Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304
पंढरपूर में ऊस दर संघर्ष समिति का आमरण उपोषण पांचवें दिन, ट्रैक्टर टायर में हवा
SKSACHIN KASABE
Dec 12, 2025 05:35:56
Pandharpur, Maharashtra
पंढरपूर तालुक्यात ऊस दर संघर्ष समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या आंदोलनाचा आज आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. ऊस दर संघर्ष समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आज पहाटे ऊस दर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी बाजीराव विहीर परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या टायर मधील हवा सोडली आहे अद्यापही साखर कारखानदार आणि प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही त्यामुळे भविष्यात हे आंदोलन आणि तीव्र होण्याची शक्यता आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 12, 2025 07:35:59
Latur, Maharashtra:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन चाकूर ते दिल्ली नगरपालिका ते संसद वयाच्या 90 वर्ष शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन. लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिलेले चाकूरकर. मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील (जन्म : १२ ऑक्टोबर १९३५) हे लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मले. उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९६७-६९ या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवले. १९८० मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर १९९९ पर्यंत सलग सात निवडणुका जिंकत लोकसभेतील एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. १९९१ ते १९९६ या काळात ते देशाचे १० वे लोकसभा अध्यक्ष होते. लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवे ग्रंथालय इमारत यांसारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. देश-विदेशातील अनेक संसदीय परिषदांमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व केले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षातही त्यांनी जाहीरनामा समितीचे अध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. २००४ मध्ये निवडणूक हरूनही त्यांच्यावर विश्वास ठेवत केंद्रातील गृहमंत्रीपद देण्यात आले. मात्र २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी राजीनामा दिला. २०१० ते २०१५ या काळात ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते. देशातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्याचे श्रेयही त्यांनी दिले जाते. वैयक्तिक आयुष्यात ते लिंगायत समाजातील असून, १९६३ मध्ये विजया पाटील यांच्याशी विवाह केला. त्यांनी एक मुलगा व एक मुलगी आहेत. सून डॉ अर्चना पाटील चाकूरकर राजकारणात सक्रीय आहे. दोन नाती आहेत. शिवराज पाटील हे सत्य साई बाबांचे निष्ठावंत अनुयायी म्हणूनही परिचित आहेत. सुमारे पाच दशका संसदीय आणि प्रशासकीय अनुभव, विविध मंत्रालयातील कामकाज आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून केलेले योगदान यामुळे शिवराज पाटील हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व मानले जातात. वैभव बालकुंदे ZEE 24 TAAS Latur
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 12, 2025 07:34:03
Shirdi, Maharashtra:साईनगरीत गर्दी घटली , उत्पन्न मात्र वाढले.. शिर्डी साई संस्थानचे उत्पन्न ८५० कोटींवर... मागील वर्षीच्या तुलनेत ३१.६२ कोटींची वाढ... साई संस्थानच्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जवळपास ३२०० शे कोटींच्या ठेवी... शिर्डीचं साई संस्थानचे देवस्थान पुन्हा श्रीमंत देवस्थानांच्या यादीत... शिर्डात साई दरबारी भाविकांचा ओघ तुलनेने कमी मात्र दानात लक्षणीय वाढ... उत्पन्नाचे प्रमुख स्रोत खालीलप्रमाणे - गुंतवणुकीवरील व्याज - २४२.८८ कोटी, दक्षिणापेटी - १५३.८२ कोटी, सर्वसाधारण देणगी - १११.४२ कोटी, रुग्णालये - ६८.४१ कोटी, अन्नदान निधी - ६७.८८ कोटी, प्रसादालय - ५५.२६ कोटी, वैद्यकीय निधी - ५२.७४ कोटी, वस्तुरूप देणगी - २०.९८ कोटी, दागिने व रत्ने - १४.७९ कोटी. या पद्धतीने घटली १० रुपयांच्या लाडू पाकिटची मागणी. १० रुपये किंमतीचे हे लाडू पाकीट सन २०२२ - २३ मध्ये उपलब्ध नव्हते मात्र २०२३ - २४ मध्ये भाविकांसाठी १० रुपयांत सुरू झाल्यावर याची विक्री प्रचंड वाढली आणि १ कोटी ४५ लाख ६० हजार ५३६ रुपयांमध्ये विकली गेली.परंतु २०२४ - २५ मध्ये १० रुपयांत मिळणाऱ्या लाडू पाकिटची विक्री घटून ३९ लाख ६८ हजार ३४९ रुपये इतकी झालिये
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Dec 12, 2025 07:16:49
Pune, Maharashtra:Headline : तळेगाव–उरळी कांचन या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे पुनःसर्वेक्षण करून आवश्यक ते बदल करण्याची खासदार बारणे यांची मागणी लोकसभेत शिवसेनेचे मावळ खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रकल्पातील गंभीर मुद्द्यांकडे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले. तळेगाव–उरळी कांचन या प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे अनेक गावांमध्ये घरे आणि शेतीजमीन बाधित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही या परिसरातील जमीन विविध शासकीय कामांसाठी अधिग्रहित झाल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र, रेल्वेमार्गाला विरोध नसून मार्गाचे पुनःसर्वेक्षण करून आवश्यक ते बदलाव करावेत आणि स्थानिकांची घरे सुरक्षित ठेवावीत अशी ठाम मागणी बारणे यांनी सभागृहात केली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 12, 2025 07:09:49
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा तालुक्यात रेल्वे विभागाकडून मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचा उपसा होत असल्याचा गंभीर आरोप करत शेतकरी संघटनेने आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हा उपसा तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. शेतकरी संघटनेच्या निवेदनात म्हटलं आहे की, रेल्वे कामासाठी मोठ्या प्रमाणात वाळू आणि गौण खनिजांचा उपसा केल्यामुळे स्थानिक पातळीवर या खनिजांचा तुटवडा निर्माण होत आहे. पंतप्रधान घरकुल आवास योजना तसेच अनुसूचित जातीसाठी असलेल्या रमाई आवास योजनेसाठी लागणारी वाळू नदी-नाल्यातून स्वस्त दरात उपलब्ध होते. मात्र रेल्वेच्या मोठ्या प्रमाणातील उत्खननामुळे वाळूचे दर वाढून या योजनांचा खर्च अवाजवी वाढणार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील ५२ ठिकाणी तसेच इतर नदी-नाल्यांमधील खनिज उपशावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 12, 2025 07:06:52
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग कांग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधन... उद्या वरवंटी शिवारात अंत्यविधी... AC - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या आज सकाळी साडेसहा वाजता निधन झाले... त्यांच्या निधनानंतर शोककळा पसरली आहे. लातूर येथील त्यांच्या निवासस्थान देवघर येथे अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले आहे. यावेळी माजी मंत्री तथा भाजप नेते बसवराज पाटील मुरुमकर, तसेच माजी मंत्री तथा भाजप नेते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित राहून अंत्यदर्शन घेतले. अंत्यविधी उद्या १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता लातूर शहराजवळील वरवंटी शिवारातील त्यांच्या शेतात होणार असल्याची माहिती माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी दिली. बाईट - बसवराज पाटील मुरूमकर, माजी मंत्री तथा भाजप नेते बाईट - आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री तथा भाजप नेते
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 12, 2025 07:00:45
Nagpur, Maharashtra:live u ने फीड पाठवले ------------------- भरतशेठ भोगावले..शिवसेना नेते On पाटील निधन * शिवराज चाकूरकर पाटील चांगले नेतृत्व होते.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होतो.. On रवींद्र चव्हाण, शिंदे भेट * दोन्ही नेत्यांची भेट काहीतरी हेतू साध्य करणारी असते... कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात कमी जास्त होतो... * काही ठिकाणी झाल ते झाल.. स्थानिक कार्यकर्ते आक्रमक असतात... आता मोठ्या पालिका निवडणुकीतआमच ताकदीने लढण्यासाठी प्रयत्न.. On नवाब मलिक * काही चांगले विचार करणे महत्वाचे त्यामुळे वरिष्ठ स्तरावर तो निर्णय घेतला असेल... On चित्रलेखा पाटील * हल्ली असा धंदा सुरू झाला हे आपण पाहतोय.. माझ्या 40 वर्षाच्या कारकीर्दीत आम्ही कोणत्याही चुका केल्या नाही... *आम्ही गोरगरिबांचे शेठ आहोत..* मी बाळासाहेबांच शिवसैनिक असल्याने आदर राखण्याची गरज.. ती माझ्या मुलीसारखी आहे मात्र त्यांनी का चुकीचा पाऊल उचललं ते कळलं नाही.. सगळीकडे त्याला ट्रोल केलं आणि आंदोलन केलं.. त्याला मी व्यवस्थित करायचं होतं असं सांगितलं... त्यांनी कड न दाखवता धागे दोरे दाखविली त्यामुळे ती फसली.. * *यावर आम्ही सभागृहात प्रश्न मांडू आणि अब्रू नुकसानीचा दावा टाकू*.... * एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष चांगला आणि रायगड जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष होता.... आता एकही खासदार आणि आमदार नाही.. त्यामुळे ते हतबल झालेले दिसत आहे.. जयंत पाटील हे अनेक वर्ष विधान परिषदेवर निवडून यायचे.. मात्र यावेळी त्यांना घरी बसावं लागलं.. त्यांच्या अशा कृतीमुळे ते नामशेष होत चालले... On नोटा video ट्विट * आता सगळ्या नवीन ऍक्टिव्हिटी निघाल्यामुळे हे सगळं लोक दाखवू शकतात.. पण घरातून निघू शकत नाही म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करत आहेत... रायगडच्या जनतेला माहित आहे.. मी किती स्वच्छ आहे ते माहित आहे.. On रोजगार हमी योजना निधी * केंद्र सरकारचे पण आलेत आणि राज्य सरकारचे म्हणाले... जवळपास पंधराशे कोटी आमचाकडे जमाय.. येत्या आठ दिवसात पोहोचतील..
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 12, 2025 06:47:17
Kalyan, Maharashtra:कल्याण मोहने परिसरातील धक्कादायक घटना. क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद गरोदर महिलेला मारहाण.. जखमी महिलेच्या बाळाचा पोटातच मृत्यू. टोपी वरून झाला वाद गरोदर महिलेच्या पोटात लाथ मारल्यान पोटातच बाळाचा मृत्यू. डोक्यावरील टोपी काढून ती टोपी आरोपीन स्वताच्या डोक्यात घातली. त्यानंतर हीच टोपी तक्रारदार यांनी आरोपीच्या डोक्यावरून काढून आपल्या मित्राला पुन्हा परत दिली. याच गोष्टीचा मनात राग येऊन आरोपी अफजल, बाबा, शब्बीर शेख या तिघांनी शेजारी राहणारे यांना मारहाण कारण्यात आली. मारहाणीत गरोदर असलेल्या महिलेच्या पोटात जोरात लाथा बुक्क्याने मारहाण केल्यान तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण जवळील मोहने गावातील लहूजीनगर येथे घडली. या महिलेवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 12, 2025 06:36:09
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 12, 2025 06:30:17
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूरच्या पाणी प्रश्नाववरून विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महापालिका अधिकारियोंांना घेतले फैलावर - सोलापूरच्या पाणी प्रश्नावर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत बैठक - बैठकीत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना घेतले फैलावर - सोलापूरकरांना रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत होणारा पाणीपुरवठा बंद होणार - अण्णा बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत कडक शब्दात सुनावले - पाणी पुरवठ्याची 882 कोटी रुपयांची योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्याचे अण्णा बनसोडे यांचे आश्वासन - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीचे आयोजन केले होते
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 12, 2025 06:07:59
Dhule, Maharashtra: सारंगखेडा घोडेबाजारात 15 कोटींचा ब्रम्होस चर्चेत आहे. त्याच्या मालकाला तो विकायचा नाही म्हणून त्याची 15 कोटीना किंमत ठेवली आहे. विशेष म्हणजे त्याला 8 कोटी रूपायांची बोली लागली होती. पण त्याच्या मालकांना तो विकायचा मोह झाला नाही. कसा आहे हा घोडा, आणि का आहे त्याची इतकी किंमत पाहूया. साध्य बाजारात चर्चा आहे ती डिफेन्डर गाडीची, श्रीमंताना डिफेन्डरची भुरळ आहे, मात्र एखाद्या महागड्या लक्झुरियेस डिफेन्डर, मर्सेडीजपेक्षाही महाग घोडा असेल तर? ऐकून धक्का बसेल, लेकिन सारंगखेड्याच्या घोडेबाजारात असा एक घोडा दाखल झाला आहे. गुजरातच्या पाटण येथून आलेला ‘ब्रम्होस’ नावाचा हा घोडा तब्बल 15 कोटी रुपये किमतीचा असल्याची चर्चा असून, बाजारात त्याच्याभोवतीच गर्दी उसळली आहे. सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये दाखल झालेला हा काळा, रुबाबदार आणि लयबद्ध चालणारा घोडा म्हणजे ब्रम्होस. कपाळावरचा आकर्षक पांढरा पट्टा आणि मारवाडी जातीची उठावदार ठेवण हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य. गुजरातच्या नागेश देसाई यांच्या देसाई स्टडफॉर्मवर पाळलेला हा घोडा आता बाजारात सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. पुष्कर बाजारात या घोड्याला 8 कोटी रुपयांपर्यंत बोली लागली होती. परंतु देसाई कुटुुबांना 15 कोटी किंमत असूनही ब्रम्होस विक्रीसाठी तयार नाही. 36 महिन्याचा, तब्बल 63 इंच उंचीचा ब्रम्होस आज देशातील टॉप अश्वांपैकी एक मानला जातो.याच्या खानपानाची काळजीही तितकीच विशेष—दिवसभरात तब्बल 15 लिटर दूध, तसेच अश्वतज्ज्न्यांच्या सल्ल्यानुसार पौष्टिक खाद्य.देखभालीसाठी दिवसभर स्वतंत्र मजूर, मसाज, ग्रुमिंगची विशेष व्यवस्था असते.त्यामुळेच देशभरात झालेल्या अनेक अश्व स्पर्धांमध्ये ब्रम्होस नंबर वन ठरला आहे. Byte नागेश देसाई, मालक Vo - सारंगखेड्याच्या या ऐतिहासिक घोडेबाजारात यंदा ब्रम्होसने खऱ्या अर्थाने सर्वांचे लक्ष वेधले. त्याचा रुबाब, उंच किंमत आणि तुफान लोकप्रियता यामुळे हा घोडा बाजाराचा शोस्टॉपर ठरला आहे. ब्रम्हामोस हा ब्लड लाईन घोडा आहे, त्यामुळे त्याच महत्व ब्रिडींगसाठी सर्वाधिक आहे. अजून त्याची पुर्ण वाढ झालेली नाही. जसा तो वाढेल तसं अधिक रुबाबदार होईल. Byte जयपाल रावल अध्यक्ष चेतक फेस्टिवल Vo - देसाई स्टडफॉर्मवर ब्रम्होसच्या ब्लुडिंगमधून आतापर्यंत 10 पिलं तयार झाली आहेत. या सर्व पिल्लांना बाजारात लाखोंच्या बोली लागल्या आहेत.म्हणूनच हा घोडा भविष्यात केवळ हॉर्स ब्रीडिंगसाठी वापरण्याचा निर्णय देसाई कुटुंबाने घेतला आहे. पण ब्रम्होस सध्या अश्व प्रेमाच्या डोळ्याचे पारणे फेडतोय. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
Advertisement
Back to top