423109
अत्याचार के सभी मामलों में हिंदू पीड़ित, आरोपी जिहादी: संग्राम जगताप की टिप्पणी उथल-पुथल
Shirdi, Maharashtra:अत्याचाराच्या शंभर केसेसमध्ये शंभर महिला हिंदू सापडतात आणि सर्व आरोपी जिहादी असतात.. आपल्यातीलच काही मानसिक खतना झालेले लोक आरोपींना पाठीशी घालतात असे वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी केलंय.. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.. यावेळी बोलताना संग्राम जगताप यांनी पुन्हा आपल्या शैलीत जोरदार टीका केली आहे.. जे हिरवे साप फणा काढतील त्यांना ठेचण्याची वेळ आली आहे.. या लोकांना वेळोवेळी माफ करण्याचे पाप आमच्यासकट अनेकांनी केले मात्र आता प्रायश्चित करण्याची वेळ आली आहे.. असे देखील आमदार जगताप यांनी म्हटलंय.. आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी अजित पवार0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
kolhapur जिले में बारिश ने फसलें डगमगा दीं; मूँगफली, सोयाबीन और चावल सबसे अधिक प्रभावित
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाने दडी मारल्यामुळे हातात आल्या अनेक पिक करपल्यासारखे झाले आहेत. भुईमूग, सोयाबीन आणि भात पिकांना याचा सर्वाधिक फटका बसताना दिसत आहे. शिवारात ऐन बी धरणीच्या कालावधीत पावसाने उघडीत दिल्याने ही पिकं जगवायची कशी असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गिर्गावमधील बाजीराव पाटील यांनी दीडल एकरात लावलेल्या सोयाबीनची देखील तीच परिस्थिती आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
वैजी में प्रतीक बैकर ने घर पर रामेश्वर ज्योतिर्लिंग की पर्यावरण-प्रिय प्रतिकृति तैयार की
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी चिपळूण तालुक्यातील वैजी येथील प्रतीक बैकर यांनी आपल्या घरातील बाप्पासाठी एक अनोखा आणि पर्यावरणपूरक देखावा सादर केला आहे. प्रतीक यांनी थेट बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या दक्षिण भारतातील 'रामेश्वर ज्योतिर्लिंग' मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आपल्या घरात साकारली आहे. सध्या गणेशोत्सवात थर्माकोल आणि प्लास्टिकच्या अतिवापरावर मर्यादा येत असताना, प्रतीक बैकर यांनी पूर्णपणे पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करून ही कलाकृती उभारली आहे. बैकर यांच्या या पर्यावरणपूरक संकल्पनेचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.0
0
Report
गणेशोत्सव के बाद पर्यावरण-अनुकूल मॉडल छात्रों के लिए ज्ञानवर्धक बना रहा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक देखावा आता विद्यार्थ्यांच्या ज्ञानासाठी! आधुनिक ‘Sanitation Resource Park’चा पर्यावरणपूरक देखावा; विसर्जनानंतर शाळेला सुपूर्द गणेशोत्सव संपला... देखावे विसर्जित झाले... पण एक देखावा मात्र विद्यार्थ्यांच्या ज्ञानासाठी कायमचा जपला गेलाय! ओंकार मुकुंद काणे यांनी गणेशोत्सवात आधुनिक ‘Sanitation Resource Park’ या संकल्पनेवर पर्यावरणपूरक देखावा साकारला होता. उत्सवानंतर हा देखावा त्यांनी स्वतः शिकलेल्या युनायटेड इंग्लिश स्कूलला सुपूर्द केला. स्वच्छता, मलनिस्सारण आणि कचरा व्यवस्थापनाची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समजावी, यासाठी हा देखावा शाळेत खुला ठेवण्यात आला आहे. उत्सवातून साकारलेली संकल्पना शिक्षण आणि पर्यावरण जनजागृतीसाठी वापरण्याचा हा अभिनव उपक्रम सध्या कौतुकाचा विषय ठरतोय.0
0
Report
Advertisement
बीड़ में भीषण आग; दमकल की गाड़ी बंद, छह दुकानें जलीं, व्यापारी नाराज़
Beed, Maharashtra:बीड़मध्ये अग्नितांडव.. अग्निशामक बंब बंद पडला; सहा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी.. वडापाव दुकानासह कापड दुकानांचे मोठे नुकसान; व्यापाऱ्यांत संताप पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. अमिरोद्दीन मणियार यांच्या वडापाव दुकानाचे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेजारील दुकानातील शेळ्याही आगीत भाजल्या. बाजूलाच असलेल्या दोन कापड दुकानांसह अन्य दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील आहे. आगीची माहिती मिळूनही अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचण्यास सुमारे दीड तासाचा विलंब झाला. त्यातच आलेला बंब बंद पडल्याने आग विझविण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाली. दुसरा बंब येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले आणि सर्व दुकाने जळून खाक झाली. परिसरात धुराचे लोट पसरल्याने बचावकार्यही अडचणीचे ठरले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नगरपालिका के सर्वसाधारण सभेत नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी अग्निशामक दलाच्या वाहनांच्या स्थितीबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र त्यावर अद्याप प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. अग्निशामक दलाची वाहने वेळेत व सुस्थितीत उपलब्ध झाली असती, तर व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान टळले असते. यापूर्वी देखील सरकीच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. मात्र नेहमीप्रमाणे अग्निशामक दलाची गाडी आली. परंतु ऐन वेळी गाडी बंद पडल्याने संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले होते. दरम्यान आज लागलेल्या भीषण आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. साऊंड बाईट: अमर नाईकवाडे, नगरसेवक0
0
Report
येवला में छगन भुजबळ के विकास कार्य गणराय के समक्ष प्रस्तुत
Yeola, Maharashtra:राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या नाशिकच्या येवल्यात त्यांनी केलेल्या विकास कामांचा देखावा गायकवाड कुटुंब यांनी आपल्या घरगुती गणरायापुढे सादर केला आहे अंगणगाव येथील नितीन गायकवाड व त्यांची कन्या समृद्धी नितीन गायकवाड यांनी येवला ते पिंपळस रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण, मांजरपाडा प्रकल्प, येवला पाणीपुरवठा योजना, एमआयडीसी मधील मका प्रक्रिया उद्योग याची प्रतिकृती गणराया पुढे स्थापीत केली आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
6 फुट की इको-फ्रेंडली गणेश मूर्ति के साथ रहेजा भारवाणी मंडळ का पर्यावरणीय गणेशोत्सव
Kalyan, Maharashtra:रहेजा भारवानी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव; 6 फुटी इको-फ्रेंडली मूर्तीची स्थापना कल्याण पश्चिम येथील रहेजा भारवनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. मंडळाचे हे २२ वे वर्ष असून दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करण्याची परंपरा मंडळाने जपली आहे. यंदाही या परंपरेला कायम ठेवत सहा फूट उंचीची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती मंडळात विराजमान करण्यात आली आहे. गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करून मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांकडून मनोभावे पूजा-अर्चा करण्यात येत आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि गणेशोत्सवाची धार्मिक परंपरा यांचा सुंदर मेळ साधत मंडळाने यंदाही पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा संदेश दिला आहे. गणेशोत्सवाच्या काळात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहत आहेत. पर्यावरणपूरक मूर्तीच्या माध्यमातून ‘उत्सवही आनंदाचा आणि पर्यावरणाचीही काळजी’ असा संदेश मंडळाच्या वतीने देण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के मिरकरवाड़ा बंदर में मछुआ विभाग की कार्रवाई फिर शुरू
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- मिरकरवाडा बंदरात पुन्हा एकदा मत्स्य विभागाची कारवाई सुरू मिरकरवाडा बंदरातील विना वापर मच्छीमारी नौका हटवण्याचे काम सुरू मत्स्य विभागाची पोलीस संरक्षणात कारवाई सुरू मिरकरवाडा बंदरात अनेक मच्छीमारी नौका अनेक वर्ष विना वापर पडून मच्छीमार नौका मालकांना नोटीस देऊ नये कुठली कारवाई नसल्याने मत्स्य विभागाकडून कारवाई 30 मच्छीमार नौका यांना मत्स्य विभागांना दिली होती नोटीस मिरकर वाडा बंदरात जानेवारी महिन्यात अनधिकृत झोपडपट्टी हटवण्याची कारवाईनंतर आता पुन्हा एकदा कारवाई0
0
Report
अमरावती में 57 हजार किसानों को नया लोन नहीं मिला, सिर्फ 3,372 को पिक कर्ज
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यातील 57 हजार शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यास बँकांचा नकार; केवळ 3 हजार 372 शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप. अंबरावती जिल्ह्यात 57 हजार शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यास बँकांनी नकार दिल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे; कर्जमाफीमुळे सात-बारा कोरा झालेल्या खातेदारांना नव्याने पीककर्ज मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या असून कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज देण्याचे आदेश शासनाने दिले; तरीही बँकांकडून केवळ 3 हजार 372 शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे जिल्हा बँकेला निर्देश देण्यात आले असू न बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक सुरू आहे.0
0
Report
नाशिक में सूखे के बीच झेंडू फूल 5–7 रुपए किलो, किसान मायूस
Chandvad, Maharashtra:अँकर-नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकरी गणेशोत्सवपूर्वी झेंडू फुल शेतीचे उत्पादन घेतात. सुरवातीला गणेशोत्सवात फुलांची मागणी असते त्यानंतर नवरात्र, दिवाळी पर्यंत फुले बाजारात विक्रीला येत असतात. यंदा नाशिक जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर झेंडू फुल शेतीचे उत्पादन घेतले मात्र सध्या या फुलांना जिल्ह्यातील बाजार पेठे सह गुजरात राज्यात मागणी नसून फुलाला अवघा 5 ते 7 रुपये किलोचा दर मिळत. आधीच पावसाने मका, बाजरी हातची गेलीय, त्यात 2 पैसे हाती लागतील या आशेवर असलेल्या झेंडू फुल शेती उत्पादक शेतकऱ्यांची सध्या मिळत असलेल्या भावामुळे पदरी निराशा पडलीय.0
0
Report
Advertisement
कृषिमंत्री भरणे पुणे में drought स्थिति का आकलन करेगा, किसान बांध पर संवाद करेंगे
Rui, Maharashtra:कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज पुणे जिल्ह्यातील दुष्काळ स्थितीचा आढावा घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर संवाद साधणार आहेत. दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथून सकाळी साडेदहा वाजल्यापासून भरणे यांच्या दुष्काळ दौऱ्याला सुरुवात होणार आहे. दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा, बारामती तालुक्यातील मोरगाव, कुर्टी आणि पुरंदर तालुक्यातील नावळी, कोळविहिरे या गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषिमंत्री भरणे शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि दुष्काळ स्थितीचा आढावा घेतील. यावेळी त्यांच्यासोबत पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे देखील उपस्थित असण्याची शक्यता आहे.0
0
Report
बारामती के सुपे में अहिल्यादेवी चौक पर फिर दुर्घटना, सीसीटीवी में कैद
Rui, Maharashtra:बारामतीच्या सुपे येथील अहिल्यादेवी चौकात पुन्हा अपघाताचा थरार पाहायला मिळाला. बंद पडलेली चार चाकी टोचन करून घेऊन जात असताना अचानक चैन तुटली आणि बंद पडलेली गाडी रस्त्यावरून धावून जाऊन एका विजेच्या खांबावर जाऊन आदळली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.0
0
Report
फायनांस कंपनी के कर्मचारी ने खुद लूट की योजना बनाकर पैसे चुराने की साजिश रची, गिरफ्तार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:फायनान्स कंपनीच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच स्वतःच्या लुटीचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या लासूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. फायनान्स कंपनीचा कर्मचारी वसुलीसाठी बाहेर पडला... त्यानंतर काही जणांनी हल्ला करून आपले हात-पाय बांधले आणि रोख रक्कम घेऊन पसार झाल्याचा दावा त्याने केला. याबाबतचा एक व्हीडिओ सुद्धा viral झाला. मात्र, पोलिसांच्या तपासात या संपूर्ण लुटीच्या कटाचा पर्दाफाश झाला. स्वतःच्या मित्रांच्या मदतीने स्वतःलाच बांधून घेत कर्मचाऱ्याने लुटीचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. या गंगापूर पोलिसांनी कारवाई करत फायनान्स कर्मचाऱ्यासह त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे रोख रक्कम हडप करण्यासाठी रचलेला हा ‘स्वतःच्याच लुटीचा प्लॅन’ आता पोलिसांच्या कारवाईमुळे चांगलाच अंगलट आला आहे.0
0
Report
Advertisement
स्पर्धा परीक्षा में असफलता से 23 वर्षीय वैष्णवी पाटील ने आत्महत्या की
Kolhapur, Maharashtra:स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने वैष्णवी पाटील या अवघ्या 23 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असणाऱ्या भामटे या गावात ही घटना उघडकीस आलाॅय. वैष्णवी पाटील गेल्या दोन वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती, याच दरम्यान तिने रेल्वेची परीक्षा दिली होती, या परीक्षेत अवघ्या दोन मार्काने अपयश आल्याने काही दिवसापासून निराश होती. या नैराश्यातून तिने जनावराच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीने बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते, त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली. त्यात वारंवार अपयश आल्याने ती निराश होती. रेल्वेच्या परीक्षेत आपण यश मिळवू असा विश्वास तिला होता , पण अवघ्या दोन मार्कांनी तिची ही संधी हुकली. यामुळे तिने आत्महत्येचे पाऊल उचलल्याच नातेवाईकांनी सांगितले.0
0
Report
वाशिम मानोरा में राजस्थानी जलविहार यात्रा भक्तों की भीड़ ने दिखाया जबरदस्त उत्साह
Washim, Maharashtra:वाशिमच्या मानोरा शहरात राजस्थानी समाजाच्या वतीने जलविहार यात्रेचे आयोजन करण्यात आले. बालाजी मंदिरापासून सुरू झालेली मिरवणूक शहरातून मार्गक्रमण करत अरुणावती नदीकाठी पोहोचली. याठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला नदीपात्रात स्नान घालून पूजा, आरती करण्यात आली. ‘जय कन्हैया लाल की’च्या जयघोषाने नदीकाठ दुमदुमून गेला. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यात्रेत महिला, पुरुष आणि बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.0
0
Report
दुष्काळ के बीच गणेश मूर्तियों का प्रतीकात्मक विसर्जन, दान की पहल पर जोर
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यातील ज्या भागात पाऊस पडला नाही, तेथे गणेश मंडळांनी मोठ्या गणेश मूर्ती बसविल्या असतील तर त्यांनी यावर्षी त्या मूर्तीचे विसर्जन न करता, प्रतीकात्मक विसर्जन करावे, किंवा पुढील वर्षी विसर्जन करावे. तसेच श्रींची मूर्ती दान करण्याची संकल्पना आहे. त्यानुसारही काही निर्णय घ्यावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केले. त्यामुळं गणपती बाप्पाच्या सणाला दुष्काळाचा फटका बसताना दिसतोय...0
0
Report
Advertisement
