुलगा देखील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनेची माहिती समजताच युवासेनेचे अविष्कार भुसे यांनी रुग्णालयात धाव घेतली असून युवासेनेचेकार्यकर्ते यांनीदेखील मदत कार्य सुरू केले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top