Back
मोदी के जन्मदिन पर नक्सलियों ने शस्त्रसंधी पत्र जारी, क्या शुरू होगी शांती वार्ता?
AAASHISH AMBADE
Sept 17, 2025 05:49:23
Gadchiroli, Maharashtra
Feed slug :--- 1709ZT_GAD_CEASEFIRE_LET
( single file sent on 2C)
टायटल:-- पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा जारी केले शस्त्रसंधी व शांती वार्ता सुरू करण्याचे पत्र, 15 ऑगस्ट ला मुद्रित केलेले पत्र उशिराने प्रकाशित करत असल्याची आहे तळटीप , भाकपा माओवादी केंद्रीय कमिटीचा प्रवक्ता अभय याच्या नावाने जारी केले आहे पत्र, पुढील एक महिन्यात तातडीची शस्त्रसंधी करून सर्व नक्षल शोध अभियाने बंद करण्याची पुन्हा केली मागणी, देशाच्या प्रगतीत व धोरणात भाग घेण्याची केली भाषा
अँकर:--पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधी करत शांती वार्ता सुरू करण्याचे पत्र जारी केले आहे. 15 ऑगस्ट ला मुद्रित केलेले हे पत्र उशिराने प्रकाशित करत असल्याची तळटीप पत्रात लाल रंगाने छापण्यात आली आहे. भाकपा माओवादी केंद्रीय कमिटीचा प्रवक्ता अभय याच्या नावाने हे पत्र जारी करण्यात आले आहे. पुढील एक महिन्यात तातडीची शस्त्रसंधी करून सर्व नक्षल शोध अभियाने बंद करण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली आहे. देशाच्या प्रगतीत व धोरणात भाग घेण्याची भाषा नक्षल संघटनांनी केली आहे. नक्षलवाद्यांनी या पत्रात आम्ही मार्च 2025 मध्येच शांतीवार्तीचा प्रस्ताव ठेवला होता व 10 मे रोजी याबाबत पहिले पत्र जारी केले होते असे म्हटले आहे. मात्र त्यानंतरही सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले. त्यातच 21 मे रोजी शीर्ष नेता बसवराजू चा मृत्यू झाल्याचा उल्लेख पत्रात आहे. आम्ही शस्त्र सोडण्यास तयार आहोत अशी स्पष्ट भूमिका नव्या पत्रात आहे. केंद्र सरकारने गृहमंत्री, त्यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी अथवा प्रतिनिधी मंडळाशी शांतीवार्तेसाठी तयार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्ष प्रस्ताव दिल्यानंतर आम्हाला आमच्या दूरवर पसरलेल्या नक्षल कॅडरशी हा प्रस्ताव चर्चा चर्चा करण्यासाठी एक महिना द्यावा असेही नक्षल संघटनांनी म्हटले आहे. याशिवाय पहिल्यांदा व्हिडिओ कॉल द्वारेही आपण आमच्याशी बोलू शकता असेही आश्चर्यकारकरीत्या सांगण्यात आले आहे. आकाशवाणी व दूरदर्शन द्वारे आमची ही भूमिका प्रसारित करण्याची विनंती देखील नक्षल संघटनांनी केली असून त्यासाठी प्रथमच ईमेल देखील देण्यात आलाय. याशिवाय फेसबुक आयडी देखील जारी करण्यात आली आहे. देशभर सातत्याने नक्षलविरोधात मोठे अभियान छेडत नक्षल चळवळ संपवून टाकण्याचा चंग केंद्र सरकारने बांधला असताना आता नव्या शांती प्रस्तावाचे नेमके काय होते याकडे नक्षल प्रभावित क्षेत्रातील नागरिक व देशाचे लक्ष लागले आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowSept 17, 2025 08:48:384
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 17, 2025 08:45:220
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 17, 2025 08:35:294
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 17, 2025 08:32:450
Report
PNPratap Naik1
FollowSept 17, 2025 08:31:330
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 08:05:440
Report
SNSWATI NAIK
FollowSept 17, 2025 08:03:500
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 17, 2025 08:01:320
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 17, 2025 08:00:580
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 07:48:262
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 17, 2025 07:36:153
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 17, 2025 07:35:441
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 17, 2025 07:31:300
Report
KPKAILAS PURI
FollowSept 17, 2025 07:31:000
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 17, 2025 07:16:380
Report