Back
शिंदे नेतृत्व वाली शिवसेना पर राजनीतिक बयान और चुनाव परिणामों की कसौटी
TTTUSHAR TAPASE
Jan 26, 2026 08:22:51
Satara, Maharashtra
सातारा:पालकमंत्री शंभूराज देसाई पत्रकार परिषद पॉइंटर
सातारा: गणेश नाईक यांनी केलेल्या टीकेवर राजकारणात कोणीच कोणाला कमी नसते. एखाद्याला संपवायची भाषा केली तर बाकीचे हाताची घडी घालून बसत नाहीत. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा आमची भूमिका घेणार. आमचा पक्ष सुद्धा तोडीस तोड उत्तर देणार..
पद्म पुरस्कार व महाराष्ट्राचा सन्मान
केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या “महाराष्ट्राचा सन्मान” मोहिमेअंतर्गत पद्म पुरस्कार माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात.पद्म पुरस्कार हे कोणत्याही राजकीय शिफारशीवर नव्हे, तर संबंधित व्यक्तींच्या आयुष्यभराच्या कार्याचा, सामाजिक योगदानाचा आणि राष्ट्रासाठी केलेल्या सेवेचा सखोल अभ्यास करून दिले जातात.अशा पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या ज्येष्ठ मान्यवरांवर राजकीय टीका करणे हे महाराष्ट्राच्या सन्मानालाच धक्का देणारे आहे.
संजय राऊतांच्या वक्तव्यांवर टीका
संजय राऊत हे नेहमीच टीका करण्याच्या भूमिकेत असतात.
राज्याच्या किंवा देशाच्या हितासाठी सकारात्मक, विकासाभिमुख भूमिका त्यांनी कधीही मांडलेली दिसत नाही.माध्यमांसमोर येताना केवळ विरोधकांवर टीका करणे हाच त्यांचा अजेंडा असतो.त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना सामान्य जनता गांभीर्याने घेत नाही.
‘पैशाचा पाऊस’ आरोप पूर्णपणे फेटाळले
नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमध्ये पैशांचा वापर झाल्याचा आरोप हा निराधार आहे.एकही ठोस केस, तक्रार, एफआयआर किंवा पुरावा दाखवावा.निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यावर पांघरूण घालण्यासाठी असे आरोप केले जात आहेत.लोकशाहीत आरोप नव्हे, तर पुरावे महत्त्वाचे असतात.
निवडणूक निकाल हे जनतेचे उत्तर
महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.हे जनतेच्या मतदानातून सिद्ध झालेले वास्तव आहे.“पैशाचा पाऊस” पडला असता, तर जनतेने मतदानातून नाकारले नसते.
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांवर स्पष्ट भूमिका
काही नेत्यांकडून जात, धर्म आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये केली जात आहेत.जबाबदार पदावर असलेल्या माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्री यांनी तरी संविधानाची आठवण ठेवून बोलावे.
अशा वक्तव्यांुळे समाजात अशांतता, द्वेष आणि हिंसा पसरू शकते.
खरी शिवसेना कोणाची –न्यायव्यवस्थेने सिद्ध केले
न्यायालयाने, विधानसभेने, लोकसभेने आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे कीएकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरी शिवसेना आहे.जनतेने मतदानातूनही यावर शिक्कामोर्तब केले आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांवर लोकांनी शिक्कामोर्तब केला आहे.
ड्रग्स / रॅकेट प्रकरणी सखोल तपास
सातारा जिल्हा पोलीस अत्यंत बारकाईने आणि गतीने तपास करत आहेत.या रॅकेटच्या मुळाशी कोण आहे, कोण चालवत आहे, याचा शोध सुरू आहे.दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
राजकीय संबंधांचे आरोप – पुरावे द्या
कुठल्या आरोपीचा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध असल्याचे पुरावे असतील, तर ते पोलीस प्रशासनाकडे सादर करावेत.
उगाच राजकीय पक्षांना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पुरावे मिळाल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर लक्ष
सध्या शिवसेनेचा संपूर्ण फोकस जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर आहे.जास्तीत जास्त शिवसेनेचे सदस्य निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.जिल्हा परिषद सत्तेत शिवसेनेचा सहभाग हा प्रमुख उद्देश आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या टिकेवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिल आहे. मंत्री गोरे हे मोठे नेते आहेत. मंत्र्यांविषयी आम्ही लहान कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ ज्ञानाच्या जोरावर अनुभवावर विधान केलं असावं. आम्ही आमच्या पक्षांना जी शिस्त लावून दिली आहे. त्या चौकटीमध्ये राहून पक्ष वाढवण्याचे काम करत आहोत.
पाटण विधानसभा मतदारसंघातील तयारी प्रचाराचा शुभारंभ पवित्र तीर्थक्षेत्रात श्रीफळ वाढवून करण्यात आला.
विकासकामे आणि लोकांच्या सुख-दुःखातील सहभाग हे प्रमुख मुद्दे आहेत. आमच्यासमोर पॅकेजचे मोठे आव्हान आहे या
मोठे पॅकेजच्या भूलथापांना पाटणची जनता बळी पडणार नाही... यावेळी प्रचंड संख्येने शिवसेनेचे उमेदवार पाटण विधानसभा मतदारसंघात निवडून येणार.
महायुती समन्वय समितीचा निर्णय वैयक्तिक टीका टाळणे, मैत्रीपूर्ण लढत, खालच्या पातळीवर न जाणे असा स्पष्ट निर्णय होता.शिवसेनेने 100% पालन केले.ज्यांनी पालन केले नाही, त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारावेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 26, 2026 10:01:290
Report
JMJAVED MULANI
FollowJan 26, 2026 10:01:090
Report
JMJAVED MULANI
FollowJan 26, 2026 09:52:280
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJan 26, 2026 09:47:020
Report
ABATISH BHOIR
FollowJan 26, 2026 09:46:420
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 26, 2026 09:32:360
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 26, 2026 09:31:140
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJan 26, 2026 09:30:480
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 26, 2026 09:30:310
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 26, 2026 09:02:000
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 26, 2026 08:51:010
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 26, 2026 08:00:590
Report
ABATISH BHOIR
FollowJan 26, 2026 07:48:150
Report
SNSWATI NAIK
FollowJan 26, 2026 07:47:40Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर अपघात. वोक्सवॅगन गाडीचा भीषण अपघात. वेगाने वाहन चालवत असल्याने झाला अपघात. वेगावरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात. अपघातात 1 तरुण गंभीर तर 4 जण किरकोळ जखमी. जखमीना रुग्णालयात केले दाखल.
0
Report