Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

शिक्रापुर के मलठण फाटा पर ट्रक में भीषण आग, महामार्ग पर जाम

HCHEMANT CHAPUDE
Feb 10, 2026 02:31:59
Shirur, Maharashtra
पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर जवळील मलठण फाटा येथे रात्री भंगाराणे भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली,या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झालाय,आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न केले.आगीमुळे महामार्गावर मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VNVishal Nagesh More
Feb 10, 2026 04:21:04
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 10, 2026 04:19:52
Nanded, Maharashtra:नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली. काही अकाउंट वरून फेसबुक वर या पोस्ट व्हायरल झाल्या. पण ह्या पोस्ट म्हणजे भाजपकडून केल्या जाणाऱ्या अफवा असून जनतेमध्ये काँग्रेसच्या खासदारांबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. मी काँग्रेसचा पाईक असून सदैव काँग्रेससोबत एकनिष्ठ राहीन, कोणत्याही पक्षात जाणार नाही असे रवींद्र चव्हाण म्हणाले. भाजपचे जे नांदेडचे नेते आहेत त्यांचे कार्यकर्ते ह्या खोट्या पोस्ट पसरवत असल्याचा आरोप करत त्यांनी खासदार अशोक चव्हाण्याकडे अंगुली निर्देशक केला. या पोस्ट पसरवनाऱ्या नांवावर करावाई कारण्याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षकांनाकडे लेखी तक्रार दाखल केली.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 10, 2026 04:17:52
Shirdi, Maharashtra:समृद्धी महामार्गावर मध्यरात्री ट्रक आणि टॅंकरची धडक.... अपघातानंतर टँकरने घेतला पेट.... अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर समृद्धी महामार्गाचे चेनेज 532 जवळ टेंकरने पेट घेतला.... समृद्धी महामार्गावर मध्यरात्री तासभर वाहतूक बंद...... कोपरगाव तालुक्यातील देर्डे आणि सिन्नर तालुक्यातील पाथरे दरम्यानची घटना..... टँकर मध्ये डिझेल असल्याने होता मोठा धोका... टँकर मधील चालकाचा होरपळून मृत्यू... कोपरगाव नगरपरिषद अग्निशमन दल कोल्हे कारखाना गणेश मंडळ आणि समृद्धी महामार्गाचे रेस्क्यु पथक घटनास्थळी होत केली जिगरबाज कामगिरी... तासभरात आग आटोक्यात आणून वाहतूक केली सुरळीत.... टँकर मध्ये अजून कोणी होतं का अधिकचा तपास सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसांकडून सुरू... Trक मधील चालक जखमी....
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 10, 2026 04:04:50
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 10, 2026 04:04:30
Washim, Maharashtra:इयत्ता बारावीची वार्षिक परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेळापत्रकानुसार आजपासून सुरवात होणार आहे. वाशीम जिल्ह्यात यंदा २२,३६९ विद्यार्थी ७४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक होण्यासाठी ८३० वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच २८ संवेदनशील परीक्षा केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त,भरारी पथके आणि विशेष देखरेख ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी,यासाठी प्रशासन आणि शिक्षण विभाग सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 10, 2026 04:02:24
Dhule, Maharashtra:बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. जिल्ह्यातील 46 परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही, झूम मीटिंग तसेच ड्रोन ची नजर राहणार असल्याची माहिती धुळे जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकूण 24 हजार 865 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 100 टक्के परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त तसेच भयमुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूमची निर्मिती करण्यात आली असून या वॉर रूमच्या माध्यमातून प्रशासन परीक्षा केंद्रांवर गैर प्रकारांवर लक्ष ठेवणार आहे. जिल्हास्तरीय दक्षता समित्या आणि भरारी पथके यांच्या माध्यमातून परीक्षेतील गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 10, 2026 03:49:16
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीने तब्बल वीस जागा मिळवत ग्रामीण भागात राष्ट्रवादीची पकड असल्याचे महायुतीमध्ये सिद्ध केले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष विराजमान होणार हे नक्की ठरले आहे. जिल्हा परिषद आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी खुले असल्याने अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अत्यंत जवळ असणाऱ्या फराकटे घराण्यातील शोभा फराकटे ह्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत.. फराकटे ह्या बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघातून विजयी झाल्या आहेत. याचबरोबर शैलेजा पाटील, विद्या पाटील, शिल्पा खोत आणि पूजा पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 10, 2026 03:47:33
Pimpri-Chinchwad, Maharashtra:आळंदीतील संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मार्बल मूर्ती जर्मनीकडे रवाना झाल्या आहेत. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर जर्मनीतील श्री विठ्ठलधाम ख्रिसचेम या ठिकाणी दोन्ही संतांच्या मूर्तिंची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राजस्थानातील ‘जैन श्वेतांबर मूर्तिकला केंद्रात’ दोन फूट उंचीच्या या आकर्षक मार्बल मूर्ती तयार करण्यात आल्या असून, या मूर्त्या मकराना व्हाईट मार्बलपासून साकारण्यात आल्या आहेत. भगवत धर्माच प्रचार आणि प्रसार व्हावा या साठी आळंदी-देहू संस्थान आणि जर्मनीतील मंदिर प्रशासनाच्या समन्वयातून हा उपक्रम साकार झालाय.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 10, 2026 03:45:20
Nagpur, Maharashtra:नागपूरात महापौर आणि उपमहापौर पदग्रहण सोहळ्यातील बॅकड्रॉपवर असलेल्या फोटोंमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचा फोटो झळाकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काल महापालिकेत महापौर आणि उपमहापौर यांचा पदग्रहण सोहळा होता. यावेळी तिथे लावण्यात आलेल्या बॅकड्रॉपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यासह महायुतीतिल नेते आणि भाजपाच्या नागपुरातील आमदारांचे फोटो लागले होते... याच रांगेत काँग्रेसच्या आमदार विकास ठाकरे यांचा फोटो कसा आला याची आता चर्चा होतेय. आमदार असल्यामुळे ठाकरेंचा फोटो लागला असेल तर मग काँग्रेसचे शहरातील दुसरे आमदार नितीन राऊत यांचा फोटो तिथे नव्हता... त्यामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बॅनरवर काँग्रेसचे ठाकरे कसे याची सर्वत्र चर्चा होतेय
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 10, 2026 03:18:02
Nashik, Maharashtra:नग्न फोटो व्हायरलची धमकी; खंडणीची मागणी नग्नावस्थेत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप करत धर्मांतरास नकार दिल्यास पंधरा लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात संशयित अब्दुल जलालउद्दीन शेख व त्याची गुरू यांच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....पंचवटीतील गजानन चौक परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय युवकाची २०२० मध्ये एका तरूणाच्या माध्यमातून किन्नरसारखा वेश परिधान केलेल्या पार्वतीशी ओळख झाली.संशयिताने युवकाचे अश्लिल फोटो मोबाईलमध्ये काढून घेतले. काही दिवसांनी तक्रारदारास संशयित पार्वती नसून, अब्दुल जलालउद्दीन शेख असल्याचे समजले. त्यामुळे संपर्क कमी केल्यानंतर संशयिताने आत्महत्येची धमकी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून संशयिताने मोबाईलमधील अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच पैसे न दिल्यास धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला आणि नकार दिल्यास युवक व त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे...
0
comment0
Report
Advertisement
Back to top