Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411018
पुणे कोर्ट में शितल तेजवानी के आज हाजिर होने पर बहस की तैयारी
KPKAILAS PURI
Dec 04, 2025 06:00:11
Pimpri-Chinchwad, Maharashtra
झी 24 तास मे उघड केलेल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरनी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या शितल तेजवानीला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. न्यायालयात नेमका काय युक्तिवाद केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. याच संदर्भात माहिती सांगताहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Dec 04, 2025 06:48:36
Chandrapur, Maharashtra:टायटल:--चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात लाखोंचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त, गोडाउनमध्ये ठेवून वाहनातून होत होती तस्करी, वरोरा पोलिसांची कारवाई अँकर:--राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू वरोरा येथील एका गोडाउनमध्ये ठेवल्याची तसेच वाहनातून त्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. शिवसेनेचे नेते मुकेश जीवतोडे आणि चंद्रपूर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी पुढाकार घेऊन सुगंधित तंबाखू पोलिसांना पकडून दिला. वरोरा तालुका व शहर परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती जीवतोडे आणि मत्ते यांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी गोडाउनवर धाड घालून सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. यात २० ते २५ लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. एका तंबाखूविक्रेत्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू पोलिसांनी हस्तगत केला. पोलिसांनी साठा जप्त करून अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी पाचारण केले.
26
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 04, 2025 06:34:49
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या मोरवा विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी १७ कोटींच्या निधीला मान्यता, विमनतळ आधुनिकीकरण आणि सुरक्षाविषयक सुविधा उभारणीचा मार्ग मोकळा अँकर:--आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या मोरवा विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी १७ कोटींच्या निधीला मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तातडीने लक्ष घातल्याने आधुनिकीकरण आणि सुरक्षाविषयक सुविधा उभारणीचा मार्ग मोकळा झालाय. मोरवा विमानतळ परिसरात वैमानिक प्रशिक्षण संस्था म्हणून नागपूर उडान क्लब, भारत सरकारच्या नागरी विमान संचालनालयाच्या (DGCA) मान्यतेनुसार कार्यरत आहे. या ठिकाणी सुरक्षित, आधुनिक आणि नियमांनुसार विमान संचालनासाठी सुरक्षाविषयक व मूलभूत सुविधांची उभारणी अनिवार्य आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना याबाबत निवेदन सादर केले. परिमिती तपासणी मार्गाचे बांधकाम, विमानतळाभोवती उपलब्ध संरक्षण भिंतीची उंची वाढविणे, हँगर व फ्युएल स्टोरेजपर्यंत जाण्यासाठी सुरक्षित संपर्क मार्ग, विमानतळाच्या चारही दिशांना सुरक्षा देखरेख टॉवरचे बांधकाम, मुख्य इमारतीसमोरील भागात हाय-मास्ट प्रकाशयोजना, स्वागत द्वार, गार्ड रूम, पार्किंग व्यवस्था आणि रेस्ट हाऊस उभारणी या सर्व कामांसाठी हा निधी खर्च होणार आहे.
104
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 04, 2025 06:15:40
88
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 04, 2025 06:00:30
39
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 04, 2025 05:48:44
Kolhapur, Maharashtra:सह्याद्रीच्या चांदोली अभयारण्यात वनविभागाने तब्बल पंधरा दिवसांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणलेली ‘चंदा’ ही वाघीण आता मुक्तपणे संपूर्ण परिसरात वावरताना दिसत आहे. पुनर्वसित केलेल्या या वाघिणीने नव्या अधिवासाशी झपाट्याने जुळवून घेतल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत चंदा वाघीण चांदोली अभयारण्याच्या सीमा रेषेबाहेरही फिरताना दिसली आहे. नुकतेच कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील उदगीर जंगल परिसरात तिने नागरिकांना प्रत्यक्ष दर्शन दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी सुरक्षित अंतरावरून टिपलेली ही दृश्ये पाहून वन्यजीवप्रेमींना आनंद व्यक्त केला आहे. पण चंदा वाघीण गावाच्या वेशीवरून फेरफटका मारत असल्याने ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावे अस आवाहन वनविभागाने केले आहे.
186
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 04, 2025 05:15:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. विद्यार्थ्यांकडून घेतलेली परीक्षा शुल्क महाविद्यालयाने विद्यापीठात भरलीच नसल्याचे समोर आल्याने गोधळ उडाला आहे.या महाविद्यालयाच्या चुकीमुळे १३३ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आज सकाळी १० वाजता पेपर असून, विद्यार्थ्यांनी कॉलेज समोर मोठी गर्दी केली आहे. संभाजीनगरच्या श्री साई कॉलेज ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट मधील १३३ विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट मिळालेले नव्हते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात धाव घेतली असता, तुमच्या महाविद्यालयाने तुमचे शुल्कच भरले नसल्याने हॉलतिकीट मिळाले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. आता हे सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या गेटवर जमा झाले आहेत.
198
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 04, 2025 04:20:07
175
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 04, 2025 04:19:52
Khed, Maharashtra:पुण्याच्या राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या मतदानांनंतर मतदारांची मतं सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित झालाय राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणूकीचे निकाल २० दिवसांनंतर लागणार असुन मतदानाच्या EVM मशिन राजगुरुनगर जवळी क्रिडा संकुल इमारतीत ठेवण्यात आले असुन या ठिकाणी पोलीसांसह सीआरपीएफचे जवान बंदोबस्तासाठी तैनात आहे मात्र evm मशिन ठेवलल्या ठिकाणचे सीसीटिव्हि बाहेर लावण्यात आले नाही तर जँमर ही लावण्यात न आल्याने या ठिकाणी २४ तासांनंतर निवडणूक आयोगाने घालुन दिलेली कामे अपुर्ण असल्याची भावना शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंगेश गुंडाळ आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी सीसीटिव्हि चालु कि बंद हेच समजत नसल्याची शंका उपस्थित केलीय.
147
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 04, 2025 04:18:14
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.रुग्णांचे प्राण वाचवण्या साठी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तिने पुढे येण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.सिकलसेल थॅलेसेमिया, हेमोफिलिया यांसारख्या दुर्मिळ आणि गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना दर महिन्याला नियमित रक्ताची आवश्यकता असते.याशिवाय प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्यास किंवा अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांनाही तत्काळ रक्ताची गरज भासते.रक्त वेळेवर न मिळाल्यास रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो,त्यामुळे जिल्ह्यातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने पुढे येण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.
130
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 04, 2025 04:17:55
Junnar, Pune, Maharashtra:किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला बिबट्यांचं दर्शन. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी गडाच्या पायथ्याला बिबट्याचं दर्शन झालंय. एकाचवेळी दोन बिबटे रस्ता ओलांडताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेत. गाडीच्या लाईटमध्ये बिबट्या फारसा थांबत नाही, मात्र एक बिबट्या सुस्तावलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळं एखादी शिकार खाऊन हा बिबट्या आला असेल का? अशी शक्यता वर्तवली जातीये. खरं तर दहा चौरस किलोमीटर क्षेत्रात एक बिबट्या असेल, असं प्रमाण वनविभागाने गृहीत धरलंय. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांत आंबेगाव, शिरुर अन आता पुन्हा जुन्नर मध्ये टोळीनं बिबट्यांचा मुक्तसंचार दिसून येतोय. त्यामुळं बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीये, हे पुन्हा-पुन्हा अधोरेखित होतंय. सरकार मात्र एका पाठोपाठ एक नवनवे आश्वासन देतंय, त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.
169
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 04, 2025 04:15:33
Amravati, Maharashtra:धक्कादायक अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात 6 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; 55 वर्षीय आरोपी अटक, परिसरात खळबळ जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेतील ही घटना असून शाळेत 6 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राजू मुल्ला झहरुद्दीन मुल्ला वय वर्ष 55 याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. परवा दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास पीडित चिमुरडीला त्या नरामाधामाने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नेऊन तिच्यासोबत हे कृत्य केले. पीडित मुलीने घरी जाऊन आई-वडीलांना माहिती दिल्यानंतर त्यांनी शाळेत जाऊन CCTV फुटेज तपासले. त्यात संशयिताची हालचाल दिसल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने तक्रार दाखल केली. चांदूर बाजार पोलिसांनी तातडीची कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
126
comment0
Report
Advertisement
Back to top