Back
शिवराज पाटील चाकूरकर का निधन, लातूर के वरिष्ठ नेता ने दी विराम
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 12, 2025 07:35:59
Latur, Maharashtra
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन चाकूर ते दिल्ली नगरपालिका ते संसद वयाच्या 90 वर्ष शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन. लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिलेले चाकूरकर. मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील (जन्म : १२ ऑक्टोबर १९३५) हे लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मले. उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९६७-६९ या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवले.
१९८० मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर १९९९ पर्यंत सलग सात निवडणुका जिंकत लोकसभेतील एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
१९९१ ते १९९६ या काळात ते देशाचे १० वे लोकसभा अध्यक्ष होते. लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवे ग्रंथालय इमारत यांसारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. देश-विदेशातील अनेक संसदीय परिषदांमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व केले.
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षातही त्यांनी जाहीरनामा समितीचे अध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. २००४ मध्ये निवडणूक हरूनही त्यांच्यावर विश्वास ठेवत केंद्रातील गृहमंत्रीपद देण्यात आले. मात्र २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी राजीनामा दिला.
२०१० ते २०१५ या काळात ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते. देशातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्याचे श्रेयही त्यांनी दिले जाते.
वैयक्तिक आयुष्यात ते लिंगायत समाजातील असून, १९६३ मध्ये विजया पाटील यांच्याशी विवाह केला. त्यांनी एक मुलगा व एक मुलगी आहेत. सून डॉ अर्चना पाटील चाकूरकर राजकारणात सक्रीय आहे. दोन नाती आहेत. शिवराज पाटील हे सत्य साई बाबांचे निष्ठावंत अनुयायी म्हणूनही परिचित आहेत.
सुमारे पाच दशका संसदीय आणि प्रशासकीय अनुभव, विविध मंत्रालयातील कामकाज आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून केलेले योगदान यामुळे शिवराज पाटील हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व मानले जातात.
वैभव बालकुंदे
ZEE 24 TAAS Latur
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowDec 12, 2025 09:00:480
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 12, 2025 08:45:350
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 12, 2025 08:35:240
Report
MKManoj Kulkarni
FollowDec 12, 2025 08:31:480
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 12, 2025 08:20:250
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 12, 2025 08:17:320
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 12, 2025 07:45:440
Report
KJKunal Jamdade
FollowDec 12, 2025 07:34:030
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 12, 2025 07:19:170
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 12, 2025 07:16:490
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 12, 2025 07:09:490
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 12, 2025 07:06:520
Report
AKAMAR KANE
FollowDec 12, 2025 07:00:450
Report
KJKunal Jamdade
FollowDec 12, 2025 06:48:230
Report