Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812
नितेश राणे ब्रांड ने विधानसभा चुनाव में भारी बढ़त के संकेत
UPUmesh Parab
Feb 09, 2026 15:06:53
Oros, Maharashtra
नितेश राणे ५० पैकी ४६ ते ४७ असे उमेदवार आमचे निवडून येतील भाजप २१, शिवसेना ८ असे आतापर्यंत उमेदवार निवडून आलेत ५० मधून ४२ उमेदवार निवडून आले होते रविंद्र चव्हाण यांनी आम्हाला पाठिंबा दिलाय आज राज्यात आमचे सरकार आहे आज भरपूर निधी देऊ आलेले पाच अपक्ष आहेत अपक्ष काही निवडून आलेत त्यांनी रविंद्र चव्हाण यांचा वापर केला आमचा एक तर्फी विजय झाला असता अदृश्य हाताच्या नावाने विकासाला गाल बोट लागणाऱ्या लोकांना बाजूला करायची वेळ आलीय राणे ब्रँडचा म्हणजे जिल्ह्याचा विकास राणे ब्रँडला ताकद देण्यासाठी लोकांनी मतदान केलेय सिंधूदुर्गच्या विकासासाठी ठाकरेंनी काय केले ठाकरेंनी फक्त राणेवर टीका केलीय २५ वर्ष तरी राज्यात सब कुच देवाभाऊ असेल मंत्री नितेश राणे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Feb 10, 2026 02:49:36
Nashik, Maharashtra:घराच्या छतावरून पाय घसरून कोसळला; शॉक लागून युवकाचा मृत्यू नाशिकच्या पेठरोड परिसरातील अश्वमेधनगरला पटांगणात खेळताना घरावर चढलेल्या अल्पवयीन मुलाचा पाय घसरला. यावेळी वीजतारेचा शॉक लागून 17 वर्षाच्या भावेश संजय गांगुर्डे या मुलाच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडलीये... या घटनेने अश्वमेधनगर भागात हळहळ व्यक्त केली जा आहे... अश्वमेधनगर परिसरात भावेश हा नेहमीप्रमाणे रविवारी मैदानात खेळत होता. येथे असलेल्या महापालिकेच्या शाळेमागे असलेल्या घरावर दुपारच्या सुमारास त्याने उडी मारून चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी त्याचा पाय घसरला अन् तो खाली कोसळला. यावेळी त्याच्या हाताचा स्पर्श अति उच्चदाबाच्या वीजतारेला झाल्याने विजेचा शॉक बसून तो दूरवर फेकला गेला. त्याचा हात गंभीररीत्या भाजला आणि भावेश बेशुद्ध पडला. या घटनेने परिसरात धावपळ उडाली. रहिवाशांची गर्दी जमली होती. तातडीने त्यास त्याचे वडील संजय गांगुर्डे यांनी रहिवाशांच्या मदतीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 10, 2026 02:47:49
Nashik, Maharashtra:शिक्षण संस्थेला ३८ लाखांचा गंडा...\nनाशिक\nकंपनीचे बनावट कागदपत्र, ई-मेल आणि आयडी वापरून स्वतः कंपनीचा संचालक असल्याचे भासवत कंपनीची ३८ लाखांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या सहायक टेरिटरी मॅनेजरला अटक करण्यात आली. नरेंद्र चांदकुमार पहिलजानीअसे या संशयिताचे नाव असून त्याच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. विवा एज्युरेशन कंपनीत सहायक व्यवस्थापक म्हणून कामाला असलेला संशयित पहिलजानी कंपनीचे विक्री व्यवस्थापन, ग्राहक संबंध राखणे आणि कंपनीच्या वतीने देयक गोळा करणे आदी महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली होती. संशयिताने नाशिकमधील विविध शाळांमध्ये कंपनीच्या पुस्तके मार्केटिंग करून ऑर्डर मिळवली. ऑर्डरप्रमाणे कंपनीकडून पुस्तके घेत संबंधित शाळांना पुरवठा करून बिल घेण्याचे काम तो करत होता. यातच त्याने फसवणूक केली असून पंचवटी पोलिसांनी दीड महिन्यांनंतर या संशयिताला अटक केली
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 10, 2026 02:46:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:कामकाजातील दिरंगाई, अडथळे, वागणूक यासारख्या तक्रारी नागरिकांना थेट प्रशासनापर्यंत पोहोचवता याव्यात, यासाठी छत्रपती संभाजी नगरचे  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपक्रम हाती घेतला होता. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, उपविभागीय कार्यालयात तक्रार पेटी व क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली. या उपक्रमाची दखल शासनाने घेतली. आता ही नागरिक अभिप्राय प्रणाली सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात लागू करण्याचा शासन आदेश  शासनाने जारी केला आहे. जून २०२३ पासून जिल्ह्यात हा उपक्रम सुरू आहे. नागरिकांना आलेला अनुभव, तक्रारी वा सूचना थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी प्रत्येक कार्यालयात दर्शनी ठिकाणी ही पेटी लावण्यात आलेली होती...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 10, 2026 02:35:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बारावीची परीक्षा आज पासून सुरू होत आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी वर्ग खोल्यांत सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आले आहेत, विभागातील केंद्र असलेल्या ९९७ वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नव्हते ,  सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. यावर उपाय म्हणून किमान परीक्षेपुरते सीसीटीव्ही कॅमेरे भाडेतत्वावर घेऊन बसवा, असा सल्ला शाळांना देण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी sगळ्यांना करायची आहे, अन्यथा बोर्डाकडून कारवाई करण्यात येईल... कॉपीमुक्त वातावरणात पेपर व्हावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथक नियुक्ती केली. त्याचबरोबरच वर्ग खोल्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. वर्ग खोल्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत, त्यांना पुढील वर्षी परीक्षा केंद्र दिले जाणार नाही. शिवाय शाळा मान्यता आणि मंडळ मान्यताही रद्द केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 10, 2026 02:33:14
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 10, 2026 02:31:10
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शिवसेनाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने ६३ पैकी २३ जि.प सदस्य निवडून आणले आहेत. मात्र जिल्ह्यात मोठा भाऊ होऊनही जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच होईल, असे भाजपचे नेते स्पष्ट सांगू शकत नाहीत. शिंदेसेनेच्या नेत्यांनी निवडणूक होताच अडीच वर्षांचा फॉर्म्युला समोर केला असे कळतेय, मात्र तूर्तास वरिष्ठ नेते अध्यक्षपदावर निर्णय घेतील, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे. मनपा निवडणुकीत भाजपला ११५ पैकी ५७ जागा मिळाल्या तर शिंदेसेनेला केवळ १३ जागांवर समाधान मानावे लागले. असे असताना भाजपने शिंदेसेनेचा उपमहापौर केला. याची परतफेड शिंदेसेनेला करावी लागेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे महायुती होईल अशी दाट शक्यता आहे. मात्र अजून स्पष्टता नाही.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 10, 2026 02:17:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:फॉर्म भरतानाचे 6 तारखेचे दुपारी 3 वाजताची विसुअल्स वापरा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ११ वाजता महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे... महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे त्यात भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने निवडीची फक्त औपचारिकता होणार आहे.. एमआयएम ने महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार उभे केले आहेत मात्र संख्याबळ त्यांच्या बाजूने नाही त्यामुळं एमआयएमने माघार घेतली तर निवडणूक बिनविरोध होईल अन्यथा भाजपसाठी निवडीची औपचारिकता पार पडेल... महापालिकेतील पक्षीय बलाबल भाजप ५७ एमआयएम ३३ शिवसेना १३ उद्धवसेना ६ वंचित बहुजन आघाडी ४ काँग्रेस १ राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) १
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 10, 2026 02:00:59
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 10, 2026 01:32:29
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 09, 2026 17:31:31
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 09, 2026 15:47:01
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या जामखेड शहरात एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणारी नृत्यांगना गायत्री तुषार सावंत हिच्यावर तरुणाने कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. राहुल अशोक कचरे असं आरोपीचे नाव असून तो बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील आहे. फोनवर बोलत नाहीस, नंबर ब्लॉक का केला, या रागातून राहुल कचरे या तरुणाने गायत्री सावंत या नृत्यांगनेवर मध्यरात्री कोयत्याने हल्ला केला. आरोपीने बोटांवर, हातावर आणि डोक्यावर वार केल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 09, 2026 15:10:55
Oros, Maharashtra:तळकोकणात महायुतीचा वरचष्मा कोकणातील जनतेने ठाकरेंना नाकारले ?? सिंधुदुर्गात राणेनी राखला गड तर रत्नागिरीत सामंतांचा करिश्मा कायम अँकर --- जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आतां हाती आलेत. या निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा पाहायला मिळालाय. तळकोकणात महायुतीने ठाकरे सेनेचा सुकडा साफ करत आपला किल्ला अभेद्य ठेवलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद 50 जागा जिंकत महायुतीने 41 जागा जिंकली, राणे बंधूणी आपला गड कायम राखलाय तर रत्नागिरी जिल्ह्यात 56 पैकी 44 जागांवर महायुतीने विजय मिळवलाय. कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असं आपण अनेक वर्ष ऐकत आलोय आणि अनुभवलंय देखील.. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि कोकण यांच अनेक वर्षांपासून नातं सर्वश्रुत आहे. मात्र याच कोकणातील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकीत चक्क नाकारल्याच चित्र आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद मध्ये ठाकरे सेनेला केवळ 3 जागा तर रत्नागिरीत केवळ 6 जागा मिळाल्या. या निवडणुकीत आपले अस्तित्व राखण्यात अपयशी ठरलेल्या माजी आमदार वैभव नाईक यांनी हि निवडणूक पैसा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशी असल्याचे सांगत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. निवडणूक निकालाच्या पूर्वीच आपला करिष्मा दाखवत पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा परिषदच्या 8 आणि पंचायत समितीच्या 17 जागा बिनविरोध जिंकून विरोधकांना शहा दिला होता. त्यानंतर त्यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखत विजय प्राप्त केलाय. विरोधकांना तोंडावर आपटणे म्हणजे काय असते आणि धूळ चारणे म्हणजे काय असते ते बघायचं असेल तर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल पाहावा असा उपरोधक टोला लागवत मंत्री नितेश राणे यांनी वोरोधकांच्या जखमेवर मीठ चोळलंय. कुडाळ मालवण मतदार संघात माजी आमदार वैभव नाईक यांना धोबीपचाड करणाऱ्या आमदार निलेश राणे यांनी महायुतीच्या विजयात मोलाचा वाटा उचललाय. नगरपंचायत निवडणुकीत आमनेसामने असलेल्या राणे बंधूनी जिल्हा परिषद ची निवड एकत्र लढत नारायण राणे यांनी तब्बल 27 वर्ष अधिराज्य गाजवलेल्या जिल्हा परिषदवर आपला करिष्मा कायम ठेवला विरोधकांनी सुरवातीच मैदान सोडले असल्याचा आरोप करत निलेश राणेनी जनतेचे आभार मानले. नितेश राणे मंत्री यांनी सिंधुदुर्गात 8 जिल्हा परिषद आणि 17 पंचायत समिती जागा बिनविरोध जिंकून विरोधकांना शहा दिला. कुडाळ मालवण मतदार संघात माजी आमदार वैभव नाईक यांना धोबीपचाड करणाऱ्या आमदार निलेश राणे यांनी महायुतीच्या विजयात मोलाचा वाटा उचललाय. नगरपंचायत निवडणुकीत आमनेसामने असलेल्या राणे बंधूनी जिल्हा परिषद ची निवड एकत्र लढत नारायण राणे यांनी तब्बल 27 वर्ष अधिराज्य गाजवलेल्या जिल्हा परिषदवर आपला करिष्मा कायम ठेवला विरोधकांनी सुरवातीच मैदान सोडले असल्याचा आरोप करत निलेश राणेनी जनतेचे आभार मानले. रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांनी 56 पैकी 40 जागा जिंकत आपला दबदबा कायम राखलाय.. तर विरोधकांचे पानिपत झाल्याचे टोला लागवत खरी शिवसेना काय असते तेदाखवून दिले असल्याचे सांगितले end तळकोकणात महायुतीला प्रचंड यश मिळालय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वर आता महायुतीचा भगवा फडकलाय मात्र या संपूर्ण निवडणुकीत झालेल्या पराभवाचे ठाकरे सेना आत्मचिंतन करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करतील की ठेविले अनंते तैसेचि रहावे अस म्हणतं शांत बसतील
0
comment0
Report
Advertisement
Back to top