Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005
नागपूर ATS ने कामठी के दो संदिग्ध को पूछताछ के लिए हिरासत में लिया
AKAMAR KANE
Sept 13, 2025 07:04:31
kolhapur, Maharashtra
Ngp ATS shots live u ने फीड पाठव ले --------------- नागपूर पाकिस्तान मधील काही लोकांशी संपर्क ठेवले या माहितीवरून एटीएस च्या नागपूर युनिट नागपूर जिल्ह्यातील कामठी मधून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे... सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोघे पाकिस्तान मधील काही लोकांच्या संपर्कात होते.. त्याची गोपनीय माहिती एटीएसला मिळाली.. त्यानंतर आज दोघांना चौकशीसाठी एटीएसच्या नागपूर कार्यालयात आणले आहे... चौकशीसाठी बोलावण्यात आलेले दोघेजण पुरुष असून नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील रहिवाशी आहेत...
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Sept 13, 2025 10:07:33
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 13, 2025 09:52:17
Kolhapur, Maharashtra:Kop Trafic Issue Feed:- Live U ANC:- कोल्हापूर शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बाहेरून आलेले पर्यटक असो वा शहरवासीयांना गाड्या पार्क करण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे पर्यटकांसह कोल्हापूरकर हैरान झालेत. जिथे जागा दिसेल गाडी लावली तर लगेच ट्राफिक पोलीस कारवाई करून दंड आकारतात. अशा परिस्थितीत गाड्या लावायच्या कुठं असा संतप्त सवाल वाहनधारक विचारत आहेत. त्यातच आता 22 तारखेपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवामुळे राज्य आणि देशभरात मोठ्या संख्येने पर्यटक कोल्हापुरात दाखल होतात. अशावेळी कोल्हापूर प्रशासन पार्किंगचे नियोजन कसं करणार हा खरा सवाल आहे. Byte:- संतोष सरनोबत, पर्यटक Byte:- राकेश तटकरी, कोल्हापूरकर
2
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 13, 2025 09:09:24
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_SchoolContro Feed on - 2C ----------------------------------- Anchor - आरक्षणावरून मराठा आणि ओबीसीमध्ये सुरु झालेला सुप्त संघर्ष आता चक्क शाळेच्या प्रांगणात पाहोचलाय. त्याचे कारण म्हणजे सरकारने काढलेल्या जी आर विरोधात याचिका दाखल करणाऱ्या संस्थालचालकाच्या शाळेतून आपल्या मुलांची टी सी काढण्याचा अर्ज 21 पालकांनी दिलाय. तर मराठा समाजाच्या संस्थाचालकाच्या शाळेतून आपली मुले काढण्याचा पवित्रा ओबीसी समाजाने घेतलाय. पाहुयात नेमकं काय घडलंय. Vo - कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने काढलेल्या जी आर विरोधात अखिल भारतीय विरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. धोंडे यांची नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे मीनाताई ठाकरे निवासी आश्रम शाळा आहे. या शाळेतून आपल्या मुलांच्या टी सी द्याव्यात असा सामूहिक अर्ज 21 पालकांनी दिलाय. हे सर्व पालक मराठा समाजाचे आहेत. या शाळेत आपल्या मुलांना पाठवणार नसल्याचा निर्णयही या पालकांनी घेतलाय. कोणताही जातभेद न करता धोंडे यांच्या शाळेत मुलांना प्रवेश दिलाय. पण संस्थाचालक धोंडे यांनी मराठा आरक्षणा विरोधी याचिका दाखल केली. त्यामुळे आमच्या मुलांना त्यांच्या शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा या पालकांनी घेतलाय. Byte - Byte - Byte - Byte - Vo - टीसी काढून घेण्याच्या मराठा पालकाच्या निर्णयाचे पडसाद गावात उमटले. मराठा संस्था चालकाच्या जय महाराष्ट्र विद्यालय या शाळेतुन आपल्या मुलांना काढून घेण्याचा निर्णय ओबीसी समाजातील काही पालकांनी घेतलाय. Byte - ओबीसी पालक Byte - ओबीसी पालक Byte - ओबीसी पालक vo - दरम्यान शाळेतून मुलांना काढण्याचा निर्णय माघे घ्यावा यासाठी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मीनाताई ठाकरे निवासी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. Byte - लक्ष्मण येवते. मुकध्याध्यापक. Vo - संस्थाचालकाने याचिका टाकली म्हणून मराठा समाजाने आपली मुले त्यांच्या शाळेतून काढण्यासाठी अर्ज दिला. त्याला प्रतिउत्तर म्हणून ओबीसी समाजाने मराठा संस्था चालकाच्या शाळेतून मुले काढण्याचा पवित्रा घेतलाय. पण या सगळ्यामुळे आरक्षणाचा वाद विद्येचे मंदिर असलेल्या शाळेच्या प्रांगणात पोहोचलाय. ही बाब नक्कीच दोन्ही जमाजासाठी भूषणावह नाही. दोन्ही समाजाने मनाचा मोठेपणा दाखवून आरक्षणाच्या या विषयातून विद्येच्या मंदिराला दूर ठेवावे ही अपेक्षा. ---------------------------
6
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 13, 2025 09:07:09
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1309ZT_CHP_FLOOD_RAIN_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात रोज रात्री मुसळधार पडत असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या ग्रामीण- शहरी भागात पूरस्थिती, धरणाची सर्व दारे एक मीटरने उघडल्याने ईरई-वर्धा नदी फुगली, ग्रामीण भागातील कित्येक मार्ग बंद      अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात रोज रात्री मुसळधार पडत असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या ग्रामीण- शहरी भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.  चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची सर्व 7 दारे एक मीटरने उघडल्याने ईरई-वर्धा नदी फुगली आहे. ग्रामीण भागातील कित्येक मार्ग बंद झाले आहेत. आजवर जिल्हा वार्षिक सरासरीच्या 102% एवढा पाऊस पडून गेलाय. जिल्ह्यातील दोन मोठे आणि आठ सिंचन प्रकल्प 100% भरले आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यातील 15 पैकी 3 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. चंद्रपूर शहराच्या बाहेरच्या पठाणपुरा भागातील जमनजट्टी  मार्ग पुराच्या पाण्याने ठप्प झाला असून या पुढच्या भागातील स्मशानभूमी पाण्यात बुडाली आहे. जिल्ह्याच्या वरच्या भागात असलेल्या वरोरा ,भद्रावती तालुक्यातही वर्धा नदीच्या पाण्याने पात्र सोडल्याने वरोरा तालुक्यातील सोईट मोठ्या पुलावर पाच फूट पाणी आल्याने  यवतमाळ मार्ग ठप्प झाला आहे. या भागात निमसडा गावातील शाळेत जाणारे विद्यार्थी अडकल्याने त्यांची तात्पुरती व्यवस्था खाजगी वीज केंद्र परिसरात करण्यात आली आहे. याशिवाय चिमूर भागातही कित्येक अंतर्गत मार्ग बंद आहेत. प्रशासन परिस्थितीवर नजर ठेवून आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
1
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 13, 2025 09:06:56
kolhapur, Maharashtra:नागपूर:- *नागपूरच्या समता नगर परिसरात स्थानिक नागरिकांकडून खड्ड्यांचा 'वाढदिवस' साजरा करून अनोख्या पद्धतीने आंदोलन*! गेल्या एका वर्षापासून रस्त्यांवरील खड्डे तसेच असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी मिळून या खड्ड्यांचा "पहिला वाढदिवस" साजरा केला. यावेळी खड्ड्यांवर केक कापण्यात आला, मेणबत्त्या पेटवण्यात आल्या आणि पोस्टर-बॅनरद्वारे प्रशासनाकडे जबाबदारी पार पाडण्याची मागणी करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात अनेकदा तक्रारी दाखल करण्यात आल्या, पण संबंधित विभाग आणि प्रशासनाकडून कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही. पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी पाणी साचते, ज्यामुळे रस्ते अपघात होतात. अनेक दुचाकीस्वार आधीच जखमी झाले आहेत. 2c ला shots आणि बाईट जोडले आहे ---- नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती केली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. बाईट आंदोलक
1
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 13, 2025 08:47:31
Raigad, Maharashtra:स्लग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अवमान ? ......... काँग्रेसने ए आय व्हिडिओ बनवून केला व्हायरल ........ रायगड भाजप महिला आघाडीकडून निषेध ...... पेझारी इथं काढली निषेध रॅली ........ चित्राताई पाटील यांनी केले आंदोलनाचे नेतृत्व ...... अँकर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांचा ए आय प्रणाली द्वारे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आला आहे . काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींचा अवमान केल्याचा आरोप करीत आज देशभर भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध आंदोलन केले जात आहे. दक्षिण रायगड जिल्हा भाजपा महिला मोर्चातर्फे आज अलिबाग तालुक्यातील पेझारी इथं निषेध रॅली काढण्यात आली. भाजपा महिला आघाडीच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केलं. यावेळी काँग्रेस पक्षाचा निषेध करणाऱ्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
6
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 13, 2025 08:46:02
kolhapur, Maharashtra:Ngp Bridge balkani live u ने फीड पाठवले --=--- नागपूर नागपुरात उड्डाणपुलाच्या रोटरीचा एक भाग चक्क एका घराच्या बाल्कनीतून गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झालेय..अशोक चौकात प्रवीण पत्रे यांच्या घराच्या बाल्कनीतून हा उड्डाणपूलचा भाग गेलाय.. इंदोरा ते दिघोरी दरम्यानच्या या उड्डाणपुलाचे अशोक चौकातील रोटरीचा हा भाग बाल्कनीतुन गेला असला तरी त्यामुळे काही अडचण नसल्याचे घरमालक पत्रे यांनी म्हटले आहे... मात्र NHAI ने याबाबत पालिकेला बाल्कनी हटवण्याबाबर बाबत मागणी केलीय...घरच्या बाल्कनीचे बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती मिळतेय..घरमालक घराचा मंजूर प्लॅन अजून प्रशासनाकडे सादर केलेला नाही.. त्यामुळं नुकसनीचीही तरतूद नसल्याच पालिकाकडून सांगण्यात येतेय..नाही..दरम्यान एवढ्या मोठ्या उड्डाणपुलाचे एवढे भव्य काम सुरू असताना प्रशासन आणि सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच सर्व काळजी आणि पाउले उचलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त होत आहे... तिथून आढावा घेत घर मालक प्रवीण पत्रे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
7
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 13, 2025 08:45:55
Kolhapur, Maharashtra:Story:- Kop Vasantrao Mulik Byte Feed:- Live U Anc:- केंद्राच्या NMMS परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पण मेरिटमूळ केंद्राच्या शिष्यवृत्तीचा लाभ न मिळणाऱ्या मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना राज्य सरकार सारथी मार्फत शिष्यवृत्ती दिली जात होती. पण आत्ता ही शिष्यवृत्ती राज्य सरकारने बंद केली आहे असा आरोप मराठा महासंघाच्या वसंतराव मुळीक यांनी केलाय.सारथी कडून NMMS परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वर्षाला 9 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती, पण राज्य सरकारने चार वर्षांसाठी मंजूर झालेली शिष्यवृत्ती मध्येच बंद केल्याने राज्यातले 70 हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून राहणार वंचित आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने बंद केलेली शिष्यवृत्ती सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडल जाईल असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिलाय. BYTE : वसंतराव मुळीक, अखिल भारतीय मराठा महासंघ, राष्ट्रीय उपाध्यक्ष
7
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 13, 2025 08:45:23
Navi Mumbai, Maharashtra:story slug - ११ जिवंत काडतुसे आणि एका पिस्तूलसह दोघांना अटक. पिस्तुल के साथ दो लोगो को किया अरेस्ट FTP slug - nm crime shots- photo reporter- swati naik navi mumbai Anchor -: नवी मुंबईतील उलवे पोलिसांनी एका पिस्तूल आणि ११ जिवंत काडतुसांसह दोघांना अटक केलेय. आरोपींकडे उत्तर प्रदेशातील पिस्तूलचा परवाना आहे परंतु ते पिस्तूल घेऊन नवी मुंबईत फिरत होते. आरोपी प्रवीण पांडे हा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा रहिवासी आहे आणि तो उलवे येथील एका डेअरीमध्ये काम करत होता तर दुसरा आरोपी विकास त्रिपाठी हा प्रतापगडचा रहिवासी आहे आणि तो येथील एका बांधकाम ठिकाणी काम करत होता. उलवे पोलिसांचे एक पथक रात्री गस्त घालण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना संविधान चौकाजवळ हातात पिस्तूल घेऊन एक व्यक्ती दिसली, त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली आणि पिस्तूलमध्ये ८ जिवंत काडतुसे आणि ३ काडतुसे आढळली. तपासात असे दिसून आले की ते पिस्तूल विकास त्रिपाठी यांचे होते आणि त्यांच्याकडे उत्तर प्रदेश सरकारचा परवाना देखील होता परंतु तो परवाना फक्त उत्तर प्रदेश राज्यासाठी होता. त्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या परवानगीशिवाय पिस्तूल येथे आणले होते आणि त्यांनी ते पिस्तूल प्रवीण पांडे यांना ठेवण्यासाठी दिले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून कारसह सुमारे ६ लाख ९२ हजार रुपयांचा माल जप्त केलाय. gf-
3
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 13, 2025 08:45:14
Ratnagiri, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदे यांच्याशी बोलून निर्णय घेतात...विरोधक याबाबतीत बातमी पुरवतात... तुम्ही त्याकडे जास्त लक्ष देऊ नका... एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये समन्वय चांगला आहे... नगर विकास खात्यात मुख्यमंत्र्यांच्या होत असलेल्या आक्षेपावरून एकनाथ शिंदे नाराज या प्रश्नाला सामंत यांचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी विचारलेला सवाल म्हणजे सैन्याचा अपमान...मुंबई- भारत- पाकिस्तान सामन्याविरोधात उबाठा आक्रमक-देशभक्तीचा व्यापार सुरु आहे.. मोदींकडून देशभक्तीची थट्टा.. राजनाथसिंह आता ऑपरेशन सिंदूर थांबल्याची घोषणा करणार का? असा असावा उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर त्याला उदय सामंत यांचे प्रत्युत्तर... उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 34 मतं फुटली हे देखील सांगा... मंत्रिमंडळात गॅंगवॉर होईल या संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत यांची प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस सोबत गेला म्हणून त्यांना मुस्लिमांची मतं मिळाली.. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबद्दल मला नको तर काँग्रेसला विचारा... ठाकरे बंधूंमध्ये बैठकांचा सत्र सुरू आहे या प्रश्नाला उदय सामंत यांचे उत्तर मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जीआर हा मराठवाडासाठी... उदय सामंत यांचे मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआर संदर्भातील प्रश्नाला उत्तर अमिषा पाडवी माझे सहकारी... त्यांच्याशी मी बोलतो... हैदराबाद गॅझेट लागू झाल्यास सरकारमधून बाहेर पडेल या पाडवी यांच्या विधानाबाबतीत प्रश्न विचारल्यानंतर सामंत यांचे उत्तर.... लोकेशन - रत्नागिरी Byte - उदय सामंत, उद्योगमंत्री
5
comment0
Report
Sept 13, 2025 08:42:48
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे ३३५ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये आदिवासी विकास विभागाची वसतिगृहे, बांधकाम विभागाची कामे, सौर ऊर्जा प्रकल्प तसेच विविध योजनांचा समावेश आहे. या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पुढील तीन वर्षांत आदिवासी समाजाच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल. घरकुल, पाणी, वीज, रोजगार, वसतिगृहे आदी सुविधा वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून आदि कर्मयोगी योजना व धरती आबा अभियानातून आदिवासींचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार संजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
5
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 13, 2025 08:35:40
Parbhani, Maharashtra:अँकर - परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अति मुसळधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब वाहत असून यामुळे पिके मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याला पावसाचा मोठा तडाखा बसलाय,गुंडा परिसरातून दोन शेतकरी महिला वाहून गेला होत्या,त्यांचा मृतदेह आज काही अंतरावर सापडलाय,तर परभणीच्या नऊ महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झालीय. कातनेश्वर मंडळात सर्वाधिक 147 मिलिमीटर पाऊस झाल्याने मोठं नुकसान झालंय,थुना नदीला पूर आल्याने माटेगाव परिसरात पूर आल्याने झिरो फाटा ते पूर्णा हा मार्ग बंद पडलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी... WKT- गजानन देशमुख
6
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 13, 2025 08:34:16
1
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 13, 2025 08:33:54
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1309ZT_JALNA_ANIMAL_SCOD(8 FILES) जालना : शहरातील मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम सुरु पहिल्याच दिवशी,पहिल्याच राऊंडला 14 जनावरं बंद महापालिकेच्या मोकाट जनावरे बंदिस्त पथकाची कारवाई पथक पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेतायत मोकाट जनावरं अँकर | जालना शहरात हजारो मोकाट जनावरं आहेत.ही जनावरं वारंवार रस्त्यावर तासंतास बसून राहत असल्यानं वाहतुकीत अडथळा निर्माण होतो.त्यामुळे महानगरपालिकेने या मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कारवाई सुरु केली आहे.महापालिकेने या मोकाट जनावरांना पकडण्यासाठी मोकाट जनावरे बंदिस्त पथकाची स्थापना केली आहे.आज या पथकाच्या वतीने शहरातील गांधी चमन भागात कारवाई करण्यात येऊन तब्बल 14 मोकाट जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत.ही मोहीम तब्बल 11 महिने चालणार आहे.मोकाट जनावरं पकडण्यात अडथळे येऊ नये म्हणून या पथकाला पोलिस बंदोबस्त देखील पुरवण्यात आला आहे.हे पथक पोलीस बंदोबस्तात मोकाट जनावरं ताब्यात घेत असून पकडलेली मोतीबाग परीसरातील नवीन कोंडवाड्यात सोडली जात आहेत.या ठिकाणी पकडलेल्या जनावरांना चारा,पाण्याची देखील सोय करण्यात आली आहे.ही मोहीम सुरुच राहणार असल्यानं शहरातील वाहतूक व्यवस्था देखील सुधारण्याची शक्यता आहे. बाईट : विवेक घुमारे, पथक प्रमुख
2
comment0
Report
Advertisement
Back to top