Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440009
नागपुर में सत्यनारायण नुवाल को पद्म श्री, ड्रोन व सोलर टेक्नोलॉजी ने आत्मनिर्भर भारत बदला
AKAMAR KANE
Jan 26, 2026 07:30:36
Nagpur, Maharashtra
नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री On सत्यनारायण नुवाल पद्मश्री - आज आपल्या करता आनंदाचा दिवस है, केंद्र सरकारने सत्यनारायण नुवाल यांना पद्मश्री जाहीर केलेला आहे, सन्मान केलाय, सत्यनारायण नुवाल यांनी संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हावा याकरिता जे अत्यंत महत्त्वाचे आधुनिक उपकरणात देण्याचा प्रयत्न केला भारत मातेला सुरक्षित करण्याकरता अतिशय महत्त्वाचा योगदान नुवाल यांनी केला आहे संपूर्ण जगात नागपूरच, विदर्भाचं नाव संपूर्ण देशात एक्सपोर्ट करून आणि विदेशात अनेक देशात एक्स्पोर्ट करून आत्मनिर्भर करण्याचं काम केलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येऊन गेले, त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान बघितलं, ऑपरेशन सिंदूरमध्ये जे ड्रोन्स होते, ड्रोन हल्ले परतून लावले ते सोलार इंडस्ट्रीमध्ये तयार झाले होते नागपुरात सोलार उद्योग आहे,नसत्यनारायण नुवाल यांनी शून्यातून साम्राज्य उभा केला On बोथे गुरुजी पद्मश्री - मी बोथे गुरुजी यांच्याकडे जाणार आहे, त्यांनाही शुभेच्छा देणार आणि त्यांचे जे कार्य आहे ते अतुल्य आहे, या महाराष्ट्राला आणि विदर्भाला तुकडोजी महाराजांचा ग्रामगीता जनता जनादनांपर्यंत पोहोचून तुकडोजी महाराजांनी केला आणि बोथे गुरुजींनी हे काम केलं On संजय राऊत कोशारी - किमान असा पुरस्कार दिल्यानंतर, इतकी मोठी यंत्रणा यामध्ये असते, जन्मापासून तर संपूर्ण कार्य बघितल्याशिवाय एवढा मोठा पुरस्कार मिळत नाही, एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यावर अशा पद्धतीचे आरोप करणे हे बुद्धी भ्रष्ट झालेल्या लोकांचं काम आहे On सूर्य ऊर्जा - मी आभार मानतो, मुख्यमंत्र्यांकडे स्वतः ऊर्जा विभाग आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचा हा विक्रम झालाय, एकूण देशात जेवढे सोलर आहेत त्याच्यातले 60% हे महाराष्ट्रात लागले आहे, आणि त्याला पुरस्कार मिळाला, शेतकऱ्यांना दिवसा वीज जाईल विधानसभा निवडणुकीत आम्ही शेतकऱ्यांना ते कमिटमेंट केलं होतं ते पूर्ण करत आहोत एकाही शेतकऱ्यांकडून पम्पाचा बिल घेणार नाही,विजेचा बिल घेणार नाही On वीज प्रकल्प राख - कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपूर वीज प्रकल्पातून जी राख निघते ते दगड खाणीत भऱली जाईल,वडधामना, बुटीबोरी आणि पाचगावाकडे आहेत ते भरले तर राखेमुळे होणारे प्रदूषण कमी होईल
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Jan 26, 2026 10:01:29
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Jan 26, 2026 10:01:09
Baramati, Maharashtra:लाखेवाडी गटात राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ... लाखेवाडी गटात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा मोठी फाईट... राष्ट्रवादीकडून झेडपीसाठी श्रीमंत ढोले आखाड्यात.... ढोलेंच्या पाठीशी दत्ता भरणे हर्षवर्धन पाटील आणि आप्पासाहेब जगदाळेंची ताकद.... राष्ट्रवादीच्या आव्हानाला भाजप फाईट देणार ka ? पुण्याच्या इंदापूर मध्ये लाखेवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय. लाखेवाडी जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी कडून श्रीमंत ढोले तर पंचायत समितीसाठी बापूराव शिंदे आणि विमल काळे यांना आखाड्यात उतरवण्यात आले आहे. या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. इंदापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने श्रीमंत ढोले यांच्या पाठीशी अजित पवार दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील आणि आप्पासाहेब जगदाळे यांची ताकद असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आव्हानाला आला भाजपा तगडी फाईट देणार का हे पहावं लागणार आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Jan 26, 2026 09:52:28
Baramati, Maharashtra:आप्पासाहेब जगदाळे यांचा विरोधकांवर हल्लाबोल. दादा मामा भाऊ झिरो होणाऱ्यातील नाहीत. या माणसांनी तालुक्यासाठी रक्त ओकलेय : जगदाळे. पुण्याच्या इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा थेट सामना पाहायला मिळत असून जिल्हा परिषद गटांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. नगरपरिषद निवडणुकीमध्ये म्हणत होते झिरो करू पण उपमुख्यमंत्री अजित पवार कृषिमंत्री दत्ता भरणे सुप्रिया सुळे हर्षवर्धन पाटील यांसारखी माणसे झिरो होणाऱ्यातील नाहीत, या माणसांनी या तालुक्यासाठी रक्त ओकले आहे. असा म्हणत जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. आप्पासाहेब जगदाळे यांच्या उपस्थितीत इंदापूरच्या महादेवनगर मध्ये कल्पना पाटील आणि यशराज जगदाळेंच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली या सभेत जगदाळे बोलत होते.....
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jan 26, 2026 09:47:02
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात चहा वरून वाद, दुकानदारास मारहाण, तिघे जखमी. सर्व घटना झाली सीसीटीव्ही कॅमेरात कैद. उल्हासनगर CAMP 3 के खटरमल चौकातील साईबाबा टी पॉईंट दुकानाच्या मालकाने फुकट चहा देण्यास नकार दिल्यामुळे तिन जणांनी दुकानदार हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे, दुकानदार विनोद नारा हे दुकानात असताना तिन जण दुकानात आले आणि त्यांनी चहा मागितला आणि त्यावरून वाद घातला. तेव्हा वाद हा हाणामारीत परिवर्तित झाला, दुकानाबाहेर ठेवलेला सफाई करण्याचा वायپرचा पाईप उचलून त्या तिघांनी विनोद नारा मारहाण केली. तसेच दुकानातील करण सचदेव आणि सोनू यादव यांच्या डोक्याच्या लोखंडी दांड्याने मारहाण केली यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. या प्रकरण विनोद नारा यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Jan 26, 2026 09:46:42
Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये ठाकरे गट नगरसेवक बेपत्ता प्रकरण तापले... ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल : • कल्याण कोळशेवाडीत ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर मात्रे बेपत्ता असल्याचे पोस्टर लावल्याने वाद निर्माण •काल पोस्टर लावणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात मधुर मात्रे यांचे वडिलांनी तक्रार दाखल केली होती • तक्रारीनंतर पोलिसांकडून प्राथमिक चौकशीला सुरुवात • चौकशी व नोटीस देण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले होते • आज ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आणि ज्यांच्यावर तक्रार दाखल झाली आहे ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोळशेवाडी पोलीस ठाण्यात हजर झाले आहे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Jan 26, 2026 09:32:36
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर शहरालगत वनविभागाने प्रादेशिक जंगलात सुरू केलेल्या नव्या लोहारा व्याघ्र सफारीचा गणराज्यदिनी प्रारंभ करण्यात आला. पालकमंत्री डॉ. उईके, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची याप्रसंगी उपस्थिती होती. जिल्ह्यातील वनवैभव व वन्यजीव वैविध्य बघण्यासाठी पर्यटकांना अगदी शहराजवळ नवा पर्याय उपलब्ध झाला. डॉक्टर उईके व मुनगंटीवार यांनी नव्या व्याघ्र सफारीचा आनंदही घेतला. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारच्या 50 पर्यटन स्थळे विकसित करण्याच्या योजनेत ताडोबाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती याप्रसंगी दिली. सोबतच बल्लारपूर येथे सागवान लाकडाशी संबंधित नवे म्युझियम साकारण्याचाही मनोदय बोलून दाखविला.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Jan 26, 2026 09:31:14
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- गडचिरोलीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, सहपालकमंत्री एड. आशीष जयस्वाल यांनी फडकविला तिरंगा, देशातील प्रगतीशील जिल्हा म्हणून गडचिरोलीची नवी ओळख निर्माण करण्याचा जागविला संकल्प अँकर:--गडचिरोलीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस मुख्यालय मैदानावर सहपालकमंत्री एड. आशीष जयस्वाल यांनी तिरंगा फडकविला. देशातील प्रगतीशील जिल्हा म्हणून गडचिरोलीची नवी ओळख निर्माण करण्याचा संकल जागवू या असे आवाहन त्यांनी केले. नक्षलग्रस्त आणि विकासात शेवटचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा, आज देशातील प्रगतिकशील जिल्हा म्हणून नवी ओळख निर्माण करत आहे. राज्यात विकास कामे घेतांना गडचिरापाल्य जिल्याला राज्य शासनाने सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. विकसित गडचिरोलीची पूर्तता अधिक वेगवान पद्धतीने करण्यासाठी सर्वांनी एकत्रित सहभाग नोंदवावा असे आवाहन ॲड. जयस्वाल यांनी केले. महामहीम राष्ट्रपती त्यांनी कल जाहीर केलेल्या १२१ पोलीस शौर्य पदकांपैकी सर्वाधिक ३१ पदके गडचिरोली पोलीस दलाला मिळाल्याबद्दल तसेच छत्तीसगड सिमेवर लक्षलप्रवण क्षेत्रात बिनागुंडा येथे पोलीस चौकी उभारण्याबद्दल त्यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहपालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले. सी-६० कमांडो पोलिस दल, स्काऊट-गाईड तसेच विविध शैक्षणिक संस्थांच्या पथसंचलनासह प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. एशियन युथ पॅरा गेम्समध्ये धनुर्विद्या प्रकारात सुवर्णपदक मिळविणाऱ्या कु. श्वेता कोवे हिला ५ लाख २० हजार रुपयांचे क्रीडा साहित्य सहपालकमंत्री यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमात विविध कलापथकांनी व शालेय विद्यार्थ्यांनी रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Jan 26, 2026 09:30:48
Jalna, Maharashtra:जालना :जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी कंबर कसून कामाला लागू पालकमंत्री पंकजा मुंडे यांचं स्पष्टीकरण अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात सर्व आरोपींवर कारवाई होईल अँकर : जालन्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी कंबर कसून कामाला लागू असं स्पष्टीकरण पालकमंत्री मुंडे यांनी जालन्यात बोकाळलेल्या अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर बोलताना दिलंय. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज पालकमंत्री मुंडे या जालन्यात होत्या. पोलीस कवायत मैदानावर मुख्य ध्वजारोहण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं. जिल्ह्यात गुन्हेगारी बोकाळण्यास गुन्हेगारच जबाबदार असून पोलीस त्यांना वेसण घालतील असा विश्वास मुंडेंनी व्यक्त केला. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात सर्व आरोपींवर कारवाई होईल असंही मुंडे म्हणाल्या。
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 26, 2026 09:30:31
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली असून, महापौर पदासाठी शारदा खेडकार तर उपमहापौर पदासाठी अमोल गोगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आज या दोन्ही उमेदवारांनी आमदार रणधीर सावरकर, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल तसेच महानगर अध्यक्ष जयंता मसने यांच्या उपस्थितीत आपले नामांकन अर्ज दाखल केले. शारदा खेडकर या सलग दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून, अमोल गोगे हेही दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. दोन्ही उमेदवारांची शहरातील चांगली प्रतिमा, प्रशासकीय कामाचा अनुभव आणि पक्षाशी असलेली निष्ठा लक्षात घेऊन भाजपकडून त्यांना संधी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अद्याप महापौर व उपमहापौर पदासाठी एकाही उमेदवाराचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने काल दोन्ही पदांसाठी एकही अर्ज स्वीकारलेला नव्हता. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार असून, अंतिम रिंगणात कोणते उमेदवार असतील याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Jan 26, 2026 08:51:01
Chandrapur, Maharashtra:आज उबाठा शिवसेਨਾ नगरसेवकांचा गट मुख्यमंत्र्यांना मुंबईत भेटणार आहे\n\nत्यांची मागणी अडीच वर्ष महापौर पदाची होती. आमच्या स्तरावर आम्ही जे शक्य आहे त्याबद्दात आश्वासन दिले होते. त्या संदर्भात एक स्टॅम्प पेपरही तयार झाला होता. मात्र काही लोकांनी उबाठा गटाला वेगळे आश्वासन दिल्याने प्रश्न निर्माण झाले. आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय होते ते बघूया.\n\nमुनगंटीवार on गोड बातमी\n\nशिवसेनेशी व विशेषतः उद्धव ठाकरे गटाशी भाजपची युती करण्यासंदर्भात काही वर्षे आधी गोड बातमी चर्चिली गेली होती. मात्र नंतर ती गोड बातमी प्रत्यक्षात उतरली नाही. आताही ती गोड बातमी प्रत्यक्षात उतरणे अशक्य वाटत आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Jan 26, 2026 08:22:51
Satara, Maharashtra:सातारा:पालकमंत्री शंभूराज देसाई पत्रकार परिषद पॉइंटर सातारा: गणेश नाईक यांनी केलेल्या टीकेवर राजकारणात कोणीच कोणाला कमी नसते. एखाद्याला संपवायची भाषा केली तर बाकीचे हाताची घडी घालून बसत नाहीत. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा आमची भूमिका घेणार. आमचा पक्ष सुद्धा तोडीस तोड उत्तर देणार.. पद्म पुरस्कार व महाराष्ट्राचा सन्मान केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या “महाराष्ट्राचा सन्मान” मोहिमेअंतर्गत पद्म पुरस्कार माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात.पद्म पुरस्कार हे कोणत्याही राजकीय शिफारशीवर नव्हे, तर संबंधित व्यक्तींच्या आयुष्यभराच्या कार्याचा, सामाजिक योगदानाचा आणि राष्ट्रासाठी केलेल्या सेवेचा सखोल अभ्यास करून दिले जातात.अशा पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या ज्येष्ठ मान्यवरांवर राजकीय टीका करणे हे महाराष्ट्राच्या सन्मानालाच धक्का देणारे आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यांवर टीका संजय राऊत हे नेहमीच टीका करण्याच्या भूमिकेत असतात. राज्याच्या किंवा देशाच्या हितासाठी सकारात्मक, विकासाभिमुख भूमिका त्यांनी कधीही मांडलेली दिसत नाही.माध्यमांसमोर येताना केवळ विरोधकांवर टीका करणे हाच त्यांचा अजेंडा असतो.त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना सामान्य जनता गांभीर्याने घेत नाही. ‘पैशाचा पाऊस’ आरोप पूर्णपणे फेटाळले नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमध्ये पैशांचा वापर झाल्याचा आरोप हा निराधार आहे.एकही ठोस केस, तक्रार, एफआयआर किंवा पुरावा दाखवावा.निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यावर पांघरूण घालण्यासाठी असे आरोप केले जात आहेत.लोकशाहीत आरोप नव्हे, तर पुरावे महत्त्वाचे असतात. निवडणूक निकाल हे जनतेचे उत्तर महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.हे जनतेच्या मतदानातून सिद्ध झालेले वास्तव आहे.“पैशाचा पाऊस” पडला असता, तर जनतेने मतदानातून नाकारले नसते. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांवर स्पष्ट भूमिका काही नेत्यांकडून जात, धर्म आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये केली जात आहेत.जबाबदार पदावर असलेल्या माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्री यांनी तरी संविधानाची आठवण ठेवून बोलावे. अशा वक्तव्यांुळे समाजात अशांतता, द्वेष आणि हिंसा पसरू शकते. खरी शिवसेना कोणाची –न्यायव्यवस्थेने सिद्ध केले न्यायालयाने, विधानसभेने, लोकसभेने आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे कीएकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरी शिवसेना आहे.जनतेने मतदानातूनही यावर शिक्कामोर्तब केले आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांवर लोकांनी शिक्कामोर्तब केला आहे. ड्रग्स / रॅकेट प्रकरणी सखोल तपास सातारा जिल्हा पोलीस अत्यंत बारकाईने आणि गतीने तपास करत आहेत.या रॅकेटच्या मुळाशी कोण आहे, कोण चालवत आहे, याचा शोध सुरू आहे.दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. राजकीय संबंधांचे आरोप – पुरावे द्या कुठल्या आरोपीचा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध असल्याचे पुरावे असतील, तर ते पोलीस प्रशासनाकडे सादर करावेत. उगाच राजकीय पक्षांना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुरावे मिळाल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर लक्ष सध्या शिवसेनेचा संपूर्ण फोकस जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर आहे.जास्तीत जास्त शिवसेनेचे सदस्य निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.जिल्हा परिषद सत्तेत शिवसेनेचा सहभाग हा प्रमुख उद्देश आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या टिकेवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिल आहे. मंत्री गोरे हे मोठे नेते आहेत. मंत्र्यांविषयी आम्ही लहान कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ ज्ञानाच्या जोरावर अनुभवावर विधान केलं असावं. आम्ही आमच्या पक्षांना जी शिस्त लावून दिली आहे. त्या चौकटीमध्ये राहून पक्ष वाढवण्याचे काम करत आहोत. पाटण विधानसभा मतदारसंघातील तयारी प्रचाराचा शुभारंभ पवित्र तीर्थक्षेत्रात श्रीफळ वाढवून करण्यात आला. विकासकामे आणि लोकांच्या सुख-दुःखातील सहभाग हे प्रमुख मुद्दे आहेत. आमच्यासमोर पॅकेजचे मोठे आव्हान आहे या मोठे पॅकेजच्या भूलथापांना पाटणची जनता बळी पडणार नाही... यावेळी प्रचंड संख्येने शिवसेनेचे उमेदवार पाटण विधानसभा मतदारसंघात निवडून येणार. महायुती समन्वय समितीचा निर्णय वैयक्तिक टीका टाळणे, मैत्रीपूर्ण लढत, खालच्या पातळीवर न जाणे असा स्पष्ट निर्णय होता.शिवसेनेने 100% पालन केले.ज्यांनी पालन केले नाही, त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारावेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 26, 2026 08:00:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर şehirात амली पदार्थांची तस्करी करणाऱ्या लातूरच्या टोळीला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री महामार्गावर मृत्यूचा थरार अनुभवला. केंब्रिज चौक ते गणेश कॉलनी या १० किलोमीटरच्या अंतरात तस्करांनी पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी दोन वेळा गाडी अंगावर घालत ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हे शाखेचे अंमलदार दादासाहेब झारगड यांनी धावत्या कारच्या बोनेटवर उडी मारून काच फोडली. त्यामुळे कारच्या चालकाला पुढे दिसण्यास अडचण झाली. त्यामुळे गाडीचा वेग मंदावला. आणि पोलिसांच्या गाड्यांना आरोपींच्या गाडीला घेराव घालत १८.७८ लाखांच्या मुद्देमालासह तिघांना बेड्या ठोकल्या. यात 3 आरोपींना अटक केली.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Jan 26, 2026 07:48:15
Kalyan, Maharashtra:कर्ता-याच्या तणावातून थोडी उसंत… कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये क्रिकेटचा आनंद Anc..नेहमी तक्रारी, चौकशी आणि कायदा-सुव्यवस्था सांभाळताना पोलिसांचा दिवस खूप धावपळीचा असतो. मात्र प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या धावपळीतून थोडी विश्रांती घेत कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला आहे. Vio:- कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस स्टेशन परिसरामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. या खेळात कल्याणच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणी जी. घेटे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कर्तव्यातून काही वेळ बाजूला काढत पोलिसांनी खेळाचा आनंद घेत उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला.
0
comment0
Report
Advertisement
Back to top